uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
photo content

🏍 *येतेय हार्ले-डेव्हिडसनची इलेक्ट्रिक बाईक!* *LetsUp | Auto* हार्ले-डेव्हीडसन ही कंपनी आपली वहिली इलेक्ट्रिक बाइक 'लाइव्हवायर' भारतात सादर (27 ऑगस्ट) करणार आहे. भारतीय बाजारात या बाइकची किंमत 32 ते 35 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. लाइव्हवायर बाइकमध्ये इलेक्ट्रिक मोटर 105 'एचपी' आणि 116 'एनएम' टॉर्क उत्पन्न करते. ही बाइक 3 सेकंदात 0 ते 1000 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते. लाइव्हवायर इलेक्ट्रिक बाइकला एसी वॉल सॉकिट पूर्ण चार्ज करण्यासाठी 12.30 तास इतका वेळ लागतो. यानंतर हि बाइक शहरात 235 किलोमीटर आणि हायवेवर 113 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते. 🤔 *फिचर्स काय-काय?* : ● या बाइकला उत्तम हार्डवेअर सपोर्ट देण्यात आला आहे. ● या व्यतिरिक्त ब्लूटूथ कनेक्टिविटीबरोबर 4.3 इंच टीएफटी डिस्प्ले, एबीएस आणि ट्रँक्शन -कंट्रोल सिस्टमसारख्या सुविधाही आहेत. ● तसेच, या बाइकमध्ये रायडिंग मोड्स असून, यात स्पोर्ट, रोड, रेन, रेंज आणि तीन कस्टम मोड्सचाही समावेश आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎬 जाणून घ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी! LetsUp | Entertainment 📍 चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 2019 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी सोशल मीडियावर केली शेअर 💁‍♂ यादीनुसार, ‘कबीर सिंग’ हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा आणि तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला ✔ टॉप 10 चित्रपटांची यादी अशी : 1. ‘कबीर सिंग’ 2. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ 3. ‘भारत’ 4. ‘मिशन मंगल’ 5. ‘केसरी’ 6. ‘टोटल धमाल’ 7. ‘सुपर 30’ सातव्या स्थानी 8. ‘गली बॉय’ 9. ‘दे दे प्यार दे’ 10. ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ व्हायरल ताप; करा घरगुती उपाय LetsUp | Health हल्ली व्हायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही डोकेवर काढत आहेत. या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. चला तर आज व्हायरल तापाची लक्षणं कोणती? त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? याविषयी जाणून घेऊयात... ---------------------- 😍 आता नामांकित 'मेडिसिन' व 'आरोग्यवर्धक उत्पादित वस्तूवर भरघोस सूटचा लाभ घ्या 'PharmEasy' वर, पहिल्या ऑर्डरवर मिळवा 30% ऑफ! त्यासाठी क्लिक करा : 👉 https://urlvia.com/tr1VJ ---------------------- 🤔 व्हायरल तापाची लक्षणं : घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते. व्हायरल तापावर वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण तुम्ही काही घरगुती उपचार देखील करू शकता. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करते. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या-जुलाबांपासून आराम मिळू शकतो. ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. शरीराचं तापमान कमी होईपर्यंत रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. असे करूनही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 1) काढा ट्राय करा : एक चमचा लवंगांची पावडर, ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर 2 तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात. 2) चहा ट्राय करा : धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला व्हिटॅमिन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 भारताचा वेस्टइंडीजवर विजय LetsUp | Sports 👍 भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजवर 318 धावांनी मिळवला विजय 💁‍♂ भारताने विंडीजला विजयासाठी 419 धावांचे लक्ष्य ठेवले होते, यानंतर विंडीजचा दुसरा डाव अवघ्या 100 धावांत आटोपला 🏆 पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे सामनावीर ठरला 📍 सामन्यातील विक्रम : ● कर्णधार विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयासह धोनीच्या विक्रमाची (27 विजय) बरोबरी साधली ● भारताकडून चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा शतकी भागीदारी (8 वेळा) करण्याचा विक्रम विराट-रहाणे जोडीच्या नावावर ● जसप्रीत बुमराहचा कसोटीमध्ये सर्वात जलद (11 कसोटी) 50 विकेट्सचा टप्पा पार करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला -------------------------------------------- 💥 पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास! 🎖 जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूने ओकाहुराला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले 🇮🇳 या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिलीच भारतीय खेळाडू ठरली 🏸 सिंधूने नोजोमी ओकाहुराच्या विरोधात 21-7, 21-7 अशा गुणांची खेळी करत विजय मिळवला 🧐 या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेडही केली ✔ या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत -------------------------------------------- ⚡ इंग्लंडचा रोमांचकारी विजय 🧢 तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 1 विकेटने रोमांचकारी विजय मिळवला 👉 या विजयाबरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी केली बरोबरी 💫 इंग्लंडला विजयासाठी 359 धावांची गरज होती, त्यांनी 9 गडयांच्या बदल्यात हे आव्हान पूर्ण केले 👌 इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, त्याने नाबाद 135 धावांची झुंजार खेळी केली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी.व्ही. सिंधू पहिली भारतीय ठरली ● केंद्राच्या अटल मिशन फॉर रिज्यूवेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन योजनेत 1,159 पार्क विकसित ● 23 सप्टेंबरला 4 राज्यांत (उत्तर प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा व केरळ) पोटनिवडणुका : निवडणूक आयोग ● भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली, कानपूर येथील रुग्णालयात दाखल ● पाकिस्तानने जादा पाणी सोडल्याने पंजाबमध्ये पुराचा धोका निर्माण, मदत पथके तैनात ● 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'फिट इंडिया मुव्हमेंट' सुरू करणार; पंतप्रधान मोदी ● हार्ले-डेव्हीडसनची पहिली इलेक्ट्रिक बाईक 'लाइव्हवायर' 27 ऑगस्ट रोजी भारतात सादर होणार ● पहिल्या कसोटीत भारताचा वेस्टइंडीजवर 318 धावांनी विजय, अजिंक्य रहाणे ठरला सामनावीर ● प्रो कबड्डी : दबंग दिल्लीने यूपी योद्धाविरुद्ध तर बेंगळुरूने जयपूरवर 41-30 ने विजय मिळवला ● फोर्ब्स 2019 : हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन ठरली सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💥 ब्रेकिंग! माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन LetsUp । Breaking ⚡ दिल्लीतील AIIMS रुग्णालयात घेतला अखरेचा श्वास 🏥 दीर्घ आजाराने निधन : माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं, ते 66 वर्षांचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. 💫 राजकीय कारकीर्द : ▪ जेटली यांनी 26 मे 2014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. ▪ 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ▪ 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांनी संभाळली. ▪ 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 📣 जेटलींच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय : ✔ नोटबंदी ✔ वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीची देशभर अंमलबजावणी ✔ रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट ✔ देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय 📽 : कार्याचा आढावा : http://bit.ly/31Z8KL9 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

🤔 Letsup I General Knowledge 1) कोणत्या देशाने लढाईसाठी तयार असलेली मानवरहित युद्धनौका (ऑगस्ट 2019) तयार केली? उत्तर : चीन 2) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मानवी-आकाराचा रोबोट (फेडर) कोणत्या देशाने पाठविला? उत्तर : रशिया 3) अमेरिकेतली कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण बनला? उत्तर : पॅरा-जलतरणपटू सतेंद्र सिंग लोहिया (मध्यप्रदेश) 4) अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘सरल’मध्ये (‘स्टेट रूफटॉप सोलर अट्रॅक्टीवनेस इंडेक्स) कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला? उत्तर : कर्नाटक 5) आर्क्टिक प्रदेशात जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी (अ‍ॅकेडेमिक लोमोनोसोव्ह) कोणत्या देशाने उभारली? उत्तर : रशिया 6) मनुष्यबळ विकास मंत्रीने सर्वात मोठ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्याचे नाव काय? उत्तर : निष्ठा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 *MPSCमार्फत 435 जागांसाठी भरती* *LetsUp | Job* 💁‍♂ *पदाचे नाव* : पशुधन विकास अधिकारी 🎓 *शैक्षणिक पात्रता* : पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी. ✔ *वयाची अट* : 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) 📍 *नोकरी ठिकाण* : मुंबई 💸 *फी* : खुला प्रवर्ग: ₹374/- (मागासवर्गीय: ₹274/-) 🗓 *ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत* : दि. 13 सप्टेंबर 2019 🗞 *जाहिरात पाहा* : http://bit.ly/31YRAx7 🌐 *ऑनलाईन अर्ज* : http://bit.ly/2XpbQJT न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 *अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक घोषणा!* *LetsUp | National* 🎯 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक अर्थ-प्रोत्साहक उपायांची केली घोषणा. 💁‍♂ *खालील घोषणा करण्यात आल्या* : *1.* गुंतवणूकदारांच्या भांडवली नफ्यावरील वाढीव कर अधिभार मागे. *2.* कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटीच्या (CSR) नियमांचे उल्लंघन फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही. सीएसआरसंबंधीच्या सर्व तरतुदींचा अर्थ मंत्रालयाकडून आढावा घेण्यात येईल. *3.* स्टार्टअप कराशी संबंधित प्रकरणांसाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल. स्टार्टअप नोंदणीकरणात आयकर कलम 56 2(B) लागू होणार नाही. स्टार्टअप्समध्ये एंजेल टॅक्स रद्द. *4.* सरकारी बँकांना सरसकट 70,000 कोटींचे अर्थसाहाय्य. तसेच रोकड सुलभतेची परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी गरज पडेल त्याप्रमाणे आणखी पाच लाख कोटी रुपयांची तरतूद. *5.* बँकांनी रेपो दरात केलेल्या कपातीचा लाभ व्याजदर कमी करून ग्राहकांना द्यावा लागेल. यातून गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याबरोबरच, उद्योगधंद्यांना खेळत्या भांडवलासाठी स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल. *6.* वस्तू आणि सेवा कर परतावा 30 दिवसांत पूर्ण होईल. MSMEच्या अर्जानंतर 60 दिवसात परतावा मिळेल. *7.* लोन सेटलमेंटच्या अटी सुलभ झाल्या. कर्जासाठी केलेल्या अर्जांचे ऑनलाईन मॉनिटरिंग होईल. कर्ज परतफेडीच्या 15 दिवसांच्या आत ग्राहकांना कागदपत्रं सुपूर्द करणे बँकेवर बंधनकारक असेल. *8.* करासाठी कुणालाही त्रास दिला जाणार नाही. टॅक्स असेसमेंट 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. आयकराशी संबंधित सूचना 1 ऑक्टोबरपासून सेंट्रलाईझ्ड पद्धतीने जारी होतील. *9.* पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल. या क्षेत्राच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल. *10.* 31 मार्च 2020 पर्यंत खरेदी करण्यात आलेली BS-IV वाहने त्यांच्या रजिस्ट्रेशन पीरियडपर्यंत कायम राहतील. शिवाय त्यांच्या वन टाईम रजिस्ट्रेशन फीसाठी जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. 🗣 *अर्थमंत्री म्हणाल्या* : ● जगातल्या बहुतांश देशांना मंदीचा सामना करावा लागतो आहे. जगाचा अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल. ● जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. देशात व्यवहार करणे आता सोपे झाले आहे. ● आर्थिक सुधारणेची प्रक्रिया बहुतांश प्रमाणात ऑटोमॅटिक झाली आहे. ● जीएसटीची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे. ● भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम वेगाने सुरु आहे. ● अर्थव्यवस्थेतली सुधारणा हा सरकारचा पहिला अजेंडा आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● केंद्र सरकार बँकांमध्ये 70 हजार कोटी रुपये जमा करणार, होम आणि कार लोन स्वस्त होणार : निर्मला सितारामण ● क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडिजच्या अंदाजानुसार, 2019 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर कमी करून 6.2 टक्के राहील ● जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नव्या तारखा लवकरच जाहीर होणार ● चलनांचे स्वरूप आणि आकार सतत बदलण्याचा निर्णय योग्य नाही, उच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले ● येत्या 13 किंवा 14 सप्टेंबरलाच निवडणुकीचा बिगुल वाजणार, राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत ● उद्या रविवारी (दि.25) मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार, रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार ● फ्युएल पाईपचा दोष दुरुस्त करण्यासाठी मारुती सुझुकीने सुमारे 40 हजार वॅगनआर परत बोलावल्या ● प्रो कबड्डी : गुजरातचा पटणा पायरेट्सवर 29-26 ने विजय तर यू मुंबाचा तमिळ थलैवाजवर 29-24 ने विजय ● भारताचा पहिला डाव 297 धावांत आटोपला; दुसऱ्या दिवसअखेर वेस्टइंडीजच्या 8 बाद 189 धावा ● बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यकथा लवकरच रुपेरी पडद्यावर, चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🤔 आज जन्माष्टमी; तुम्हाला 'हे' माहित आहे का? LetsUp I Special श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाची बहिण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता. हाच दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. हा जन्मदिवस संपूर्ण भारतात तसेच विदेशात देखील उत्साहात साजरा केला जातो. 💁‍♂ कुठे कशी साजरी होते जन्माष्टमी? 1) महाराष्ट्र : येथे कृष्णजन्म गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी उपवास केला जातो. रात्री 12 वाजता कुष्णाच्या मुर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही-दूधाचा प्रसाद दाखवला जातो. तर दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सवदेखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. 2) गुजरात आणि राजस्थान : या ठिकाणी देखील मोठया उत्साहात कृष्ण जन्म साजरा केला जातो. यादरम्यान कृष्णाची मंदिरे सजविली जातात. रात्रभर भजन आणि रासलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. 3) ओडीसा आणि बंगाल : बंगालमध्ये देखील कृष्ण जन्माला एक वेगळंच स्थान आहे. लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवले जाते. कृष्ण जन्मावरील नृत्याविष्कार सादर केले जातात. 4) दक्षिण भारत : या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. गीतेचे वाचन तसेच भगवान कृष्णासाठी विशेष नैवेद्य केला जातो. ❓ तुम्हाला 'हे' माहित आहे का? ● कृष्ण जन्माष्टमी, साटम आथम, गोकुळाष्टमी,अष्टमी रोहिणी, श्रीकृष्ण जयंती, श्री जयंती या नावाने देखील जन्माष्टमी साजरी केली जाते. ● दक्षिण आशिया खंडात खालील समुद्री भागातील देश गयाना, त्रिनिनाद, टोबागो,जमैका आणि डच कॉलनी ऑफ सुरीनाम येथे जन्माष्टमी साजरी केली जाते. ● मथुरा आणि वृंदावन श्री कृष्ण जन्मभूमी मध्ये जन्माष्टमी आठवडाभर साजरी केल्या जाते. ● सिंगापूर येथील जन्माष्टमी पाहण्यासारखी असते. येथे कृष्ण नामस्मरण करण्याची स्पर्धा सुध्दा भरविल्या जातात. ● पाकिस्तानमध्ये श्री स्वामीनारायण मंदिर कराची येथे सुध्दा जन्माष्टमी भजन कीर्तनासहित साजरी केली जाते. ● क्वालालंपूर येथे देखील जन्माष्टमी साजरी केली जाते. याप्रसंगी अन्नदान सुध्दा मोठ्या प्रमाणात होते. ● फ्रान्स येथील पॅरिसमधील मंदिरात 2 दिवस महोत्सव साजरा केला जातो. रात्री 12 वाजता श्री कृष्णास गंगाजलाने अंघोळ घालून विधिवत पूजा केली जाते. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👀 पहा, चांद्रयान-2 ने पाठवलेले चंद्राचे पहिले छायाचित्र LetsUp | Science 📍 हा फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) प्रथमच प्रसिद्ध केला आहे ✔ चांद्रयान-2 ने विक्रम रोव्हर लँडरने 21 ऑगस्ट रोजी हा फोटो टिपला आहे 🧐 या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत 🔎 हे छायाचित्र चंद्रापासून 2,650 किमी अंतरावरुन काढण्यात आले आहे 🎯 महत्वकांक्षी मोहीम : ● चांद्रयान-2 ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम असून त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे ● यामुळे चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय आणि खनिज शास्त्रीय माहिती मिळणार ● चांद्रयान-1 च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. आता त्याचा पाठपुरावा केला जाणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

💁‍♂ वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग LetsUp | Education 📍 शास्त्रीय नाव (मराठी नाव) व उपयोग : 1) अल्टिमीटर (विमान उंचीमापक) विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र 2) कार्ब्युरेटर (कार्ब्युरेटर) : वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण 3) सिस्मोग्राफ (भूकंपमापी) भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र 4) होल्टमीटर (होल्टमीटर) विजेचा दाब मोजणारे यंत्र 5) टेलिस्कोप (दूरदर्शक) : आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त 6) अ‍ॅनिओमीटर (वायुमापक) : वार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण 7) स्टेथोस्कोप (स्टेथोस्कोप) : हृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे 8) स्पेक्ट्रोमीटर (वर्णपटमापक) एका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण 9) टेलिप्रिंटर (टेलिप्रिंटर) संदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र 10) थर्मामीटर (तापमापक) उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 *टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक ठरले* *LetsUp I Sports* 📣 एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीची केली घोषणा 🎯 *भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक* : ● फलंदाजी प्रशिक्षक : विक्रम राठोड ● गोलंदाजी प्रशिक्षक : भारत अरुण ● क्षेत्ररक्षण प्रशिक्षक : आर.श्रीधर 👀 ही निवड पाहता फक्त संजय बांगर वगळता सगळे प्रशिक्षक आहे तेच ठेवण्यात आले आहेत ✔ प्रशासकीय व्यवस्थापकपदी विद्यमान सुनील सुब्रह्मण्यम यांच्या जागी गिरीश डोंगरे यांची नियुक्ती -------------------------------------------- 🇮🇳 *भारताची 203 धावांपर्यंत मजल* 💁‍♂ भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर 6 बाद 203 धावांपर्यंत मजल मारली 👍 भारताकडून के.एल. राहुलने 44 तर अजिंक्य रहाणेने 163 चेंडूत 81 धावांची खेळी केली 💫 विंडीजकडून पहिल्या दिवशी केमार रोचने 3, गॅब्रिअलने 2 तर रोस्टन चेसने 1 बळी घेतला -------------------------------------------- 🤼‍♂ *बंगालकडून पटणाचा धुव्वा* 📍 'प्रो कबड्डी'मध्ये बंगाल वॉरियर्सने पाटणा पायरेट्‌सचा 35-26 असा धक्कादायक पराभव केला ✔ बंगालकडून मनिंदरसिंगने सुपरटेन कामगिरी केली. त्याला के. प्रपांजन व रिंकू नरवाल यांची साथ लाभली 👉 पाटणा संघाच्या परदीप नरवालने 12 गुण मिळविले. त्याला अन्य खेळाडूंची साथ लाभली नाही न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● खर्चकपात करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून वर्षभरात देशभरातील 5,500 हजार एटीएम बंद ● आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत CBI कोठडी ● पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि दुबई या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना ● कोहिनूर मील गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘ईडी’कडून तब्बल 9 तास चौकशी ● सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा चांगला पाऊस पडू शकतो, हवामान विभागाने वर्तवली शक्यता ● राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सामानाची केली भाडेवाढ, नवे तिकीट दर 27 ऑगस्टपासून लागू ● बांधकाम व्यावसायिक डीएसकेच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव करायला कोर्टाने दिली परवानगी ● BMW ने नवीन 3 Series कार केली लाँच, या कारची एक्स-शोरुम किंमत 41.40 लाखांपासून सुरु ● भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेरीस 6 बाद 203 धावा केल्या ● नेटफ्लिक्सची आगामी सिरीज ‘बार्ड ऑफ ब्लड’चा ट्रेलर रिलीज, यामध्ये इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🐅 19 वर्षांत दोन हजार वाघांची शिकार! LetsUp I Update 📍 गत 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार, तर 382 वाघांना जीवंत पकडण्यात आले 👀 केवळ भारतातच 626 वाघांची शिकार, याबाबत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती 📝 केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे अहवालात माहिती नमूद 🔎 साल 2000 ते 2018 पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला होता 🤔 वाघांची शिकार का होते? : ● आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी ● चीनची छुपी बाजारपेठ वाघांची मोठी ग्राहक ● अवयवांपासून औषधांची निर्मिती केली जाते ● कातड्याला लाखो रुपये किंमत मोजली जाते ● नखांचा दागिन्यांमध्ये वापर, हाडांची पूड करून औषधात मिसळली जाते न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 'फोर्ब्स' कडून जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर LetsUp | Special 📍 फोर्ब्‍स 2019 च्या माहितानुसार, ड्वेन जॉनसन जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला 🇮🇳 या यादीत एकमेव भारतीय अभिनेत्याचा समावेश, जून 2018 ते जून 2019 या कालावधीत 65 मिलियन डॉलरची कमाई करत अक्षय कुमार चौथ्या क्रमांकावर विराजमान 🎯 सविस्तर यादी अशी : 1. ड्वेन जॉनसन ( 89.4 मिलियन डॉलर) 2. क्रिस हेमस्वर्थ (76.4 मिलियन डॉलर ) 3. रॉबर्ट डाउनी जूनियर (66 मिलियन ) 4. अक्षय कुमार (65 मिलियन डॉलर) 5. जॅकी चॅन (58 मिलियन डॉलर) 6. ब्रॅडली कूपर (57 मिलियन डॉलर) 7. अ‍ॅडम सँडलर (57 मिलियन डॉलर) 8. ख्रिस इव्हान्स (43.5 मिलियन डॉलर) 9. पॉल रुड (41 मिलियन डॉलर) 10. विल स्मिथ (35 मिलियन डॉलर) न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup