uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - सोशल मीडियावरील तुमच्या हालचालींवर लवकरच सरकारची असणार नजर, कमेंट करताना सावधान; होईल 3 वर्षांचा तुरूंगवास 2. वॉशिंगटन - भारताची अर्थव्यवस्था मजबुतीच्या दिशेने जात आहे; नोटबंदी, GST चा निर्णय ऐतिहासिक : क्रिस्टीन लेगार्ड, IMF प्रमुख न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 3. न्यूयॉर्क - काँग्रेस हा संधीसाधू पक्ष; नोटाबंदीचा निर्णय धाडसी असून यासाठी जगभरात भारताचे कौतुक होत आहे : अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री 4. वेंगारा - केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा विधानसभा पोटनिवडणुकीत इंडियन यूनियन मुस्लिम लीगने मारली बाजी 5. कानपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांच्याशी केल्याप्रकरणी कानपूरमधील 23 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल 6. मुंबई - ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर सोडले टीकास्त्र 7. मुंबई – शिवसेनेने 'नीच' राजकारण केलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे राजकारण कधीच विसरणार नाही : राज ठाकरे 8. रत्नागिरी - कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खाण्यातून विषबाधा, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू 9. अहमदनगर - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक पोलीस कर्मचारी रमेश शिंदे निलंबित, सोशल मीडियावर सरकार विरोधात पोस्ट केल्याचा आरोप 10. फ्लिपकार्टच्या अ‍ॅपने गुगल प्ले स्टोअरवर दहा कोटी डाऊनलोड टप्पा केला पार, असा विक्रम करणारे ते पहिले भारतीय ई-कॉमर्स पोर्टल बनले 11. नवी दिल्ली - भारताचा डब्लू.डब्लू.ई चॅम्पियन जिंदर महालने महान क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकरची घेतली भेट, भारतात होणाऱ्या डब्लू.डब्लू.ईच्या लाईव्ह इव्हेंटला हजर राहण्याचे दिले आमंत्रण 12. मुंबई - अभिनेत्री विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, यात ती रेडिओ जॉकीची भूमिका साकारणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. गोरखपूर - बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या चार दिवसांत 69 मुलांचा मृत्यू झाला, गेल्या 7 महिन्यांत 823 मुलांचा मृत्यू 2. नवी दिल्ली - ग्रामीण भागात उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांमुळे तेथील महागाईत मोठी घट तर दारू आणि तंबाखूवरील खर्चांतही घट - एसबीआय 3. नवी दिल्ली - अन्नधान्य आणि उर्जेवर देण्यात येणारी अनुदाने बंद केल्यास देशातील प्रत्येक व्यक्तीला वार्षिक 2600 रुपये युनिव्हर्सल बेसिक इन्कमपोटी देणे शक्य - आयएमएफ 4. नवी दिल्ली - ‘ब्ल्यू व्हेल’ सारखे धोकादायक गेम ब्लॉक करण्यासाठी फायरवॉल तयार करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले 5. नवी दिल्ली - राहुल लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील अशी घोषणा खुद्द काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एका मुलाखतीत केली 6. नवी दिल्ली - गजबलेल्या व पायाभूत सुविधांचा वनवा असलेली मुंबई जगातील सर्वाधिक सुरक्षित 60 शहरांमध्ये 45 व्या स्थानावर तर राजधानी दिल्‍ली 43 व्या स्थानावर 7. मुंबई - राज्यात दिवाळीत भारनियमन होणार नाही, कोल इंडिया कंपनीकडून कोळसा पुरवठा होणार; ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती 8. मुंबई - ग्रामीण भागात सेवा देण्यास नकार देणार्‍या राज्यातील 4500 डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण संचलनालयाने घेतला 9. पुणे - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन तूर्तास स्थगित केले 10. लंडन - ट्विटरवर #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग जोरात सुरू, हा हॅशटॅग वापरून जगभरातील अनेक महिला ट्विटर वापरणे बंद करत आहेत 11. मुंबई - बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूरने आगामी ‘साहो’च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले, याबाबतची माहिती श्रद्धाने ट्विटरवरून दिली 12. मुंबई - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे रद्द, मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालानुसार आता सर्वाधिक उपासमारी असलेल्या 119 देशांच्या यादीत भारताची (100 व्या स्थानावार) तीन अंकांनी घसरण 2. नवी दिल्ली - पदवीधर मुस्लिम युवतींना लग्नासाठी केंद्र सरकार देणार 51 हजारांचा ‘शगुन’, मुस्लिम समाजात मुलींना शिकवण्यासाठी सजगता वाढावी म्हणून निर्णय 3. नवी दिल्ली - आता पशु चाऱ्याच्या व्यवसायात बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली करणार पदार्पण, मध्यमवर्गींयानंतर आता शेतकऱ्यांवर लक्ष्य केंद्रित करणार 4. नवी दिल्ली - जयने सरकारी पैसा घेतला नाही किंवा जमीनही घेतलेली नाही, त्यामुळे यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही, मुलावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अमित शहांची सफाई न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 5. भोपाळ - महाराष्ट्र आणि गुजरातनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही पेट्रोलवरील 3 टक्के आणि डिझेलवरील 5 टक्के व्हॅट केला कमी 6. हरियाणा - पंचकूला जिल्हा न्यायालयाने रामरहीमची सहकारी हनीप्रीत आणि सुखदीप कौरला 23 ऑक्टोबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी 7. वॉशिंग्टन - सरकारने अनिवार्य केलेल्या आधार कार्डमुळे सरकारचे सुमारे 9 अब्ज रुपये वाचणार, आधारकार्डचे निर्माते नंदन निलेकणी यांची माहिती 8. संयुक्त राष्ट्राची सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोतून अमेरिकेनंतर आता इस्राईलसुद्धा बाहेर पडणार 9. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 32,432.69, निफ्टी : 10,167.45, सोने भाव : 29,760 (प्रतितोळा), चांदी : 40,228 (प्रतिकिलो) 10. मुंबई - येत्या 15 ऑक्टोबरपासून अतिरिक्त काम न करण्याचा मध्य रेल्वे मोटरमन संघटनेने घेतला निर्णय, यामुळे ऐन दिवाळीत लोकलचा होणार खोळंबा 11. मुंबई - ‘भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अपयश आलं आहे. फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नाही, ‘सामना’मधून भाजपवर जोरदार टीकास्त्र 12. मुंबई - महापालिकेतील मोठा पक्ष नगरसेवक करोडो रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे, भाजप खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप 13. शिवसेनेच्या धमकीवर प्रतिक्रिया देणंही हास्यास्पद झालं आहे. दिवसभर एकत्र राहतात आणि संध्याकाळी टीका करतात : सुप्रिया सुळे 14. सोनी कंपनीने भारतात सायबरशॉट आरएक्स 10 IV हा तब्बल 25 एक्स इतकी ऑप्टीकल झूम करण्याची क्षमता असणारा कॅमेरा 1,29,990 रूपयांत केला लाँच 15. ऑकलंड - आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगसाठी दिली मान्यता, यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्येही सर्व संघ एकत्र खेळलेले पाहायला मिळणार 16. मुंबई - कॉमेडियन अभिनेता कपील शर्मा याचा आगामी चित्रपट 'फिरंगी'चे मोशन पोस्टर प्रदर्शित, हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत दहशतवाद्यांची चकमक, दोन जवान शहीद तर दोन दहशतवादी ठार 2. नवी दिल्ली - गेल्या 3 वर्षांच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 183 जवान शहीद झाले तर 62 काश्मीरी नागरिकांचा मृत्यू : केंद्र सरकार 3. नवी दिल्ली - 13 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेला देशव्यापी संप पेट्रोल पंपचालकांनी घेतला मागे 4. नवी दिल्ली - नोकरी बदलल्यावर आपोआप टान्सफर होणार पीएफ अकाऊंट, जवळपास 5 कोटी नागरिकांना ऑटो पीएफ ट्रान्सफरचा मिळणार फायदा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 5. नवी दिल्ली - 18 वर्षाखालील पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार ठरवला जाईल व पतीविरुद्ध गुन्हा दाखल होईल : सुप्रीम कोर्ट 6. चंदीगड - रामरहीमला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हिंसा घडवून आणण्याचा कट आपणच रचला असल्याची हनीप्रीतने दिली कबुली, सुत्रांची माहिती 7. अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याचे निवडणूक आयोगाने दिले संकेत 8. सेऊल - उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी सायबर हल्ला करत गुपित लष्करी कागदपत्रांसहित युद्धावेळी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने आखलेल्या रणनीतीची केली चोरी 9. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31,833.99, निफ्टी : 9,984.80, सोने भाव : 29,783 (प्रतितोळा), चांदी : 40,246 (प्रतिकिलो) 10. मुंबई - आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर : उद्धव ठाकरे 11. मुंबई - बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही : रामदास कदम 12. मुंबई - बैलगाडी शर्यतींच्या आयोजनाला हायकोर्टाची बंदी कायम, बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार 13. ठाणे - खंडणी प्रकरणी छोटा शकील, दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर, पंकज गांगर आणि कासकरला मदत करणारे आणखी दोघांविरुद्ध मोक्का 14. नवी दिल्ली - शाओमीचा एमआय मिक्स 2 स्मार्टफोन लाँच, फोनची किंमत 35 हजार रुपये, हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करता येईल 15. नवी दिल्ली - लियोनेल मेस्सीच्या थरारक हॅट्ट्ट्रीकच्या जोरावर अर्जेंटिनाने विश्वचषक फुटबॉल 2018 मध्ये आपले स्थान केले पक्के 16. मुंबई - 71 व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 50 मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने पटकावले सुवर्णपदक 17. पुणे - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती 18. मुंबई - 'रेस-3' मध्ये बॉबी देओल दिसणार, सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. श्रीनगर - काश्मीरमधील सुरक्षा दलांनी सोमवारी दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले 2. नवी दिल्ली - जीएसटीच्या 28 टक्क्यांच्या स्लॅबमधील काही वस्तू वगळण्याचा निर्णय केंद्र सरकाकडून घेण्यात येण्याची शक्यता 3. नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या एका ताज्या अहवालानुसार देशाची अर्थव्यवस्था बिकट असल्याचे दिसून आले 4. नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर बंदी, केवळ हिंदूंच्या सणांवरच बंधनं लादण्याचं धाडस का? चेतन भगत यांचा सवाल 5. नवी दिल्ली - डिमॅट खाते हॅक होऊ नये म्हणून मुंबई शेअर बाजाराने अत्याधुनिक सायबर सुरक्षा कामकाज केंद्र कार्यरत केले 6. हरयाणा - येथील सोनीपतमध्ये 1996 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याला दोषी ठरवले 7. मुंबई - राज्य सरकारने पेट्राेल-डिझेल दरात कपातीचा निर्णय घेतला, पेट्रोलचे दर दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी होणार 8. पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल आज दुपारी 1 वाजता जाहिर केला जाणार 9. पुणे - मुद्रांक विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील अधिकृत मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिक संघटनांचा बेमुदत राज्यव्यापी संप 10. कॅलिफोर्निया - उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जंगलाला लागलेल्‍या भीषण आगीमध्ये दहा जण ठार, दीड हजार इमारती जळून खाक 11. मुंबई - एका आवाहलानुसार भारतीय चित्रपट उद्योगाचा वार्षिक आधारावरील वृद्धीदर 11 टक्के असून 2020 सालापर्यंत तो 23800 कोटी रुपयांचा होईल 12. मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनची 10 नोव्हेंबरला होणारी निवडणूक पुढे ढकलली, व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. श्रीनगर - सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना रोखण्यासाठी आता पॅलेट गनऐवजी प्लास्टिक गोळ्यांचा वापर करण्यात येणार 2. नवी दिल्ली - रेल्वेतून व्हीआयपी कल्चर घालविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना मिळणारी 'व्हीआयपी ट्रीटमेंट' बंद करण्याचा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 3. नवी दिल्ली - संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत-चीन सीमेवर नथूला-डोकलाम परिसराची केली हवाई पाहणी 4. नवी दिल्ली - हज यात्रेवरील सबसीडी हटविण्याबाबतचा नवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 5. नवी दिल्ली - पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत तफावत, अनेक जवानांमध्ये नाराजीची भावना 6. नवी दिल्ली - डावे केरळमध्ये सत्तेत आल्यापासून 120 भाजप कार्यकर्त्यांची हत्या : अमित शाह 7. नवी दिल्ली - यंदा दिवाळी कसली, देशातील लोकांचे दिवाळे निघाले आहे : काँग्रेस 8. गाजियाबाद - कोणतेही संकट देशाच्या सुरक्षेबाबत निर्माण झाले तर हवाई दल त्याचा सामना करण्यासाठी सज्ज : एअरचीफ मार्शल 9. पंचकुला - बाबाला (राम रहिम) पाठदुखीचा त्रास होत असल्याने अस्वस्थ झालेल्या हनीप्रीतने बाबाला भेटण्याची इच्छा केली व्यक्त 10. बंगळुरू - भारत जगातील शक्तिशाली देश बनला आहे. अन्यथा डोकलामचा वाद कधीच संपुष्टात आला नसता : राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री 11. वडनगर - देशाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींची जन्मगावी वडनगरला प्रथमच भेट, नागरिकांची तुफान गर्दी, मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे केले लोकार्पण 12. मास्को - सीरियामधील विविध ठिकाणच्या ‘इसीस’च्या तळांवर रशियाकडून हवाई हल्ले, यामध्ये ‘इसीस’चे 180 हून अधिक दहशतवादी मारले गेले 13. मुंबई - उत्तर मध्य महाराष्ट्रात येत्या 28 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज 14. मुंबई - मुंबईजवळच्या बुचर म्हणजेच जवाहर द्विपावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग अजूनही सुरुच, आगीमुळे जवळपास 235 कोटींचे नुकसान 15. धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील शेतकऱ्याचा (दशरथ कोळी) फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू 16. सांगली - ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना नाट्यक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर 17. अहमदनगर - जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत जनलोकपालसाठी आंदोलन छेडणार 18. इन्स्टाग्रामवरील स्टोअरीज आता फेसबुकवरदेखील शेअर करता येणार, आधी प्रायोगिक अवस्थेत असणारे हे फिचर आता सर्व युजर्सला देण्यात येणार 19. पटना - आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 20 हजार रूपये मासिक पेन्शन देणार, उत्तर प्रदेशच्या क्रीडा मंत्र्याची घोषणा 20. मुंबई - चांगला मोबदला मिळणार असेल आणि दुसरं काही काम नसेल तर 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करायला मी तयार आहे : शाहरुख खान न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

डिजीटल न्यूजपेपर.pdf5.65 KB

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - केंद्र सरकारने राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील यावरील व्हॅट पाच टक्क्यांनी कमी करावा, यासाठी हालचाली केल्या सुरू, इंधनाचे दर कमी होण्याची चिन्हे 2. नवी दिल्ली - रजनीश कुमार (59) एसबीआयचे नवे चेअरमन, त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल --------------------------------------------- आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... https://goo.gl/znYVB2 --------------------------------------------- 3. नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था भक्कमच, जीडीपी पहिल्यांदा 5.7 टक्के झालाय का? : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4. भारतीय वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) उप महासंचालकपदी निवड 5. भारतीय वायुसेनेतील तीन महिला वैमानिक, या महिन्याच्या अखेरीस अद्ययावत सुखोई तीस विमानांमधून गगनभरारी घेणार 6. स्वीडन - स्वीस संशोधक जॅक्स डबॉच आणि अमेरिकन संशोधक जोचिम फ्रँक, रिचर्ड हँडरसन यांना यंदा रसायनशास्त्रातील नोबेलने गौरवण्यात आले 7. लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिप्पणी केल्याप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ कोर्टात तक्रार दाखल, याप्रकरणी 7 ऑक्टोबरला होणार सुनावणी 8. ठाणे - दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या हस्तकाला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी 9. मुंबई - नांदेड महापालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर VVPAT चा वापर होणार, प्रभाग क्रमांक दोनमध्ये होणार वापर : राज्य निवडणूक आयुक्त, जे.एस.सहारीया 10. मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करा : राज्य सरकार 11. मुंबई - 11 हजार निकाल राखीव असताना सर्व निकाल जाहीर असे विद्यापीठ कसे म्हणू शकते? : माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर 12. मुंबई - वीज पडून मृत्यू झाल्यास 4 लाखांची भरपाई, राज्य सरकारच्या महसूल, मदत व पुनर्वसन विभागाचा निर्णय 13. मुंबई - रेल्वेकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यांच्याविरोधात मनसेकडून आज मोर्चाचे आयोजन, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राज ठाकरेंनी केले आवाहन 14. मर्सडिझ बेंझ कंपनीने भारतात आपल्या सी-क्लास या श्रेणीतील ‘एडिशन सी’ सादर करण्याची केली घोषणा 15. नवी दिल्ली - हार्दिकची तुलना कपिल यांच्यासोबत करण्यात येऊ नये. हार्दिक फार गुणी खेळाडू आहे : सौरव गांगुली 16. मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने दिग्दर्शनापाठोपाठ फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात केला प्रवेश, तिने स्वतःचा नुश नावाचा ब्रँड केला तयार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

आजचा डिजिटल न्यूजपेपर वाचा लगेच दिवसभरात काय घडले याचा आढावा लेट्सअप-डिजिटल न्यूजपेपर सोबत...! सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा आणि Pdf ऑप्शन निवडा http://myletsup.com/digitalnewspaper.pdf न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup हा मेसेज तुमच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आणि करा सर्वांना अपडेट… प्रतिक्रिया कळवा : feedback@myletsup.com

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - भारतात अत्यंत लोकप्रिय असलेली आकाशवाणी आता जपान, जर्मनी, द. आफ्रिका, कॅनडा या देशांत आपली सेवा सुरू करणार 2. नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 1.50 रुपयांनी वाढ, दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम अनुदानित गॅस सिलिंडरचा दर 488.68 रुपये 3. नवी दिल्ली - विकासासाठी पैशांची गरज असते, ज्यांना देशात विकास पाहिजे आहे, त्यांना त्या विकासासाठी किंमत तर मोजावीच लागेल - अरुण जेटली 4. नवी दिल्ली - दिवाळीनंतर राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता असल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले 5. नवी दिल्ली - भारतीय जवानांना स्वदेशी पण अत्यंत हलके आणि अभेद्य असलले ‘सुरक्षा कवच’ जवानांना सुरक्षा प्रदान करणार 6. गुजरात - अरबी समुद्रात 130 फूट खोलीवर 10 हजार वर्षे जुने अवशेष आढळले, तज्ज्ञांच्या मते भगवान श्रीकृष्णाने वसवलेली द्वारका नगरीचा हा भाग 7. नागपूर - फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर 8. मुंबई - राज्यातील 29 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या 15 हजार 766 प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले 9. मुंबई - महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला स्टेट बँक आॅफ इंडिया वित्तपुरवठा करणार 10. नवी दिल्ली - जिओ आणि आयफोन यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून लवकरच जिओच्या स्टोअरमध्ये आयफोन उपलब्ध होणार 11. मुंबई - कॉलेजविश्वातल्या नाट्यप्रेमींचं मुख्य आकर्षण ठरणाऱ्या आयएनटी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत दहा एकांकिका दाखल 12. नागपूर - अंतिम वनडे सामन्यात रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

आजचा डिजिटल न्यूजपेपर वाचा लगेच दिवसभरात काय घडले याचा आढावा लेट्सअप-डिजिटल न्यूजपेपर सोबत...! सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://myletsup.com/digitalnewspaper.pdf न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup प्रतिक्रिया कळवा : feedback@myletsup.com

Lets Up News Updates 1. श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण व सेना प्रमुख जनरल बिपीन राव यांची घेतली भेट 2. नवी दिल्ली - एका सर्वेक्षणानुसार सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण 31 टक्क्यांनी वाढले 3. नवी दिल्ली - स्पाइस जेट कंपनी 50 क्यू 400 टर्बोप्रॉप विमाने खरेदी करणार, त्यात 90 आसनी टर्बोप्रॉप विमान उडविणारी स्पाइसजेट पहिली ठरणार 4. नवी दिल्ली - दसरा, दिवाळीसह सणासुदीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने स्टेट बँकेने कर्जांच्या किमान आधारभूत दरात (बेस रेट) 0.05 टक्के घट केली 5. नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्याची सुटका करण्याचा प्रस्ताव असल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने खोडाला 6. राजस्थान - महिलेला लिफ्ट दिल्यानंतर रस्त्याच्याकडेला नेऊन तिच्यावर 23 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बिकानेरमध्ये घडली 7. मुंबई - काँग्रेसचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे 1 ऑक्टोबरला आपल्या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती 8. मुंबई - एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे आठवड्याभरात ऑडिट करण्याचे आदेश 9. मुंबई - डॉ. तात्याराव लहाने यांची अॅट्रॉसिटीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने डॉ. लहाने यांना निर्दोष ठरवले 10. नवी दिल्ली - यापुढील काळात होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपले मत कोणाला गेले हे तत्काळ समजणार 11. मुंबई - बहुचर्चित ‘पद्मावती’मधील एका गाण्यावरील नृत्यासाठी संजय लीला भन्साळीने कॅटरिना कैफला साईन केले असल्याची चर्चा 12. लंडन - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या मारहाणीच्या व्हिडिओनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) स्टोक्सवर निलंबनाची कारवाई केली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

लेट्स अप डिजिटल न्यूज पेपर आज दिवसभरात काय घडले याचा आढावा...! सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://myletsup.com/digitalnewspaper.pdf न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup प्रतिक्रिया कळवा : feedback@myletsup.com

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - सरकारी योजनांचा आणि अनुदानांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार क्रमांक’ प्राप्त करण्याची मुदत केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत वाढवली 2. नवी दिल्ली - पान टपर्‍यांवर सॉफ्टड्रिंक्‍स, बिस्किट तसेच चॉकलेट विकण्यावर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार, तसा प्रस्ताव तयार करण्यात आला 3. नवी दिल्ली - केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल 20 लाख रिक्त पदे भरणार, रेल्वेतच सुमारे 2 लाखाहून अधिक पदे 4. नवी दिल्ली - उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता 5. नवी दिल्ली - उत्तर प्रदेश कॅडरची आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार ठरली माउंट मनास्लू सर करणारी पहिली भारतीय महिला 6. नवी दिल्ली - नोटबंदीनंतर पेमेंट सिस्टीममध्ये केलेल्या बदलांमुळे विविध बँकांना 3800 कोटी रुपयांचा फटका बसला 7. पुणे - दसऱ्याच्या निमित्ताने शनिवारी बंद होणाऱ्या बँका थेट मंगळवारीच उघडणार, रोख रकमेची अडचण भासण्याची शक्यता 8. मुंबई - महाराष्ट्रातील नवबौद्धांता कायदेशिररित्या बौद्ध समजणे अनिवार्य, त्यांना बौद्ध अल्पसंख्यांक कायदेशीर दर्जा 1956 पासूनच - राज्य सरकार 9. बीड - भगवान बाबा यांचे जन्मगाव घाट सावरगाव येथील गावकऱ्यांनी निमंत्रण दिल्यामुळे पंकजा मुंडें दसरा मेळावा सावरगाव येथे घेणार 10. न्यूयॉर्क - भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी 40 लाख डॉलरची रक्कम जमा केली 11. मुंबई - बीबीसीची शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर, त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरूनिस्सा सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश 12. बंगळूर - चौथ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय, 335 धावांचा पाठलाग करताना भारताच्या 50 षटकात 8 बाद 313 धावा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - लवकरच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल घरपोहोच मिळण्याची शक्यता, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती 2. नवी दिल्ली - केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल 20 लाख रिक्त पदे भरणार, केंद्रीय कामगार मंत्रालयाच्यावतीने यासाठी पुढाकार 3. नवी दिल्ली - रेल्वे टीसींना तिकीट चेकिंगसाठी युनिफॉर्मसक्ती; सर्व आरपीएफ स्टाफ, तिकीट चेकर यांनी अधिकृत गणवेशातच चेकिंग करावं : पियुष गोयल, रेल्वेमंत्री 4. नवी दिल्ली - सरकार अडचणीत आले की सर्जिकल स्ट्राइक करतं, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली खरमरीत टीका 5. नवी दिल्ली - नोटबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू करण्याची घाई केली, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला हल्लाबोल 6. जयपूर - योगगुरु रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये केला शिरकाव, अंडरवेअर ते स्पोर्ट्सवेअर तयार करण्याचा रामदेव बाबा यांचा मानस 7. गोवा - बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्यावरील आरोप निश्चित, आपण दोषी नसल्याचा तरुण तेजपाल यांचा दावा, 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी 8. लॉस एंजल्स - जगप्रसिद्ध मॅगझीन ‘प्लेबॉय’चे संस्थापक ह्यू हेफनर यांचं वृद्धापकाळाने निधन, ते 91 वर्षांचे होते 9. न्यूयॉर्क - कुलभूषण जाधव यांच्या मोबदल्यात पेशावरमधील शाळेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला सोडण्याचा प्रस्ताव, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचा दावा 10. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेण्याचे दिले संकेत 11. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31282.48, निफ्टी : 9768.95, सोने भाव : 29,632 (प्रतितोळा), चांदी : 39,767 (प्रतिकिलो) 12. मुंबई - मुंबईत लोकलच्या 2 ऑक्टोबरपासून 60 नव्या फेऱ्या, गर्दीच्या वेळी कोणतीही फेरी नाही 13. कोल्हापूर - छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत झाला राडा, सतेज पाटील-महादेव महाडिक गट भिडले, कार्यकर्त्यांची हाणामारी 14. नवी दिल्ली - रॉयल एनफिल्ड कंपनी लवकरच दमदार आणि हटके लुक असणारी इंटरसेप्टर 750' ही नवी बुलेट लाँच करण्याची शक्यता 15. बंगळुरु - भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथी वनडे, ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 335 धावांचे आव्हान, उमेश यादवचे 4 बळी 16. मुंबई - मराठी चित्रपट अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेची प्रमुख भूमिका असलेला द्वैभाषिक चित्रपट 'सीआरडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर - बांदीपुरा येथे दहशतवाद्यांनी रमीज अहमद परे या निवृत्त जवानाची गोळी मारून केली हत्या, गोळीबारात कुटुंबातील 3 जण जखमी 2. *सण-उत्सवाचा मौका, शॉपिंग तो बनती है बॉस! जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्ससाठी लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/YYfp5P* 3. नवी दिल्ली - तुम्ही आता 31 डिसेंबर 2017पर्यंत आधारला पॅन कार्डशी जोडू शकता, केंद्र सरकारने अधिकृतरीत्या केली घोषणा 4. नवी दिल्ली - ‘सौभाग्य’ची वीज फुकट नाही! गरिबांना फक्त वीज जोडणी विनामूल्य, सरकारचा खुलासा --------------------------------------------- आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horo-28-sept --------------------------------------------- 5. नवी दिल्ली - साखरेचे दर 45 रुपये किलोच्या आत राहणार असतील तर यावर्षी साखरेची आयात होऊ देणार नाही : नितीन गडकरी 6. नवी दिल्ली - लघु उद्योगांना उद्योग जगतातील आव्हानांचा लाभ घेण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत यावे लागेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 7. नवी दिल्ली - भाजपनेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा लाेकसभा शिस्तपालन समितीचे बनले अध्यक्ष 8. नवी दिल्ली - कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली : यशवंत सिन्हा, ज्येष्ठ भाजपानेते 9. ठाणे - दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा 10. न्युयाॅर्क - उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अण्वस्त्र तंत्रज्ञान काेणत्या देशाच्या सहकार्यामुळे मिळाले, याची चौकशी व्हायला हवी : सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री 11. न्यूयॉर्क - लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी : ख्वाजा आसिफ, पाक परराष्ट्रमंत्री 12. मुंबई - कर्जखाते असलेल्या बँकेला शेतक-यांनी तात्काळ आधार क्रमांक द्यावा, आपला आधार नंबर कर्जखात्याशी नोंद करुन घ्या, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन 13. मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना थेट भाजपमध्ये प्रवेश न देता मित्रपक्ष म्हणून त्यांचा एनडीएत समावेश करण्याच्या निर्णयावर भाजप पक्षश्रेष्ठींनी केले शिक्कामोर्तब 14. मुंबई - टाटा मोटर्सने आपली नवी कार ‘नेक्सन’ केली लाँच, या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 5.85 लाख रुपये (एक्स शोरुम) 15. बंगळुरु - विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज, संघात काही बदल करण्याची शक्यता 16. लॉस एंजेलिस - फोर्ब्सच्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीत सोफिया वरगारा पहिल्या तर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आठव्या क्रमांकावर न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीएसएफने राबवले ऑपरेशन अर्जुन, यामध्ये पाकिस्तानचे 7 सैनिक आणि 11 नागरिक मारले गेले, पाकिस्तानने टेकले गुडघे 2. नवी दिल्ली - भारतीय पॅराकमांडोंनी आज पहाटे म्यानमार सीमेजवळ केली कारवाई, मात्र हा सर्जिकल स्ट्राईक नाही तर लष्कराची कारवाई आहे : भारतीय सैन्यदलाने केले स्पष्ट 3. नवी दिल्ली - सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी केली टीका 4. नवी दिल्ली - केंद्र सरकार बोफोर्स प्रकरण पुन्हा उकरून काढत आहे; काँग्रेसला बदनाम करण्याची ही खेळी आहे : मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते 5. सिरसा - ईडी आणि आयकर विभाग करणार राम रहीमच्या संपत्तीची चौकशी; पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे आदेश 6. ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला आणखी 4 दिवसांची पोलिस कोठडी 7. काबुल - काबुल विमानतळावर 20 ते 30 रॉकेटने हल्ला, अनेक विमानांचं उड्डाण रद्द, हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता 8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31159.81, निफ्टी : 9735.75, सोने भाव : 29,796 (प्रतितोळा), चांदी : 39,935 (प्रतिकिलो) 9. मुंबई - खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले : राज ठाकरे 10. औरंगाबाद - चंद्रकांत दादा स्वतः बोगस व्यक्ती आहेत. ते स्वतः मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावात असतात : राजू शेट्टी 11. पुणे - नारायण राणेंच्या दिल्ली भेटीदरम्यान राजकीय चर्चाही झाल्या, त्या चर्चेला मूर्त स्वरूप मिळाल की लवकरच भूमिका स्पष्ट करू : रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष 12. ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा घेतला निर्णय, आता ट्विट करताना कॅरेक्टर लिमिट 280 होणार, ट्विटरची माहिती 13. मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती केली सादर, हि आवृत्ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान असणार 14. मुंबई - भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, बॉलिवूड अभिनेत्याच्या (अमित अजित गिल) नातेवाईकासह सहा जण अटकेत 15. मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ या वास्तवदर्शी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये हिज्बूल मुजाहिदीन टॉप कमांडर अब्दुल कय्यूम नजरला सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले 2. नवी दिल्ली - केंद्र सरकारने आता 4जी नंतर 5जी सेवेच्या दिशेने पाऊल टाकले, 5जी समितीची स्थापना 2020 पर्यंत भारतात 5जी सेवा सुरू होणार 3. ओरलांडो - भारताच्या आधार ओळख प्रणालीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर, विंडोज, अँड्रॉइड, फेसबुक अशा प्रणालींनाही मागे टाकले - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला 4. नवी दिल्ली - भारताला सोबत घेऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू, अशा शब्दांत अमेरिकन संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढविला 5. नवी दिल्ली - गुरमीत राम रहीमची कथित कन्या हनीप्रीतला ट्रान्झिट अंतरिम जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला 6. हैदराबाद - निवृत्तीला तीन दिवस शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल 500 कोटी रुपयांची मालमत्ता भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली 7. मुंबई - संपत्तीच्या अवैध हस्तांतरण प्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, इसरार सय्यद, मुमताझ शेख आणि इतरांविरोधात चौकशीस सुरुवात 8. मुंबई - ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या श्रीमंतांच्या सहाव्या वार्षिक यादीनुसार रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 58 टक्के वाढ 9. पुणे - फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते, ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही - राजन खान 10. मुंबई - इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस 11. पुणे - अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये गाजलेल्या 'घुमा' चित्रपटाचे 'पसायदान' हे गाणे रिलीज, घुमा 29 सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित 12. नवी दिल्ली - दक्षिण आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद भारताला, गुवाहाटीमध्ये होणार स्पर्धा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUpp Marathi - Статистика та аналітика Telegram каналу @letsup