uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - आर्थिक गुन्हे करुन पळून जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी 'फ्यूजिटिव्ह ईकनॉमिक ऑफेंडर्स बिल' मंजूर 🔅 नवी दिल्ली - दहशतवाद आणि मूलगामी शक्‍तींविरुद्धचा लढा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी 🔅 नवी दिल्ली - SBI, PNB आणि ICICI या भारतातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली 🔅 नवी दिल्ली - आधार क्रमांकाशी जोडल्यामुळे देशात 2.75 कोटी बोगस रेशनकार्ड सापडले, वितरणात अन्नधान्याची होणार बचत 🔅 बेळगाव - महापौरपदी कन्नड गटाचे बसप्पा चिक्कलदिनी बिनविरोध, तर उपमहापौरपदी मराठी गटाच्या मधुश्री पुजारी 🔅 मुंबई - डी. एस. कुलकर्णी यांची पत्नीसह येरवडा कारागृहात रवानगी, डीएसकेंना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी 🔅 मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला, स्मारक उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी 🔅 मुंबई - सलमान लवकरच मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित मालिकेची निर्मिती करणार असल्याची माहिती (आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

💇🏻‍♀ होळीच्या रंगांपासून वाचवा केसांंना LetsUp I Holi Special होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना आपल्या केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे रंग खेळताना केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही टिप्स... 👉 होळी खेळताना केसांचे कमीत-कमी नुकसान व्हावे याकरिता केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करा. 👉 होळी खेळायला जाण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावून बाहेर पडा. 👉 होळी खेळताना केसांचे नुकसान होऊ नये म्हणून ते घट्ट वेणी किंवा आंबाड्यात बांधा. केस मोकळे ठेवू नका. 👉 कॅप किंवा स्कार्फ घालणार असाल तर त्याखाली शॉवर कॅपही घाला. यामुळे रंगांचा थेट डोक्याशी किंवा केसांशी संपर्क येत नाही. 👉 केसांमधील रंग काढताना गरम पाण्याचा वापर कटाक्षाने टाळा. कारण गरम पाण्याने केस धुतल्यास ते अधिक शुष्क, कोरडे होऊ शकतात. For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/egfuvE ⚡

💥 जीडीपीमध्ये भारत चीनच्या पुढे! Breaking आर्थिक वर्ष 2017-18 च्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर पोहोचला असून भारताने जीडीपीच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. याच तिमाहीतला चीनचा जीडीपी 6.8 टक्के आहे. अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत जगात वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे. For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/EkhTcm ⚡

💐 ऑल द बेस्ट...! आजपासून दहावीची परीक्षा LetsUp I Updates महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा राज्यभरातून 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी परिक्षा देणार आहे. बारावीप्रमाणे याही परीक्षेला 10.30 नंतर एक मिनिटेही उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळे आधी केंद्रावर पोहचण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना LetsUp - Digital Magazine कडून शुभेच्छा...! For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/X1SDS6 ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - 2017-18 च्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर, या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले 🔅 नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांच्या भत्त्यांत वाढ करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब 🔅 नवी दिल्ली - बँकांची 515 कोटी रुपयांची फसवणूक, आर. पी. इन्फो सिस्टिम्स कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला 🔅 नवी दिल्ली - कांचीपुरम पीठाचे 69 वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 🔅 पंढरपूर - आषाढी वारीला येणा-या भक्तांची संख्या ही जगात विक्रमी असून त्याची नोंद ‘वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली 🔅 पुणे - आजपासून दहावीची परीक्षा, 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान परीक्षा पार पडणार, साडेसतरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार 🔅 मुंबई - जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे, चौकशी अहवालानंतरच निलंबन मागे 🔅 मुंबई - भारताचा अव्वल भालाफेकपटू दविंदर सिंग कांग उत्तेजक चाचणीत दोषी, चार वर्षांची बंदी घालण्यात येण्याची शक्यता 🔅 पणजी - 9 वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या 21 ते 24 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे (आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

⚡ स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी 'हे' पुस्तक प्रकाशित LetsUp | Update महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात 'MPSC' आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात 'UPSC' देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे 'भारत 2018' या माहितीपर पुस्तकाचे नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. शासनाकडून हे पुस्तक दरवर्षी प्रकशित केले जाते. या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे देखील अनावरण करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या आवृत्ती अॅमेझोन आणि गुगल प्ले-स्टोअरवर देखील उपलब्ध असतील. मागील वर्षांत भारतात काय घडले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात असून आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, सरकारच्या योजना अशा सगळ्या विषयांतील माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📣 पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने पीएफमधून 10 लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. EPFO ने पेपरलेस वर्क करण्याकडे हे पाऊल उलचले आहे. यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. सध्या EPFO खातेदारांना ऑनलाईनसोबतच मॅन्युअल पद्धतीनेही पैसे काढण्याची परवानगी आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🏏 IPL मध्ये DRS प्रणालीची एंट्री आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच DRS प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. BCCI ने आयपीएलमध्ये DRS सिस्टमचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. BCCI सुरुवातीला या प्रणालीबाबत सकारात्मक नव्हते. मात्र बीसीसीआयने या प्रणालीचा आयपीएलमध्ये प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एका मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel. To Join Click : t.me/letsup 👆

💡 महत्वाची माहिती - तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का? असे घ्या जाणून! LetsUp I Updates बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाईन 31 मार्च असल्याने अनेकांनी बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक केले असेल. मात्र आधार कार्ड बँकेशी लिंक झाले आहे कि नाही? याबात अनेकांना शंका असेल. म्हणूनच बँक खाते आधारशी लिंक झाले आहे कि नाही? हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा... 👉 सर्वात प्रथम युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा. 👉 यानंतर आधार सेवा ‘Aadhaar Services’या सेक्शनवर जा. 👉 Aadhaar Services वर गेल्यानंतर ‘Check Aadhaar & Bank Account Linking Status’ या ऑप्शनवर जा. 👉 या ठिकाणी तुमचा 12 अंकांचा आधार नंबर टाका. त्यानंतर OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल. 👉 तुम्ही सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे कि नाही? याचा मेसेज येईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel. To Join Click 👉 t.me/letsup ⚡

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - तात्काळ तीन तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेत आज बहुमताने मंजूर, आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत 2. नवी दिल्ली - भारतीय जवानांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करण्याचे आदेश पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिले 3. नवी दिल्ली - केंद्र सरकारचा छोट्या गुंतवणुकदारांना मोठा दणका, अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात 4. नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलेंडरचे दर यापुढे प्रत्येक महिन्याला वाढणार नाहीत, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय 5. नवी दिल्ली - राज्यघटनेवर माझा पूर्ण विश्वास, केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंचा घटना बदलण्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप 6. नवी दिल्ली - शत्रूने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करणा-या अॅडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली 7. मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 जणांचा मृत्यू झाला 8. पुणे - लोणावळ्यातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा, 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित, आणखी 49 हॉटेल्सवर कारवाईची शक्यता 9. मुंबई - राज्यातील 1314 शाळा बंद करत असल्याच्या मुद्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर आमची बाजू भक्कमपणे मांडू - शिक्षणमंत्री विनोद तावडे 10. मुंबई - राज्यातील 307 सिंचन प्रकल्पांना 40 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता, हा आता घोटाळा नाही का? राष्ट्रवादीचा सवाल 11. मुंबई - बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्रींनाच नव्हे, तर पुरुष कलाकरांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, प्रियंका चोप्राचा नवा गौप्यस्फोट 12. मुंबई - मुंबई इंडियन्स संघातील ऑलराऊंडर क्रिकेटपटू कृणाल पांड्या गर्लफ्रेण्ड पंखुडी शर्मासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकला (अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/9fUzV1 )

photo content

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - दर महिन्याला 150 कोटी गीगाबाईटस् मोबाईल डेटा वापरून, भारत सर्वाधिक डेटा वापरणारा देश ठरला 2. नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आईला मंगळसूत्र, टिकल्या, बांगड्या उतरवण्यास सांगून पाककडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली 3. नवी दिल्ली - सीमेवर कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक, पाकच्या हद्दीत घुसून 6 सैनिकांचा खात्मा 4. बंगळुरु - आपला पक्ष भाजपा लवकरच राज्यघटना बदलणार, केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांचे वादग्रस्त वक्तव्य 5. लखनऊ - उन्नावमधल्या सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया, वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी 6. मुंबई - मोबाइल उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला, किंमत फक्त 499 रुपये 7. पुणे - पुढील वर्ष साखर उद्योगासाठी अडचणीचे ठरणार, कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करावी - शरद पवार 8. मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर 29 ते 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 9. पुणे - 31 डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर 'एल्गार परिषद'चे आयोजन; परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचीही असणार उपस्थिती 10. मुंबई - जानेवारी 2018 पासून ह्युंदाई कारच्या किंमतीत दोन टक्के वाढ, कंपनीच्या निर्णयानंतर सर्वच कार महागणार 11. मुंबई - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या आयुष्यावर चित्रपट, अभिनेत्री सोहा अली खान पती कुणाल खेमू सोबत करणार निर्मिती 12. नवी दिल्ली - बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपऐवजी कुठल्या अन्य स्पर्धेपासून अमलात आणायला हवा होता - पी. व्ही. सिंधू (अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/9fUzV1 )

photo content

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्सला टाकणार मागे, ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) प्रसिद्ध केला अहवाल 2. नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर हायअलर्ट, नागरिक उड्डान सुरक्षा ब्यूरोने दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षा वाढवली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 3. नवी दिल्ली - पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त दर मिळण्यासाठी केंद्र सरकार बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत 4. नवी दिल्ली - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आईला कुलभूषण यांच्यासोबत मराठीत बोलण्यास मज्जाव केला; कुलभूषण जाधव भेटीवर परराष्ट्र मंत्रालयाची माहिती 5. नवी दिल्ली - केजरीवाल सरकारचा दिल्लीकरांना मोठा झटका, दिल्लीमध्ये पाण्याच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ होणार 6. जम्मू-काश्मीर - राखचिक्री येथील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या तीन जवानांना केले ठार, एक जवान जखमी झाल्याचे पाकिस्तानच्या मीडियाने म्हटले 7. श्रीनगर - जैश-ए- मोहम्मदला दणका, टॉप कमांडरचा चकमकीत खात्मा, भारतीय सैन्याच्या वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचा समावेश 8. गुजरात - विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर नितीन पटेल यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 9. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 34010.61, निफ्टी : 10531.50, सोने भाव : 28,747 (प्रतितोळा), चांदी : 38,108 (प्रतिकिलो) 10. मुंबई - राधेश्याम मोपलवार यांना कथित ऑडियो प्रकरणी चौकशी समितीची क्लीन चिट; समृद्धी महामार्गाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू 11. मुंबई - थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन महागण्याची शक्यता, बीअरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढणार 12. औरंगाबाद - भाजपात खुनाचा आरोपी आणि वेडी माणसं सोडली, तर सध्या कोणालाही सहज प्रवेश मिळतो : हरिभाऊ बागडे 13. चेन्नई - मला राजकारण नवं नाही, फक्त उशीर झालाय. राजकारणात प्रवेश हा विजयाप्रमाणेच आहे. 31 डिसेंबर 2017 रोजी राजकीय वाटचालीची घोषणा करणार : सुपरस्टार रजनीकांत 14. दुबई - भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (तिसऱ्या) रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरण तर रोहित शर्मा (चौदाव्या) आणि केएल राहुल (चौथ्या) यांनी रँकिंगमध्ये मारली मुसंडी 15. मुंबई - 'टायगर जिंदा है' चित्रपटाने यंदाच्या वर्षातील बॉक्स ऑफिसवरचे कमाईचे सर्व विक्रम काढले मोडित, चित्रपटाने चार दिवसात तब्बल 151.47 कोटी रुपयांची केली कमाई न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

LetsUp News Updates 1. नवी दिल्ली - 2018 मध्ये खगोलप्रेमींना सुपरमून, ब्ल्यूूमून, उल्कावर्षाव अशा अनेक खगोलशास्त्रीय घटनांचा अनुभव घेता येणार 2. नवी दिल्ली - गंभीर गुन्हे तपास विभागाकडून चालू आर्थिक वर्षात 63 बोगस कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली 3. नवी दिल्ली - पेट्रोलवर होणार्या आर्थिक खर्चाची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी जनतेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी 4. नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या तपशीलानुसार सार्वजनिक बँकांची एकूण थकीत कर्जे 7.34 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली 5. मुंबई - राज्यातील 59 हजार 263 स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस 6. मुंबई - पेन्शनची ‘कट ऑफ डेट’ ठरवणे, हे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले 7. मुंबई - शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली 8. मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख 55 महामंडळांपैकी जवळपास 35 महामंडळे ही आर्थिकदृष्ट्या डळमळीत; टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येणार 9. मुंबई - मराठा समाजाला 10 फेब्रुवारीपर्यंत आरक्षण न मिळाल्यास 26 फेब्रुवारीला विधानभवनाला घेराव घालण्याचा इशारा 10. लाहोर - दहशतवादी हाफीज सईदने लाहोर येथे 'मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल)' या नव्या पक्षाचे कार्यालय उघडले 11. मुंबई - अभिनेत्री इलियाना डिक्रूज बॉयफ्रेंण्ड फोटोग्राफर ऐंड्र्यू नीबोन याच्याशी गुपचूप लग्न बंधनात अडकल्याची चर्चा 12. मुंबई - टीम इंडियाने आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत 121 गुणांसह थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली (अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/m9sEMa )

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - चार राज्यातील पाच विधानसभांच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तीन ठिकाणी विजय मिळवला 2. नवी दिल्ली - पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाक सैनिक ठार लेट्सअपचे फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा मोबाईल जिंकण्याची संधी; फेसबुक पेज लाईक करण्यासाठी : https://goo.gl/ZuYLo6 3. नवी दिल्ली - शेजारील देशांसोबतचे व्यापार संबंध वाढवण्यासाठी भारताकडून सीमाभागात 2 हजार कि. मीचे रस्ते बांधणीची योजना 4. नवी दिल्ली - तीन तलाक विधेयक घटनाविरोधी आणि शरीयतच्या विरुद्ध, विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे आवाहन 5. नवी दिल्ली - एक द‌िवस आमचे आयुष्य जगून बघा, आमच्यावर असलेल्या असह्य ताणाची कल्पना येई; एम्स’च्या डॉक्टरांचे पंतप्रधानांना पत्र 6. नवी दिल्ली - नवीन वर्षात रेल्वेकडून स्टेशन तसेच गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे दर 30 ते 50 टक्के वाढवले जाण्याची शक्यता 7. मुंबई - नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरही वाहनधारकांची दमछाक 8. नागपूर - छत्तीसगड सीमेवरील सांड्रा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याला कंठस्नान 9. पुणे - ऑनलाइन दाखले मिळण्यासाठी ‘ई-ग्राम’ हे अद्ययावत सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले असून आता घरबसल्या दाखले मिळणार 10. फिलिपाईन्स - येथील डेवाओ शहरातील एका मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 37 जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 11. नवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’कडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली 12. मुंबई - वानखेडे स्टेडियमवर चुरशीच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेला 5 विकेट्सनी हरवून मालिका 3-0 अशी खिशात घातली (अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/m9sEMa )

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने वर्षभरात 900 वेळा जम्मू-कश्मीरमध्ये केला गोळीबार, भारताच्या लष्कराने दिली माहिती 2. नवी दिल्ली - इस्त्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांना ऍन्ट्रीक्स देवास व्यवहार प्रकरणातील गैरप्रकारांच्या प्रकरणात जामीन मंजुर लेट्सअपचे फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा मोबाईल जिंकण्याची संधी; फेसबुक पेज लाईक करण्यासाठी : https://goo.gl/ZuYLo6 3. नवी दिल्ली - भाजपने त्रिपुरातील पक्षाच्या निवडणूक प्रभारीपदी हिमंता बिस्वा सर्मा यांची तर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे नागालँडची जबाबदारी सोपवली 4. श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, चार जवान शहीद 5. अमृतसर - भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार, भारत-पाकिस्तान सीमेलगत पंजाबमध्ये घडली घटना 6. मणिपूर - म्यानमार-भारत सीमेवर भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी 7. लॉस एंजेलिस - नाताळच्या निमित्ताने घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या इसिसच्या हस्तकाला अमेरिकेच्या प्रांतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली अटक 8. गुजरात - या विधानसभा निवडणुकीत एक नवीन लीडरशीप तयार झाली, आगामी निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळतील : राहुल गांधी 9. हैदराबाद - आमच्या हिरव्या रंगासमोर कोणताही रंग टिकाव धरू शकत नाही. मग तो मोदी यांचा असो की काँग्रेसचा : असदुद्दीन ओवेसी 10. मीरारोड - ओला कॅबमध्ये तरुणीवर बलात्कार, दोन्ही आरोपी अटकेत , काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 11. उस्मानाबाद - उमरगा तालुक्यात अलूरमध्ये महिलेची गळ्यात चप्पल घालून धिंड, घरापासून ग्रामपंचायतीपर्यंत धिंड, महिलेने चहाड्या सांगितल्याचा रागातून धिंड 12. नवी मुंबई - अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण, पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचे निलंबन 13. पुणे - मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक अकाउंटवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बदनामी, अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल 14. नवी दिल्ली - भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक आणि निवडकर्ते साबा करीम यांची बीसीसीआयने महाव्यवस्थापकपदी (क्रिकेट परिचालन) केली नियुक्ती 15. मुंबई - दोन वर्षानंतर हनी सिंह पुन्हा एकदा बॉलीवुडमध्ये एन्ट्री करणार, त्याने कार्तिक आर्यनच्या "सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटासाठी "दिल चोरी साडा' हे गाणे गायले न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates 1. नवी दिल्ली - आगामी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळणार; तीन लाखांपर्यंत उत्पन्‍न करमुक्‍त होणार 2. नवी दिल्ली - शालेय पोषण आहार योजनेसाठीही ‘आधार’ अनिवार्य; महिला आणि बालविकासमंत्री वीरेंद्रकुमार यांची माहिती 3. नवी दिल्ली - फसवणुकांमुळे गेल्या आर्थिक वर्षात बँकांचे तब्बल 16 हजार 789 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अर्थराज्यमंत्र्यांनी दिली 4. नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाची रचना आणि पाया पूर्णपणे असत्यावर आधारित, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका 5. मुंबई - अमेरिकन आयटी क्षेत्रातील गुंतवणूक भारतीय आयटी क्षेत्राला धास्तावणारी, भविष्यात नोकऱ्यांवर परिणाम होणार - नारायण मूर्ती 6. मुंबई - देशाच्या उत्तर भागातील थंडीच्या लाटेमुळे पुढील 24 तासांत मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट 7. मुंबई - राज्यातील 59 हजार 263 अकार्यरत धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द, धर्मादाय आयुक्तालयाचा संस्थांना दणका 8. नागपूर - राज्यात पुरेसा कोळसा उपलब्ध, येत्या उन्हाळ्यात राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ - ऊर्जामंत्री 9. पुणे - राज्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश 10. गोवा - लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती करणार्‍या महिला दिग्दर्शकांनासाठी ‘सहित’ची आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुपट स्पर्धा 11. मुंबई - रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशाविषयी अनेक वर्षांपासून चर्चा; 31 डिसेंबरला होणार याबाबत घोषणा 12. इंदोर - भारताचा श्रीलंकेवर 89 धावांनी विजय, मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी; रोहित शर्माचे 35 चेंडूत शतक

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडला; पंतप्रधान नरेंद्र मोदीसह मान्यवरांची हजेरी 2. लेट्सअपचे फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा मोबाईल जिंकण्याची संधी; फेसबुक पेज लाईक करण्यासाठी - https://goo.gl/ZuYLo6 3. नवी दिल्ली - ओक्लाची ‘स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स’ जाहीर; अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारताने इंटरनेट वेगात आघाडी घेतली 4. नवी दिल्ली - कार कंपनी टोयोटाची नवी घोषणा; 2020 पर्यंत 10 इलेक्ट्रिक कार आणण्याचा मानस टोयोटाने जाहीर केला 5. गुजरात - पोरबंदर दंगलीसाठी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक; पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप 6. राज्यस्थान - येथील सरकारने गुज्जर समाजाला व चार इतर मागासवर्गीयांना 1 % आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली 7. मुंबई - औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याऐवजी लवकरच रुग्णांना गरजेनुसार औषध खरेदी करता येणार 8. मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर ‘देवा’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळाल्या 9. मुंबई - लवकरच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वरुन 60 होणार; महिन्याभरात नवीन निर्णय लागू होण्याची शक्यता 10. पुणे - मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डी एस कुलकर्णी गायब; पुणे पोलिसांनी परराज्यात पथके पाठवली 11. मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, 23 जानेवारी 2019 ला रिलीज होणार 12. नागपूर - कर्नाटक संघावर पाच धावांनी थरारक विजय मिळवत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली (अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/m9sEMa )