uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 143
Підписники
-124 години
-127 днів
-3830 день
Архів дописів
*CMO Maharashtra Tweets:* 🤝 CM Devendra Fadnavis presided over the MoU signing between several departments of the Government of Maharashtra and various organisations to promote skill development across the State. 🤝 MoU 1 ✅Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department And IPE Global Limited Objective of the MoU: Data-driven gender planning to increase women's participation in the workforce 🤝 MoU 2 ✅Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State And National Skill Training Institute, Mumbai Objective of the MoU: To enhance the skills of ITI instructors working in Government and Private ITIs across the State of Maharashtra by imparting training in various categories to upgrade their technical and pedagogical skills with support from NSTI, Mumbai. 🤝 MoU 3 ✅Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State And Shrimad Rajchandra Educational Trust Objective of the MoU: To collaborate for upgradation and transformation of Government Industrial Training Institutes by upgrading infrastructure, curriculum and training facilities to global standards, introducing industry-relevant courses including emerging technologies, enhancing employability, and fostering innovation, entrepreneurship, and environmental and social sustainability practices. 🤝 MoU 4 ✅ Skills, Employment, Entrepreneurship, and Innovation Department And The United Nations Entity for Gender Equality and the Empowerment of Women Objective of the MoU: To support the Government of Maharashtra in strengthening gender-responsive governance and advancing women's economic empowerment through UN programmes on skilling, employment, and entrepreneurship, improving women's access to opportunities for higher education and career pathways in STEM, while providing technical assistance to engender the implementation of the department's initiatives. 🤝 Tripartite Agreement Government of Maharashtra (Home Department) And Sri Sri Rural Development Programme Trust (SSRDP) And Maharashtra State Skill Development Society Objective of the agreement: To conduct training programmes for jail inmates in accordance with the relevant skill development scheme guidelines. Expanding coverage from 12 to 26 prisons. The agreement is for a period of 5 years. Together, these collaborations reflect a comprehensive push to strengthen Maharashtra’s skill ecosystem, including efforts to build instructor capacity, drive institutional transformation, foster inclusive empowerment, and deliver industry-aligned training to build a future-ready workforce. Minister Mangal Prabhat Lodha, representatives of various organisations and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या विविध विभाग आणि संस्थांदरम्यान राज्यभर कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. 🤝 सामंजस्य करार 1 ✅ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग आणि आयपीई ग्लोबल लिमिटेड कराराचा उद्देश : महिलांचा कामकाजातील सहभाग वाढवण्यासाठी डेटा-आधारित लिंगाधारित नियोजन. 🤝 सामंजस्य करार 2 ✅ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NSTI), मुंबई कराराचा उद्देश : महाराष्ट्रातील शासकीय व खासगी आयटीआयमधील प्रशिक्षकांचे तांत्रिक आणि शिकवण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी विविध प्रशिक्षण देणे, तसेच NSTI, मुंबईच्या मदतीने त्यांचा सर्वांगीण विकास करणे. 🤝 सामंजस्य करार 3 ✅ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि श्रीमद राजचंद्र एज्युकेशनल ट्रस्ट कराराचा उद्देश : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (ITI) आधुनिकीकरण व रूपांतरण करण्यासाठी सहकार्य करणे. यामध्ये पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण अधिक चांगले करणे, नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करणे, विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अधिक सक्षम बनवणे तसेच नावीन्य, उद्योजकता आणि पर्यावरण व समाजाचा विचार करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. 🤝 सामंजस्य करार 4 ✅ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग आणि The United Nations Entity for Gender Equality and the Empowerment of Women

CMO Maharashtra Tweets: ‘महा-चतुर’ एआय चॅटबॉट कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेसाठी नवे व्यासपीठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ’महाचतुर एआय चॅटबॉट’मुळे कौशल्य, रोजगार व उद्योजकतेला नवी गती मिळेल. राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर’ एआय चॅटबॉट हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल. भारताची 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील असून ही देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चॅटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सेंटर ऑफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाचतुर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो, जर्मनीचे महावाणिज्यदूत क्रिस्टोफ हॅलियर, रिपब्लिक ऑफ कोरियाचे महावाणिज्यदूत यू डोंगवान आणि फिनलंडचे महावाणिज्यदूत एरिक अफ हेल्स्ट्रॉम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SkillDevelopment

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सर्वात प्रोफेशनल पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र पुलिस दल को देश के सबसे प्रोफेशनल पुलिस बलों में से एक माना जाता है। (महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026 | मुंबई | 27-4-2026) #Maharashtra #PoliceSports #Mumbai

CMO Maharashtra Tweets: अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचा विकास : पर्यटन आणि वारसा संवर्धनाला चालना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन व संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चौंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ₹681 कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत स्मारक परिसरात भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. ‘बॅरेज’ उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे. प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल) आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम व दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित करता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ₹360 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी वन, सार्वजनिक बांधकाम, जलसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोजणी केली असून सीमारेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. चौंडी येथील स्मारकाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने केला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PunyashlokAhilyadeviHolkar

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar Memorial at Chondi to be Developed in a Planned and Comprehensive Manner Chaired a meeting in Mumbai today regarding the Preservation and Conservation Development Plan for the Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar Smruti Sthal at Chondi (Ahilyanagar). The legacy of Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar continues to remain a guiding inspiration. With the objective of inspiring future generations through her life and work, several development initiatives have been undertaken for the holistic development of Chondi village. Directed that Chondi be developed in an inclusive and well-planned manner, with quality infrastructure and facilities to promote tourism. An allocation of ₹681 crore has been made for the comprehensive development of the memorial. The project will include a grand statue, landscaped gardens, riverfront development, a modern museum, an open-air theatre and a tourism facilitation centre. Directed that water management measures be prioritised to ensure a permanent water supply and that the area be developed while maintaining a balance between green spaces and open areas. Legislative Council Chairman Prof Ram Shinde and senior officials were present. #Maharashtra #PunyashlokAhilyadeviHolkar https://x.com/Dev_Fadnavis/status/2048794465440239616?s=20

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the Preservation and Conservation Development Plan for the Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar Smruti Sthal at Chondi, (Ahilyanagar). Legislative Council Chairman Prof Ram Shinde and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन व संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर स्मृति स्थल, चौंडी (अहिल्यानगर) के संरक्षण, संवर्धन एवं विकास योजना के संदर्भ में बैठक। इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕒 3pm | 27-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. ३ वा. | २७-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #PunyashlokAhilyadeviHolkar

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From Service to Sport: Maharashtra Police Lead the Way Delighted to attend the closing ceremony of the '36th Maharashtra State Police Sports Competition 2026' in Mumbai today. This year’s competition, hosted by Mumbai, saw the city secure the Best Team award in both men’s and women’s categories. Police personnel dedicate their lives to maintaining law and order and serving citizens. Amidst these responsibilities, such sporting events hold special significance, promoting fitness, discipline and talent. Maharashtra’s units have consistently excelled at national-level competitions, including the National Level Police Games. Maharashtra Police Force stands as a modern, technologically advanced and highly professional force, recognised across the country. The state’s stature as India’s financial and industrial powerhouse is built on the strong law and order maintained by our police forces. Proud of the dedication, discipline and excellence demonstrated by the Maharashtra Police Force. Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Adv. Ashish Shelar, MoS Dr. Pankaj Bhoyar and other dignitaries were present. #Maharashtra #PoliceSports https://x.com/Dev_Fadnavis/status/2048778622341873931?s=20

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis in the meeting with Joint Parliamentary Committee led by Chairman MP Aparajita Sarangi along with other committee members. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षा खासदार अपराजिता सारंगी आणि समितीच्या इतर सदस्यांसमवेत बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में संयुक्त संसदीय समिति की अध्यक्षा सांसद अपराजिता सारंगी एवं समिति के अन्य सदस्यों के साथ बैठक। 🕧 12.20pm | 27-4-2026📍Mumbai | दु. १२.२० वा. | २७-४-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #JointParliamentaryCommittee

CMO Maharashtra Tweets: कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धे’चे यजमानपद यावेळी मुंबईला मिळाले आणि यजमान संघाने पुरुष व महिला दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट संघांचा पुरस्कार पटकावला, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून, उत्कृष्ट पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाकडे पाहिले जाते, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. तसेच महाराष्ट्र पोलीस दल आधुनिकता व तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. मात्र, येथील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. जिथे कायद्याचे राज्य असते, तिथे समृद्धी येते आणि ते कायद्याचे राज्य टिकवण्याची जबाबदारी पोलीस दलावर असते. म्हणूनच महाराष्ट्र पोलीस दलाचे अभिनंदन. पुढील काळात गुन्हेगारी क्षेत्रातील आव्हानेही बदलत आहेत. सायबर क्राइम, नार्कोटिक्स अशा प्रकारची नवी आव्हाने समोर येत आहेत. अशा वेळी कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्यावर मात करून, सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस दलावर असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PoliceSports

photo content
+2

photo content
+9

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते '36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026' मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 🏆पुरस्कार विजेते संघ:- ✅ फुटबॉल (पुरुष) – नागपूर शहर ✅ बास्केटबॉल (पुरुष) – नाशिक परिक्षेत्र ✅ हँडबॉल (पुरुष) – मुंबई शहर ✅ हॉकी (पुरुष) – कोल्हापूर परिक्षेत्र ✅ बास्केटबॉल (महिला) – नागपूर शहर ✅ व्हॉलीबॉल (महिला) – मुंबई शहर ✅ तायक्वांदो (महिला) – पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 🎯 वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमबाजी स्पर्धा:- ✅ उत्कृष्ट नेमबाज (DYSP ते DIG गट) – गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक फोर्स वन, मुंबई) ✅ उत्कृष्ट नेमबाज (DIG ते DGP गट) – कृष्ण प्रकाश (अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई आणि प्रशिक्षण व खास पथके मुंबई ) इतर पुरस्कार ✅ बेस्ट ॲथलिट (पुरुष) – सचिन नने (राज्य राखीव दल परिक्षेत्र) ✅ बेस्ट ॲथलिट (महिला) – यामिनी ठाकरे (पुणे, पिंपरी चिंचवड) 🥈 उपविजेते संघ:- ✅ महिला सर्वसाधारण– पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ✅ पुरुष सर्वसाधारण– एसआरपीएफ परिक्षेत्र 🏆 सर्वसाधारण विजेते (जनरल चॅम्पिअनशिप): ✅ महिला – मुंबई शहर ✅ पुरुष – मुंबई शहर यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PoliceSports

photo content
+1

photo content
+9