LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
6 624
तारापूर भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट!
LetsUpp l Trending
● तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका कायम आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात ५ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.
● दरम्यान जखमी रूग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या सर्व रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
● आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
● दरम्यान यानंतर आगीवर यश मिळवण्यास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे.
● मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला.
● स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. आणि त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/YUnhk2YNBhb
6 624
हृदयद्रावक! १२ दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
LetsUpp l Nagpur
● नागपूरमध्ये एक काळीज पिळवटवून टाकणारी घटना घडली आहे.
● नागपूरातील सरकारी वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये एका १२ दिवसांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाचा मृत्यू झाला आहे.
● २० जूनला या बाळाचा जन्म झाला होता. या बाळाच्या जन्मानंतर सहा दिवसांनी ताप आल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
● दरम्यान २० जूनला प्रसूतिपूर्वी या चिमुकल्या बाळाच्या आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.
● २ जुलैला या बाळाचा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला इतर काही कॉम्प्लिकेशन देखील होत्या.
● या बाळाचं हृदय योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
● जन्माच्या बाराव्याच दिवशी या बाळाची प्राणज्योत मालवल्याने पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बाळाच्या आईला मोठा धक्का बसला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/i4sbPIRZBhb
6 624
युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या : रोहित पवार
LetsUpp | Trending
● MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनदेखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली.
● या घटनेमुळे फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. राज्यात मोठ्या संख्येने तरुण या परीक्षेची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी देखील हा धक्का ठरला.
● या तरुणाच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त होतानाच दुसरीकडे एमपीएससीच्या कारभारावर आणि निर्णय प्रक्रियेतील ढिलाईवरही तीव्र टीका होऊ लागली आहे.
● खुद्द सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या मुद्दयावरून सरकारला विनंती केली आहे.
● “युवा पिढी निराश असून वकरात लवकर परीक्षा घ्याव्यात”, अशी विनंती रोहित पवार यांनी ट्वीट करून केली आहे.
ट्वीट:
- रोहित पवार यांनी परीक्षा घेण्यासोबतच तातडीने त्यांना नियुक्त्यादेखील देण्याची विनंती केली आहे.
- “कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे.
- माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/VADuhGS8Bhb
6 624
पुण्यात नैराश्यातून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल! पत्रात MPSC ला का म्हटलं मायाजाल?
LetsUpp l Trending
● स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे केंद्र बनलेले पुणे शनिवारी हादरले आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्निलने आत्महत्या केली.
● एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला.
● या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला.
● त्याच्या संयमाचा अंत झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहून त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.
● आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने सर्व गोष्टींबाबत त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्या आहेत.
● आत्महत्येसाठी कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे स्वप्निलने म्हटलं असून, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं आवाहन केले आहे.
पत्रात काय म्हटलय:
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता!
नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.
To know more click here
https://letsup.app.link/jYMyOZMLBhb
6 624
राज्यात दिवसभरात ९ हजार ४८९ नवीन कोरोनाबाधित
LetsUpp l Trending
● राज्यात आता पुन्हा एकदा दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत अधिक दिसत आहे.
● आज दिवसभरात राज्यात ९ हजार ४८९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८ हजार ३९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
● अद्यापही राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडतच आहे. आज राज्यात १५३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
● सध्या राज्याती मृत्यू दर २.०१ टक्के एवढा आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या एकूण १ लाख १७ हजार ५७५ सक्रिय रुग्ण आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/PteItOpWAhb
6 624
कोरोना लशीच्या डोस पूर्वीच मुलांमध्ये अँटिबॉडिज
LetsUpp | Trending
● कोरोना विरोधातील लढ्यात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लशी लाभदायक ठरल्याने देशभर त्याची मोहिम सुरू झाली. मोठ्या व्यक्तींवरील कोवॅक्सिन लशीचे ह्यूमन ट्रायल नागपुरातून झाल्यानंतर या लशीचा मार्ग देशासाठी मोकळा झाला.
● आता पुढील टप्प्यात लहान मुलांवरील लशीचे ह्यूमन ट्रायल नागपुरात सुरू आहे. मात्र लशीचा पहिला डोस देण्यापूर्वीच आलेल्या माहितीनुसार मुलांमध्ये लशीचा पहिला डोस देण्याआधीच अँटिबॉडिज विकसित झाल्याचे स्पष्ट होत आहे.
● मुलांवरील कोवॅक्सिन लस ह्यूमन ट्रायलच्या दुसऱ्या फेजमधील २ ते १८ वयोगटातील मुलांमध्येही या ॲन्टिबॉडिज तयार झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या तिन्ही वयोगटातील १२१ मुलांपैकी ३८ मुलांमध्ये ॲन्टिबॉडिज तयार झाल्या आहेत.
● ६ जून रोजी पहिल्या टप्प्यातील १२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. पुढच्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांवरही ह्यूमन ट्रायल सुरू झाली असून ३५ मुलांचे स्क्रिनिंग करून त्यांना लस देण्यात आली.
● कालपासून २ ते ६ वयोगटातील मुलांवरील ह्यूमन ट्रायल सुरुवात झाली. यात निवडलेल्या २७ पैकी १३ अशा जवळजवळ ५० टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी ६ ते १२ वयोगटातील निवडलेल्या ४३ पैकी १५ मुलांमध्ये तर १२ ते १८ वयोगटातून निवडलेल्या ५१ पैकी १० मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्याचे स्पष्ट झाले होते.
● लशीचा पहिला डोस देण्यापूर्वीच मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती (अँटिबॉडिज) विकसित झाल्याने मुलांना कळत न कळत कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. मात्र त्यांना कोरोनाचा त्रास झाला नाही. मुलांना विषाणू संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या शरिराने प्रतिकार करीत कळत न कळत रोग प्रतिकारशक्ती विकसित केली, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.
To know more click here
https://letsup.app.link/RyYVB5NUAhb
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
● मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण, 350 कामगारांचे बोगस लसीकरण करून लुटले 4 लाख 23 हजार रूपये; तुर्भे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
● नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह; मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीत घेतला होता सहभाग
● रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात आणलेलं 879 कोटींचं हेरॉईन कस्टम विभागाकडून जप्त
● वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजरकैद व सुटका; आमदार महेश लांडगेंच्या मध्यस्थीने आंदोलन टळले! दिघीतून कीर्तनकार बंडातात्या पोलिसांसोबत पंढरपूरकडे रवाना
● ओबीसी आरक्षणासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर मैदानात; कार्यकर्ते राज्यभरात करणार चक्काजाम आंदोलन; उद्या होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
● तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुष्कर सिंह धामी यांच्याकडे उत्तराखंडची सूत्रे, राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
● कल्पना चावलानंतर आता आणखी एक भारतीय महिला घेणार अंतराळात झेप; सिरिशा बांदला उड्डाणासाठी सज्ज! ११ जुलै रोजी न्यू मॅक्सिको येथून होणार उड्डाण
● राफेलबाबत फ्रान्समध्ये महत्वाची घडामोड, चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती, फ्रान्सच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांची होणार चौकशी
● पुण्यात ज्येष्ठ मराठी कलादिग्दर्शक राजेश सापते यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून जीवन संपविले; मनोरंजनसृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड
● बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी दिग्दर्शक किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात
To know more click here
https://letsup.app.link/D1buC88MAhb
6 624
घर घेताय ? होम लोन संदर्भात ही आहे महत्वाची बातमी
Letsupp | Trending
● करोना काळामध्ये अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. साथ प्रसार, टाळेबंदीचे निर्बंध या दरम्यान ग्राहकांकडून कर्जासाठीची मागणी कमी झाली आहे. मात्र आता गृह कर्जाचे व्याजदर किमान पातळीवर ठेपले आहेत.
● यामध्ये आता आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने सर्वात कमी, वार्षिक ६.६६ टक्के किमान गृह कर्ज व्याजदर ३० वर्षांपर्यंत देऊ केला आहे. त्यामुळे आता घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे.
● एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हि योजना लागू असेल, ५० लाख रुपयेपर्यंतच्या गृह कर्जासाठी ६.६६ टक्के व्याजदर उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सवलतीच्या व्याजदरामुळे कर्जदारांची मागणी वाढेल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.
● यामध्ये इतर बँकांचे किमान गृह कर्ज व्याजदर असे आहेत : ६.६५ टक्के - कोटक महिंद्र बँक, ६.७५ टक्के - सिटी बँक, ६.८० टक्के - यूनियन बँक, ६.८५ टक्के - बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, ६.७० टक्के - स्टेट बँक, ६.७५ टक्के - एचडीएफसी लिमिटेड, ६.९० टक्के - आयसीआयसीआय बँक असे आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/i1WM8i7fAhb
6 624
ब्रेकिंग! अभिनेता आमिर खान आणि किरण यांचा घटस्फोटाचा निर्णय
LetsUpp l Trending
● बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
● आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली.
● आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे.
● आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
काय आहे आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र? :
● 15 वर्षाच्या सुंदर सोबतीमध्ये आयुष्यभर स्मरणात राहणारे अनुभव जगता आले. आनंद, हास्य आणि आमचं नातं हे विश्वास, आदर आणि प्रेम याच्या आधारावर फुलले.
● आता आम्ही आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करत आहोत. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता सह पालक आणि कुटुंब म्हणून एकत्र राहू. आम्ही गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहण्यासाठी नियोजन सुरू केलं होतं. आता हा निर्णय झाल्यामुळं बरं वाटत आहे.
● एक्सटेंडेड कुटुंबाप्रमाणं आम्ही वेगळं राहिलो तरी आयुष्यातील महत्वाच्या घटना शेअर करत राहू. आम्ही मुलगा आझादसाठी पालक म्हणून दोघंही एकत्रितपणानं जबाबदारी पार पाडू, त्याचा सांभाळ दोघेही संयुक्तपणानं करु, असं देखील म्हटलं आहे.
● आम्ही एकत्रितपणे चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये काम करु. आमचे कुटुंबिय आणि मित्र यांना देखील धन्यवाद देतो कारण आमच्या नात्यामध्ये हे घडत असताना त्यांनी सातत्यानं पाठिंबा दिला.
● त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो. आम्ही आमचे शुभचिंतक आम्हाला या निर्णयाबद्दल शुभेच्छा देतील अशी आशा आहे.
● हा घटस्फोट म्हणजे काही शेवट नाही. नवीन प्रवासाची सुरुवात आहे, असे संयुक्त पत्र आमिर खान आणि किरण राव यांनी लिहिले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/yi3sav0jAhb
6 624
'शेरनी' वास्तवाची जाणीव करून देतो
LetsUpp | Entertainment
● शेरनी चित्रपटाची कथा 'माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्षांची आहे'. माणसाने प्रगती करताना निसर्गाची अतोनात हानी केली. यातूनच हा संघर्ष सुरु झाला. कुठलेही आडवळणं न घेता अगदी सरळ, साध्या पद्धतीनं शेरनी चित्रपटातून हा संघर्ष आपल्यापुढे सादर केली आहे.
● दिग्दर्शक अमित मसुरकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. यापूर्वी असाच वेगळा विषय घेऊन ‘न्यूटन’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘शेरनी’ चित्रपटातूनही त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. यामुळे हा चित्रपट वास्तवाच्या अगदी सहजपणे जवळ पोहोचतो.
● या चित्रपटाला यवतमाळ जिल्ह्यातल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूची पार्श्वभूमी आहे. मात्र ही कथा मध्य प्रदेशातल्या बिजासपूर जंगलात घडते. नऊ वर्षांपासून बढती न मिळाल्याने विद्या विन्सेट म्हणजे विद्या बालन नैराश्यात असते. तिला सहा वर्षांनंतर वनाधिकारी म्हणून फिल्डवर काम करण्याची संधी मिळते. पुरुषांच्या गर्दीत ती एकटीच महिला अधिकारी असते. प्रामाणिक अधिकाऱ्याची होणारी घुसमट यातून वेळोवेळी दिसून येते.
● बिजासपूर परिसरात ‘टी-१२’ वाघिणीने जनावरं आणि काही नागरिकांचे तिने जीव घेतलेले असतात. यामुळे आजूबाजूच्या गावांतल्या नागरिकांत भय आणि रोष दोन्ही दिसून येतो. वाघिणीला पकडा किंवा मारून टाका, अशी त्यांची मागणी असते. यात काही वन्यजीवप्रेमीही असतात. तिच्याच विभागातले काही निष्ठुर वरिष्ठ देखील आहेत.
● वाघिणीचा मुद्दा राजकीय बनतो. श्रेय घेण्यासाठी एकमेकांचे विरोधक जंगल पेटवण्यापर्यंत पोहचतात. यातून अनेक अस्वस्थ करणाऱ्या बाबीही पुढं येतात; मात्र मानवता आणि वनसंवर्धनासाठी झटणारा प्रोफेसर हसन नूरानी (विजय राज) हा विद्याबरोबर असतो. पूर्ण चित्रपटभर वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
● प्रत्येकाचे हेतू मात्र वेगवेगळे आहेत. जंगल आणि प्राणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कुणाला तिला मारून श्रेय घ्यायचंय, बन्सलसारख्या अधिकाऱ्याला सुटका करवून घ्यायची; तर विद्या व नूरानीला वाघिणीला वाचवायचं आहे. यामुळे विद्यापुढं वाघिणीचं सुरक्षित स्थालांतर करण्याचं आणि गावकऱ्यांना वाचण्याचं आव्हान उभा राहतं. यातून विद्या कसा मार्ग काढते यासाठी आपल्याला चित्रपट बघावा लागलं.
● विद्याचा अभिनय या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. इतर विजय राज, शरत सक्सेना, बृजेंद्र काला या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. उत्तम कॅमेरा, ‘बॅकग्राउंड स्कोअर’ आणि 'ध्वनीव्यवस्था' आपण जंगलात असल्याचा फील देतात.
● काही ठिकाणी चित्रपट रटाळ वाटू शकतो; मात्र वास्तवाची ‘सफारी’ नवं काही देऊन जाते. अगदी सरळ रेषेत चालणारी ही कथा आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो.
*शेरनी*
● *लेखक* ; आस्था टिकू
● *दिग्दर्शक* ; अमित मसुरकर
● *निर्माते* ; भूषणकुमार, किशनकुमार, विक्रम मल्होत्रा, अमित मसुरकर
● *पार्श्वसंगीत* ; बेनेडिक्ट टेलर, नरेन चंदावरकर
● *छायाचित्रण* ; राकेश हरिदास
● *कलावंत* ; विद्या बालन, शरत सक्सेना, बृजेंद्र काला, नीरज काबी, विजय राज, समपा मंडल, सत्यकाम आनंद, मुकुल चढ्ढा, इला अरुण आदी.
● *ओटीटी*; अमेझॉन प्राइम
चित्रपट समीक्षक-
- प्रशांत शिंदे
To know more click here
https://letsup.app.link/qrkyJOTgzhb
6 624
ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी
LetsUpp | Trending
● कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.
● त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
● लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
● बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/cAK4VjPazhb
6 624
लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
LetsUpp | Trending
● भारतात प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारने गरोदर महिलांना कोरोना लस घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
● प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी ही तज्ज्ञ समितीची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केल आहे. त्यामुळे आता गर्भवती महिलाही कोरोना लस घेऊ शकतात.
● प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी, अशी शिफारस NTAGI ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. ज्याला मंजुरी मिळाली आहे. प्रेग्नंट महिलांना कोरोना लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी.
● किंवा त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे..
● गर्भवती महिला कोविन ॲप वर रजिस्टर करू शकतात किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील.
To know more click here
https://letsup.app.link/CPbdNVk5yhb
6 624
ब्रेकिंग! एचएससी बोर्डाचा फॉर्म्युला जाहीर
LetsUpp | Trending
● एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
● दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
● या मूल्यांकन पद्धतीला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असल्याने एचएससी बोर्डाचा कायदेशीर मार्ग सुकर झाला आहे.
● पदवी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या दोन बोर्डांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे त्यांची मूल्यांकन पद्धती एकसमान राखली आहे.
मूल्यमापनाचा तपशील
- दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)
- 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
- 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%)
To know more click here
https://letsup.app.link/wYpwyk82yhb
6 624
बॉलिवूडच्या नववधूला ED चे समन्स
LetsUpp | Trending
● ईडीच्या महाराष्ट्रात धडक कारवाया सुरु आहेत. राजकीय नेत्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावलं आहे.
● ईडीने फेमा कायद्या अंतर्गत हे समन्स बजावलं आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याने यामी गौतमला जबाब नोंदवावा लागणार आहे. त्यासाठी ईडीने पुढील आठवड्यात जबाब नोंदवण्यास हजर राहावं यासाठी समन्स बजावलं आहे.
● ईडीने दुसऱ्यांदा यामी गौतमला समन्स बजावलं आहे. फेमा अर्थात परकीय चलनासंबंधित कायदा आहे. यानुसार, परदेशातून काही वस्तू-सेवांबाबत केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवली जाते.
● यामध्ये काही गडबड किंवा शंका आढळल्यास कारवाई केली जाते. फेमा कायद्यानुसार व्यवहार झालेली देशी किंवा परदेशी मालमत्ता जप्त करता येते.
To know more click here
https://letsup.app.link/yaH7GRwJyhb
6 624
मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफ
LetsUpp | Trending
● अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत यावर्षी प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्याची 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केला.
● राज्यात अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघापुरता या पद्धतीने निर्णय घेतला तर राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
● आरक्षण रद्द झाल्यांनतर उगाच सल्ले देत फिरण्यापेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे विखे-पाटील स्पष्ट केले.
● आरक्षण टिकविण्यात आलेल्या अपयशाचे प्रायश्चित म्हणून आघाडी सरकारने देखील विद्यार्थ्याची या वर्षाची संपूर्ण शैक्षणिक फी भरावी आशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
To know more click here
https://letsup.app.link/vu8c8XXJyhb
6 624
https://www.youtube.com/watch?v=p3r_Asc2QVM
ईडीने साखर कारखान्यांवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – राजू शेट्टी
LetsUpp | Trending
● राज्यातील ४३ सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने केली आहे. आता ईडीने केलेली कारवाई मात्र राजकीय हेतूने प्रेरित आहे.”, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
● कारवाई १०० टक्के झाली पाहिजे, ही अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करत आहोत. रस्त्यावर आंदोलन करत आहोत. न्यायालयात दाद मागितली होती. ईडी आज ज्या पुराव्याच्या आधारे चौकशी करत आहेत. ते पुरावे मी पाच वर्षांपूर्वीच त्यांच्याकडे सादर केले होते.” असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
हे सुद्धा तपासाचं नाटक होणार –
● ”साखर कारखान्याचा खरेदी व्यवहारात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आहेत. एकही पक्ष यापासून अलिप्त नाही, या सगळ्या नेत्यांनी मिळून हा दरोडा टाकलेला आहे.
● ईडी हा दिल्लीकरांना सोय होईल अशी, दिल्लीकरांना जे त्रासदायक ठरतात, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशाप्रकारे तपासाचं नाटक करतं, मला माहिती हे सुद्धा तपासाचं नाटक होणार आहे. दिल्लीमध्ये खलबतं झाली बैठक झाली की तपास शांत होणार आहे. ” असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/0ytBN8eNyhb
