LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
Letsupp | Bulletin
● नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच, 383 घरांमध्ये अळी आढळल्या; या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम
● येत्या दोन दिवसांत सोलापूरला पुण्याप्रमाणेच शिथिलता : पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शहरातील व्यापाऱ्यांची लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
----------------------
● नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी ठाणे, नवी मुंबईतील भूमिपुत्र पुन्हा आक्रमक
● मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीला परवानगी नाही; या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय
● आगामी 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरसकट महाविकास होणार नाही : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक
● पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून हलवण्यास पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माजी विद्यार्थ्यांकडून विरोध
● राज्यात सोमवारी 4,505 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 68 रुग्णांचा मृत्यू; तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
● 45 झोपड्या, सहा मजली इमारतीवर हातोड, ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई
● सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह 15 जणांविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया लवकरच, एनआयएची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात माहिती
● भारतीय पुरूष, महिला संघाचं जोरदार स्वागत, विमानतळापासून हाॅटेलपर्यंत जंगी मिरवणूक; दोन्ही टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं
To know more click here
https://letsup.app.link/TapI1REZAib
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार
● राज्य सरकारविरोधात रंगकर्मीचे आज राज्यव्यापी आंदोलन; कोरोनाकाळात कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने रंगकर्मीवर आली उपासमारीची वेळ
● मुंबईत कोरोना मृत्यूंमध्ये २४ टक्क्यांनी घट; शहरात प्रतिदिन रुग्णसंख्याही ५०० पेक्षा कमी झाली, तर रविवारी धारावीत देखील शून्य कोरोना रुग्णांची नोंद
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी खटल्यातील आरोपींच्या सुटकेला राज्य सरकार आव्हान देणार; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची माहिती
● कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिनच्या मिश्र मात्रा जास्त परिणामकारक; ‘आयसीएमआर’च्या अभ्यासातील निरीक्षणे
● देशात उपचाराधीन कोरोनाच्या रुग्ण संख्येत ५ हजारांनी घट; गेल्या २४ तासांत ३९ हजार कोरोनाबाधित; तर ४३ हजार रुग्णांची कोरोनावर मात
● टोकियो ऑलिम्पिकचा समारोप; पुढील स्पर्धा तीन वर्षांनी पॅरिसमध्ये होणार
● आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरण : पी चिदंबरम यांच्याविरोधातील सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात होणार सुनावणी
● काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर लाॅक केल्यावरून काॅंग्रेस संतप्त; केंद्र सरकारने दबाव टाकल्याचा आराेप
● काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले; मोदीस्तुतीमुळे काँग्रेस नेते पडले बुचकळ्यात
To know more click here
https://letsup.app.link/9YNSO3elzib
6 624
MPSC उमेदवारांची सुधारित यादी वादाच्या भोवर्यात, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
LetsUpp l Trending
📚 राज्य सरकारनं एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी नुकतीच जाहीर केलेली सुधारीत यादी वादाच्या भोवर्यात अडण्याची शक्यता आहे. या यादीला आक्षेप घेणार्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
👉 न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं ही यादी पुढील सुनावणीपर्यंत कार्यन्वित करू नये, असे निर्देश राज्य सरकारला देत या याचिकेची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.
💁♀️ राज्य सरकारनं एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी 23 जुलै रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली. त्यांनतर 26 जुलैला सुधारत यादी जाहिर केली. मात्र सुधारीत यादीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं वगळण्यात आल्यानं या यादीला आक्षेप घेत गौरव गणेशदास डागा आणि इतर उमेदवारांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
💁♂️ यावर याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. राजेंद्र देशमुख यांनी राज्य सरकारच्या सुधारीत यादीला जोरदार आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटातून (इडब्ल्युएस) आरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तो निर्णय पूर्वलक्षीत प्रभावानं लागू केला.
📍 तसेच भरती प्रक्रीयेत एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी शासनानं आधी जी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली होती. त्याऐवजी शासनानं नव्यानं सुधारित यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं वगळण्यात आल्यानं अभियांत्रिकी प्रमाणेच भरती प्रकियेपासून वंचित रहाणार असल्यानं सुधारीत यादीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.
📌 यावेळी राज्य सरकारच्यावतीनं अॅड. व्ही.ए.थोरात यांनी भूमीका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयानं याचिकेची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब करत तोपर्यंत या यादीला स्थगिती दिली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/NgmE7J0Hxib
6 624
मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्ण दिवस दाखवणारा सोंगाड्या
LetsUpp l Special
(जन्म 8 ऑगस्ट 1932, मृत्यू 14 मार्च 1998, विवाह - नलिनी कोंडके )
🙏 मराठी चित्रपट सृष्टीचा बादशहा अशी ओळख असणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजेच दादा कोंडके. एकेकाळी डबघाईला आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला परत सुवर्ण दिवस दाखवणारा कलाकार म्हणजेच दादा कोंडके. जाणून घेऊया या हरहुन्नरी कलाकाराबद्दल...
सुरुवातीचे जीवन
💁♀️ दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते. त्यांचे बालपण लालबाग जवळच्या नायगाव येथे गेले.
💁♂️ मुळगाव हे भोर तालुक्यातील इंगवली हे गाव. कुटुंबाला हातभार लावण्याच्या दादांनी बँड पथकामध्ये सहभाग घेतला होता. बँड पथकमध्ये कार्यरत असताना समाजसेवेमधे सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली.
मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण
👉 भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाड्या या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले. सोंगाड्याने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला.
दादा आणि बाळासाहेब ठाकरे
⚡ कोहिनूर चित्रपटाच्या मालकाने दादांचा सोंगाड्या हा सिनेमा रोखून धरला होता. त्यांना देव आनंद यांचा "तेरे मेरे सपने" हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दादांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे धाव घेतली.
💫 बाळासाहेबांच्या आदेशामुळे सोंगाड्या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. बाळासाहेबांचे हे उपकार दादा कधीही विसरले नाहीत आणि शेवटपर्यंत ते कट्टर शिवसैनिक राहिले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
🎞️ दादांचे सलग नऊ चित्रपट हे पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले होते त्यामुळे दादांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला होता. एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे चित्रपट सृष्टीतील एक नवीन रेकॉर्ड होते जे आजही अबाधित आहे.
🎙️ ते एक कसलेले अभिनेते सुद्धा होते. गाणी सुद्धा त्यांनी गायली. ते गीतकार आणि पटकथाकार सुद्धा होते. ते एक यशस्वी दिग्दर्शक आणि नावाजलेले संगीतकार देखील होते. एकाच व्यक्तीकडे एवढे गुण असणे म्हणजे आश्चर्यच नव्हे काय!
🎥 द्विअर्थी विनोदाने गाजलेल्या चित्रपटात मध्ये सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव,आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, मला घेऊन चला, पळवा पळवी या चित्रपटांची आवर्जून नावे घेता येतील.
विवाह आणि प्रेम
👩❤️👨 दादांचा विवाह नलिनी यांच्या बरोबर झाला होता पण तो फार काळ टिकला नाही आणि लवकरच अंतर्गत वादाने त्याचे परिवर्तन घटस्फोटात झाले. दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटातील अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चांना उत आला होता पण याची पुष्टी दादांनी कधीच केली नाही. दादांच्या घटस्फोटानंतर दादा आणि उषा चव्हाण हे लग्न करणार असल्याच्या अफवा सुद्धा पसरत होत्या पण शेवटपर्यंत त्या अफवाच राहिल्या.
जगाचा निरोप
📌 14 मार्च 1998 रोजी चा तो काळा दिवस उजाडला आणि दादर येथील आपल्या रामनिवास निवासस्थाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.
📍 आजही दादांच्या चित्रपटातील गाणी ऐकताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याएवढा अष्टपैलू अभिनेता आजवर तरी कोणी झाला नाही. या कसलेल्या अभिनेत्याला मानाचा मुजरा.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/iJt7Dq7Rxib
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● लोकलच्या गर्दीवर नियंत्रणासाठी अॅपचा विचार, लोकल, हॉटेलबाबत आठवड्याभरात निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
● मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर ठाण्यातील हॉटेल मालकांचा संप तूर्तास मागे; हॉटेल्स असोशिएशनचे आणि बार अँन्ड रेस्टोरंट असोसिएशन अध्यक्षांची माहिती
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात; नगरपालिका पाटबंधारे विभाग, हवामान विभाग आणि महसूल विभागांना पाठवणार कायदेशीर नोटीस!
● कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळतीनंतर रुग्णांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, आदित्य ठाकरे यांची माहिती
● पुणे - शिवने-उत्तमनगरमधील बस मॉडिफाय करणाऱ्या गॅरेजला भीषण आग, 14 वाहनं जळाल्याची माहिती
● तुळजापुरातील 3 मंदिरं सील, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी कडक कारवाई केली
● राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई: दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी केली कारवाई; राहुल गांधी इन्स्टाग्रामवर सक्रिय
● पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
● स्वातंत्र्य दिनी दिल्लीत घातपाताची शक्यता, दिल्लीत कडक सुरक्षा तैनात; पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी दिल्ली पोलिस, आर्मीच्या जवानांबरोबर कंटेनरची एक उच्च भिंत
● भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा! संघाची जबाबदारी जानेका शॉपमन यांच्याकडे
● टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी; एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई
To know more click here
https://letsup.app.link/Uso6d6tGxib
6 624
राज्यातील 'हे' शहर ठरले पहिले कोरोना मुक्त शहर
Letsupp | Trending
● राज्याच्या आकडेवारी नुसार भंडारा जिल्हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा तर धुळे हे पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या दिलासादायक बातमीमुळे धुळेकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.
● कोरोनाचा सर्वत्र कहर सुरु होता यात दुसऱ्या लाटेत कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत होते. कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत होत्या आता मिळालेल्या माहिती नुसार राज्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
● भंडारा जिल्हा हा राज्यातील पहिला करोनामुक्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्याच सोबत कोरोना रोखण्यास यशस्वी ठरलेले धुळे हे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दिलासादायक बातमीमुळे धुळेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळत आहे.
● धुळे शहरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण शुन्य आहेत तर 3 ऑगस्टपासून कुठलीही पॉझिटिव्ह केस आलेली नसुन कोरानाने मृत्यू देखील झालेला नाही तसेच धुळे शहरात एकही कंटेन्मेंट झोन नसल्याचे सांगण्यात आले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/sTL90Pitwib
6 624
आता लसीकरणाचा एकच डोस पुरेसा! भारतात सिंगल डोसला मंजुरी
LetsUpp l Trending
🦠 जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मंसुख मांडविया
यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे. मांडवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे.
💉 जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जॉन्सनअॅण्डजॉन्सन
To know more click here
https://letsup.app.link/GXLPf1eDwib
