uk
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
रजा अकादमीवर बंदी आणा, आरोपींना तात्काळ अटक करा - अनिल बोंडे LetsUpp | Nanded ▪️ नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचारात निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ▪️ या आंदोलनात माजी मंत्री बोंडे म्हणाले की, रजा अकादमीवर बंदी आणावी, आणि या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे. ▪️ अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिला आहे. ▪️ दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे एक कट्टर स्वरूपाचं मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/wPUkMdLfolb

अमरावती शहरात पुन्हा कडक संचारबंदी लागू LetsUpp | Amravati ● त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात 13 तारखेला हिंसाचार घड
अमरावती शहरात पुन्हा कडक संचारबंदी लागू LetsUpp | Amravati ● त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात 13 तारखेला हिंसाचार घडला होता त्यापार्श्वभूमीवर शहरात सहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती व इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती. ● पुन्हा आज भाजपच्यावतीने त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ● त्यामुळे अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत कडक संचारबंदीचा आदेश दिला आहे. ● तसेच कडक कारवाईचे आदेश सुद्धा बजावण्यात आला आहे. तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/5hFSN6aPnlb

*टॉप १० हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या* *LetsUpp l Bulletin* ● अमरावतीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या येणार अमरावती दौऱ्यावर; पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या सोमय्या यांनी १५ दिवसानंतर अमरावतीत यावं ● चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीचा वाहन चोरीचा गोरखधंदा; पोलिसांकडून बेड्या; वैष्णवी देवतळे असं या अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे ● अक्कलकोट-सोलापूर मार्गावर सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या प्रवासी जीपच्या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू; १२ जण गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक ● जालना जिल्ह्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरच पगार मिळणार; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश ● अंत्यसंस्काराहून परतताना भीषण अपघात, सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; बिहारमधील लखीसराय येथे झाला अपघात ● मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळणार? पवई तलावाजवळील सायकल ट्रॅक प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती ● शीना बोरा हत्याकांड : आरोपी इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाहीच; हायकोर्टाने सहाव्यांदा जामीन अर्ज फेटाळला ● मुंबईतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात; सोमवारी दक्षिण मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक पहायला मिळाला ● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन; ३४१ किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वे पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशला जोडत आहे ● टी-२० विश्वचषक २०२२ पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार, यावेळी एकूण ४५ सामने ऑस्ट्रेलियाच्या ७ मैदानांवर खेळवले जाणार आहेत *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/sXRx0Zblelb