MPSC Value Addition by Sohel Shaikh
Открыть в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Больше4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 день
Архив постов
🔰♦️⚠️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
🔸 भाषा पेपर 01
⚜ मराठी ❕
⚜ इंग्रजी ❕
Join : @MPSC_Value_Addition
♦️🔰👉राज्यसेवा मुख्य परीक्षा चे वेळापत्रक....
😍उद्या पासून सुरु होत असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी सर्व उमेदवारांला शुभेच्छा 👍💐💐💐
⭕️♦️⚠️राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२१ हॉल तिकिटे उपलब्ध
♦️लिंक :
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
🔥Join @MPSC_VALUE_ADDITION
🔰 2020-2021 झालेल्या परीक्षांमध्ये रद्द प्रश्न संख्या...
राज्यसेवा पूर्व 2020 - 4
राज्यसेवा पूर्व 2021 - 8
राज्यसेवा मुख्य 2020 - 23
संयुक्त गट ब पूर्व 2020 - 5
संयुक्त गट ब पूर्व 2021 - 8
AMVI मुख्य 2020 - 5
स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य - 7
🔹 आयोगाचा प्रश्न थेट रद्द करण्याकडे कल वाढण्याचे प्रमुख कारण आयोग-परीक्षार्थी संघर्ष...
🔹 जास्त प्रश्न रद्द झाले अर्थात Cutoff देखील त्यानुसारच निश्चितपणे कमी लागेल...
Repost from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चला लोकराजाला आदरांजली वाहूया..!🙏
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शुक्रवार, 6 मे रोजी सकाळी *10 वाजता 100 सेकंद* स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध होणार कोल्हापूर..
तुम्ही ही लोकराजाला मानवंदना देण्यासाठी असाल तिथून नक्की सहभागी व्हा 🙏🙏
कुछ करना है,
कुछ बनना है ,
तो जी जान, ताकत सब लगा कर कीजिए !
क्योंकि जितना बड़ा आपका सपना है ! उतनी कीमत आपको चुकानी ही होगी !!
शुभ सकाळ☺️
Everything is impossible ;
Until its done...!!!
Good morning officer
Join @mpsc_value_addition
Q.1 The captain along with some players____on the ground.
A) are playing
B) is playing
C) have played
D) have been playing
⚠️♦️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
श्री. प्रमोद चौगुले सर महाराष्ट्रात प्रथम....💐💐
🚨 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2020 परीक्षेत इतिहासातील सर्वोच्च मार्क घेऊन राज्यात प्रथम आलेल्या प्रमोद चौगुले सरांचे खूप खूप अभिनंदन..💐💐
🥰 मुळात अशा मित्रांचा सहवास लाभला हीच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. माझं स्वतःचं नशीब समजतो की, प्रसाद चौगुले आणि प्रमोद चौगुले ही राज्यात प्रथम येणारी व्यक्तिमत्व माझे मित्र , मार्गदर्शक - सोबती आहेत.
➡️सरांबद्दल चार शब्द लिहिण्याचा मोह आवरला नाही, म्हणून हा लिखान प्रपंच.....
🔹सरांचे मुळगाव सोनी, तालुका मिरज, जिल्हा सांगली..
🔹वडील टेम्पो चालवतात, आता कोरोना काळात त्यांना टेम्पो विकावा लागला.
आई शिवणकाम करतात. घरी फक्त अर्धा एकर जमीन आहे.
▪️अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी यश मिळवून त्यांनी पुढची पिढी अनुकूल परिस्थितीत जगण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
🔸 सरांची इयत्ता सहावी मध्ये नवोदय विद्यालय सांगली येथे निवड झाली .. लहानपणापासूनच हुशार असलेल्या सरांनी इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी मध्ये शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला...
🔹त्यानंतर 2009 साली त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची डिग्री पूर्ण केली. गुणवत्तेच्या जोरावर त्यांना कॉलेज प्लेसमेंट मधून भारत पेट्रोलियम ( BPCL ) मध्ये नोकरी भेटला.
🔺गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना देखील सरकारी नोकरीमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून त्यांनी 2013 साली नोकरीचा राजीनामा देऊन UPSC चा अभ्यास चालू केला.
◾️2016 साली सरांचे लग्न झाले.. अभ्यासाबरोबर उदरनिर्वाहासाठी ते पुण्यातील ज्ञानदीप क्लास येथे शिकवण्याचे देखिल काम करत होते..
🔻 UPSC च्या 4 पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर चार मुख्य परीक्षा दिल्या होत्या आणि अगदी 1 ते 10 मार्काने चारही interview call हुकले ..
🔸 आलेल्या अपयशानं खचून न जाता त्यांनी MPSC मधून पोस्ट करण्याचा निर्धार करून तयारी चालू केली .
2019 साली तयारी करून परीक्षा दिली परंतु, फक्त एका मार्काने ( 521गुण ) त्यांची पोस्ट हुलाकावनी देऊन गेली होती..
🔹 यातून खचून न जाता त्यांनी 2020 साठी ची तयारी चालू केली...
🔵 त्यामध्ये पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये LockDown मध्ये घरी सांगलीला अडकले होते, तरीही पूण्यातील मित्राला पुस्तक पार्सल ने पाठवायला सांगून घरी अभ्यास चालू ठेवला .
🔵त्यानंतर दुसऱ्या Lockdown मध्ये ते पुण्यामध्ये होते आणि घरी सांगली मध्ये सर्वांना करोना ची लागण झाली परंतु ते जाऊही शकत नव्हते...
🔵यां अडचणीत भर म्हणून कि काय मध्यंतरी सांगली मध्ये मोठा पूर आला आणि पुराचे पाणी घरात घुसले.. अशा संकटाच्या मालिका सुरू असताना देखिल सरांनी अभ्यासिकेतील खुर्ची सोडली नाही 😊
▫️▫️चौगुले सरांची फॅमिली पुण्यामध्ये चिंचवड मध्ये असून देखिल ते अभ्यासामुळे सहा-सहा महिने घरी जात नव्हते.
⭕️ एकदा मुख्य परीक्षेच्या अगोदर आम्ही सरांना भेटलो होतो . तेव्हा मी सरांना बोलून दाखवले होते, सर तुमचा लुक प्रॉपर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसारखा झाला आहे 😄 तुमचं वजन 4-5 किलो तरी कमी झाले असेल तुम्हाला टी शर्ट देखिल ढगळा बसतोय 😄& चेहऱ्यावरचे तेज गेलय... असे तुमच्याकडे बघून तुम्ही किती जोरदार & डेडिकेशन ने अभ्यास केला आहे ते समजते आणि तुमचा निकाल पण तसाच जोरदार लागणार आहे......
♻️आम्हाला वारंवार सरांचं मार्गदर्शन भेटत असतं. कायम आमच्या रूम वर येत असतात. आम्हाला खूप सपोर्ट & मार्गदर्शन करत असतात.. अभ्यासाबद्दल च्या गोष्टी तर सांगतातच पण बाहेरच्या गोष्टीही आवर्जून सांगत असतात.
♻️सरांकडे बघितले की अभ्यास करण्यासाठी अजून प्रेरणा भेटते... संयम, जिद्द, सातत्य, शांत स्वभाव, अवांतर विषयांचे मुद्देसूद knowledge, हे सर्व मला सरामध्ये बघायला भेटले...
🧡 सरांच्या कष्टाला खरोखर सलाम. त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे आई-वडील तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच मेहुना प्रसाद चौगुले आणि त्यांची फॅमिली, सरांचे मित्रमंडळी यां सर्वांनी सरांना खूप साथ दिली आहे ...त्यामुळे सर्वांचे सर्वांचे खरोखर मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
🚨 सर पुढच्या 2021 च्या परीक्षेत टॉपर च्या यादीत नक्की असणार आहेत. सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
जय हिंद...
- PSI गणेश यलमर (2nd rank )
भगत सिंहांचे मित्र जयदेव गुप्ता यांना २४ जुलै १९३० रोजी त्यांनी पाठवलेलं एक पत्र उपलब्ध आहे. ज्या पत्रातून त्यांचं पुस्तक प्रेम कमालीचं ठळकपणे दिसून येतं. ते छोटंसं पण महत्वाचं पत्र इथे वाचकांसाठी उपलब्ध करून देतोय.
~~
सेंट्रल जेल
लाहोर
२४ जुलै १९३०
प्रिय मित्र जयदेव,
खाली लिहिलेली पुस्तकं द्वारकानाथ ग्रंथालयातून माझ्या नावावर नोंदवून घेऊन शनिवारी कुलबीरच्या हस्ते पाठवावीत. पुस्तकांची नावं अशी,
Militarism ( Karl Liebknecht )
soviet at work ( Lenin )
Left wing Communism ( Lenin )
FIELDS FACTORIES AND WORKSHOPS ( Prince Peter Alekseyevich Kropotkin )
why men fight ( B russell )
Collapse of the Second International ( Lenin )
Mutual Aid: A factor of evolution ( Alekseyevich Kropotkin )
Civil War in france ( Karl Marx )
The Spy ( Upton Sinclair )
शक्य असेल तर कृपया मला आणखी एक पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करावी. त्याचे नाव, historical materialism, bukharin असं आहे. ( हे पंजाब लायब्ररीतून मिळेल. ) आणि ग्रंथालयाच्या अध्यक्षांकडून माहिती करून घ्या की काही पुस्तकं बोर्स्टल तुरुंगात पाठवली आहेत काय? त्यांच्याकडे पुस्तकांचा भयंकर दुष्काळ पडला आहे. त्यांनी सुखदेवचे बंधू जयदेव यांच्याकडे एक यादी पाठवली होती, परंतू त्यांना अजून पुस्तकं मिळाली नाहीत. ग्रंथालयाकडे अशी एखादी यादी नसेल तर कृपया लाला फिरोजचंद यांच्याकडून माहिती मिळवून त्यांच्या पसंतीनुसार काही मनोरंजक पुस्तके पाठवा. या रविवारी मी जेंव्हा तिकडे पोहोचेन तोवर पुस्तकं तिकडं पोहोचायला हवीत. हे काम काहीही करून शीघ्र करून घ्यावं. याच बरोबर डार्लिंग लिखीत Peasant in Prosperity आणि याच सारखी आणखी ( शेतीच्या समस्याविषयक ) काही पुस्तकं डॉक्टर आलम यांच्यासाठी सुद्धा पाठवावीत.
तुम्हाला हे कष्ट जास्त वाटणार नाहीत अशी अशा करतो. भविष्यकाळात तुम्हाला कधी कष्ट, त्रास देणार नाही असे वाचन देतो. सर्व मित्रांना माझी आठवण करून द्या. लज्जावतीजी यांना नमस्कार सांगा. दत्तच्या भगिनी आल्या तर त्या माझीही भेट घेतील अशी अशा करतो.
आपला नम्र,
भगत सिंह
~~
या त्यांच्या पत्राव्यतिरीक्त २६ एप्रिल १९२९ साली वडिलांना पाठवलेल्या एका पत्रात ते "गीतारहस्य" आणि "नेपोलियनचं चरित्र" वडिलांकरवी मागवून घेताना दिसतात.
त्यांचं वाचनप्रेम त्यांनी आवर्जून शेवटच्या क्षणाबद्दल प्राणपणानं टिकवलं. भगत सिंहांचे वकील प्राण मेहता यांना २३ मार्च रोजी त्यांना भेटू दिलेलं. भगत सिंह पिंजऱ्यातल्या सिंहासारखे वाटलेले प्राण मेहता यांना. भगत सिंहांच्या चेहऱ्यावर कसल्याही चिंतेचा किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांनी उत्कट हास्यानं मेहता यांचं स्वागत केलं आणि त्यांनी मागवलेलं लेनिन (Vladimir Lenin) यांचं "स्टेट अँड रिव्होल्यूशन (State and Revolution) " हे पुस्तक आणलं काय असा प्रश्न केला.
मेहता यांनी जसं त्यांना पुस्तक दिलं तसे ते पुस्तक वाचायला बसले. त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही आणि त्यांना ते पुस्तक वाचून संपवायचं होतं. वाचनावरची अशी पराकोटीची निष्ठा जगभर शोधून सापडायची नाही. मेहता निघून गेले आणि भगत सिंह यांना सांगण्यात आलं तुमची फाशी अलीकडे घेतली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला फाशी देण्यात येईल. तोवर त्यांची थोडीथोडकीच पानं वाचून झालेली.
या प्रसंगाबद्दल भगत सिंहांचे निकटचे सहकारी श्री मन्मथनाथ गुप्त यांनी लिहून ठेवलं आहे,
"जेव्हा फाशीचा तख्त तयार आहे हे सांगायला एक अधिकारी भगत सिंह यांच्याकडे आला तेंव्हा भगतसिंह लेनिन यांनी लिहिलेलं किंवा लेनिन यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचत होते, भगत सिंह यांनी त्यांचं वाचन चालू ठेवलं आणि दृढतम् आवाजात म्हणाले,
"काही काळ प्रतीक्षा करा. एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकारकाची ( पुस्तकातून) गळाभेट घेत आहे."
त्यांच्या त्या आवाजात काहीतरी विशेष होतं, तो मृत्यूचा संदेश घेऊन आलेला अधिकारीही काही काळ संमोहित झाला. भगतसिंह वाचत राहिले. काही क्षणांनंतर त्यांनी ते पुस्तक छताच्या दिशेने भिरकावून दिलं आणि धीरगंभीर आवाजात गरजले,
"चला जाऊया."
~~~
~~~
इंन्कलाब जिंदाबाद
Repost from Umesh Kudale
बा महाराष्ट्रा ..
तु खुप आधी पासुनच इथं राकटपणे उभा होतास..
१ मे १९६० ला तु आम्हाला सामावुन घेतलस.
महाराष्ट्र दिनी तुझा अंश असणाऱ्या सगळ्यानां खुप शुभेच्छा...
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!
जय महाराष्ट्र !!
💢♦️महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐🚩🇮🇳🚩
🔰Join: @MPSC_Value_Addition
