uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 737 підписників, посідаючи 5 619 місце в категорії Освіта та 12 029 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 737 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -8, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 15.91%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.84% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 369 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 282 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 737
Підписники
-1324 години
-127 днів
-830 день
Архів дописів
🟪 मोदी सरकारचा मोठा निर्णय… Anti-India ठपका ठेवत २० YouTube Channels वर घातली बंदी. भारताने सोमवारी २० युट्यूब चॅनेल्स आणि दोन वेबसाईटवर बंदी घातली आहे. भारतविरोधी प्रचार करणारी ही चॅनेल्स आणि वेबसाईट्स पाकिस्तानमधून हाताळल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुधारित माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील बदलांनुसार हा बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं इकॉनमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यूट्यूब आणि टेलिकॉम विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये देशाच्या एकतेला आणि सर्वभौमत्वाला धोका पोहचवणारा कंटेंट आणि अशा माध्यमांना तातडीने ब्लॉक करण्यात यावं असे आदेश दिले होते. या प्रकरणाशीसंबधित सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा खुलासा केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने इंटरनेटवरुन भारताविरोधी प्रचारकी साहित्याचं प्रसारण केलं जात होतं. अशापद्धतीने चुकीची माहिती पसरवणाऱ्या गटांपैकी एका गटाचं नाव ‘नया पाकिस्तान’ असं असल्याचं माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या युट्यूब चॅनेलला दोन मिलियन सबस्क्रायबर आहेत. काश्मीर, शेतकरी आंदोलन, अयोध्या प्रकरण यासारख्या गोष्टींबद्दल या चॅनेलवरुन खोटी माहिती दिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हेच कारण देत या चॅनेलवर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.

🟪‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021 ‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, परराष्ट्र मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (DARPG) याच्या पुढाकाराने 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2021 या काळात देशात ‘सुशासन सप्ताह’ पाळण्यात येत आहे. सुशासन सप्ताहानिमित्त उत्तम प्रशासनाच्या कार्यपद्धती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी 'प्रशासन गांव की ओर' अर्थात 'प्रशासन चालले गावांकडे' या मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणु-ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 20 डिसेंबर 2021 रोजी झाला. 'प्रशासन गांव की ओर' या मोहिमेद्वारे, सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सेवा प्रदान करण्यात सुधारणा करण्यासाठी सर्व जिल्हे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक राष्ट्रीय चळवळ चालवली जाणार आहे. सातशेपेक्षा अधिक जिल्हाधिकारी 'प्रशासन गांव की ओर' उपक्रमात सहभागी होतील आणि आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात तहसील / पंचायत समितीच्या मुख्यालयांना भेटी देतील. लोकांच्या तक्रारींचे वेळेवर निवारण व्हावे आणि त्यांना सेवा प्रदान करण्याची पद्धत अधिक सुधारावी, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.

📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना📚 🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला? - चंपारण्य 🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले? - अहमदाबाद गिरणी लढा 🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला? - खेडा सत्याग्रह 🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला? - असहकार चळवळ 🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला? - 1906 रोजी नाताळ येथे 🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली? - यंग इंडिया 🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला? - साबरमती 🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते? - 1924 चे बेळगाव अधिवेशन 🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले? - सविनय कायदेभंग चळवळ 🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले? - अवंतिकाबाई

👍 Pdf मध्ये या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे ज्यामध्ये पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त सामान्य अध्ययन या विषयाच्या प्रश्न
👍 Pdf मध्ये या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे ज्यामध्ये पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त सामान्य अध्ययन या विषयाच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यात आले आहे या मधून मराठी व इंग्रजी व्याकरण तसेच इतर सामायीक विषय वगळण्यात आलेले आहे सदरील विषय मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे.

#Preliminary #पुर्व परीक्षा 👍 अत्यंत आनंदाची बातमी...... 🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे. 🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे. ❗️दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ❗️कर सहाय्यक ❗️लिपिक टंकलेखक 👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा!!!👌👌👌

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪प्रदीप कुमार रावत भारताचे चीनमधील नवे राजदूत. 🔘ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विक्रम मिस्री यांची जागा घेणार आहेत. 🔘भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९९० सालच्या तुकडीचे अधिकारी असलेले रावत हे सध्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ‘ते नव्या नियुक्तीची सूत्रे लवकरच स्वीकारतील,’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात सांगितले. 🔘पूर्व लडाखच्या सीमेवरील तिढा रेंगाळत असतानाच रावत यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या काळात ते इंडोनेशिया व तिमोर-लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते. ते चीनमधील मँडरीन भाषा अस्खलितपणे बोलू शकतात.

🟪DRDO संस्थेद्वारे नियंत्रित हवाई वितरण प्रणालीच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन. 🌼संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) संस्थेची एक प्रयोगशाळा असलेल्या आग्रा येथील हवाई वितरण संशोधन आणि विकास आस्थापना (ADRDE) या संस्थेने 500 किलोग्राम वहन क्षमता असलेल्या नियंत्रित हवाई वितरण प्रणाली (CADS-500) याच्या उड्डाण्णांचे प्रात्यक्षिक 18 डिसेंबर 2021 रोजी आयोजित केले होते. 🌼भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्याच्या दिशेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या मालिकेचा एक भाग म्हणून ही उड्डाणांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. 🌼ड्रॉप झोन, मालपुरा येथे 5000 मीटर उंचीवरून प्रणालीच्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. AN32 विमानातून पॅरा-ड्रॉप प्रणाली सोडण्यात आली आणि नंतर स्वायत्त मोडमध्ये पूर्वनिश्चित स्थानावर नेण्यात आली. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या अकरा पॅराट्रूपर्सनी CADS - 500 चा हवेत पाठलाग केला आणि ते एकाच वेळी जमिनीवर उतरले. 🌺CADS-500 प्रणाली विषयी... 🌼CADS-500 प्रणालीचा वापर राम एअर पॅराशूट (RAP) याच्या सहज वळवता येण्याजोग्या क्षमतांचा वापर करून पूर्वनिर्धारित ठिकाणी 500 किलोग्राम पर्यंतच्या वजनी वस्तूंचे अचूक वितरण करण्यासाठी केला जातो. 🌼उड्डाणादरम्यान ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम वापरून दिशा निर्देशांक, उंची आणि हेडिंग सेन्सर यांचे समायोजन करत लक्ष्य स्थानाची माहिती निश्चित केली जाते. कॅड्स, त्याच्या ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक्स युनिटसह, कार्यप्रणालीद्वारे लक्ष्य स्थानाकडे वेपॉईंट नेव्हिगेशन वापरून स्वायत्तपणे उड्डाण मार्गावर चालू शकते.

🟪आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या संघटनेला ‘निरीक्षक’ दर्जा देण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा निर्णय 👁‍🗨आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या संघटनेला ‘निरीक्षक’ दर्जा देण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या संघटनेला ‘निरीक्षक’ दर्जा प्रदान केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे “एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड” या संकल्पनेला चालना मिळणार आहे. 👁‍🗨आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या संघटनेला ‘निरीक्षक’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे समन्यायी ऊर्जा उपायांसाठी जागतिक स्तरावर सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे. 🟠आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी.. 👁‍🗨2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. 👁‍🗨ही 121 देशांच्या सरकारांची एक आंतरराष्ट्रीय युती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. 👁‍🗨भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. 👁‍🗨 ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.

🟪‘लोकपालऑनलाइन’: तक्रार व्यवस्थापनासाठीचे डिजिटल मंच. ◼️भारतीय लोकपालचे अध्यक्ष, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांनी 13 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे 'लोकपालऑनलाइन' नावाच्या तक्रारींच्या व्यवस्थापनासाठीच्या डिजिटल मंचाचे उद्घाटन केले. ◼️या मंचाचा वापर करून देशातील सर्व नागरिक कुठूनही, कधीही ‘http://lokpalonline.gov.in’ या संकेतस्थळावर तक्रारी नोंदवू शकतात. ◼️हा मंच “लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ अन्वये दाखल करण्यात येणाऱ्या लोकसेवकांविरुद्धच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी ही एक डिजिटल उपाययोजना आहे. लोकपालऑनलाइन ही संकेतस्थळ-आधारित सुविधा आहे, जी सर्व हितधारकांच्या फायद्यांसह जबाबदार, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने तक्रारींचा निपटारा करते. 🟡मंचाची वैशिष्ट्ये... ◼️तक्रारदारास प्रत्येक टप्प्यावर ई-मेल आणि एसएमएस याद्वारे तक्रारीवरील कारवाईची माहिती मिळणार. ◼️तक्रारकर्त्याला कधीही तक्रारीची सद्यस्थिती तपासण्याची सुविधा आहे. ◼️तक्रारीची ओळख गोपनीय ठेवली जाते CVC, CBI आणि इतर चौकशी संस्था त्यांचे अहवाल थेट ‘लोकपालऑनलाइन’ मंचावर अपलोड करू शकतात. ◼️चौकशी संस्थांना ई-मेल आणि एसएमएस याद्वारे स्मरणपत्रे मिळणार.आवश्यकतेनुसार विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे.

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

🔲 आमचे मित्र, मार्गदर्शक, आपल्या सिम्प्लिफाईड परिवारातील 'अभिजित थोरबोले' सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!✌️💐👍✌️💐👍 🤝वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांसह आपल्या www.simplifiedcart.com वर उपलब्ध इतर सर्व प्रकाशनाची पुस्तके भरगोस सवलतीत उपलब्ध! » Up To 50% Off » Door | Home Delivery Available » Fast Delivery Available » Offer Only 21 | 22 December 2021 » प्रत्येक Order वर चालू घडामोडी प्रश्नसंच मोफत » Contact : 8788639688 | 9423333181 👇Online Booking Available👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

आयोगामार्फत दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

photo content

5_6199269174145975236.pdf

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🔲 आमचे मित्र, मार्गदर्शक, आपल्या सिम्प्लिफाईड परिवारातील 'अभिजित थोरबोले' सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!✌️💐👍✌️💐👍 🤝वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांसह आपल्या www.simplifiedcart.com वर उपलब्ध इतर सर्व प्रकाशनाची पुस्तके भरगोस सवलतीत उपलब्ध! » Up To 50% Off » Door | Home Delivery Available » Fast Delivery Available » Offer Only 21 | 22 December 2021 » प्रत्येक Order वर चालू घडामोडी प्रश्नसंच मोफत » Contact : 8788639688 | 9423333181 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+8