uk
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
💥 *सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी!* *LetsUp l Nashik* कुटुंबात होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून आज लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. मखमलाबाद इथं राहणाऱ्या संतोष थोरे असं या 40 वर्षीय मयत ईसमाचे नाव आहे. थोरे कुटुंबात संतोष हा नेहमी कुटुंबामध्ये दारू पिऊन वाद घालत होता. तसेच आईला आणि बहिणीला देखील मारहाण करत होता. अनेक वेळा संतोषला सर्वजण समजून सांगत होते मात्र त्यानंतरही संतोषचे कुटुंबीयांना त्रास देणे सुरू होते. आज सकाळी मयत संतोष थोरे हा शरद चंद्र पवार मार्केट यार्ड कांदा व्यापाऱ्याकडे कामाला असलेल्या सुनील थोरे या लहान भावाकडे जाऊन वाद घालू लागला. लहान भाऊ सुनील याने संतोष थोरे याला एका इसमाससह गाडीवर बसून घरी सोडण्यासाठी निघाला होता. रस्त्यात पुन्हा शाब्दिक वाद झाल्याने पेठरोडच्या नामको हॉस्पिटलच्या गेटवर लहान भावाने मोठा भाऊ असलेल्या संतोष थोरे याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. हा प्रकार सकाळी साडेआठ वाजता घडला असून सदर घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह म्हसरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या हत्येप्रकरणी मयत इसमाचा लहान भाऊ सुनील थोरे यास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक करत आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *'मुंबईचा राजा' यंदा फक्त चार फुटाचा* *LetsUp l Update* ⚡ 'मुंबईचा राजा' अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (गणेश गल्ली) यंदा श्रींची मूर्ती फक्त 4 फुटांची ठेवण्याचा निर्णय घेतला असून मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जणार आहे. 🙏 *विनंती* : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुंबई पोलीस व महापालिकेनेही मंडळांना तशी विनंती केली होती. 👍 *स्तुत्य निर्णय* : राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक भान जपण्याचा निर्णय घेतला आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' नंतर आता गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानेही असाच स्तुत्य निर्णय घेतला आहे. 💁‍♂️ *आवाहनाला प्रतिसाद* : गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' हा भव्यदिव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. 'मुंबईचा राजा'ची मूर्ती सुमारे 22 फुटांची असते. यंदा मंडळाने सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्तीची उंची 4 फुटांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. 📌 फक्त पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यंदा केली जाणार असून ही मूर्ती शाडूची असेल. मूर्तीचे विसर्जनही कृत्रिम तलावात केले जाणार आहे. भाविकांसाठी 'लाइव्ह दर्शन'ची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे, असा निर्णय मंडळाच्या कार्यकारिणीत घेतला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*पतंजली लॉन्च करणार कोरोनाचं औषध* *Letsup | Trending* ⚡ कोरोना विषाणूची बाधा होऊन होणाऱ्या कोविड 19 आजारावर प्रभावी उपचार म्हणून रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने 'कोरोनिल' नावाचे औषध बाजारात आणले आहे. 👍 रुग्णांना 100 टक्के कोरोनामुक्त करण्याचे काम हे औषध करीत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र, अजूनही त्याला केंद्र सरकारची परवानगी मिळालेली नाही. 🗣️ याबाबत आज सीईओ बालकृष्‍ण हे अधिकृत माहिती देणार आहे. मात्र, या औषधाने 5 ते 14 दिवसात कोरोना विषाणू शरीरातून नाहीसा होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 💪🏻 तसेच या औषधासह नियमित योगासने आणि इम्युनिटी वाढवणारे सकस खाद्यान्न खाण्याचेही आवाहन कंपनीने केले आहे. ⏰ हरिद्वार येथून 'दिव्‍य कोरोनिल टैबलेट' आज दुपारी 12 वाजता बाजारात विक्रीची घोषणा केली जाणार आहे. 🥗 गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारि रस आणि अणु तेल यांच्या मिश्रणातून हे औषध तयार करण्यात आलेले आहे. 👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *नेपाळच्या आडमुठेपणामुळे बिहारला पुराचा धोका* *LetsUp | International* ⚡ भारताची लिपुलेख, कालापानी, लिम्पियाधुरा ही ठिकाणे राजकीय नकाशात दाखवून त्यावर ताबा सांगितल्यानंतर आता नेपाळने भारताचे आणखी एका मार्गाने कोंडी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहे. 🛑 *प्रवेश नाकारला* : भारत-नेपाळ सीमेवरील गंडक बराज धरणाजवळ भारतीय अभियंत्यांना नेपाळने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे या धरणाच्या डागडुजीचे काम रखडल्याची माहिती बिहारचे जलसंपदा मंत्री संजय झा यांनी दिली आहे. नेपाळच्या आडमुठेपणामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती झा यांनी व्यक्त केली आहे. 🗣️ *मंत्री झा यांची माहिती* : गंडक बराज धरणाला 36 दरवाजे आहेत. त्यापैकी 18 दरवाजे हे नेपाळमध्ये आहे. पूर आल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी जे साहित्य उपलब्ध आहे. तेथे प्रवेश करण्यावर नेपाळने बंदी घातली आहे. यापूर्वी असे कधीही झाले नाही” असेही झा म्हणाले. 👀 *पाणी पातळीत वाढ* : आपल्या इंजिनियर्सला या साहित्याचा वापर करण्यासाठी या भागांमध्ये प्रवेश दिला नाही तर धरणाची डागडुजी करता येणार नाही. असे झाल्यास नेपाळमध्ये पडणाऱ्या पावसामुळे गंडक नदीमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल. 📌 *ही कामेही थांबवली* : “लाल बेकिया नदीजवळ धरणाच्या डागडुजीचे काम केले जाते, त्यासाठीही नेपाळने परवानगी दिली नाही. हा प्रदेश कोणत्याही देशाच्या अंतर्गत येत नाही. तसेच त्यांनी इतर अनेक ठिकाणी डागडुजीची कामे थांवबली आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *गोव्यात कोरोनाचा पहिला बळी* *LetsUp | Corona Live* ⚡ कोरोनाचा प्रभाव भारतात टप्प्याटप्याने कमी होत असताना गोव्यात मात्र एक निराशादायक बातमी आली आहे. गोव्यात आज सोमवारी सकाळी कोरोनाने पहिला बळी घेतला. 🗣️ *आरोग्यमंत्री राणे यांची माहिती* : मोरलेम येथील 85 वर्षीय महिलेची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. कोरोनाचे निदान झाल्यापासून त्या महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र अखेर महिलेचा मृत्यू झाला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ही माहिती दिली. 😷 *पहिलीच घटना* : “गोव्यात 85 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही गोव्यातील पहिलीच घटना आहे. त्या महिलेला कोरोना झाल्याचे समजताच तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. 📌 गोव्यातील नागरिकांना खात्रीपूर्वक सांगतो की नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे” असेही गोव्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *सोशल मिडियावर अश्लील मजकूर; आ. पवार यांची पोलिसात तक्रार* *LetsUp | Latur* माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील भाषेत मजकूर लिहिल्याबद्दल औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तत्काळ गुन्हेगाराचा शोध घेवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. संपुर्ण राज्यभर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात टिकेल असे अभ्यासपूर्ण मराठा आरक्षणचा पाठपुरावा केला यामुळे हे आरक्षण शक्य झाले असे आ. पवार यांनी म्हटले आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे शनिवारी लागलेल्या राज्य सेवा परीक्षेत मराठा समाजातील 127 विद्यार्थी वर्ग 1,वर्ग 2 चे अधिकारी झाले. असे असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील भाषेत मजकूर लिहिल्या बद्दल औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यांनी दि. 21 जून रोजी रात्री याप्रकरणी औसा पोलिसात संबंधित मजकूर लिहिणाऱ्याबद्दल तक्रार दाखल केली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, गटनेते सुनील उटगे, संतोष मुक्ता, भीमाशंकर मिटकरी, हणमंत कांबळे आदी उपस्थित होते. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *कोरोनाबाधित मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात* *LetsUp | Nashik* कोरोनाच्या भीषण काळातही नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. या ना त्या कारणाने चर्चेत असलेले शासकीय रुग्णालयाने पुन्हा एक मोठी चूक केली आहे. कोरोना संशयित 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा मृतदेह रुग्णालयाने अंत्यविधीसाठी चक्क नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हा मृतदेह नातेवाईकांनी तब्बल 7 तास फुलेनगरमधील मयत महिलेच्या राहत्या घरात ठेवला. मात्र काही वेळा नंतर या मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सगळ्यांच धक्का बसला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णलयात या घटनेचा जाब विचारल्या नंतर डॉक्टरांनी मृतदेह पुन्हा हॉस्पिटलला आणून द्या अस सांगितल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शेवटी जिल्हा रुग्णालयाने रात्री 1 वाजता शासकीय पथक पाठवून राहत्या घरातून या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन विल्हेवाट लावली आहे. आधीच फुले नगर, पेठ रोड, राम नगर भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झालेला असताना दुसरीकडे आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या चुकीच्या कारभारामुळे या भागात आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह घरी दिल्याने नातेवाईकांनी भीती व्यक्त केली आहे. या भोंगळ कारभारामुळे आमच्या जीवाला धोका झाला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने...* *LetsUp | Update* 💫 यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. ✨ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात गणेशमंडळाना सूचना दिल्या. 👉 तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनीही तयारी दर्शवून राज्य सरकारचा आदेश मान्य करणार असून कोणताही अडथळा आणला जाणार नसल्याचे आश्वासन दिले. 📍 गणेशोस्तव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे. 📌 दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

LetsUp I Job 💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे : ● प्राध्यापक : 07 ● सहकारी प्राध्यापक : 06 ● सहाय्यक प्राध्यापक : 08 📍 नोकरी ठिकाण : मुंबई 💸 फी : General/OBC/EWS: ₹2000/- [SC/ST/PWD:₹500] 🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 10 जुलै 2020 👍 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.tiss.edu/ 📝 जाहिरात पाहा : http://recruitment.tiss.edu/ 👩‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3dbx55C ✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ ऐका यशोगाथा! मंडप दुकान ते हजार कोटींची संस्था... 🎯 नागेबाबा उद्योगसमूहाचे कुटुंबप्रमुख... 👌 श्री. कडुभाऊ काळे म्हणजे सामान्य ते असामान्य एक जबरदस्त प्रवास. 🤓 जाणून घ्या, साधेपणातून यशाचे शिखर गाठले कसे? शून्यातून विश्व उभारले कसे? 👉 एक प्रेरणादायी संवाद पहा : https://youtu.be/I0HeYFf6i78 (ADVT)

photo content

🏫 राज्यात जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू LetsUp | Update ⚡ शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी जाहीर केला आहे. 💁‍♂️ शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या मनातील संभ्रम या निर्णयामुळे दूर झाला आहे. 🧐 असे असू शकतात पर्याय! : ● सुरू होणार्‍या शाळा मात्र 5 तासांऐवजी 3 तास भरणार ● एका वर्गात जास्तीत जास्त तीस विद्यार्थीच असावेत ● शाळा दोन सत्रांत भरविण्याची अथवा विद्यार्थ्यांनी एक दिवसाआड (सम-विषम) शाळेत यावे ● सकाळी 9 ते 12 आणि, दुपारी 12 ते 3 अशा दोन सत्रात शाळा चालवावे ● सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी वर्ग 1 आणि 2, ● मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी वर्ग 3 व 4 भरवण्यात यावेत 📍 दरम्यान; भविष्यात शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्देशही सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत. 👉 भविष्यात शाळा सुरू झाल्यावर वर्ग तीन तासांचे किंवा एक दिवसाआड सुरू होण्याची शक्यता शालेय शिक्षण विभागाने व्यक्‍त केली आहे. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक इशारा! LetsUp | Trending ⚡ जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक धक्कादायक इशारा दिला आहे. 💁‍♂️ कोरोनाचे थैमान आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कायम राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. 🧐 दोन आठवडे कायम : गत 15 दिवसांपासून रोज जवळपास 1 लाखाहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे. 🗣️ संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांचे मत : चीनमध्ये 50 दिवसांनंतर पुन्हा एकदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमधील 90 हजार लोकांच्या चाचण्या केल्या असून हे प्रकरण चीन चांगल्या पद्धतीने हाताळले असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे. 📌 इशारा : चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक तेथे जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिकेमध्येही वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 सलग दहाव्या दिवशी पेट्रोल दरवाढीचा झटका! LetsUp | Update ⚡ पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा झटका सुरूच आहे. सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत 47 पैशांची तर डिझेलच्या दरात 57 पैशांनी वाढ केली आहे. ⛽ दर वाढ : दिल्लीत पेट्रोलचे दर 76.73 रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 75.19 रूपये प्रति लीटर एवढे झाले आहेत. गत दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे 💁‍♂️ राज्यनिहाय पेट्रोल दर (लिटरमध्ये) : ▪️ दिल्ली : पेट्रोल - 76.73 | डिझेल - 75.19 ▪️ मुंबई : पेट्रोल - 83.62 | डिझेल - 73.75 ▪️ चेन्नई : पेट्रोल - 80.37 | डिझेल - 73.17 ▪️ कोलकाता : पेट्रोल - 78.55 | डिझेल - 70.84 🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

😍 या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा LetsUp | Trending 💰 जगात सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सर्व्हिस ब्राझीलमध्ये अधिकृतरित्या सुरू झाली आहे. 📜 फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. 🗣️ मार्क झुकरबर्गने सांगितले की... : ● आज आम्ही ब्राझीलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिसची सुरुवात करत आहोत. ● आम्ही पैसे पाठवणे आणि स्विकारण्याच्या प्रक्रियेला फोटो पाठवण्याऐवढे सोपे बनवत आहोत. ● लवकरच छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खरेदी-विक्रीची सुविधा देणार आहोत. ● व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटसाठी ब्राझीलच्या स्थानिक बँकांशी भागीदारी करण्यात आली आहे. ● व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेला ब्राझील हा पहिला देश आहे. ● त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये देखील ही सेवा लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

LetsUp News Update ▪ देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये 11 हजारांहून अधिक वाढ; देशात 24 तासांत 11 हजार 502 रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या 3 लाख, 32 हजार 424 वर पोहचली ▪ भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये गैरसमज झाले असतील तर ते चर्चेने दूर केले जातील; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा ▪ राज्यात कोरोना मृत्यूंचा नवा उच्चांक; 24 तासात कोरोनामुळे 178 रुग्णांचा बळी, राज्यात कोरोनामृत्यूंचा आकडा 4 हजार 128 वर पोहचला; राज्यात 2 हजार 786 नवीन रुग्ण ---------------------- Advertisment On LetsUp Contact : 7798655655 ---------------------- ▪ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा लॉकडाऊनची शक्यता फेटाळली, मुंबई, पुण्यातही टाळेबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे केले स्पष्ट; चेन्नईत मात्र पुन्हा निर्बंध लागू ▪ बँकेत काचेच्या दरवाजाला धडकून महिलेचा मृत्यू; केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील पेरम्बवूरमध्ये घडली घटना; बीना नॉबी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव ▪ अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या मुंबईमधील लोकलमधून पहिल्याच दिवशी 50 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास ▪ जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात जिल्ह्यात 76 नविन रुग्ण आढळले, जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1804 वर पोहचली, फक्त जळगाव शहराची एकूण रुग्णसंख्या 322 ▪ शक्तीशाली अमेरिकन एअर फोर्सचं फायटर विमान उत्तर समुद्रात कोसळलं; पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या बेसवरुन एफ-15 सी विमानाने नियमित सरावासाठी केले होते उड्डाण ▪ ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेटर्सचा सन्मान; गल्ल्यांना भारतीय क्रिकेटर्सची नावे दिली जाणार, सचिन तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली या खेळाडूंची शहरात रस्त्यांना नावे देण्याचा सन्मान मिळणार ▪ लॉकडाउननंतर पुढल्या महिन्यात सिनेमागृहं उघडण्यासाठी जोरदार तयारी सुरू; प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नाना क्लृप्त्या, मोफत चित्रपट दाखवण्याचे आमिष प्रेक्षकांना दाखवलं जाणार असल्याचे समजतंय 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

💥 नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या LetsUp l Mumbai ⚡ चेंबूर येथील प्रभाग क्र.155 चे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने रविवारी रात्री आत्महत्या केली. 💁‍♂️ मृत अभिषेक शेट्ये (वय 26) हा रविवारी लालडोंगर परिसरातील श्रमिक इमारतीतील त्याच्या राहत्या घरात एका वेगळ्या खोलीत झोपला होता. रात्री बराच उशीर होऊनदेखील तो खोलीबाहेर आला नाही. 📌 त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पाहायला गेल्यानंतर अभिषेकने गळफास घेतल्याचे त्यांना आढळले. सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने अभिषेक यास तत्काळ चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 'ते' फोटो तत्काळ डिलीट करा; सायबर सेलचा इशारा LetsUp l Trending ⚡ महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. रविवारी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 💁‍♂️ इशारा : सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सोशल मिडियावर सुशांतच्या घरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने याच फोटोंवरुन इशारा दिला आहे. 🙏 आवाहन : सुशांतचे ते फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याचबरोबर यापूर्वी अनेकांनी हे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 👉 महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे. ज्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंविषयी इशारा पोलिसांनी दिला आहे. 📌 न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा प्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जाऊ शकते. महाराष्ट्र सायबरने सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट न करण्याचे आवाहन केले आहे. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 देशात कोरोनाची परिस्थिती LetsUp l Corona Live ⚡ देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला असला, तरी कोरोनाचे संकट अजूनही कायम आहेच. 💁‍♂️ केंद्रीय आरोग्य मंत्रलयाची माहिती : गेल्या 24 तासांत 11 हजार 502 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग पाचव्या दिवशी तीनशेहुन अधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सिक्कीम, लडाखसारख्या ईशान्येकडील भागांमध्येही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. 💫 दिलासा : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख 32 हजार 424 इतकी झाली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. 📌 उपचार व मृत्यू : आतापर्यंत एक लाख 69 हजार 798 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक लाख 53 हजार 106 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 520 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp