mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
428
Подписчики
Нет данных24 часа
+77 дней
+630 дней
Архив постов
भारतीय महिला क्रिकेटर (फलंदाज) स्मृती मानधना हिला BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
AIIMS दिल्लीने भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू केला🔥🔥🔥
भारतातील पहिला 'चेहरा प्रत्यारोपण' कार्यक्रम अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली संस्थेने सुरू केला आहे.
उद्योगासाठी पहिली 'AI लिव्हिंग लॅब' महाराष्ट्रात सुरू
देशातील पहिली 'AI लिव्हिंग लॅब' महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
#Updated Current Eco
केरळ हे अत्यंत गरिबी कमी करणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे, १ नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.
गरीबी निर्मूलनातील कुटुंबांकडे अन्न, आरोग्य, उपजीविका आणि निवास यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांना 'अत्यंत गरीब' मानले जाते.
यासाठी राज्य सरकारने 'अत्यंत गरिबी निर्मूलन' (EPEP) या विशेष योजनेची सुरुवात केली होती.
तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प काय आहे?
तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प हा उत्तर जम्मू आणि काश्मीरमधील झेलम नदीवरील वुलर सरोवराच्या बाहेर प्रस्तावित केलेला नेव्हिगेशन लॉक-सह-नियंत्रण संरचना (control structure) प्रकल्प आहे.
भारताने प्रथमच संयुक्त कार्यदल–१५४ (CTF-154) चे नेतृत्व स्वीकारले आहे.
त्याचे मुख्यालय कुठे स्थित आहे?
बहरीन / बहरीन
आर्क्टिक सेंट्री” हे मिशन आर्क्टिक प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या संस्थेने सुरू केले?
नाटो (NATO)
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ Soldierthon 2026 ची घोषणा कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने केली?
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
नैतिक आणि जबाबदार एआय वापरासाठी देशव्यापी डिजिटल मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताचा पहिला पाण्याखालील दुहेरी नळी (ट्विन-ट्यूब) रस्ता आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे?
ब्रह्मपुत्रा नदी
६वा भारत–फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे?
बंगळूरु
नवी दिल्लीत आयोजित करण्यात येत असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ ची थीम काय आहे?
“सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या आनंदासाठी.”
ऐतिहासिक! भारताचे आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू सतेंद्र सिंह लोहिया यांनी न्यूझीलंडमधील कुक सामुद्रधुनी — जगातील सर्वात कठीण खुल्या पाण्यातील पोहण्यांपैकी एक — यशस्वीरीत्या पार केली आहे.
२४ किमी | ९ तास २२ मिनिटे | १२ फेब्रुवारी २०२६
हा पराक्रम करणारे आशियातील पहिले पॅरा जलतरणपटू!
👉 GDP नवीन आधारभूत वर्ष : २०२२-२३
👉 मागील आधार वर्ष: २०११-१२
👉 प्रकाशन तारीख: २७ फेब्रुवारी २०२६
👉 विश्वनाथ गोल्डार समिती
👉केरळचे सर्वसमावेशक नागरी धोरण 2026
👉((केरळ ))हे भारतातील(( पहिले)) सर्वसमावेशक नागरी धोरण (Comprehensive Urban Policy) स्वीकारणारे राज्य ठरले .
👉स्वीकार:फेब्रुवारी 2026
👉मुख्य मुद्दे :
लक्ष्य : 2050 पर्यंत दीर्घकालीन शाश्वत शहरी विकासाचा रोडमॅप.
👉धोरण निर्मिती प्रक्रिया:
नोव्हेंबर 2023 मध्ये Kerala Urban Policy Commission स्थापना.
मार्च 2025 मध्ये अहवाल सादर.
सर्वाधिक तज्ञ प्राध्यापक तामिळनाडूमध्ये आहेत तसेच महाराष्ट्र आणि गुजरात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहे.
आयसीसी स्पर्धांमधील सलग सर्वाधिक विजय
ICC स्पर्धामध्ये सलग 16 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताने रचला
1] भारत : 16 सामने (टी-20 विश्वचषक (2024), चॅम्पियन्स ट्रॉफी (2025), टी-20 विश्वचषक (2026)
2] ऑस्ट्रेलिया : 15 सामने (चॅम्पियन्स ट्रॉफी 2006 ते विश्वचषक 2007)
भारताने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा ICC स्पर्धामधील सलग 15 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
दिल्लीत "AI समिट" ला सुरुवात
जगातील सर्वात मोठ्या 'AI समिट'ला दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.
AI बाबत (जागतिक शिखर परिषद)
AI इम्पॅक्ट समिट 2026
भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी 16 फेब्रुवारीपासून आयोजित केली आहे यामध्ये 45+ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
बांगलादेशात 'BNP' ची सत्ता
➡️ 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवला.
⭕️ जमात-ए-इस्लामी (68 जागा), बीएनपीचे मित्र पक्ष (3 जागा), तर इतर पक्षांना सहा जागा मिळाल्या आहेत. (दोन जागांचे निकाल राखीव आहेत).
तारिक रहमान घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांना शपथ देतील.
13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवला.
👉या शपथविधीला भारतातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व इतर प्रतिनिधी असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय गो-संस्कृती संग्रहालय मथुरेत
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठात देशातील पहिले राष्ट्रीय गो-संस्कृती संग्रहालय स्थापन केले जाणार आहे
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाला पराभूत केले.
भारत-पाक आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 75 हून अधिक धावा करणारा इशान किशन, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा हा आशिष नेहरा (भारत) आणि इमरुल काग्रेस (बांगलादेश) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.
सामनावीर : ईशान किशन [40 चेंडूत 77 धावा]
कोटक महिंद्रा बँक इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्यांचा (e-signatures) वापर करून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) परवाना जारी करणारी भारतातील पहिली कस्टोडियन बँक ठरली आहे.
बँकेने भौतिक कागदपत्रांशिवाय (paperless) पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे FPI खाते उघडले असून, ही सेवा परदेशी गुंतवणूकदारांसाठी सुलभता वाढवणारी आहे.
