uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
📣 SBI मध्ये 8904 लिपिक पदांसाठी भरती LetsUp | Job 👨‍💼 पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) 📍 जागांची संख्या :8904 जागा 🧐 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. 💁‍♂ वयाची अट: 01 एप्रिल 2019 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🎯 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 💵 Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/माजी सैनिक:₹125/-] ▪ पूर्व परीक्षा: जून 2019 ▪ मुख्य परीक्षा: 10 ऑगस्ट 2019 🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2019 🗞 जाहिरात पाहा: http://bit.ly/2GCznha 🗓 ऑनलाईन अर्ज: http://bit.ly/2Z2GbvT 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

📚 आज 'जागतिक पुस्तक दिन' Letsup | Special 🧐 आज जागतिक पुस्तक दिन आहे. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. इंटरनेटच्या जगात वाचक वर्ग आधुनिकतेकडे वळला असला तरीही, आजही पुस्तकांची भुरळ कायम आहे. 🎯 इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. म्हणून तरुण पिढीला पुस्तक वाचणं बोअरिंग वाटतं. पुस्तकांबद्दल प्रेम वाढावं, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. तसेच नवीन लेखकांनाही प्रोत्साहन मिळावं या हेतूनही पुस्तक दिन साजरा होतो. 💁‍♂ वाचनाचं महत्व: वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. 📍 द होली बायबल, कोटेशन्स फ्रॉम चेअरमन माओ त्से-तुंग व हॅरी पॉटर ही जगात सर्वांत जास्त वाचली जाणारी तीन पुस्तके आहेत. 👍 काही प्रेरणादायी पुस्तके: ▪ अग्निपंख - माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ▪ तरुणांना आवाहन - स्वामी विवेकानंद ▪ राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे ▪ एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ▪ स्टिव्ह जॉब्स यांचे आत्मचरित्र - विलास साळुंके 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

📣 नगरमध्ये मतदान सुरु; दुरंगी लढत रंगण्याची चर्चा जोरात! LetsUp | Local 📍 नगर दक्षिणेत उत्साहात मतदान सुरु, सकाळी 11 वाजेपर्यंत नगरमध्ये 20.26% मतदान 👀 19 उमेदवारांचे राजकिय भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार 👉 महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व आघाडीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात खरी लढत रंगणार असल्याची चर्चा 🎯 यंदाची वैशिष्ट्ये काय?: ▪ 192 मतदान केंद्रावरून लाईव्ह वेबकास्टिंग केले जाणार ▪ प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असणार ▪ नगर दक्षिण एकूण मतदार : 18 लाख 54 हजार 248 ▪ मतदान केंद्र : 2030 ▪ यंदा 10 सखी मतदान केंद्राची स्थापना ▪ मतदारांना अडचण आल्यास 1950 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार 📍 विभानसभा मतदारनिहाय मतदार : ▪ शेवगाव : 3 लाख 38 हजार 788 ▪ राहुरी : 2 लाख 88 हजार 127 ▪ पारनेर : 3 लाख 17 हजार 8 ▪ नगर शहर : 2 लाख 85 हजार 913 ▪ श्रीगोंदा : 3 लाख 93 हजार 24 ▪ कर्जत-जामखेड : 3 लाख 15 हजार 88 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🧐 Letsup I General Knowledge 1) कोणता रेणू आपल्या विश्वातला सर्वात प्राचीन रेणू मानला जातो? उत्तर: हिलियम हाइड्राइड आयन (HeH+) 2) 23 वी ‘आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद’ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उत्तर : कतार (दोहा शहर) 3) 2020 सालापासून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दृष्टीसाठी उपयोगी साधने वापरण्यास कोणते शैक्षणिक मंडळ परवानगी देणार आहे? उत्तर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 4) भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) कार्ये आणि त्याच्या रचनेबाबत कोणती घटनात्मक तरतुद स्पष्टता देते? उत्तर: कलम 324 5) जून महिन्यात कोणता देश 'जी-20 शिखर परिषद 2019' आयोजित करणार आहे? उत्तर: जपान (ओसाका) 6) यंदाच्या ‘जागतिक वारसा दिन 2019’ ची संकल्पना (Theme) काय होती? उत्तर: रूरल लँडस्केप्स 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🎯 ऐतिहासिक खेळी! 25 चेंडूत शतक LetsUp | Sports 🏏 25 चेंडूत शतक झळकावत स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्ज मुंसे याने टी-20 क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास 👍 ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हन संघाकडून खेळताना मुंसेने वेगवान शतकासह एका षटकात 6 षटकार खेचण्याची किमयाही साधली 👀 39 चेंडूंत 147 धावांचा पाऊस : ▪ टी-20 सामन्यात मुंसेने अवघ्या 39 चेंडूंत 147 धावांचा पाऊस पाडला ▪ मुंसेच्या या खेळीत 5 चौकार आणि तब्बल 20 उत्तुंग षटकारांचा समावेश होता ▪ मुंसेने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 17 चेंडू खर्ची घातले तर पुढच्या आठच चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली 😳 सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत : टी-20 मध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर होता. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या होत्या. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हन संघाने हा विक्रम मागे टाकत 3 बाद 326 धावांचा डोंगर उभा केला 💫 अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या या सामन्याला मात्र ICCचा अधिकृत दर्जा मात्र नव्हता 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💁‍♂ तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार LetsUp | Political ⚡ लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज 13 राज्य आणि 2 केंद्रशासित राज्यातील 116 जागांवर उत्साहात मतदान सुरु 👉 सकाळी सातपासून मतदारांची मतदान केंद्रांवर दिसली गर्दी; मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज 🎯 महाराष्ट्रात कुठे मतदान? : जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले 📍 देशात कुठे मतदान? : गुजरात : 26, कर्नाटक : 14, केरळ : 20, उत्तर प्रदेश : 10, छत्तीसगढ़ : 7, ओडिशा : 6, बिहार : 5, पश्चिम बंगाल : 5, आसाम : 4, गोवा : 2, दादरा आणि नगर हवेली : 1, दमन दीव : 1, त्रिपुरा : 1, जम्मू आणि काश्मीर : 1 🧐 राज्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला: ▪ बारामती : सुप्रिया सुळे Vs कांचन कुल यांच्यात लढत ▪ माढा : रणजित निंबाळकर Vs संजय शिंदे ▪ पुणे : गिरीष बापट Vs मोहन जोशी ▪ अहमदनगर : संग्राम जगताप Vs सुजय विखे ▪ जळगाव : उन्मेष पाटील Vs गुलाबराव देवकर ▪ कोल्हापूर : संजय मंडलिक Vs धनंजय महाडिक ▪ हातकणंगले : धैर्यशील माने Vs राजू शेट्टी ▪ सांगली : संजय पाटील Vs विशाल पाटील Vs गो. पडळकर ▪ संभाजीनगर : चंद्रकांत खेरे Vs सुभाष झांबड Vs इम्तियाज जलील Vs हर्षवर्धन जाधव ▪ रायगड : अनंत गिते Vs सुनील तटकरे ▪ रत्नागिरी-सिंधुदूर्ग : विनायक राऊत Vs नीलेश राणे Vs नवीनचंद्र बांदिवडेकर ▪ सातारा : उदनराजे भोसले Vs नरेंद्र पाटील ▪ जालना : रावसाहेब दानवे Vs विलास औताडे ▪ रावेर : रक्षा खडसे Vs डॉ. उल्हास पाटील 💫 आता मतदारराजा ईव्हीएमचे बटण दाबून कुणाला कौल देतो? यावरच दिग्गजांचे भवितव्य अवलंबून असणार आहे 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● लोकसभा निवडणुक तिसरा टप्पा : महाराष्ट्रातील 14 जागांसह देशातील 116 जागांवर आज मतदान ● ट्रायच्या मार्च 2019 च्या अहवालानुसार रिलायन्स जिओचा 4 जी डाउनलोड वेग अव्वल ● बाबरी मशिदीबाबतच वक्तव्य भोवले; साध्वी प्रज्ञासिंह विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश ---------------------- Advertisment On LetsUp Contact: 7875190190 ---------------------- ● इराणकडून तेल आयात करणे थांबवा अन्यथा निर्बंधांना सामोरे जा, अमेरिकेची पाच देशांना सूचना ● वैद्यकिय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये 16 टक्के मराठा आरक्षणाला विरोध, हायकोर्टात पुन्हा याचिका ● मनीष माहेश्वरी टि्वटर इंडियाचे नवे एमडी, ते 29 एप्रिलपासून जबाबदारी सांभाळतील ● स्पोर्ट युटिलिटी वाहनासाठी महिंद्रा-फोर्डची हातमिळवणी, याबाबतचा उभय कंपन्यांनी केला करार ● दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा, ऋषभ पंत ठरला सामनावीर ● मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना 4 दिवसांची सुट्टी, बॅट-बॉलपासून लांब राहण्याच्या सूचना ● 'सूर्यवंशी' चित्रपटात 'अक्षय-कॅटरिना' ची जोडी 9 वर्षांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार ● अहमदनगर - नगर मतदारसंघासाठी आज (दि. 23) मतदान, 18 लाख मतदार बजावणार हक्क, 2030 केंद्र ● अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदान कर्मचारी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या 215 बसेस रवाना ● अहमदनगर - राहुरीत 50 महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात, निवडणुकीसाठी महिला बाउन्सर आणल्याचा संशय, महिलांकडे चौकशी सुरु 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी ▪ श्रीलंकेत नववा स्फोट : पोलिसांना तपासणी दरम्यान सापडले 87 बॉम्ब डिटोनेटर ▪ श्रीलंकेच्या समुद्र सीमेवर भारताचे डॉर्नियर विमान, जहाजे तैनात; तटरक्षक दल हाय अलर्टवर ▪ जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये 66 दहशतवाद्यांचा भारतीय जवानांकडून खात्मा ▪ बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा नाही, रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दलाल यांचे स्पष्टीकरण ▪ कॉमेडियन व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड _______________________________ 💹 Sensex : 38,645.18 | 🔽 −495.10 (1.26%) 💹 NIFTY: 11,594.45 | 🔽 −158.35 (1.35%) 🌟 Gold Rate : ₹32,650.00 for 10gm _______________________________ ▪ ‘चौकीदार हि चोर हे’ वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली ▪ 120 कोटी द्या नाहीतर 'वानखेडे' स्टेडियम खाली करा; राज्य सरकारची एमसीएला नोटीस ▪ तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (दि. 23) राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांचा प्रामुख्याने समावेश. ▪ शाओमीचा डबल साइड डिस्प्ले टीव्ही उद्या (दि. 23) चीनमध्ये होणार लाँच ▪ आयपीएल-2019 चा अंतिम सामना चेन्नई ऐवजी हैदराबादला होणार, बीसीसीआयने केलं स्पष्ट ▪ बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💁‍♂ कठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह LetsUp | Motivation प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. अशा कठीण प्रसंगातही पॉझिटीव्ह राहण्यासाठी या टिप्स फायदेशीर ठरतील. 1) प्रत्येकाशी प्रेमपूर्वक वागा. समोरच्या व्यक्तीचा सन्मान करा. कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग मनात बाळगू नका. 2) प्रत्येक वेळी परफेक्ट असण्याचा अट्टाहास करु नका. आणि त्यात वेळ वाया घालवू नका. 3) स्वतःसाठी वेळ काढा. 4) भविष्य कोणीच पाहिले नाही. त्यामुळे त्याची चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. 5) गरजेचे आहे तिथे स्वतःचे मत मांडायला शिका. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. 6) ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते किंवा ज्याची शंका तुम्हाला वारंवार सतावते, अशा गोष्टींचा विचार करून घाबरुन जाऊ नका. 7) नकारात्मक विचारांपासून आणि माणसांपासून दूर रहा. 8) वर्तमानात जगा. त्याचा पूरेपूर आनंद लूटा. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 9) कुटुंबासोबत वेळ घालवा. 10) नैराश्यापासून दूर राहण्यासाठी रिकाम्या वेळत तुमच्या आवडीचे काम करा. समाजकार्यही तुम्हाला आनंद देईल. 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

📣 श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित Letsup । Update ⚡ श्रीलंकेत सोमवार (दि.22) मध्यरात्रीपासून राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली 💁‍♂ साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर श्रीलंकामध्ये रविवार (दि.21) रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सोमवार पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती 🎯 महत्वाच्या घडामोडी : ▪‘नॅशनल तौहीद जमात’ने हा हल्ला केल्याचे श्रीलंकन सरकारने घोषित केले आहे. ▪ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी आतापर्यंत 24 लोकांना अटक ▪ साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत सोशल मीडियावरही बंदी घातली 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💁‍♂ लेखक चेतन भगत यांचा आज वाढदिवस; जाणून घ्या त्यांच्याबाबत... Letsup । Special तरुणाईंना चेतन भगत यांची पुस्तकं आवडतात. ज्यांचं शिक्षण भारतीय भाषांमध्ये झालं, अशी बरीचशी मुलं इंग्रजी वाचायला सुरुवात करताना भगत यांची पुस्तके निवडतात. चेतन यांची काही लोकप्रिय पुस्तके.. ▪ वन नाईट ऍट कॉल सेंटर : हरियाणातील गुडगाव मधील कॉन्सेशन कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांची कथा यामध्ये मांडण्यात आली आहे. या कादंबरीतील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे देवाकडून येणार फोन कॉल आहे. या कथेतील सर्व पात्र, नाट्यमय कथा निर्णायक वळण घेते. ▪ ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ : हे पुस्तक लिहिताना विषय खुललेला वाटत नाही. केवळ तरुणांची धम्माल-मस्ती, विवाहपूर्व सेक्स या त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या मांडणीत असणारा समान धागा या पुस्तकात नाही. चेतन भगत यांनी रचलेली प्रेमकथा असल्याने तर्कशास्त्राला चार हात दूरच ठेवावं लागतं. ▪ द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ :* धार्मिक, राजकारण, आपत्ती, अपमानित प्रेम आणि या सर्व व्यतिरिक्त स्वतःच्या चुका या पुस्कात मांडल्या आहे. नको असतानाही राजकारणाशी संबंध आल्यामुळे गुजराती तरुणांवर ओढवलेली बिकट परिस्थिती चेतन यांनी मांडली आहे. ▪ 'फाइव्ह पाॅइंट समवन' :आजच्या भयानक स्पर्धेत, युवक त्यांच्या क्षमता, आणि काहीतरी मिळवण्याची इच्छाशक्ती असलेल्या युवकांना यश मिळू शकते हा संदेश या लेखनाद्वारे देण्यात आला. 📚 पुस्तकांवर आधारित बॉलिवूड फिल्म्स : ▪ 'थ्री इडियड्स' ▪ '2 स्टेट्स' ▪ 'काय पो छे' ▪ 'हॅलो' 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💥 धोकादायक पासवर्डची यादी जाहीर! Letsup । Update ⚡ नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरच्या अहवालानुसार, जगभरात वापरले जाणारे कॉमन पासवर्ड 🎯 असुरक्षित पासवर्ड* : ▪ '123456' हा प्रथम स्थानावर ▪ '123456789' हा दुसऱ्या स्थानावर ▪ 'qwerty', '1111111' तसेच 'password' हे देखील असुरक्षित पासवर्डच्या यादीत ▪ 123456 हा पासवर्ड वापरणारे यूजर्स सुमारे 2 कोटी 30 लाखहून अधिक आहे 💁‍♂ कॉमन पासवर्ड :* Ashley, Michael, Daniel, Jessica आणि Charlie हे पासवर्ड सहज हॅक करता येतात. काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन सारखे सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टर आपला पासवर्ड म्हणून सेट करतात ❗ स्ट्रॉंग पासवर्ड हाच उपाय: अधिक चांगला, स्ट्रॉंग पासवर्ड निवडणं हाच ऑनलाइन सुरक्षेसाठी एकमेव उपाय आहे, असा सिक्युरिटी एक्सपर्ट ट्राय हंटचा सल्ला आहे 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🖨 वोटिंग स्लिप मिळवा अगदी सहज❗ 📦आगामी लोकसभा निवडणुकीची आपली वोटिंग स्लिप ऑनलाईन मिळवण्यासाठी 💻 www.nvsp.in या संकेतस्थळास भेट दया 🔍 Search Your Name in Electoral Roll या पर्यायाची निवड करा 🙋🏻‍♂ नाव व मतदान ओळखपत्र क्रमांक नोंदवा ✅ इतर आवश्यक माहिती नोंदवा 🖨ज्यानंतर अगदी काही क्षणात आपल्याला आपली वोटिंग स्लिप प्राप्त होईल. 📢 I❤NGR तर्फे जनहितार्थ प्रसारित* I❤NGR मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा* ⤵ Android : https://ltsup.in/ILoveNagarAndroid iOS : https://ltsup.in/ILoveNagariOS 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

😍 जगातील सर्वात आनंदी देश, 2019 LetsUp | Statistics 1. फिनलंड 2. डेन्मार्क 3. नॉर्वे 4. आइसलँड 5. नेदरलँड 6. स्वित्झर्लंड 7. स्वीडन 8. न्यूझीलँड 9. कॅनडा 10. ऑस्ट्रिया 92. इंडोनेशिया 93. चीन 125. बांग्लादेश 140. भारत (World Happiness Report) 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🎯 आज जागतिक वसुंधरा दिन; आपण काय करू शकतो?* Letsup । Special पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंधकारमय आहे. अशात आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 🧐 सुरुवात व मूळ संकल्पना* : अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिनाची संकल्पना मांडली. त्यांनी अमेरिकेतील लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला आणि राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे 1970 सालापासून हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ अर्थात ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे. 🌐 गुगलचे विशेष डुडल: अ‍ॅनिमेटेड डुडलमधून संदेश देत गुगलने जागतिक वसुंधरा दिन दिन साजरा केला आहे. या डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे. 💁‍♂ आपण काय करू शकतो?* : ▪ नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देऊया. ▪ अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ▪ शक्य असेल तेवढी झाडे लावूया, तसेच लावलेल्या झाडांचे रक्षण करूया. ▪ जमीन व जल प्रदूषण करणार्‍या प्लास्टिकचा वापर टाळूया. ▪ पृथ्वीचे तापमान वाढणार्‍या घटकांचे उत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. ▪ टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना दैनंदिन जीवनात अंमलात आणूया. ▪ शालेय स्तरापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था निर्माण करून जबाबदारीची जाणीव करून देऊया. ▪ वने, वन्यप्राणी निसर्गाचा अविभाज्य घटक असून पर्यावरण संतुलनात पर्यायाने पृथ्वीच्या वातावरणीय समतोलामध्ये या घटकांची महत्वाची भूमिका आहे हे जनमानसात ठसवूया. ▪ निसर्गाने दिलेल्या साधन-संपत्ती जपून वापरूया आणि गरजेपुरती वापरूया. ▪ साधन-संपत्तीचा प्रमाणापेक्षा अधिक वापर कमी करूया व भावी पिढीसाठी जतन करूया. ▪ पर्यावरण रक्षण हे आद्य कर्तव्य समजून वसुंधरेला स्वच्छ व सुजलाम् सुफलाम ठेवण्यासाठी रोजच वसुंंधरा दिन करूया. 🤝 संकल्प करूया* : हरित वसुंधरेचे विश्वस्त या नात्याने संकल्प करूया, वनसंवर्धनाचा, ऊर्जा-पाणी बचतीचा, समृद्ध भविष्याचा नवनिर्मितीचा. 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💁‍♂ बीट खाण्याचे असेही फायदे Letsup । Health आजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तरच तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे रोजच्या आहारात विशेषतः बीटचा वापर केला पाहिजे. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात... 1) विशेषतः ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या. बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. 2) रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. शरीरातील रक्ताची कामकरता भरून निघते. 3) कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं असून यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खालं पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात. 4) बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने कफ होण्याची समस्या दूर होते. 5) बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 6) बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. 7) बीटमध्ये फॉलिक अॅसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🧐 धोनी झुंजला; बंगळूरचा एका धावेने रोमहर्षक विजय* Letsup । IPL Special ⚡ अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बंगळूरने चेन्नईचा एका धावेने केला पराभव 🎯 प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने 161 धावांचे आव्हान ठेवले, याचा पाठलाग करताना चेन्नईला 160 धावांपर्यंत मजल मारता आली 🏆 आक्रामक अर्धशतक करणारा पार्थिव पटेल (53 धावा, 37 चेंडू) ठरला सामन्याचा मानकरी 🤔 शेवटचे रोमहर्षक षटक* : चेन्नईसमोर अखेरच्या षटकांत 26 धावा करण्याचे आव्हान होते. धोनीने उमेश यादवच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर धोनीला 2 धावा काढता आल्या. पाचव्या चेंडूवर धोनीने पुन्हा षटकार लगावला. यामुळे चेन्नईला अखेरच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 2 धावा हव्या होत्या. पण, अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना चेंडू धोनीच्या बॅटमधून सुटला आणि एक धाव घेताना शार्दुल ठाकूर यष्टिरक्षक पार्थिव पटेलच्या अचूक थ्रोने धावबाद झाला आणि बंगळूरने एका धावेने रोमांचकारक विजय मिळविला. 👀 व्हिडिओ पहा* : http://bit.ly/2GvB12H ⚔ आजचा सामना : राजस्थान Vs दिल्ली 📍 वेळ : रात्री 8 वाजता, ठिकाण : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर 🏏 आयपीएल मॅचमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप,👉 क्लिक करा: https://ltsup.in/IPL-Fantasy 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी ▪ नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित वेब सीरीजचे प्रक्षेपण निवडणूक आयोगाने रोखले ▪ भारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप ▪ सुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची, श्रीनगर एअरबेसवरून पश्चिम विभागातील महत्त्वाच्या एअरबेसवर पोस्टिंग ▪ चीनची मोठी आर्थिक गुंतवणूक असलेला महत्त्वकांक्षी ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्ह’ परिषदेसाठी चीनकडून उत्तर कोरीयाला निमंत्रण ▪ केनियामध्ये वैज्ञानिकांना 1500 किलो वजनाच्या 'महाकाय' सिंहाचे जिवाश्म सापडले ---------------------- 📣 आवाहन! 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏 ---------------------- ▪ विद्यार्थी संख्येमध्ये घट, राज्यातील 27 पॉलिटेक्निक संस्था बंद होण्याच्या मार्गावर ▪ Loksabha 2019 : अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण ▪ 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोटोच्या नव्या झेड 4 स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन ऑनलाईन वर लिक ▪ IPL: अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून हटवले, स्टीव्ह स्मिथकडे राजस्थानची धुरा ▪ शुटींग दरम्यान अभिनेता विक्की कौशल झाला जखमी; चेहऱ्यावरील हाड फ्रॅक्चर 👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💵 आता इंटरनेटशिवाय करा पैसे ट्रान्सफर!* Letsup । Update ⚡ BHIM अ‍ॅपच्या माध्यमातून आता इंटरनेट कनेक्शनशिवाय पैसे ट्रान्सफर करता येणार 📱 इंटरनेट कनेक्शनविना बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल फोनच्या मदतीने पैसे पाठवणे शक्य झालं आहे. त्यासाठी आपल्याला यूएसएसडी (USSD) आधारित मोबाईल बँकिंग वापरणे आवश्यक आहे 💁‍♀ पैसे ट्रान्सफर कसे कराल?* ▪ आपल्याला स्मार्टफोन मध्ये BHIM अ‍ॅप डाउनलोड करावे ▪ मोबाईल क्रमांक आपल्या बँक खात्याशी कनेक्ट करावा ▪ आपण यूएसएसडी आधारवर मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडू शकता ▪यानंतर *99# डायल करण्याची आवश्यकता आहे ▪यांनतर स्क्रीनवरील ऑप्शन निवडून आयएफएससी कोड आणि अकाउंट नंबरच्या सहाय्याने ट्रान्सफर केले जाऊ शकतात. 🎯 पैसे ट्रान्सफरसाठी BHIM अ‍ॅप सोबत यूएसएसडी देखील अपग्रेड करण्यात आले आहे 🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

📣 'टिक टॉक' लाँच करणार नवे अ‍ॅप* Letsup । Update 🎯 टिक टॉक कंपनी आता भारतात तब्ब्ल एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. 💁‍♂ बाईट डान्स ही चीनमधील एक स्टार्टअप कंपनी असून, ही कंपनी भारतात नवीन अ‍ॅप घेऊन येणार आहे. याच कंपनीचा टिक टॉक अ‍ॅप आहे. ▪ बाईट डान्स या कंपनीचे एकूण 20 अ‍ॅप्स आहेत. येणार्‍या तीन वर्षांत एक वेगळे अ‍ॅप लाँच करू, असे बाईट डान्सचे आंतरराष्ट्रीय पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणाले. ▪ नवीन लाँच होणारे अ‍ॅप टिक टॉक सारखा असेल की, इतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल याबद्दल कंपनीने अजून स्पष्ट केलं नाही. 📍 तीन अ‍ॅप्स भारतात : कंपनीने याआधी भारतात विगो, हेलो आणि 'टिक टॉक' हे तीन अ‍ॅप लॉन्च केले होते. 🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/cb9HhK