LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
6 624
👌 पुणेकरांची चांदी, चक्क एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड!
LetsUpp l Trending
● राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नगण्य दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच चांदी झाली आहे.
● पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळाल्या
● पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे.
● आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
💁♂️ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा- अजित पवार
● देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. अशावेळी थाटामाटात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन खुद्द अजित पवार यांनी केलंय.
To know more click here
https://letsup.app.link/iUlOwjJZ5hb
6 624
राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याकडून रेड अलर्ट
LetsUpp | Trending
☔ भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने राज्यातील ५ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
🌨️ कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
💦 मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे पालघर आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/Olk1N1aI5hb
6 624
नाशिक शहरात मुसळधार पाऊस
LetsUpp | Nashik
● नाशिक शहरात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे सराफ बाजार, दहीपूल परिसरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांची धावपळ उडाली आहे.
● यामध्ये सोने, कपडे व्यावसायिकांच्या दुकानांत पावसाचे पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या कामाचा दुकानदारांना फटका बसला आहे.
● दुसरीकडे शहरातील गटारी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने गोदावरी नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. छोट्या मोठ्या नाल्यांचे पाणी गोदावरी नदीच्या पात्रात मिसळत असल्याने दुतोंडया मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/nTiDcNtx5hb
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● ११ वी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद; सुविधा पूर्ववत होताच, बोर्डाकडून अवगत करण्यात येणार
● रत्नागिरीच्या खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती; बाजारपेठ पाण्याखाली, जगबुडी नदीचे रौद्र रूप; खाडी पट्ट्यातील २० गावांचा संपर्क तुटला
● मुंबईत आजही लसीकरण बंद, उद्यापासून लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता; पुरेशा लससाठ्या अभावी लसीकरण मोहीमेत अडथळे
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● अहमदनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या भाजपमधील रस्सीखेचीवर तोडगा काढणार; भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शुक्रवारी नगर दौऱ्यावर
● जलयुक्त शिवार योजनेच्या कामांतील गैरव्यवहार आणि अनियमिततेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
● आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील बंद करण्यात आलेली एसटीची प्रवासी वाहतूक आजपासून सुरू करण्यात येणार
● नाशिक जवळील वाडीवऱ्हे जवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार तर २ जण जखमी झाले
● सरकारने पेगाससचा वापर केला नाही असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे;काँग्रेस नेते कमलनाथ यांची मागणी
● बकरी ईद निमित्त पहिल्यांदाच भारत-पाक सैनिकांनी सीमेवर एकमेकांना दिली मिठाई; पुलवामा हल्ल्यानंतर बंद होती प्रथा
● सरकारच्या चुकीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० लाख जणांचा मृत्यू; काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
To know more click here
https://letsup.app.link/Ez7UcOus5hb
6 624
जीवाची बाजी लावणाऱ्या 'या' वायरमॅनचं होतंय सर्वत्र कौतुक
LetsUpp l Positive News
💁♂️ मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेल्याने साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
🔌 हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका वायरमॅनने जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन पोलवरील तुटलेली हायटेन्शनची तार जोडली. त्यामुळे 35 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाला. श्रावण शेलवले असे या वायरमॅनचे नाव असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित
💡 वीज दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कानविंदे या गावालगत एक तलाव आहे. या तलावात वीजेचा पोल आहे. या पोलवर लाईटचा कंडक्टर तुटला आहे. त्यामुळे अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती श्रावण शेलवले यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली.
भर पावसात पोहत जाऊन तार जोडणी
🪛 ही माहिती मिळाल्यानंतर श्रावण यांनी भर पावसात सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य नसताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी मारली. जनतेची सेवा करण्यासाठी वायरमॅन श्रावण यांनी हातातले हँडग्लोव्हज आणि पक्कड या गोष्टी तोंडात पकडल्या.
🏊 त्यानंतर पुढे पाण्यात पोहत जाऊन पोलवर चढून तुटलेली तार जोडली. यामुळे 35 गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत फोडसे नावाचे आणखी एक वायरमॅन उपस्थितीत होते.
🙏 श्रावण शेलवले आणि फोडसे या दोघांच्या या कामगिरीमुळे 35 गावांचा वीज पुरवठा पूर्ववत होण्यास मदत मिळाली आहे. या महावितरणच्या दोन्ही जनसेवकांचे शहापूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/R0MxqVS13hb
6 624
जाणून घ्या, काय आहे? बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यामागील कारण...
Letsupp | Special
● मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान ७० दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे बकरी ईद.
● यामध्ये मुख्य प्रथा म्हणजे या दिवशी कुर्बानी दिली जाते. हि प्रथा इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबरांमध्ये हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. यामागे एक कथा देखील संगितली जाते. यामध्ये विशेषतः बकर्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप करावे लागते.
● कुर्बानीइतिहास सांगणारी कथा अशी कि, इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबर हजरत इब्राहिम म्हणजेच ज्यांनी हि कुबानींची परंपरा सुरु केली. यांच्या स्वप्नात येऊन पुत्र इस्माइल (प्रेषित) याचे बलिदान दे, अशी आज्ञा केली होती. त्यांना म्हातारपणी जाऊन अब्बा बनण्याचा आनंद मिळाला होता. पण अल्लाहच्या अज्ञापुढे ते आपला आनंद कुर्बान करण्यास तयार होते.
● परमेश्वरावरील असीम भक्ती व प्रेमासाठी त्यांनी आपल्या एकुलत्या एक व उतरत्या वयात झालेल्या पुत्रास परमेश्वरासाठी बळी देण्याचे ठरवले. मक्काच्या पर्वतराजीमध्ये एका मोठ्या शीळेवर पुत्राचा बळी देण्यासाठी त्यांनी पुत्राच्या गळ्यावर सुरी चालवली.
● मात्र परमश्रेष्ठ अल्लाह या भक्तीने स्तिमित व प्रसन्न झाले व पुत्राच्या ठिकाणी त्यांनी देवदूताकरवी एका बोकडास अवतरीत केले. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वरभक्ती, परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून 'ईल-उल-जुहा' साजरी करण्याची प्रथा पडली. तर अशी आहे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा!
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/RiyEURW53hb
6 624
कोविड प्रोटोकॉलनुसार 'नवोदय' प्रवेश परीक्षा होणार; परीक्षेच्या तारखा जाहीर!
Letsupp | Trending
● नवोदय विद्यालय समिती, एनव्हीएसने JNVST २०२१ साठी ६ वीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
● सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड प्रोटोकॉलनुसार, प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एनव्हीएसने स्पष्ट केले. यामध्ये एकूण २,४१,७००९ उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी ११, १८२ केंद्रांमध्ये ४७, ३२० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
● याबाबत शिक्षण मंत्रालयाने एका ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र २०२१-२२ च्या वर्ग-८ मधील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. दरम्यान, ही परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.
To know more click here
https://letsup.app.link/Kd5oy90e4hb
6 624
‘आयटीआय’ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
LetsUpp l Trending
⚡ राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
👉 यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
📝 राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील.
🖥️ प्रवेश प्रक्रिया, नियमावली, आवश्यक कागदपत्रे, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
💫 विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचे शुल्क भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कागदपत्र तपासणी, प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत जाण्याची गरज नाही.
📍 दरम्यान, दहावीचे गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/7jgLueRZ3hb
