LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
6 624
📚 खुशखबर; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघाली भरती
Letsup I Job Update
पोस्ट : कर सहायक गट-क - जागा : 478
पोस्ट : लिपिक टंकलेखक (मराठी) गट क - जागा : 316
पोस्ट : दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट-क - जागा : 33
पोस्ट : लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट क - जागा : 35
फी : 374 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 11 एप्रिल 2018
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/5sazHa
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/TDi541
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
💐 शहीद दिन; जरा याद करो कुरबानी
Letsup I Update
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस 'शहीद दिवस' म्हणून साजरा केला जातो.
सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले.
या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी 'मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।' हे गाणे गायले होते.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
📣 आजपासून अण्णांचे रामलीलावर आंदोलन
Letsup I Update
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दिल्लीतील रामलीला मैदानात शहीद दिनाचे औचित्य साधून आंदोलन करणार आहेत. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव, निवडणूक सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे. दरम्यान, अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरु होत्या.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp I News Updates
● नवी दिल्ली - रामलीला मैदानावर विविध मागण्यासाठी अण्णा हजारेंचे आजपासून सत्याग्रह आंदोलन
● नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात चकमकीत 2 भारतीय जवान आणि 3 पोलीस शहीद
● नवी दिल्ली - चेन्नईस्थित ‘कनिष्क गोल्ड’चा 14 बँकाना 824 कोटींचा चुना, सीबीआयकडून गुन्हा दाखल
● नवी दिल्ली - भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांतील मिळून 52 हजार पदे रिक्त, 21 हजार पदे वरिष्ठ अधिकाऱ्यांची
● मुंबई - ओला, उबर टॅक्सी चालकांचा संप तीन दिवसांनी मागे, लेखी आश्वासनानंतर निर्णय
● मुंबई - 'सत्यमेव जयते' वॉटर कप स्पर्धेची घोषणा, 24 जिल्ह्यातील 5900 गावं सहभागी होणार
● मुंबई - राज्य सरकारने कृषीपंप वीजबिल वसुलीला स्थगिती दिली तर बोंडअळीग्रस्तांसाठी तीन हजार कोटींची मदत
● मुंबई - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव, एकनाथ खडसे यांनी केली होती मागणी
● मुंबई - उर्मिला मातोंडकरचे 10 वर्षांनी पुनरागमन, 'ब्लॅकमेल' चित्रपटात आयटम सॉंग करणार
● नवी दिल्ली - बीसीसीआयकडून मोहम्मद शमीला क्लिन चीट; तीन कोटींच्या करारात समावेश
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🌾 कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती
Letsup I Update
राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. विरोधकांनीही याप्रश्नाकडे राज्यसरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन अखेर कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती दिली.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ आमच्याकडून चूक झाली : मार्क झुकरबर्ग
Letsup I Update
केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणावर फेसबुकने पहिल्यांदाच अधिकृत भाष्य केले आहे. फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या हातून चूक घडली, अशी कबुली दिली आहे. फेसबुकच्या अंदाजे पाच कोटी युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर करून केंब्रिज अॅनालेटिकाने 2016च्या निवडणुकीवर प्रभाव टाकला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी झुकरबर्ग यांनी पहिल्यांदाच मौन सोडले व ते म्हणाले, फेसबुकवर असे अनेक अॅप्स आहेत ज्याद्वारे युजर्सची माहिती त्या अॅप बनवणाऱ्यांना मिळते. अशा अॅप्सला चाप बसवण्यासाठी कठोर पावले उचलू. तुमच्या डेटाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. जर आम्ही त्याचं संरक्षण करू शकलो नाही तर तुम्हाला सेवा देण्यास आम्ही पात्र नाही, असं समजू. मी फेसबुकची स्थापना केली, म्हणून या प्लॅटफॉर्मवर जे काही होईल, त्यासाठी मी जबाबदार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - येत्या काही दिवसांमध्ये वीज कंपन्या त्यांचे दर (93 पैसे प्रती युनिट) वाढवू शकतात, सूत्रांनी दिली माहिती
● नवी दिल्ली - अर्थसंकल्पात घोषित मोदीकेअर योजनेला मंजुरी; आयुष्यमान भारत नावाने योजना राबवणार
● नवी दिल्ली - 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या एका कंपनीवरून आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू
● नवी दिल्ली - ई पलानीसामी आणि ओ. पनीरसेल्वम, टीटीव्ही दिनाकरन यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात होणार सुनावणी
● जम्मू-काश्मीर - कुपवाडातील हलमतपोरा येथे दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद
● उत्तर प्रदेश - राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; सुधांशू त्रिवेदी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता
● पणजी - सागरमाला योजनेत लवकरच 11 नद्यांना जोडण्यासह 60 नवी बंदरे निर्माण केली जातील : नितीन गडकरी
● मुंबई - आमदारकीचे आमिष; भाजप नेत्याला 10 कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न, याप्रकरणी एका महिलेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक
● युट्युबने आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी पीआयपी अर्थात पीक्चर इन पिक्चर मोड हे विशेष फिचर देण्याचे दिले संकेत
● नवी दिल्ली - बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला क्लीन चिट : सूत्र
● आता चीनमध्ये 'बाहुबली 2 : द कन्क्लुजन' हा चित्रपट प्रदर्शित होणार, चीनने या चित्रपटाला सेन्सॉर केले असले तरी प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📌 #DeleteFacebook हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?
Letsup I Update
सध्या सोशल मीडियावर #DeleteFacebook हा हॅशटॅग ट्रेंड होत असून फेसबुक डिलीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारख्या फेसबुकशी निगडीत अन्य सेवाही डिलीट करण्यासाठी ट्विटरवर जोरदार मोहिम सुरू आहे.
अमेरिका आणि कॅनडात 1 कोटी फेसबुक युजर्सने आपले फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहे. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी फेसबुक डिलीट करण्यास का सांगितले आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
👉 नेमकं प्रकरण काय?
हे संपूर्ण प्रकरण केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत आहे. 2016 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले.
केंब्रिज अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप आहे. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणानंतर फेसबुकच्या गोपनीयतेवरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. म्हणूनच फेसबुकविरुद्ध #DeleteFacebook ही मोहीम जोर धरत आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💫 माहिती अधिकार अर्ज; मोजावे लागणार 50 रुपये
Letsup I Update
माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर आता जास्तीत-जास्त 50 रुपये शुल्क लागेल. तसेच प्रति पान 5 रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालय, विधानसभा, विधानपरिषद, तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार आहे. हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 देशातल्या भिकाऱ्यांची यादी जाहीर
Letsup I Update
संपूर्ण देशात 4 लाख 13 हजार 760 भिकारी असल्याची धक्कादायक माहिती सामाजिक न्याय विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना हा अहवाल सादर केला.
देशात भिकाऱ्यांची सर्वाधिक संख्या पश्चिम बंगालमध्ये (81 हजार 244) आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (65 हजार 835) असून तिसऱ्या क्रमांकावर बिहार (29 हजार 723) तर महाराष्ट्रात एकूण 24 हजार 307 भिकारी आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
ब्रेकिंग
पुण्यात अटक केलेल्या पाच संशयित बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारउल बांगला टीम म्हणजेच 'एबीटी' या संघटनेने महाराष्ट्रात तीन शहरात जाळे पसरवले होते. ही संघटना अल कायदाशी संलग्न असून कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. मात्र एटीएसने पाच जणांना अटक करून कट उधळून लावला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
📞 भारतातील कॉल सेंटरमधील नोकऱ्या धोक्यात?
LetsUp I Updates
कॉल सेंटर्सच्या कर्मचाऱ्यांना आपण कोणत्या देशातून बोलत आहोत हे सांगणे बंधनकारक करणारे विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये मांडण्यात आले. या विधेयकामुळे कॉल सेंटर्समधील रोजगार सुरक्षित होतील, असा दावा करण्यात आला असला तरी भारतासारख्या देशांतील कॉल सेंटर्सवर यामुळे गदा येण्याची शक्यता आहे. कारण जगभरातील अनेक देशात अमेरिकेची कॉलसेंटर्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतात अमेरिकेची सर्वात जास्त कॉलसेंटर्स आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
🏅 राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
LetsUp I Updates
देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखला जाणारा पद्म पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. कला, साहित्य, शिक्षा, क्रीडा, संशोधन, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, लोककला, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावर्षी 84 जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून त्यातील 43 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून समाजसेवक डॉ.अभय आणि राणी बंग, साहित्यिक गंगाधर पानतावणे, अरविंद गुप्ता, जेष्ठ अभिनेते मनोज जोशी, उद्योजक रामेश्वरलाल काबरा, मुरलीकांत, शिशिर मिश्रा यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - पद्म पुरस्कार वितरण सोहळा राजधानीत पार पडला, राष्ट्रपतींच्या हस्ते 43 मान्यवरांचा सन्मान
🔅 नवी दिल्ली - 2014 साली इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांची हत्या, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची माहिती
🔅 नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे विमान ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात कोसळले, वैमानिक जखमी
🔅 नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी महात्मा गांधी हे कट्टर हिंदू होते असा दावा केला
🔅 श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा येथे झालेल्या चकमकीदरम्यान 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
🔅 बीजिंग - चीन एक इंचही जमीन सोडणार नाही; रक्तरंजित संघर्षासाठी तयार - चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग
🔅 मुंबई - देशभरातल्या एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना स्वायत्त दर्जा, पुणे विद्यापीठाचाही समावेश
🔅 मुंबई - खाजगी शाळांच्या फी वाढीला सरकारचा चाप, 25 टक्के पालकांना एकत्र येऊन तक्रार करता येणार
🔅 मुंबई - मराठमोळ्या पोलिसाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणवीरच्या सिंगच्या 'सिम्बा' चित्रपटात सारा अली खानची निवड
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 फी वाढीविरोधात पालकांनाही दाद मागता येणार!
Letsup I Update
खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार आता पालकांनाही मिळणार आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली.
या निर्णयामुळे आता मुंबईसह राज्यातील कोणत्याही खाजगी शाळांना अवाजवी शुल्क आकारता येणार नाही. कुठल्याही शाळेत 25 टक्के पालक एकत्र येऊन तक्रार करु शकतील. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही नवी तरतूद लागू करण्यात येणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 अॅट्रॉसिटीमध्ये तातडीने अटक नाही : सुप्रीम कोर्ट
Letsup I Update
▪ कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन त्याची थेट अटक आता होणार नाही.
▪ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करता येईल.
▪ तसेच न्यायालयाने अटकेपूर्वी जामीन अर्ज न मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आता तुम्हाला जामीन मिळणार आहे.
▪ मुंबईतून दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीत हा निकाल देण्यात आला आहे. न्यायमूर्ती उदय ललित आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
▪ विशेष म्हणजे केवळ सरकारी नोकरच नव्हे, तर इतर सामान्य व्यक्तींनाही अशाच प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे.
▪ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या स्तरावर अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल, त्यातून केवळ अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून अडकवण्याचा तर हा प्रकार नाही ना, हे सिद्ध झाल्यावरच पुढची कारवाई करता येणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ जात प्रमाणपत्र पडताळणी मुदतवाढ विधेयक मंजूर
Letsup I Update
जात प्रमाणपत्र पडताळणी अभावी मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आता मुभा देण्यात आली आहे. यासंबंधी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मांडलेले विधेयक कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर झाले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🚘 स्वयंचलित कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
LetsUp I Updates
उबरच्या स्वयंचलित कारच्या धडकेत अमेरिकेतील अॅरिझोना येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला या कारने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उबरच्या स्वयंचलित कारने धडक दिल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे स्वयंचलित कारच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥
6 624
🚆 विद्यार्थ्यांचे रेल रोको आंदोलन; मुंबईकरांचे हाल
ब्रेकिंग
रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचे तुफान हाल होत आहेत.
विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. पोलिसांनी रेल्वेरुळावर उतरुन विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - ‘पद्म’ पुरस्करांसाठी 84 जणांची निवड, यात तीन पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 72 पद्मश्री
🔅 नवी दिल्ली - के. चंद्रशेखर राव आणि ममता बॅनर्जी यांनी भाजप-काँग्रेसविरोधात संयुक्त आघाडी स्थापन केली
🔅 नवी दिल्ली - केजरीवालांकडून नितीन गडकरींची माफी, गडकरींनी मानहानीचा खटला घेतला मागे
🔅 नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएला पाठिंबा देणार, खा. राजू शेट्टींची दिल्लीत घोषणा
🔅 बेंगळुरू - लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी कर्नाटकातील सरकारने मान्य केली
🔅 मॅस्को - रशियाची सूत्रे पुन्हा व्लादिमीर पुतीन यांच्या हाती, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकहाती विजय
🔅 मुंबई - अंगणवाडी सेविकाचे निवृत्तीचे वय आता 65 वर्ष, मानधनही 1500 रुपयांनी वाढणार - पंकजा मुंडे
🔅 मुंबई - रेशन दुकानदारांचा मोर्चा, 1 एप्रिलपासून संपावर, शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी
🔅 मुंबई - अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित रेस 3 या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
