ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
🔵 join @rajyasevastudy 👆 Science - Chemistry प्रश्न:- संप्लवण म्हणजेच?
Anonymous voting

🔵join @rajyasevastudy👆 Science - Chemistry प्रश्न:- पाण्याचा गोठणबिंदू किती आहे?
Anonymous voting

☑️Join @rajyasevastudy👆 Science - Chemistry प्रश्न:- खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेमुळे विरघळत नाही?
Anonymous voting

Science 🌸 स्थायू आवस्था 🌸 👉 स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात. 👉 जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण. 👉 स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो. 👉 स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे. 👉 स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात. 👉 उदा. रबर, लाकूड, हिरा इ. 🌸 द्रव अवस्था 🌸 👉 द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते. 👉 द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात. 👉 द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात. 👉 द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो. 👉 उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ. 🌸 वायु अवस्था 🌸 👉 वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात. 👉 वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात. 👉 उदा. हवा, गॅस इ. 🌸 अवस्थांतर 🌸 👉 स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात. 👉 द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते. 👉 वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते. Join @rajyasevastudy

Science 🌸 वस्तुमान 🌸 👉 प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत. 👉 एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते. 👉 वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते. 🌸 आकारमान 🌸 👉 भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात. 🌸 घनता 🌸 👉 घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे. 👉 घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v) 🌸 द्रव्य 🌸 👉 द्रव्य जागा व्यापते. 👉 द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते. 👉 द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते. 👉द्रव्याच्या अवस्था स्थायुरूप द्रवरूप वायुरूप Join @rajyasevastudy

● भारतीय संशोधन केंद्र 1. दक्षिण गंगोत्री - Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र - स्थापना: 26 जानेवारी 1984 - बंद: 25 फेब्रुवारी 1990 2. मैत्री - वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र - स्थापना: जानेवारी 1989 3. भारती - अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र - या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते. - स्थापना: 18 मार्च 2012 4. IndARC - भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र - हे केंद्र आर्क्टिक भागात आहे. ________________________ जाॅईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल 👉 @Sciencetech4all

प्लाजमा थेरेपी..

..... लोकसत्ता..... 🗓 27 / 04 / 2020 Search = #NewsPaper ═════════════

🔷 जागतिक मलेरिया दिन: 25 एप्रिल - मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नेतृत्वात जगभरात 25 एप्रिल या दिवशी जागतिक मलेरिया दिन पाळतात. - यावर्षी “झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी” या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला आहे. मलेरिया उच्चाटनासाठी राजकीय, सामाजिक पातळीवर एकत्र येणे, त्यासाठी विशिष्ट धोरण तयार करणे असा या संकल्पनेचा हेतू आहे. ▪️मलेरिया आजार - मलेरिया 'प्रोटोजुअन प्लाज्‍मोडियम' वंशाच्या परजीवीमुळे होणारा एक जीवघेणा आजार आहे. परजीवी मादी अनोफिलेस मच्छरच्या चाव्याव्दारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. या ठिकाणी मादा मलेरिया परजीवीने आधीच संसर्गग्रस्त झालेली असते. - संसर्गाच्या प्रारंभिक लक्षणांमध्ये सामान्यत: ताप, डोकेदुखी आणि थंडीचा समावेश असतो. ▪️मलेरियाविषयी जागतिक स्थिती - जागतिक आरोग्य संघटनेनी दिलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष 2000 आणि वर्ष 2004 या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. या काळात मृत्यूदर सुमारे 40 टक्क्यांवर घसरला आहे. - वर्ष 2014 ते वर्ष 2018 या काळात मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विशेष यश आले नाही. साधारण 2017 साली मलेरियाने जेवढे मृत्यू झाले तेवढेच 2018 सालीही झाले. - जगभरात प्रत्येक 2 मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू मलेरियाने होतो. - मलेरियाला प्रतिबंध घालण्यासाठी 2000 सालापासून प्रामुख्याने कीटकनाशकाद्वारे उपचारीत जाळी वापरली जाते आणि घरामध्ये कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ▪️मलेरिया दिनाचा इतिहास - 2008 साली अफ्रिकेत जागतिक मलेरिया दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. मलेरिया या साथीच्या आजाराने आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. 2007 साली मे महिन्यात भरलेल्या 60 व्या जागतिक आरोग्य परिषदेत हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. - "मलेरियासंबंधी माहिती आणि समज" आणि राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण योजनांची अंमलबजावणी वाढविण्यास मलेरिया प्रतिबंधक व स्थानिक भागांमध्ये उपचार याबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली आहे. - जागतिक मलेरिया दिवस हा 24 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात पाळण्यात येणार्‍या जागतिक लसीकरण आठवड्यामध्ये येतो. या लसी 26 रोगांपासून लोकांना सुरक्षित ठेवते आणि त्यामुळे दरवर्षी अंदाजे 2-3 दशलक्ष मृत्यू रोखले जाऊ शकतात. - मलेरियाच्या निर्मूलनासाठी जीन ड्राइव्ह पद्धत आणि लस - जीन ड्राइव्ह ही जीन-एडिटिंग पद्धत आहे, जिथे या घातक मलेरियामुळे ग्रस्त मच्छरांचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होते. त्याच्या माध्यमातून मच्छरांमध्ये जनुकीय बदल केले जातात ज्यामुळे अंततः जीन-संपादित करून निर्जंतुकीकरण केलेल्या पालक मच्छरदात्यांच्या पिढ्या बनतात. - मलावी देशाने आफ्रिकेच्या पहिल्या मलेरिया लसीचा प्रमुख टप्पा सुरू केला आहे. - RTS-S म्हणून ओळखली जाणारी ही लस फक्त 2 वर्षापेक्षा लहान मुलांसाठी प्रभावी आहे. ही लस 5 वा महिना, 6 वा महिना, 7 वा महिना आणि 22 वा महिना या वयात चार वेळा दिली जाते. ---------------------------------------------------

#StateBoard #Science 🔸इयत्ता 10 वी - भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान (New) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science 🔸इयत्ता 10 वी - भाग 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान (New) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science #StateBoard #Science 🔸इयत्ता 9 वी - सामान्य विज्ञान(New) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science #StateBoard #Science 🔸इयत्ता 8 वी - सामान्य विज्ञान(old) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science #StateBoard #Science 🔸इयत्ता 8 वी - सामान्य विज्ञान(New) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science 🔸इयत्ता 7 वी - सामान्य विज्ञान(old) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science 🔸इयत्ता 7 वी - सामान्य विज्ञान(New) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science 🔸इयत्ता 6 वी - सामान्य विज्ञान(old) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science 🔸इयत्ता 6 वी - सामान्य विज्ञान(New) 📍@PDF_Katta

#StateBoard #Science 🔸इयत्ता 5 वी - सामान्य विज्ञान 📍@PDF_Katta

​उन्हाळ्यात करोनाला लगाम! - सूर्यप्रकाश, उष्णता, आद्र्रता यामुळे करोनाचा विषाणू टिकाव धरू शकत नाही, असे मेरीलँड येथील बायोडिफेन्स अँड काउंटर मेजर यासंस्थने संशोधनाअंती म्हटले असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील आरोग्यविषयक अधिकारी बिल ब्रायन दिली आहे. - या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सूर्यप्रकाशात करोनाचा विषाणू टिकू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते अतिनील किरणही या विषाणूला मारू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता कमी आहे. भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने करोनाला अटकाव होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. पृष्ठभागावरचे व हवेतील विषाणू सूर्यप्रकाशात मारले जातात. तपमान व आद्र्रतेचाही यात संबंध असतो. - वाढते तपमान व आद्र्रता या दोन्ही गोष्टी करोनाला मारक असतात. या शोधनिबंधची शहानिशा अजून तटस्थ तज्ञांकडून झाली नसल्याने तो जाहीर करण्यात आलेला नाही. ब्रायन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यात असे सांगितले गेले की, हा विषाणू २१ ते २४ अंश सेल्सियस किंवा त्यावरील तपमान व २० टक्के आद्र्रता असेल तर निम्मा होतो. - थोडक्यात तो क्रियाशील राहत नाही. या तपमान व आद्र्रतेला तो दारांचे हँडल, पोलाद यावरही टिकत नाही. जेव्हा आद्र्रता ८० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल हा सहा तासांपर्यत खाली येतो म्हणजे तो सहा तासात निम्माच राहतो. हा विषाणू सूर्यप्रकाशात दोन मिनिटातच निष्क्रीय होतो. जेव्हा विषाणू हवेत असतो व तपमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर आद्र्रता २० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल एक तास असतो. - सूर्यप्रकाशात हवेत असलेला विषाणू ३० सेकंदात निष्क्रिय होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विषाणूचा प्रसार कमी होतो असे ब्रायन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ विषाणू नष्ट होतो म्हणजे सामाजिक अंतर पाळण्याची गरज नाही असा घेण्यात येऊ नये. - भारतात पावसाळ्यात दक्षतेची गरज शिव नाडर विद्यापाठीच्या गणित विभागाचे सहायक प्राध्यापक समित भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतात आता टाळेबंदी उठवल्यानंतर करोना विषाणूचा प्रसार रोखल्याचा आभास निर्माण होईल, त्याचा आलेखही स्थिर येईल, पण नंतर काही महिन्यांनी पुन्हा करोना पुन्हा सक्रिय होईल. आता काही आठवडे किंवा महिने करोना कमी झालेला दिसेल पण नंतर तो पुन्हा उसळी घेईल. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत गेली असून ती काही काळ कमी दिसेल. आलेख स्थिर होइलही पण ती स्थिती फसवी असण्याचा धोका अधिक आहे. - दुसऱ्या संसर्गाची लाट जुलै व ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते. बेंगळुरू येथील आयआयएससीचे प्राध्यापक राजेश सुदर्शन यांनी या मताशी सहमती दर्शवली.