LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
6 624
🏛 अयोध्या प्रकरण : 18 ऑक्टोबरची डेडलाईन!
LetsUp । National
⚡ सुप्रीम कोर्टानं अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची 'डेडलाइन' निश्चित केली आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे.
💁♂ अयोध्या राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना थांबवण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
👉 महत्वाचे मुद्दे
▪ सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले आहे.
▪ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
▪ यामुळे अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
▪ याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी रोज एक तास अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚀 विक्रम लँडर अन् इस्रोने प्रयत्न थांबवले!
LetsUp | Update
चंद्रावर उतरलेल्या 'विक्रम' लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न संपल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.
इस्रोने एका एका ट्विटद्वारे चांद्रयान-2 मोहिमेला देशभरातून भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
चांद्रयान-2 चे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असून, पुढली 7 वर्षं ऑर्बिटर चंद्राबद्दल विविध उपकरणांच्या माध्यमातून माहिती देत रहाणार आहे.
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. मात्र, विक्रम लँडर नक्की कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● आता आधारमध्ये माेबाईल नंबर/ फाेटाे/ ई-मेल अपडेट करण्यासाठी काेणत्याही दस्तऐवजाची गरज नाही
● 2018-19 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर (पीएफ) 8.65 टक्के इतके ठेवण्याचा निर्णय
● पारले प्रॉडक्ट्सने आपल्या सर्व प्रकल्पांत गेल्या 4 महिन्यांत 8 ते 10 टक्क्यांची उत्पादन कपात केली सुरू
● उत्तर भारतीयांचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्याविरोधात याचिका दाखल
● राज्यात 19 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा दमदार पाऊस हाेण्याची शक्यता : भारतीय हवामान विभाग
● नाणार रिफायनरीमुळे 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार, सरकार निर्णयाचा फेरविचार करणार : मुख्यमंत्री फडणवीस
● राज्य सेवा परीक्षा 2017-2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता
● आता स्क्रीनशॉटवरून गुगल सर्च करता येणार, लवकरच हे फिचर युजर्सला प्रदान करण्यात येणार
● भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा टी-20 सामना आज (दि.18) बुधवारी माेहालीत रंगणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'मन बैरागी' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🎂 हॅपी बर्थ डे; देशाचे लोकप्रिय पंतप्रधान
LetsUp I Special
देशात तसेच विदेशात लोकप्रिय असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. या निमित्ताने जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी...
1. मोदी पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे.
2. त्यांनी अमेरिकेतून मैनेजमेंट व पब्लिक रिलेशन संबंधित 3 महिन्यांचा कोर्स केला होता.
3. लहानपणी त्यांना नरिया ह्या नावाने बोलवले जात.
4. ते लहानपणी अॅक्टिंग व नाटकांमध्ये भाग घ्यायचे, ते NCC मध्ये देखील होते.
5. RSS मुळेच ते 1985 मध्ये भाजपशी जोडले गेले.
6. लालकृष्ण आडवाणी यांना नरेंद्र मोदींचे राजनीतिक गुरु मानले जाते.
7. ते कोणतंही नवीन काम करण्याआधी आपल्या आईचा आशीर्वाद घेतात, व स्वामी विवेकानंद यांना आपला आदर्श मानतात.
8. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 13 वर्षाच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नव्हती.
9. त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून सलग २०६३ दिवस काम केलं.
10. त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे कि ते फक्त 5 तासांची झोप घेतात व सकाळी 5.30 ला उठतात.
11. ते मोवाडो ह्या स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध कंपनीच घड्याळ वापरतात, या घड्याळांची किंमत 40 हजार ते 1 लाख 90 हजारापर्यंत असते. ते नेहमी उजव्या हातात घडयाळ घालतात असं करणं ते शुभ मानतात.
12. ते मों ब्लां ह्या जर्मनीच्या प्रसिद्ध कंपनीचे पेन वापरतात, या पेनाची किंमत 1 लाख 30 हजार इतकी आहे.
13. ते बुल्गरी या इटलीच्या प्रसिद्ध ब्रॅण्डचा चष्मा वापरतात. या कंपनीच्या चष्म्याच्या किंमती 30 ते 40 हजार इतक्या असतात.
14. त्यांचे कपड़े बिपिन व जीतेंद्र चौहान यांच्या दुकानामध्ये बनवली जातात. 1989 पासून मोदी त्यांच्याकडून कपडे शिवून घेतात. हे दुकान काही लहान-मोठं नाहीये, ह्यांची अहमदाबाद मध्ये जेड ब्लू नावाची 150 कोटींची कंपनी आहे.
15. मोदींना भेटस्वरूपात ज्या वस्तू मिळतात त्यांचा ते वारसातून एकदा लिलाव करतात व त्यामधून मिळणारे पैसे सामाजिक संस्थांना दान म्हणून देतात.
16. BJP ने पहिल्यांदाच लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वखाली पूर्ण बहुमत प्राप्त केले. आत्तापर्यंत कांग्रेस व भाजप असे दोनच पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत प्राप्त करू शकले आहेत.
17. त्यांनी गुजरातमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना गुजरात टुरिझमचा ब्रांड अंबेसडर बनवले होते. अमिताभ यांनी अनेक जाहिरातींमधून गुजरातच्या पर्यटनाचा प्रचार केला, यासाठी त्यांनी कोणतंही मानधन घेतले नव्हते.
18. 2005 च्या गुजरात दंगलीमुळे व भारतातील अनेक लोकांच्या विरोधामुळे 2005 ते 2013 पर्यंत अमेरिकेने त्यांना व्हिसा दिला नव्हता, परंतु पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेने त्यांना स्वतःहून बोलावून घेतले.
19. नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके
● आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
● एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
● ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
● सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
20. पंतप्रधान बनल्यानांतर दोनच महिन्यांत मोदींच्या जीवनावर 40 पेक्षा जास्त पुस्तके प्रकशित झाली.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● आज (दि.17) लँडर विक्रमवरून जाणार नासाचे ऑर्बिटर, ते लँडिंग साईटचे छायाचित्र पाठवू शकते
● तेल संकटासंदर्भात अरामको कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा; केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
● 18 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात होणार बैठक
● कर्तारपूर कॉरिडॉर भारतीय शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबरला खुला होईल, पाकिस्तानने सांगितले
● पाकिस्तान 2022 पर्यंत चीनच्या मदतीने अवकाशात पहिला अंतराळवीर पाठवणार : फवाद चौधरी, पाक मंत्री
● एमआयएम आणि वंचित आघाडी सोबत विधानसभा निवडणूक लढणार, खा. इम्तियाज जलील यांनी दुजोरा दिला
● मोटोरोलाने भारतात स्मार्ट टिव्ही आणि मोटो ई सीरिजमधील मोटो ई6एस हा स्मार्टफोन केला लाँच
● संघातील युवा खेळाडूंनी त्यांना मिळणाऱ्या चार ते पाच संधींमध्येच स्वतःला सिद्ध करावे : विराट कोहली
● बीसीसीआयने जेटची दुरवस्था पाहता आता एअर इंडियासोबत कसोटी मालिकेचा केला करार
● अभिनेता मिलिंद सोमण लवकरच ‘जग जननी माँ वैष्णो देवी’ या मालिकेत भगवान शंकराची भूमिका वठविणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♀ पालकत्वात हवा मैत्रीचा संवाद
LetsUp | Parenting
पालकांना आणि मुलांना एक गोष्ट सोबत धरून ठेवते आणि ती म्हणजे संवाद. जेव्हा तो व्यवस्थित असतो तेव्हा त्या नात्याला योग्य दिशा मिळते. कधी होतो असा निखळ संवाद? जेव्हा त्या नात्यात मैत्री, मोकळेपणा, विश्वास असतो. संवाद व्यवस्थित होण्यासाठी काय करावे? त्याबाबत जाणून घेऊ...
🎯 तुम्ही मुलाला जन्म दिला म्हणजे तुम्ही त्यांच्यावर अधिकार गाजवू शकता हा विचार चुकीचा आहे. तुम्ही माध्यम होता त्यांच्या जन्माचं! मात्र त्यांना त्यांचं अस्तित्व आणि विचार आहेत ही बाब नक्की लक्षात घ्यायला हवी.
👉 आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. हा सुद्धा संवादाचा एक भाग आहे, हे समजून घ्या.
📌 तुम्ही पालक आहात म्हणजे तुम्ही केवळ मुलांना चुका दाखवणे किंवा त्यांना उपदेश करणे अपेक्षित नसते. त्यांना समजून घेणे, वेळप्रसंगी त्यांच्या विश्वात रममाण होणे देखील तुम्हाला जमायला हवे. मुलांचे भावविश्व तुमच्याभोवती फिरत असते, हे लक्षात ठेवून त्यांना प्रेमळपणे वागवणे महत्वाचे आहे. त्यांचे मित्र बनून राहा. त्यांना तुमच्याशी बोलताना कोणत्याही प्रकारची अडचण वाटणार नाही, याची काळजी तुम्हीच घ्यायला हवी.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤦🏻♀ लठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण
LetsUp । Health
लठ्ठपणा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही खास उपाय
👉 पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
💁♀ दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
🍃 पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
🧐 वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.
▪आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
🚶♀ दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही किलोमीटर अंतर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. रात्री जेवणात पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या.
🎯 वजन कमी करण्यासाठी : वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
👍 दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
🌷 सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 153 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :
● जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग : 30
● जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग : 123
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
💸 फी : खुला प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्गीय: ₹300/-)
👍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001
🗓 अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 25 सप्टेंबर 2019
🌐 अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2lYd6m0
🗞 जाहिरात पहा :
● पद क्रमांक 1 : http://bit.ly/2lEZNXJ
● पद क्रमांक 2 : http://bit.ly/2k8Rd2S
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● आता काेणत्याही बँकेचे ग्राहक भारतीय पाेस्ट पेमेंट बँकेतून (आयपीपीबी) पैसे काढू शकतील
● चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 18 सरकारी बँकांत 31,898.63 काेटी रुपयांचा घोटाळा
● शीखविरोधी दंगलप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता
● ब्रिटिश एअरवेजच्या वैमानिकांनी पगारवाढीसाठी पुकारला संप, मुंबई-लंडन प्रवाशांना फटका बसणार
● एमपीएससीने 377 पदांसाठी घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर
● विद्यमान राज्य सरकारने कार्यकाळातील अखेरच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल 37 महत्त्वाचे निर्णय घेतले
● युतीचा फॉर्म्युला आठवड्याभरात स्पष्ट होईल, कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार : चंद्रकांत पाटील
● अॅपल कंपनी आज (दि.10) मंगळवारी एका कार्यक्रमाद्वारे अॅपल आयफाेन बाजारात आणणार
● माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी
● 'छिछोरे' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस, बॉक्स ऑफिसवर पहिल्या 3 दिवसांतच 35 कोटी रुपयांची कमाई
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ ऐतिहासिक! चांद्रयान-2'चं लँडिंग आज मध्यरात्री
LetsUp | National
📍 इस्रोची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहे.
👉 उद्या दि. 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहे.
👍 इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.
🚀 चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले चांद्रयान शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
🧐 यानाचे लँडिंग झाल्यावर 2 तासांनी म्हणजे 5.30 ते 6.30 च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी चित्तथरारक असणार आहे.
💪 यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर जगातील चौथा देश बनेल, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल
👀 'या' ठिकाणी लाईव्ह पहा :
● इस्रोच्या अधिकृत वेबसाईट https://www.isro.gov.in/ वरून याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
● 'प्रेस इन्फर्मेशन ब्युरो'तर्फे (PIB) युट्युबवर या घटनेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी PIB च्या या युट्युब चॅनेलला भेट द्या.
● तसेच हॉटस्टारवर तुम्हाला लाईव्ह पाहता येईल.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च; जाणून घ्या सर्वकाही!
LetsUp | Tech
रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर अखेर लॉन्च झाली. याअंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. आता जवळपास 1600 शहरांमध्ये ही ब्रॉडब्रॅंड इंटरनेट सेवा सोबत डीटीएच सेवा सुद्धा उपलब्ध होणार आहे.
📍 असे आहेत प्लॅन :
दरमहा प्लॅन किंमत/ स्पीड/ FUP अंतर्गत डेटा+मोफत डेटा
1) ब्राँझ प्लॅन : 699 रूपये/ 100Mbps/ 100GB+50GB
2) सिल्व्हर प्लॅन : 849 रूपये/ 100Mbps/ 200GB+200GB
3) गोल्ड प्लॅन : 1,299 रूपये/ 250Mbps/ 500GB+250GB
4) डायमंड प्लॅन : 2,499 रूपये/ 500Mbps/1250GB+250GB
5) प्लॅटीनम प्लॅन : 3,999 रूपये/ 1Gbps/2500GB
6) टायटॅनियम प्लॅन : 8,499 रूपये/ 1Gbps/5000GB
👉 टीप : अतिरिक्त मोफत डेटा सहा महिनेच मिळणार आहे.
🎯 ठळक वैशिट्ये :
1) सर्वच प्लॅन्ससोबत फ्री व्हॉईस देण्यात आले आहेत. याद्वारे भारतात कोठेही मोफत कॉल्स करता येतील.
2) या सेवेसाठी जिओचे JioCall हे अॅप वापरता येईल.
3) टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग या सेवा असतील. व्हिडिओ कॉलिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 रुपये, गेमिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 (झेरो लेटन्सी नेटसाठी), डिव्हाईस सेक्युरिटी सेवा वार्षिक 999 रुपयात उपलब्ध असेल.
4) होम नेटवर्किंग घरातील विविध खोल्यांमध्ये वायफाय मेश तयार करून इंटरनेट पुरवता येईल.
फोटो, म्युझिक, व्हिडिओ शेयर करण्यासाठी सेवा उपलब्ध!
5) सुरक्षेसाठी Safety & Surveillance Solution उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामध्ये डोर कॅमेरा, CCTV, बाळांकडे लक्ष ठेवण्यासाठी बेबी मॉनिटरचा समावेश.
6) आभासी जगाची सफर घरबसल्या करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटचा समावेश थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव.
7) जिओ होम गेटवे हा राऊटर असेल जो जिओ फायबरद्वारे वायफाय मार्फत सेवा पुरवेल.
💁♂ जाणून घ्या सेवेची किंमत :
✔ हि सेवा घेण्यासाठी तुम्हाला 2,500 रुपये डिपॉजिट भरायचे आहे (हे एकदाच द्यावं लागेल) यामधील 1,500 रुपये परत मिळू शकतील तर उर्वरित 1,000 रुपये इंस्टॉलेशन चार्ज असेल.
✔ जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत जिओ होम गेटवे, 4K Jio Set Top Box मोफत मिळेल.
✔ एक टीव्ही (गोल्ड आणि पुढील प्लॅन्समध्ये म्हणजे दरमहा 1,299 आणि त्यापुढील प्लॅन्स) मिळेल. सोबत OTT सेवांद्वारे चित्रपट, मालिका, गाणी मोफत पाहता येतील.
1. गोल्ड प्लॅन : 1 वर्षासाठी घेतल्यास Muse 2 Bluetooth speaker मिळेल. 2 वर्षांसाठी घेतला तर 24 इंची एचडी टीव्ही मिळेल.
2. सिल्व्हर प्लॅन : वर्षासाठी घेतल्यास Thump 2 Bluetooth speakers मिळतील.
3. डायमंड प्लॅन : वर्षासाठी घेतल्यास 24 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
4. प्लॅटिनम प्लॅन्स : वर्षासाठी घेतल्यास 32 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
5. टायटॅनियम प्लॅन : वर्षासाठी घेतल्यास 43 इंची 4K टीव्ही मोफत मिळेल!
🤔 नोंदणी कशी कराल? :
● www.jio.com वर जा किंवा MyJio अॅप घ्या. JioFiber सेवेसाठी नोंदणी करा.
● तुमचा पत्ता, नाव, मोबाईल क्रमांक विचारला जाईल.
● जर तुमच्या भागात जिओ फायबर सेवा असेल तर त्यांचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल पुढील प्रक्रिया त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल.
● दरमहा/ चौमाही/ वार्षिक अशा कोणत्याही प्लॅन्सने रीचार्ज केल्यास ग्राहकांना सेट टॉप बॉक्स देण्यात येईल.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 *LetsUp News Updates*
● 'चांद्रयान-2' मोहीम आता अंतिम टप्प्यात, त्यामुळे चंद्र आता अवघ्या काही पावलांवर आला आहे
● भारताकडून रशियाला एक अब्ज अमेरिकी डॉलर कर्ज स्वरूपात देण्यात येतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी
● INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना कोर्टाचा दिलासा नाही, 19 सप्टेंबरपर्यंत तिहार जेलमध्ये रवानगी
● कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींना समन्स, 4 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश
● ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉनसन यांच्या भावाचा मंत्रिपदाचा आणि खासदारपदाचा राजीनामा
● प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक नाटककार किरण नगरकर (77 वर्ष) यांचे निधन
● रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च, विविध प्लॅन्स आणि ऑफर जाहीर
● Pro Kabaddi 7 : यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यातील रोमहर्षक सामना बरोबरीत (33-33) सुटला
● विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा : सलामीच्या लढतीत भारत ओमानकडून (1-2) पराभूत
● बॉलिवूडचे महानायक मराठीत दिसणार, त्यांचा आगामी चित्रपट 'एबी आणि सीडी'चं पोस्टर रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019
LetsUp । Job
💁♂ विभागाचे नाव : पोलीस विभाग
👍 पद व संख्या : पोलीस शिपाई - 3,450
🔎 वेतनश्रेणी : 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे - 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
🎓 शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
🎯 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
🧐 वयाची अट : 18 ते 28 (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्ष)
💰 शुल्क : खुला गट - ₹450/- (आरक्षित जागा : ₹350/-)
📅 अंतिम मुदत : 23 सप्टेंबर 2019
🗞 अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2lDvTCS
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😍 खुशखबर! होमलोन होणार स्वस्त
LetsUp I National
📣 RBIने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे दिले आदेश
💁♂ त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार, कारण RBI जेव्हा जेव्हा रेपो रेट कमी करेल तेव्हा तेव्हा बँकांना व्याजदर कमी करावा लागणार
✔ त्यामुळे ग्राहकांच्या कर्जांवरील व्याजदर आपोआप कमी होणार असल्याने त्यांना कर्जाचा हप्ता कमी बसणार
📍 महत्वाचे :
● दसरा-दिवाळी सारख्या सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार
● गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार
● तसेच कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार
👀 सक्तीचा बडगा : प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर RBIने उगारला सक्तीचा बडगा
💫 ICICI बँकेकडून कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर, बँकेने कर्जावरील व्याजासह ठेवींवरील व्याजदरही 0.10 टक्के प्रमाणात केले कमी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● RBIने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे दिले आदेश
● भारत-रशिया यांच्यात 15 करार, यात क्षेपणास्त्र प्रणाली शक्तिशाली करण्यासंबंधी कराराचा समावेश
● चांद्रयान-2चे लँडर विक्रमची कक्षा दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या बदलली, हे लँडर आता चंद्राच्या अगदी जवळ
● कर्नाटकातील काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ, 13 सप्टेंबरपर्यंत ईडीच्या रिमांडवर
● महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी आज (दि.5) गुरुवारी पार पडणार
● विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे 10 लाख मतदारांची वाढ : निवडणूक आयोग
● देशातील सर्वात मोठी कंपनी असलेली मारुती सुझुकी हरियाणातील आपले प्लँट दोन दिवस बंद ठेवणार
● विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आज गुरुवारी (दि.5) ओमानविरुद्ध होणार
● मिसबा-उल-हककडे पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीप्रमुख पदाची जबाबदारी
● बहुचर्चित ‘साहो’ चित्रपटाने पाचव्या दिवशी तब्बल 350 कोटी रुपयांचा आकडा आकडा केला पार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🌧 राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार
LetsUp । Update
⚡ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण
💁♂ येत्या 8 सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज
👍 आगामी 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार, मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये; हवामान खात्याने दिला इशारा
🧐 हवामान खात्याचा अंदाज काय? :
● राज्याच्या विविध भागात आठवडाभर संततधार पाऊस सुरू राहणार
● पुढील 24 ते 48 तासांत मध्य महाराष्ट्रात (जळगाव, नाशिक आणि मालेगाव) मध्यम पावसाची शक्यता
● पुण्यात हलका पाऊस राहील. मराठवाड्यातील काही भागांत मध्यम सरींची शक्यता
● त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे पाऊस पडतच राहील
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● चांद्रयान-2 : लँडर विक्रम चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले, शनिवारी (दि.7 ) ते चांद्रभूमीवर उतरणार
● आयएनएक्स मीडिया प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम 5 सप्टेंबरपर्यंत CBIच्या ताब्यातच राहणार
● IDBI तोट्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून 9 हजार कोटींचे बेलआउट पॅकेज मंजूर
● आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून अटक
● तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताकडून जीवनावश्यक औषधांच्या आयतीसाठी दिली मंजूरी
● भाजपच्या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुती 229 जागा जिंकणार असल्याचा अंदाज
● जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी 7 नवीन समिती कार्यालये स्थापन
● Nokia 8.1 (4GB) या स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीत एकूण 11 हजार रुपयांची कपात
● कसोटी क्रमवारी : फलंदाजीत विराट कोहली दुसऱ्या तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी
● संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी आपल्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचे पोस्टर केले प्रसिद्ध
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🕺 हॅपी बर्थडे ‘किंग ऑफ पॉप’
LetsUp | Special
सर्व जगाला वेड लावून गेलेला तसेच आपल्या नृत्य आविष्काराने सर्व जगाला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या मायकल जॅक्सनचा आज जन्मदिवस.
📍 मायकल जॅक्सन म्हणजे :
● अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक, अभिनेता आणि 'पॉपचा राजा' .
● खऱ्या अर्थाने पॉप संगीत सामान्य जनतेपर्यंत घराघरात पोहचवणारा स्टार.
● 'थ्रीलर', 'बॅड', 'डेंजरस' या यशाची उच्चतम पातळी गाठणार्या पॉप अल्बमसचा निर्माता आणि सर्वेसर्वा.
● संगीत क्षेत्राची मानाचा "ग्रॅमी" अॅवॉर्ड तब्बल 13 वेळा जिंकणारा एकमेव कलाकार.
● गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पासून ते "ग्रॅमी" अॅवॉर्ड पर्यंत जवळपास 400 अॅवॉर्डचा धनी.
💁♂ सुरुवात आणि प्रसिद्धी :
● त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेतील इंडियन प्रांतातील छोट्याशा शहरात झाला होता.
● 1964 साली ते आपल्या 6 भावांच्या ‘जॅक्सन-5’ या बँड ग्रुमध्ये सामील झाले व त्यांच्या संगीताचा प्रवास सुरु झाला.
● साधारणतः 80 च्या दशकात मायकल यांनी संगीत जगतात आपली एक वेगळी ओळख बनवली.
● त्यांच्या गाण्याचे ‘बिट इन’, ‘बेले जीन’ आणि ‘थ्रिलर’ हे अल्बम 1982 साली रिलीज झाले व त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली.
👍 अनेक जागतिक विक्रम :
● 90च्या दशकात त्यांचे ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ आणि ‘स्क्रीम’ने हे अल्बम गाजले.
● ‘थ्रिलर’ या अल्बमच्या जगभरात जवळपास 65 लाख प्रति विकल्या गेल्या आहेत. व ते संगीतातील ‘किंग ऑफ पॉप’ बनले.
● ‘रॉक अॅण्ड रोल हॉल’च्या फेम मध्ये मायकल जॅक्सन दोनदा सामील झाले आहेत.
😇 चर्चित वैयक्तिक आयुष्य :
● मायकल जॅक्सन यांचे गाण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यही खूप जास्त चर्चेत राहिले.
● त्यांनी आपल्या 30 वर्षातील करियरमध्ये तब्बल 100 कॉस्मेटिक सर्जरी केल्या.
● त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा आरोपही लागला होता. शिवाय ते ड्रग्सच्या आधीन गेले होते.
● 25 जून 2009 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी मायकल जॅक्सन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👨⚕ डॉक्टर निळ्या/हिरव्या रंगाचाच युनिफॉर्म का घालतात?
LetsUp | Do U Know
जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो, पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत विशिष्ट रंगाचं कनेक्शन आहे दिसतं. जर आपण बारकाईने लक्ष दिले तर जाणवेल डॉक्टर बहुदा सफेद, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. त्यांच्या या रंगांच्या युनिफॉर्ममागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.
1) सफेद रंग : हा रंग शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक आहे. यामुळे विविध प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ नये. शांत वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात.
2) हिरवा/ निळा रंग : 1914 साली एका डॉक्टरने सफेद रंगाच्या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले.
📝 'टूडे सर्जिकल नर्स' (1998) या वैद्यकिय अहवालावर आधारित एका लेखात याबाबत सांगण्यात आले आहे.
● हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले.
● जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते.
● वैद्यानिक दृष्टीकोणातून विचार करता आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत.
● ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही.
वरील सर्व कारणांचा विचार करून हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर पसंत करतात.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
