uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 711 підписників, посідаючи 5 599 місце в категорії Освіта та 11 969 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 711 підписників.

За останніми даними від 10 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -87, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.98%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.78% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 364 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 275 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 11 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 711
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-8730 день
Архів дописів
🟪म्युकरमायकोसिस आजारावरच्या औषधाचं उत्पादन भारत सरकार वाढवणार! देशातल्या अनेक ठिकाणी सध्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजार बळावत चालला आहे. करोनातून बरे झालेल्या किंवा बरे होत असणाऱ्या रुग्णांना हा आजार होत असल्याचं कळत आहे. या आजाराच्या उपचारासाठी सध्या ‘अॅम्फोटेरीसीन-बी’ हे औषध डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधून या औषधाची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन आता भारत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या औषधाची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने या औषधाच्या आयातीवर आणि देशातली निर्मिती वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातले आयातदार आणि औषध उत्पादकांसोबत चर्चा करुन या औषधाच्या साठ्याचा आणि मागणीचा काल आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांची मागणी लक्षात घेऊन १० मेपासून ३१ मेपर्यंत औषधांचा पुरवठा केला जाईल. राज्यांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयातल्या ह्या औषधाच्या वाटपासाठी यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. ▪️कसा होतो म्युकरमायकोसिस? करोनाची लागण झालेल्या रुग्णांतील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातच रुग्णांना मधुमेह किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार असतील तर त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या आजारात नाकाच्या बाजूला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत (सायनस) या बुरशीची वाढ होते व त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ही बुरशी वेगाने वाढते व पुढे रक्तवाहिन्यांमध्ये शिरून रक्तप्रवाहात अडथळा आणते. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून घेतली आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन होती येत आहे.

Video from Dr.Ajit Prakash Thorbole

photo content

photo content
+9

photo content
+9

🟪PREVIOUS YEAR QUESTION ANALYSIS |MPSC|PSI|STI|ASO| ExciSI |CL-Ty |TaxAsst प्रश्नपत्रिका विश्लेषण https://youtu.be/JxFAT6jvJ3Q

━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.si
━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________

श्श्र🛑भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) याला ICCचा "ग्रीन ऊर्जा पुरस्कार" मिळाला. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था मर्यादित (IREDA) या संस्थेला "ग्रीन ऊर्जा पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) यांच्यावतीने प्रदान करण्यात आला आहे. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) अक्षय ऊर्जेच्या संदर्भात प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी आघाडीची सार्वजनिक संस्था आहे. त्याच्या निर्णायक भूमिकेसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था मर्यादित (IREDA) विषयी भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था मर्यादित (IREDA) ही एक मिनी-रत्न (श्रेणी-1) कंपनी आहे. भारत सरकारच्या नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली एक सार्वजनिक कंपनी आहे. संस्थेची स्थापना 1987 साली अ-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून झाली.

🔄पंतप्रधानांचा जी-७ दौरा रद्द देशात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी जाणार नसल्याचे मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ ते १३ जून या कालावधीत जी-७ देशांची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदी यांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रण दिले होते. मात्र करोना स्थितीमुळे मोदी जी-७ परिषदेसाठी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.

🛑लघुग्रहाचे अवशेष घेऊन वृत्तसंस्था, केप कॅनव्हरॉल नासाने पाठवलेल्या एका अवकाशयानात लघुग्रहाचे अवशेष अडकले असून हे यान आता सोमवारी पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला निघाले आहेत. अवकाशातील प्राचीन खडकांचा या अवशेषात समावेश आहे असे मागच्या आरशातून दिसत आहे. रोबोट स्वरूपाचे हे यान ओसीरिस रेक्स नावाचे असून त्याला पृथ्वीकडे परतण्यास दोन वर्षे लागणार आहेत. अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे लॉरेटा यांनी सांगितले की, अवकाशयानात अर्धा पौंड व १ पौंड म्हणजे २०० ते ४०० ग्रॅम अवशेष असून ते खडकांचे छोटे तुकडे आहेत. एकूण २ औंस म्हणजे साठ ग्रॅम अवशेष आणण्याचे उद्दिष्ट होते ते पूर्ण करण्यात आले आहे. यापूर्वी अपोलो यानाने चंद्रावरून खडक आणले होते. त्यानंतर प्रथमच सर्वात मोठ्या प्रमाणात अवकाशातील अवशेष हे पृथ्वीवर आणण्यात येत आहेत. धुमेकतूतील धूळ व सौर वाऱ्यांचे काही नमुने नासाने यापूर्वी आणले होते. जपानने अशी उद्दिष्टे दोनदा पार केली आहेत. सोमवारी जे यान निघाले आहे ते बेन्नू या लघुग्रहाजवळून निघाले आहे. नासाचे प्रकल्प वैज्ञानिक जॅसन डोर्किन यांनी सांगितले की, लघुग्रहावरील अवशेष परत येत आहेत. त्यासाठी बराच कालावधी लागला असून हा प्रवास खूप मोठा आहे. हे यान काही वर्षांपूर्वी पाठवण्यात आले आहे, त्यावेळी माझी मुलगी लहान होती. आता ती पदवी घेण्याच्या तयारीत आहे. बेन्नू लघुग्रहावरील नमुने व काही छायाचित्रे परत आणली जात असून ओसिरीस रेक्स हे यान बेन्नूपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. बेन्नू हा लघुग्रह सूर्याभोवती फिरत आहे. सोमवारी दुपारी त्याचे मुख्य इंजिन प्रज्वलित करण्यात आले होते. लॉकहीड मार्टिन कंपनीने हे यान तयार केले होते. त्यांनी अवकाशयान परत येत असल्याचे स्वागत केले आहे.

▶️द्रवरुप ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या समस्येवर इलाज काढण्यासाठी इंधन आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम प्रयत्नशील. अतिरिक्त आयएसओ कंटेनर्स व सिलेंडर्सच्या खरेदीची मागणी नोंदवली औद्योगिक क्षेत्रातील नागरीकत्व जबाबदारी निभावत भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम दुसऱ्या कोविड 19 महामारीच्या लाटेशी सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. या संदर्भात, ते प्रामुख्याने द्रवरुप ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या प्रश्नावर काम करत आहेत

💉💊🩺आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन: 12 मे. दरवर्षी 12 मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून पाळला जातो. परिचारिकांनी समाजात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. 2021 साली हा दिन "नर्सेस: ए व्हॉईस टू लीड – ए व्हिजन फॉर फ्युचर हेल्थकेअर" या संकल्पनेखाली पाळला गेला. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. कोविड-19 महामारीच्या संकटकाळातही परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 💉पार्श्वभूमी. 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते. फ्लोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे. 1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली. या दिवशी भारत सरकारतर्फे फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिला जातो. 50,000 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🌆इव्हरमेक्टिन औषधाबाबत आरोग्य संघटनेचा इशारा करोना संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट वापरण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी धोक्याचा इशारा दिला आहे. इव्हरमेक्टिन हे तोंडावाटे देण्याचे औषध असून परोपजीवी जंतूंना अटकाव करणारे ते करोनावर वापरण्यात येत आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, करोनावर उपचार करताना सुरक्षितता व परिणामकारकता महत्त्वाची आहे. कोविड १९ विषाणू संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट वापरणे योग्य नाही. या औषधाची निर्मिती करणाऱ्या एमएसडी व मर्क या कंपन्यांनाही याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. इव्हरमेक्टिनचा करोना १९ विषाणू संसर्गावर वापर करताना त्याबाबत झालेले अभ्यास विचारात घेणे आवश्यक आहे. आतापर्यंतच्या विश्लेषणानुसार या औषधाचा करोनावर उपयोग होत असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. शिवाय सुरक्षिततेबाबतच्या माहितीचाही अभाव आहे. इव्हरमेक्टिन या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा देण्याची दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले होते की, या औषधाने रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत. गोवा सरकारने करोनावर इव्हरमेक्टीन औषधाच्या वापरास प्रतिबंधात्मक औषध म्हणून मंजुरी दिली असून प्रौढांमध्ये हे औषध वापरण्यास सांगितले आहे.

🟪विश्वचषकाच्या संघसंख्येत वाढ करोना साथीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्याबरोबरच बिगरनामांकित संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १० ऐवजी १४ संघांचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे ‘आयसीसी’लासुद्धा आर्थिक हानीला सामोरे जावे लागले. त्याशिवाय ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतही अद्याप साशंकता कायम आहे. २०१९मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात फक्त १० संघांचाच समावेश करण्यात आला. त्यामुळे झिम्बाब्वे, आयर्लंड, नेदरलँड्स या संघांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे या देशांतील क्रिकेटला पुन्हा उभारी देण्यासाठी ‘आयसीसी’ पाऊल उचलणार आहे. सध्याची स्थिती पाहता २०२३मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकातच ‘आयसीसी’ला अधिक संघ खेळवता आले असते. परंतु इतक्या कमी कालावधीत संपूर्ण स्पधेची रूपरेखा नव्याने आखणे कठीण असल्यामुळे त्यानंतरच्या म्हणजेच २०२७च्या विश्वचषकात १० ऐवजी १४ संघ खेळवण्याचा विचार ‘आयसीसी’ करत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ‘आयसीसी’च्या बैठकीदरम्यान याविषयी अंतिम निर्णय घेतला जाण्याचे अपेक्षित आहे. २००७, २०११, २०१५च्या विश्वचषकात १४ संघांचा समावेश करून त्यांना दोन गटांत विभागण्यात आले होते.

🟪भारतीय रेल्वेकडून ऑक्सिजन एक्स्प्रेस मिळणारे नववे राज्य ठरणार उत्तराखंड. ऑक्सिजन एक्स्प्रेसने कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात पोहोचविला 5735 मेट्रिक टनापेक्षा अधिक ऑक्सिजन विविध राज्यांना 375 टँकर लोडपेक्षा अधिक प्राणवायूचा पुरवठा 90 हून अधिक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास केला पूर्ण 120 मेट्रिक टन प्राणवायू घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री होणार उत्तराखंडमध्ये दाखल 50 मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायू घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज होणार पुण्यामध्ये दाखल बेंगळुरूला 120 मेट्रिक टन प्राणवायू प्राप्त आजवर महाराष्ट्राला 293 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशाला सुमारे 1630, मध्यप्रदेशला 340, हरयाणाला 812, तेलंगणाला 123, राजस्थानला 40, कर्नाटकला 120 आणि दिल्लीला 2383 मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायूचा पुरवठा

🟪भारतीय नौदलाची कोची आणि ताबर ही जहाजे महत्त्वपूर्ण वैद्यकीय साधनसामग्री घेऊन न्यू मेंगलोर बंदरात दाखल. कोविड मदतीसाठी सुरु केलेल्या समुद्रसेतू-II अभियानाला नव्या उंचीवर पोहोचवत भारतीय नौदलाची आणखी दोन जहाजे - आयएनएस कोची आणि आयएनएस ताबर दि. 11 मे 21 रोजी, महत्त्वपूर्ण वैद्यकीय साधनसामग्रीसह न्यू मेंगलोर बंदरात दाखल झाली. एकूण पाच कंटेनर्समध्ये 100 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणि 1200 ऑक्सिजन सिलेंडर घेऊन या दोन्ही जहाजांनी दि. 06 मे 21 रोजी कुवेतच्या बंदरातून भारतासाठी प्रस्थान ठेवले होते. आज आणलेली सामग्री, पुढील कार्यवाहीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

🟪रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमणूक हॉलीवूडमधील अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह २०२० सालचे ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्य़ातील परिटेवाडी या खेडय़ात प्राथमिक शिक्षक असलेले डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस १ अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता. याच पुरस्काराशी साधम्र्य साधणाऱ्या ५० हजार अमेरिकी डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे. अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे.