🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
✳ NASA अवकाशात ‘ऑर्गन्स-ऑन-चिप्स’ पाठवणार
💥 अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (NASA) अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर ‘टीशू चिप्स’ किंवा ‘ऑगन्स-ऑन-चिप्स’ पाठवण्याची योजना तयार केली आहे.
💥 टीशू चिप हे 3D मॅट्रिक्समध्ये मानवी पेशी साठविण्यात आलेले लहान उपकरण आहे.
💥 मानवी पेशी अवकाशात असताना ताण, औषधे आणि आनुवांशिक बदलांना कसा प्रतिसाद देतात हे जाणण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे.
💥 नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ही संयुक्त राज्य अमेरिकेची (UAS) एक सरकारी शाखा आहे, जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि हवाई उड्डाणशास्त्र व अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे.
💥 NASA ची स्थापना 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) याच्या जागी केली गेली होती.
💥 या संस्थेने 1 ऑक्टोबर 1948 पासून कार्य करण्यास सुरुवात केली.
2 804
✳ ‘M777 हॉविट्झर’, ‘K-9 वज्र’ स्वचलित तोफा भारतीय लष्कराच्या सेवेत
💥 भारतीय लष्कराची क्षमता वाढवण्यासाठी ‘M777 A2 अल्ट्रा लाईट हॉविट्झर’, ‘K-9 वज्र’ स्वचलित तोफा सेवेत समर्पित केल्या आहेत.
💥 या तोफा तैनात झाल्यानंतर पश्चिम सीमेवरील भारताच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
💥 155 मिलीमीटरच्या 39 क्षमतेच्या अल्ट्रा लाईट (अती हलक्या) हॉविट्झर तोफा अमेरिकेकडून विकत घेतल्या असून भारतात महिंद्रा डिफेन्स आणि BAE सिस्टीम्स यांच्या भागीदारीतून या तोफांची जुळणी करण्यात आली आहे. 155 mm/52 कॅलिबरच्या पहिल्या दहा ‘K-9 वज्र’ तोफा दक्षिण कोरियाच्या हानवा तेचविन कंपनी आणि लार्सन अँड टुब्रो यांनी पुरविल्या. उर्वरित 90 तोफा मुख्यत्वेकरून भारतात निर्मित केल्या जातील
2 804
🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯:
✳ NASAची ‘केप्लर अंतराळ दुर्बिण’ कालबाह्य
👇👇👇
✍अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन संस्थेची ‘केप्लर अंतराळ दुर्बिण’ नऊ वर्षांच्या सेवेनंतर इंधन संपल्यामुळे निवृत्त होत आहे.
✍केप्लर अंतराळ दुर्बीण ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) याची अवकाशात पाठवलेली वेधशाळा आहे. सन 2009 मध्ये ‘केप्लर अंतराळ दुर्बीण’ अवकाशात सोडण्यात आली होती.
✍सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळतेजुळते परग्रह शोधणे हा या दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे.
✍तिच्यात पहिल्यांदा सन 2012 मध्ये बिघाड झाला होता. केप्लर दुर्बिणीने 2009 सालापासून आतापर्यंत जवळपास 1,50,000 तार्यांचा वेध घेतलेला आहे.
✍शास्त्रज्ञांनी केप्लरपासून प्राप्त माहितीच्या आधारावर आतापर्यंत 2,662 ग्रहांचा शोध लावलेला आहे.
2 804
✳ 2019 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक
✅ राज्यसेवा पूर्व - 17 फेब्रुवारी 2019
✅ संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) - 24 मार्च 2019
2 804
🌸🌸💕संगणकाचे नेटवर्क 💕🌸🌸
✍दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.
संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .
✍१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.
2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर
✍३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .
प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .
✍नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .
🚘 संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयावर आधारित परीक्षाभिमूख माहितीसाठी आजच join kra
T.me/sciencetech4all
2 804
🎯 10 व्या अणू ऊर्जा परिषदेचे डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
✍ 10 व्या अणू ऊर्जा परिषदेचे उद्घाटन डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत केले.
✍ भारताचा अणू ऊर्जा कार्यक्रम हा शांततापूर्ण उदिृष्टांसाठी उपयोगात आणला जाईल हे देशाच्या अणू ऊर्जा कार्यक्रमाचे पितामह डॉ. होमी भाभा यांचे वक्तव्य भारताने यथार्थ ठरवल्याचे केंद्रीय अणू ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
✍ अंतराळ तंत्रज्ञानाचा जनतेसाठी उपयोग करायला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
✍ देशाचा अणू ऊर्जा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 1962 च्या अणू ऊर्जा कायद्यामध्ये सुधारणा केली आहे.
✍ यामुळे भारतीय अणू ऊर्जा महामंडळाला इतर भारतीय सार्वजनिक उपक्रमाबरोबर संयुक्त प्रकल्प स्थापन करता येणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
2 804
💐💐जापानचे रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार विजेते शिमोमूरा यांचे निधन💐💐
✍जपानमधील जन्मलेले जीवशास्त्रज्ञ ओसामु शिमोमूरा यांचे वयाच्या 90व्या वर्षी जपानच्या दक्षिणेकडील नागसाकी शहरात निधन झाले.
✍तीन शास्त्रज्ञांपैकी एक शिमोमुरा हे होते, ज्यांनी 2008 मध्ये केशरचना अभ्यासात योगदान दिले होते. जेलिफिश प्रोटीनचा शोध आणि विकास करण्यासाठी रसायनशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.
✍शिमोमूरा यांचा जन्म क्योटो येथे झाला आणि शिक्षण नागासाकी येथून घेतले, जीथे 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेच्या परमाणु बॉम्बस्फोटापासून ते वाचले होते. 1951 मध्ये रसायनशास्त्र पदवी पूर्ण केल्यानंतर, ते प्रिन्स्टन विद्यापीठ, येथे त्यांनी अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टीवर 10,000 जेलिफिश प्रोटीन नमुने शोधुन काढले होते.
2 804
☀️हे राज्य शासन 15 ऑगस्ट 2018 पासून शेतकर्यांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रुपयांची जीवन विमा योजना सुरू करणार आहे
- तेलंगणा.
☀️ झारखंडमध्ये या शहरात नवे AIIMS उभारले जात आहे
– देवघर.
☀️ भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आलेले ‘IN LCU L54’ जहाज या कंपनीकडून संरचित आहे
- गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE, कोलकाता).
☀️मे 2018 मध्ये या आखाती देशात अत्यंत धोकादायक भुपृष्ठभागावरचे ‘मेकुनू’ चक्रीवादळ धडकले
– ओमान.
☀️ आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये (ISA) या युरोपीय देशाचा समावेश करण्यात आला
- नेदरलँड्स.
☀️ या देशात 25 मे 2018 पासून ‘जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन’ (GDPR) प्रभावी करण्यात आले आहे
- युरोपीय संघ.
☀️ पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा प्रांताला या अशांत क्षेत्रासोबत विलीन करणार आहे
- सांघिक प्रशासित आदिवासी क्षेत्र (FATA).
☀️ हा देश ‘ट्रेकोमा’चे निर्मूलन करणारा दक्षिण-पूर्व आशियातला पहिला देश बनला
– नेपाळ.
2 804
🔹 मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन म्हणून ओळखले जाणार
🔺 याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.
👉🏻उत्तर प्रदेशाताली योगी सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले असून त्याऐवजी या स्टेशनचे नाव आता पंडित दीन दयाळ उपाध्याय जंक्शन असे असणार आहे.
◾️उत्तर प्रदेशाताली योगी सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले असून त्याऐवजी या स्टेशनचे नाव आता पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे असणार आहे. याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही याबाबत ट्विट केले
गोयल यांनी म्हटले की, जनतेच्या मागणीवरुन उत्तर प्रदेशातील मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय करण्यात आले आहे. योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्याच वर्षी मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी (४ जून) त्याची अधिकृत अधिसुचना जारी करण्यात आली.
दरम्यान, योगी सरकारच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून विरोध व्हाऊ लागल्याने काही काळ त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला होता. काही लोकांनी मुगलसराय जंक्शनला देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
रा. स्व. संघाच्या विचारसरणीचे आणि भाजपाचे नेते असलेले दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री या दोघांचाही मुगलसराय शहराशी जवळचा संबंध आहे. मुगरसराय हे शास्त्रींचे जन्मस्थळ आहे. तर १९६८ मध्ये दीनदयाल उपाध्याय यांचा मुगलसराय जंक्शन येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर बऱ्याच काळापासून भाजपा या रेल्वे स्टेशनला त्यांचे नाव देण्याची मागणी करीत होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
