LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
6 624
📣 भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगाभरती
Letsup I Job Update
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
जागा : GEN : 1010 I SC : 300 I ST : 150 I OBC : 540 I Total : 2000
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट : 01 एप्रिल 2018 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
---------------------------------------
👨🎓 ड्रीम जॉब हवाय? मग साईनअप करा शाईन.कॉम सोबत आणि बनवा तुमचं स्वप्नातील करिअर, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Vs1ZVr
---------------------------------------
फी : General & OBC: ₹600/- (SC/ST/अपंग: ₹100/-)
पूर्व परीक्षा : 01 ते 08 जुलै 2018
मुख्य परीक्षा : 04 ऑगस्ट 2018
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 13 मे 2018
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : https://goo.gl/PkKyL3
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚔ नागपुरात हातात तलवार घेऊन राडा
Letsup I Update
नागपुरात खंडणीखोरांची दहशत माजली आहे. गुंड हातात तलवारी घेऊन ग्राहकांनी भरलेल्या हॉटेलमध्ये धुमाकूळ घालून दहशत निर्माण करत असल्याची घटना महाअन्नपूर्णा हॉटेलमध्ये घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत सविस्तर असे कि, हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महाअन्नपूर्णा हॉटेलमध्ये भरपूर गर्दी होती. लोक स्नॅक्सचा आनंद लूटत असताना अचानक सात ते आठ गुंडांनी हॉटेलसमोर येऊन शिवीगाळ आणि धमकावणे सुरु केले. ग्राहकांना काही कळायच्या आधीच गुंडांनी हॉटेलच्या काऊंटरवर बसलेल्या मॅनेजरच्या दिशेने सशस्त्र हल्ला केला.
या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये पळापळ झाली. महिलांनी कसाबसा लहान मुले आणि स्वतःचा जीव वाचवला. काऊंटरवर बसलेल्या मॅनेजरने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोर गुंडाच्या दिशेने कढई फेकून मारली. त्यानंतर गुंड तिथून पळून गेले. या हल्ल्यात हॉटेलचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात बेकायदेशीररित्या मंडळी जमवून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📝 600 शिक्षणतज्ज्ञांचं पंतप्रधानांना पत्र!
Letsup I Update
जगभरातल्या 600 शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी देशातल्या गंभीर प्रश्नांवर मोदींच्या गप्प राहण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
पत्रात असे लिहिले आहे की, सध्या देशात परिस्थिती गंभीर आहे. त्यात भरीसभर म्हणून सत्तारुढांचा हिंसेशी असलेला परस्परसंबंध निर्विवादपणे उघड होताना दिसत आहे. पण, यावर तुम्ही बराच काळ मौन साधलं आहे. त्याचं कारण काय?, असा प्रश्न मोदींना उद्देशून विचारण्यात आला आहे. या पत्रावर न्यूयॉर्क विश्वविद्यालय, ब्राऊन विश्वविद्यालय, हार्वर्ड, कोलंबिया येथील विद्यापीठं तसेच वेगवेगळ्या आयआयटी संस्थांच्या शिक्षण तज्ज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ कोहलीला खुले आव्हान; 'दहा वर्षांत तुझी जागा घेईन'
Letsup I Update
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यात विराट कोहलीच्या एका फॅनने त्याला मजेदार आव्हान दिले आहे. यामध्ये विराटला 10 वर्षात रिप्लेस करण्याच आव्हान त्याने दिले आहे.
पंजाब आणि बंगळुरुच्या सामन्यादरम्यानाचा हा फोटो आहे. दहा वर्षाच्या लहान मुलाच्या हातात एक पोस्टर आहे. त्या पोस्टरवर 'हैलो विराट सर, अगले 10 साल में आपको रिप्लेस करने का वादा करता हूं, बेस्ट ऑफ लक.' असे लिहण्यात आले आहे.
हे पोस्टर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/mdxAgU
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● देश सोडून पळून जाणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करणे आता शक्य होणार, अध्यादेश कॅबिनेटमध्ये मंजूर
● नवी दिल्ली - देशात पुढील चार दिवस राहणार उकाडा, 25 एप्रिलपर्यंत तेलंगणा, विदर्भ, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये उकाडा वाढणार
● नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा भाजपला रामराम, सोडचिठ्ठीनंतर सिन्हांची भाजप नेत्यांवर जोरदार टीका
● स्टॉकहोम - जगातील पहिला इलेक्ट्रिक रस्ता स्वीडनमध्ये उभारला, वाहने आपोआप होणार चार्ज
● गोवा - नववा गोवा राज्य चित्रपट महोत्सव 3 ते 6 मे दरम्यान, महोत्सवात 9 कोकणी आणि एका मराठी चित्रपटाची निवड
● मुंबई - नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर
● मुंबई - 2002 हिट अँड रन प्रकरण, मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाकडून अभिनेता सलमान खानविरुद्धचे वॉरन्ट रद्द
● गुगलने आपली चॅट ही नवीन प्रणाली केली सादर, याच्या मदतीने क्रॉस-प्लॅटफॉर्म संदेशांची देवाण-घेवाण शक्य होणार
● एबी डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 6 गडी राखून केला पराभव
● सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला' या चित्रपटाला मुहूर्त मिळाला, येत्या 7 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ आता अण्वस्त्र परीक्षण नाही : किम जोंग
Letsup I Update
अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आज शनिवारपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. हुकुमशहा किंग जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी गुड न्युज आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🏏 ipl आजचे सामने; 21 एप्रिल 2018
Letsup I Ipl Special Katta
👉 4:00pm - कोलकाता नाइट रायडर्स Vs किंग्स इलेव्हन पंजाब, ईडन गार्डन, कोलकाता
👉 8:00pm - दिल्ली डेअरडेव्हिल्स Vs रॉयल चॅलेजर्स बंगळूरु, फिरोजशाह कोटला स्टेडियम, दिल्ली.
पाँईट टेबल खालीलप्रमाणे :
1) चेन्नई सुपर किंग्ज - 4 सामने 6 पाँईट
2) कोलकाता नाईट रायडर्स - 5 सामने 6 पाँईट
3) सनरायझर्स हैदराबाद - 4 सामने 6 पाँईट
4) किंग्ज इलेव्हन पंजाब - 4 सामने 6 पाँईट
5) राजस्थान रॉयल्स - 5 सामने 4 पाँईट
6) मुंबई इंडियन्स - 4 सामने 2 पाँईट
7) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 4 सामने 2 पाँईट
8) दिल्ली डेअरडेव्हिल्स - 4 सामने 2 पाँईट
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 आता अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी!
Letsup I Breaking
▪ पॉस्को कायद्यात नवीन तरतूद
▪ 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
▪ लवकरच सरकार यासाठी अध्यादेश जारी करणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎯 जाणून घ्या टेक्नो अपडेट
Letsup I Techno Update
▪ व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज जास्त जणांना पाठवला तर त्याची ट्रॅकिंग करण्यात येणार, तसेच अनेकांना एकच मेसेज पाठवला तर फॉरवर्डेड मेनी टाईम्स असा मेसेज येईल
▪ गुगलने आपल्या क्रोम या ब्राऊजरची 66वी आवृत्ती युजर्ससाठी केली सादर, यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश
▪ ग्राहकांना सर्व दूरसंचार कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनची माहिती आता एकाच ठिकाणी मिळणार, 'ट्राय'ची नवी वेबसाईट (http://tariff.trai.gov.in) लाँच
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📱 आता मोबाईलद्वारे टोल भरता येणार
Letsup I Update
राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठी लवकरच न थांबता टोल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसांतच मोबाईलवरून टोल भरण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.
मोबाईलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोठेही थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - शुक्रवारी पेट्रोलचे दर 55 महिन्यांच्या उच्चांकावर, दिल्लीत पेट्रोल 74.08 आणि परभणीत 83.55 रुपये लिटर
● नवी दिल्ली - पेन्शन कोष नियामकने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी बँक खाते व मोबाईल क्रमांक देणे केले सक्तीचे
● नवी दिल्ली - देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 19 एप्रिल 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये एक टक्क्याने घट
● नवी दिल्ली - भारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल : क्रिस्टोफर वुड
● अहमदाबाद - गुजरात हायकोर्टाने 2002 मधील नरोडा पाटिया दंगलीच्या आरोपातून माजी मंत्री माया कोडनानी यांची केली निर्दोष मुक्तता
● मुंबई - राज्याच्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी 21 मे रोजी मतदान, मतमोजणी 24 मे रोजी
● मुंबई - ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचा इशारा; राज्यातील सर्व मनपा आयुक्तांना अखेरची संधी
● चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर 64 धावांनी विजय, शेन वॉटसन ठरला सामनावीर
● मुंबई - मारुती अल्टो ही देशात सर्वाधिक विक्री झालेली चारचाकी गाडी, 2017-18 या वर्षामध्ये 6.99 टक्के वाढीसह 2,58,539 गाड्यांची विक्री
● मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'केसरी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त, या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक स्टंट करत असताना अक्षयला दुखापत
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
💥 सर्व निवडणुका स्वबळावरच : शिवसेना
Letsup I Update
▪ राज्यात शिवसेना यापुढे सर्व निवडणुका स्वबळावरच लढवेल, भाजपसोबत कोणत्याही निवडणुकीत युती करणार नाहीच
▪ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🔥 प्रेयसीचा नकार अन् त्याने जाळल्या 5 लाखांच्या नोटा!
Letsup I Update
प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरुणाने पाच लाख रुपयांच्या नोटांना आग लावली. मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कॅशिअर जितेंद्र गोयलला अटक केली आहे.
आरोपी जितेंद्र ही रक्कम प्रेयसीला दाखवण्यासाठी बेरावल गावात गेला होता, जेणेकरुन ती त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होईल. पण प्रेयसीचे लग्न दुसरीकडे ठरले होते. त्यामुळे तिने जितेंद्रसोबत लग्न करण्यास नकार दिला. याच कारणामुळे नाराज झाल्याने त्याने त्याच्याजवळ असलेल्या पाच लाख रुपयांच्या नोटांना आग लावली.
नसरुल्लागंज पोलिसांच्या माहितीनुसार, स्पंदना स्फूर्ती फायनान्स कंपनीत जितेंद्र गोयल कॅशिअर म्हणून काम करत होता. त्याच्याकडेच या तिजोरीची किल्ली असायची. कंपनीच्या तिजोरीतून 6 लाख 74 हजार रुपये काढून जितेंद्र गायब झाला. कंपनीच्या मॅनेजरच्या तक्रारीनंतर नसरुल्लागंज पोलिसांनी कॅशिअर जितेंद्रविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. दरम्यान, आग लावलेल्या रकमेत दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश होता. त्याच्याकडून 46 हजार रुपयेही जप्त करण्यात आला.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🏏 IPL मध्ये विकत घ्यायला कोणीही नव्हतं तयार; मात्र त्याने ठोकलं पाहिलं शतक
Letsup I Update
वय, फिटनेस आणि फॉर्म या तीन गोष्टींमुळे आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी लिलावात ख्रिस गेलवर बोली लावायला पहिल्या दोन राउंडमध्ये कोणीही स्वारस्य दाखवले नाही. मात्र अखेरच्या राउंडमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने या वादळाला खरेदी केले. संघाची सहमालक प्रिती झिंटा आणि मार्गदर्शक विरेंद्र सेहवागने चर्चा करुन हात उंचावला व गेलला त्याच्या बेस प्राईसला म्हणजे फक्त 2 कोटी रुपयांना विकत घेतले.
ख्रिस गेलला खरेदी केल्यानंतर सेहवागने गेलने आम्हाला दोन सामने जरी जिंकून दिले तरी आमचे पैसे वसूल झाले असे आम्ही समजू असे म्हटले होते. त्याचीच प्रचिती सध्या दिसत आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने मोहालीतल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 15 धावांनी मात केली. पंजाबचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला.
गेलने या सामन्यात 63 चेंडूत 104 धावा ठोकत, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले पहिले शतक आपल्या नावावर केले. आणि सर्व संघ मालकांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान यावर बोलताना गेलने म्हटले की, 'मला वाटतं की, सेहवागने माझी निवड करत लीगमध्ये रोमांच कायम ठेवला.'
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 CBSE दहावी परीक्षा; इंग्रजीत 2 गुण मोफत मिळणार
Letsup I Update
CBSE बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या पेपरमध्ये दोन गुणांची भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. 12 मार्च रोजी झालेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुक आढळल्याने ही 2 गुणांची भरपाई जाहीर केली. एका प्रश्नामधील चूक काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - आजही देशातील 19 कोटी युवावर्गाकडे स्वत:चे बँक खाते नसल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून स्पष्ट
🔅 नवी दिल्ली - आयटी रिटर्न्स भरताना चुकीची माहिती दिल्यास दंड किंवा तुरुंगवारी, आयकर विभागाचा सावधानतेचा इशारा
🔅 नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश करणारी अभिनेत्री मलिका राजपूतने गंभीर आरोप करत भाजपाला रामराम ठोकला
🔅 नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेकडून सिटी को-ऑप बँकेवर निर्बंध, 6 महिन्यात केवळ 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा
🔅 नवी दिल्ली - नीट’ परीक्षेसाठी ड्रेसकोड जारी; हाफ स्लीव्ह्ज शर्टची सक्ती, तर बेल्ट, शूज, घड्याळालाही बंदी
🔅 मुंबई - राज्यातील 1 लाख 10 हजार 315 शाळांपैकी 3 हजार 348 शाळांमध्ये मुलांची तर 2018 शाळांमध्ये मुलींची शौचालये नाहीत
🔅 बुलढाणा - शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष सर्वसाधारण, भेंडवळच्या भविष्यवाणीने शेतकरी सुखावला, तर राजाही कायम राहण्याचे भाकित
🔅 मुंबई - ऐरोली आणि मुलुंडचे दोन टोल भरण्यापासून वाहनचालकांची सुटका, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
🔅 मुंबई - दाभोळकर, पानसरेंचे मारेकरी अजूनही मोकाट का? हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटकारले
🔅 पुणे - 98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत नाट्य संमेलन
🔅 पंजाब - ख्रिस गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादचा 15 धावांनी पराभव केला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚖ न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच : सुप्रीम कोर्ट
Letsup I Update
न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक अर्थात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच झाला होता, त्यामुळे चौकशीची गरज नसल्याचे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणातील 4 न्यायाधीशांच्या जबाबावर शंका घेण्याचे काहीही कारण नाही, तसेच महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपासही समाधानकारक असल्याचे कोर्टाने व्यक्त केले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🖊 'नीट'चे अजब-गजब नियम!
Letsup I Update
सीबीएसईने नीट 2018 परीक्षेसाठी ड्रेस कोडसंदर्भात महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. नीटची परीक्षा 6 मे रोजी होणार आहे. पूर्ण सूचना वाचूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर यावे, असे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले आहे.
▫ परीक्षेच्या दिवशी हाफ स्लीव्हचे फिकट रंगाचे कपडे घालून या.
▫ कपड्यांवर कोणत्याही प्रकारची बटणं लावलेली नसावीत. शिवाय मुलींनी अॅम्ब्रोयडरी असलेले ड्रेसही परिधान करु नये.
▫ परीक्षेच्या दिवशी शूज घालून येऊ नका. स्लिपर्स किंवा कमी उंचीच्या सँडल्स चालतील.
▫ बुरखा, पगडी परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचायला हवे.
▫ विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन येऊ नये. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिलसोबतही एक्झाम हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
▫ परीक्षा केंद्रावर दागिने, हॅण्डबॅग, पाण्याची बाटलीही घेऊन येऊ नये.
▫ परीक्षेला अॅडमिट कार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💡 ‘आधार’साठी आता ‘क्यूआर कोड’ पद्धत
Letsup I Update
'यूआयडीएआय'ने आता 'ई-आधार'साठी डिजिटल हस्ताक्षरयुक्त 'क्यूआर कोड'ची पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून आधार धारकाची सर्व माहिती (नाव, पत्ता, जन्मदिनांक) फोटोसह अपडेट होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून ऑफलाईन पडताळणीही करता येणार आहे.
'यूआयडीएआय'च्या मते या माध्यमातून आधार कार्डधारकाचे तपशील पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहेत. क्यूआर कोड म्हणजे बारकोड लेबलचाच एक प्रकार आहे. त्यामध्ये दडविण्यात आलेल्या सूचना केवळ रिडरद्वारेच वाचल्या जाऊ शकतात. कार्डधारकाच्या माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून 'आधार'चे 'ई-आधार' हे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन तयार करण्यात आले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎯 प्लॅस्टिक खाणारे एन्झाइम सापडले
Letsup I Update
प्लॅस्टिकलाच खाऊन टाकणाऱ्या एन्झाइमचा शोध लागल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.
प्लॅस्टिक विघटनाबाबात पोर्टस्माऊथ विद्यापीठ आणि नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरी विभागाने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या या साधारणपणे पॉलिथिन टेरेप्थॅलेट (पीईटी) पासून बनवल्या जातात. हे पीईटीच पचवून टाकेल असे द्रव्य संशोधकांनी आता शोधून काढले आहे. ही द्रव्ये इतकी शक्तिशाली आहेत की शेकडो वर्षे नष्ट न झालेले प्लॅस्टिकही काही क्षणात विघटित होऊन त्याची विल्हेवाट लागू शकते.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
