mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
421
Подписчики
-324 часа
-37 дней
-130 дней
Архив постов
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
पूर्व परीक्षा: २५ ऑक्टोबर २०२६
पूर्व परीक्षेला आता ५६ दिवस बाकी आहेत...
((अग्निपथ योजना ))
👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व निमशासकीय पदे निर्माण करण्यास मंजुरी.
👉 प्राधान्य विभाग: पोलीस, अग्निशमन, वन विभाग तसेच विविध गट-क संवर्ग.
👉 25% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी संधी; उर्वरित 75% सेवामुक्त होतील.
👉 सेवामुक्त अग्निवीरांच्या प्रशिक्षण व कौशल्यांचा उपयोग करून पुनर्वसनासाठी राज्य सरकारी सेवेत संधी.
👉 संबंधित विभागांना निकषांनुसार पदनिर्मिती व नियुक्ती प्रक्रिया राबवता येईल.
👉 पदनिर्मितीसाठी वित्त विभागाच्या पुनर्मान्यतेची आवश्यकता नाही.
आयोगाच्या Departmental Excise परीक्षेत सुद्धा घोटाळा झालेला आहे वाटतं.
फाटलेल्या गोधडीला ठिगळ कुठे कुठे व किती आयोग आणि राज्य शासन जोडणार आहे. 🤔
प्रशासनात गोरगरीबांच्या लेकरांना जाण्याचा एकमेव आधार असलेल्या आयोगाने एक परीक्षा रद्द च Notification टाकून काहीच न झाल्यासारखा आव आणला आहे हे अनाकलनीय आहे.😱
तसेच NEET, MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी 50-50 लाख मोजणाऱ्या करोडपतींच्या ‘गुणवत्ता’धारक औलादींना नोकऱ्या कशासाठी पाहिजेत? आधीच तुटपुंज्या जागा निघतात. काही काही पोस्ट तर 3-4 वर्षात एकदा येतात. राहू द्या ना तेवढ्या तरी मेहनती उमेदवारांसाठी.
👉आर. प्रज्ञानंद हा Grand Chess Tour (GCT) चे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
👉 ग्रँड फायनल: अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव.
जिंदगी झारखंड झाली!!!
प्रत्येक चुकीची घटना घडल्यावर LECTURE मध्ये बोलत आलोय परंतु आता विद्यार्थ्यांना जागरूक करण्याची वेळ आलीय नाहीतर विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न तयार होईल.
या लढ्यात सर्व प्रामाणिक शिक्षक आपल्या सोबत आहेत.
शासनाला एवढीच विनंती आहे की परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्या आणि विद्यार्थ्यांना एकच सांगेल की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा.
आपल्याला प्रत्येकाला ऋषिकेश गांगुर्डे व्हावे लागणार आहे.
DRUG INSPECTOR पेपर फुटीतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
DRUG INSPECTOR ला 40 हजार विद्यार्थी होते परंतु गट क साठी 12 लाख आहेत हे विसरू नका,
काही चुकीचे आढळले तर पोरं नाही ऐकणार.
आणि हो शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणूक मी लढवणार नाही कारण 2020 मध्ये आमची जिरली !!!
राजकारण लय वंगाळ हाय अन त्यात आमची जिंदगी झारखंड झाली हाय!!!
सदैव विद्यार्थ्यांसोबत,
सचिन ढवळे सर
+5
या घोटाळ्याची पोलिस चौकशी होणे गरजचे आहे...!
तीन पेक्षा अनेक उमेदवार यामध्ये दोषी कशावरून नसतील....?
जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
