cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

HiSTORY by Hardikar

Больше
Рекламные посты
1 503
Подписчики
+424 часа
+87 дней
+2530 дней
Время активного постинга

Загрузка данных...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Анализ публикаций
ПостыПросмотры
Поделились
Динамика просмотров
01
राज्यसेवा मुख्य साठी उपयुक्त☝️
1460Loading...
02
मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५) यांचा आज स्मृतिदिन. (१४ जून १९१६:) निर्दोष कलाकृती नसली, तरी अस्सल वातावरण, जिवंत स्वभावचित्रण, सुटसुटीत व मार्मिक संवाद, प्रासादिक पद्यरचना आणि सहजसुंदर विनोद या बाबतींत ती बिनतोड ठरावी. संशयकल्लोळ या हटकून रंगणाऱ्या सुखात्मिकेवरुन देवलांच्या असाधारण रूपांतरकौशल्याची साक्ष पटते. देवलांनी रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ द कोर्ट ऑफ लंडन ह्या कादंबरीवरून लंदनरहस्य, पूर्वार्ध भा. १ (१८९४) ही कादंबरी व पुणे वैभव पत्रात प्रचलित विषयावर स्फुटलेखन केले होते. अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचे लेखन आणि स्वाभाविक अभिनयशिक्षण या द्विविध प्रकारे रंगभूमीशी तादात्म्य पावून देवलांनी जी रंगभूमीची सेवा केली, ती चिरंतन स्वरूपाची आहे. शेवटी काही वर्षे देवल रंगभूमीवरून निवृत्त झाले होते. मधुमेहाच्या विकाराने त्यांचे मिरज येथे देहावसान झाले. संदर्भ : बनहट्टी, श्री. ना. नाट्याचार्य देवल, पुणे, १९६७. लेखक-मालशे, स. गं.
1441Loading...
03
Media files
1350Loading...
04
'केसरी' मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - 'राणीसरकारचा जयजयकार''. . 15-June-1897 (मंगळवार) - आजच्या दिवशी, लोकमान्य टिळकांचा 'केसरी' मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - 'राणीसरकारचा जयजयकार''. (एकूण तीन लेख - ०८जून१८९७ , १५जून१८९७ आणि २२जून१८९७). . 'महाराणी सरकारचा जयजयकार' या शीर्षकाचे तीन अग्रलेख ०८जून१८९७ ते २२जून१८९७ या काळात 'केसरी'त प्रसिद्ध झाले. व्हीकटोरीया राणीचा राज्यकारभार सुरु होऊन साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतभर अनेक मोठे कार्यक्रम आखण्यात आले होते. लोकमान्य टिळक अग्रलेखात म्हणतात की - "यूरोपच्या पश्चिमेकडील एका लहानशा बेटातील लोकांनी, की जे लोक नऊशे वर्षांपूर्वी अगदी रानटी स्थितीत होते, त्यांनी अशा रीतीने थोड्या काळात जगातील सार्वभौम राष्ट्रांमध्ये अग्रेसर पावावे, हा काही त्यांच्या बुद्धीचा, उद्योगशीलतेचा, हिमतीचा आणि साहसाचा लहानसहान प्रभाव नव्हे. जगाचा नकाशा पुढे घेऊन इंग्रजी राज्याचा विस्तार पाहू, तर राणीच्या राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही, अशी जी म्हण आहे, ती अगदी अक्षरशः खरी आहे, हे दिसून येईल'. . याच अग्रलेखात इंग्रजांनी राजसत्तेचा पसारा सुनियंत्रितपणे चालवण्यास तारयंत्र, आगगाड्या व आगबोट यांना आणल्याचा उल्लेख टिळकांनी केला आहे. त्यात शेवटी ते म्हणतात - ' असो, अशा रीतीने संपत्तीच्या व वैभवाच्या शिखरावर पोहोचलेल्या राष्ट्रातील लोक आपल्या उत्कर्षाचे द्योतक म्हणून हा जो उत्सव (उतांड्व) करीत आहेत, तो त्यांच्या दृष्टीने अगदी यथायोग्य आहे. हे आमचे राज्यकर्ते आहेत म्हणून आम्हांसही त्यात आनंदच आहे. मात्र गेल्या साठ वर्षात त्याच्याप्रमाणे आमची भरभराट झाली, असे मात्र म्हणता यावयाचे नाही". . संपत्ती अफाट झाल्यामुळे लंकेत ज्याप्रमाणे हजामतीस सोन्याच्या विटा द्याव्या लागत, तद्वतच इंग्लंड मध्ये बहुतेक असा प्रकार झाला आहे. तथापि त्याने तळातल्या लोकांची स्थिती फारशी सुधारली आहे, असे नाही. इंग्रजी राष्ट्राचे खरे बळ व्यापारी व मध्यम स्थितीतील लोक होत. त्यांच्यात नाना तऱ्हेची सुधारणा सुरु असून त्यांच्या सुखाची साधने उत्तरोत्तर वृद्धिंगत होत चालली आहेत. थोडक्यात, व्यापारी आणि अन्य श्रीमंत समाज उत्तरोत्तर प्रगतीपथावर पोहोचला आहे, पण सामान्य माणूस होता तिथेच राहिला आहे". . आर्थिक मुद्द्यांचा आधार घेतल्यास राजकारण अधिक परिणामकारकपणे समजावून सांगता येते याची जाणीव पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनाच झाली. अर्थशास्त्राशी संबंधित एकही मुद्दा असा नाही, की ज्यास लोकमान्य टिळकांनी स्पर्श केलेला नाही. . 🇮🇳🙏🇮🇳
1240Loading...
05
https://marathi.hindustantimes.com/religion/rani-lakshmi-bai-death-anniversary-2024-abhivadan-shubhechha-in-marathi-wishes-quotes-captions-status-messages-images-141718172006804.html
1860Loading...
06
https://www.esakal.com/desh/rani-laxmibai-9-facts-about-the-brief-life-journey-of-rani-laxmibai-the-inspiration-goddess-of-revolutionaries-dds97
1760Loading...
07
बातमी कळल्यावर डिस्ट्रिक्ट मँजिस्ट्रेट रोज याने हालचाली करून सैन्यात फितुरी माजवणार्या मानसिंंगाला पकडून तोफेच्या तोंडी दिले. मरताना मानसिंग प्रजेला उद्देशून म्हणाला जर जातिवंत हिंदू आणि मुसलमान असाल तर इंग्रजावर सूड उगवल्याशिवाय राहू नका. १७ ऑगस्टला छत्रपतींच्या वाड्याला वेढा घालून राणीसाहेबांचे दत्तक चिरंजीव कशी महाराज सेनापतींचे दुसरे चिरंजीव दुर्गासिंग व सेनापतींचे चुलत भाऊ पर्शुरामबाबा यांना एका गाडीत व माईसाहेब, राणीसाहेब , पर्शुरामबाबा यांची पत्नी यांना दुसर्या गाडीत बसवून प्रथम खडकीला नेण्यात आले. तेथून मुंबई जवळच्या बुचेर बेटात ठेवण्यात आले. लेफ्ट. कर्नल याने बुवासाहेब शिर्के यांचा वाडा उद्वस्त केला. सेनापतींच्या चुलत्यांना राजद्रोहाचा आरोप ठेवून जन्मठेप सुनावली. त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यांना सातार्याहून हलवण्यापूर्वी सात्विक संतापाने त्यांचा मृत्यू झाला. प्रतापसिन्हांचा मुलगा शाहू याना कराचीला नेउन स्थानबद्ध करून बाकीच्यान नगरच्या किल्यात ठेवण्यात आले. रंगो बापुजींवर पकडण्यासाठी ५०० रुपये बक्षीस ठेवण्यात आले. पण ते जे भूमिगत झाले ते सापडलेच नाहीत. ( याच काळात नेमके अक्कलकोटचे स्वामी समर्थ प्रकट झाले काहींच्या मते हे रंगो बापुजीच होते. पण याला ठोस पुरावा नाही. ) त्यांचे १६ साथीदारही भूमिगत झाले ते शेवटपर्यंत सापडले नाहीत. १८५८ च्या ऑगस्ट मध्ये तीन जणाचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरु झाली. रंगो बापुजीं सापडले नाहीतच. पण त्यांचा मुलगा सीताराम वाळवे बोरगाव येथे पकडण्यात आले. मी बंडात भाग घेतला होता असे त्यांनी उघडपणे सांगितले. खटला १५ मार्च ते २४ मार्च १८५८ पर्यंत चालला. त्यात खालील लोकांची मालमत्ता जप्त करून सर्वाना जन्मठेप झाली. १ हैबतराव महाडिक, पुतळाजी सावंत विठू भोसले, विठू कुमकर, गणु भोसले , विठू न्हावी , आबा कदम, नारोजी कासकर, खेलेजी नाईक कासारकर, राघोजी भोसले, नारायण शेवडे, गोपाल जोशी पाळीचे बुवा केशव कीवे, हि मंडळी होती. ७-७ १८५८ ला निकाल लागून खालील शिक्षा सुनावण्यात आल्या. नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे , शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते, यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड (मांग) येशा गायकवाड (मांग), गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चावण, बाबा कानगी रामोशी नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे?) पर्वती पोटाले (पाटोळे?) पताळू येशु यांना गोळ्या घालण्यात आल्या. मृत्यूची शिक्षा देताना असा भेदभाव का हे न उलगडलेले कोडे आहे. निकाल लागल्यानंतर लागलीच ८ सप्टेंबरला शिक्षेची अंमल बजावणीही झाली आणि सर्वाना यमसदनी पाठवण्यात आले. आरोपित सर्व जातीचे लोक होते हे विशेष आपल्या धेय्यासाठी जातीभेद विसरून मृत्यूला कवटाळण्याचा तो जमाना होता. सातारकरांनी ८ सप्टेंबर हा दिवस सातारच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मानवा. यासाठी सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाने पुढाकार घ्यावा. एवढीच या लिखाणाची माफक अपेक्षा आणि रंगो बापुजींचेही यथोचित स्मारक व्हावे एवढेच. (शेवटच्या फोटोत दिसते आहे त्या जागेत रंगो बापूजी गुप्ते रहात असत, फरासखाना आणि युनियन क्लबच्या मधील जागा, आता तिथे अपार्टमेंट झाले) संकलन ः संजय कोल्हटकर
2620Loading...
08
सातार्यातील उठाव उद्या १२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे त्यांनी जाहीर केले होते. १८३१ मध्ये त्यांना इंग्रजांनी पंढरपूर येथे पकडले. बंड केल्यापद्दल खटला भरून १३ फेब्रुवारी १८३२ला येरवड्यास फाशी दिले. १८१८ मध्ये पेशवाई नष्ट झाल्यावर गोपाल पटवर्धन, अण्णाजी शेंडे, विठुजी कुंडलकर, सन्तु घडगा व यशवंत चव्हाण यांनी १८२१ मध्ये बंड केले. यांनी दोन हजार माणसे जमा केली होती. यात गोपाल पटवर्धन यांस जन्मठेप व यशवंत चव्हाण यांस दहा वर्षे शिक्षा झाली. १८४० मध्ये कोले येथील धारराव पवार यांनी बंड केले. कराड ते प्रचीतगड या भागात त्यांनी आपला अंमल बसवला. तेथील इंग्रजांची सत्ता उठवली पण नंतर त्यांचा पराभव झाला. पण ते भूमिगत झाले. ते शेवटपर्यंत सापडले नाहीत. त्यांच्या अनुयायांना मात्र तुरुंगवास सोसावा लागला. १८४४ मध्ये प्रताप सिंहांचा एकनिष्ठ अनुयायी सुभान निकम व लिंबाचे राघो आपटे यांनी उठाव केला. त्यांनी इंग्रजांची टपाल यंत्रणा मोडून काढली. कोल्हापूरच्या सामानगड येथे येथे निकमानी तळ ठोकला. तेथे ५०० लोक जमवले. निकमांवर हल्ला करण्यासाठी सातारचा रेसिडेंस ओव्हन्स याची नेमणूक झाली. त्याचा कासेगाव येथे निकमानी पराभव करून त्याला कैद केले. व पन्हाळ्यावर ठेवले. १८४५ मध्ये इंग्रजांनी ओव्हन्स याची सुटका केली. व निकमला कैद केले. १८३८ साली प्रतापासिन्हाना पदच्युत केल्यावर या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रंगो बापुजी गुप्ते समुद्रमार्गे इंग्लंडला गेले. प्रतापासिहांना त्यांचे राज्य परत मिळावे म्हणून त्यांनी चौदा वर्षे अथक प्रयत्न केले. शेवटी निराश होऊन ते १८५४च्या फेब्रुवारीत परत आले. नंतर दीड वर्षे वेगवेगळ्या लोकांना भेटून ते योजना बनवत होते. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्याशीही त्यांनी संधान बांधले. आपला पुतण्या वासुदेव याला ५०० सैनिकांनीशी पेशव्यांच्या मदतीला पाठवले. १८५६ ते ५७च्या दरम्यान माणसे, पैसे व युद्धासाठी साहित्य मिळवण्यासाठी ते फिरत होते. सैन्यात भरतीसाठी त्यांनी येनावडे, वाठार, देऊर, वर्धनगड वारुगड आर्वी, कळंबी, कराड, आरळे अर्जुनगड येक्मुल्ली, जकातवाडी फलटण व जिल्ह्याबाहेरही केंद्रे सुरु केली. गुप्त्यांचे मख्य ठाणे सातारा मेढा रस्त्यावर हम्दाबाद येथे होते. सातार्यात मंगळवारात बालाजी शिप्याचे घर, कृष्णेश्वराजवळ गोसावी वाडा, विठोबाच्या नळाजवळ सखाराम कबाडे यांचे घर हि केंद्रे होती. त्यांना पुढील साथीदार मिळाले. सातारचे तात्या फडणीस, कर्हाडचे दौलत पवार, रंगो बापूजींचा मेहुणा अण्णा चित्रे, मुलगा सीताराम, भोरमधील शेट्ये बंधू, सातारा येथील बाविसाव्या पलटणीला दप्तरदार गणेश कारखानीस, जकातवाडीचे सोनार हरी देवरुखे यांच्या बरोबर बोलून कामे वाटून देण्यात आली. पोलिसात व इंग्रजी सैन्यात फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारुगोळा तयार करणे अशी वाटणी झाली. स्वतः रंगो बापूजीं सज्जनगडावर सहा आठवडे होते. तेथील मांग व रामोशी यांना सैन्यात भरती करून घेत होते. रामोशांचा पुढारी सत्तू रामोशी मांगांचा पुढारी बाबिया , योरीया , मल्या मांग शिवराम कुलकर्णी यांना रंगो बापूजीं यांनी बंडात सामील करून घेतले. रंगो बापूजीं सज्जनगडावर भोरच्या तुकडीची वाट पाहत होते. अप्पा ऐतवडेकरानी ८०० तोफ गोळे तयार केले. सातारा तुरुंगावरील पहारेकरी मानसिंग सैन्यात फितुरी करून दारुगोळा मिळवणार होता भोरमध्ये दारूगोल्याची जय्यत तयारी केली होती. कोल्हापूरच्या चीमासाहेबांशी संपर्क झाला होता. सातारच्या राण्यांची व बोवासाहेब शिर्के या पोलिस प्रमुखांची समती मिळवून ठेवली होती. उत्तर हिदुस्थानात १२ जून १८५७ हि बंडाची तारीख ठरवण्यात आली होती. तोच मुहूर्त सातारच्या बंडासाठी ठरवण्यात आला. गोसावी वाड्यात शेवटची बैठक होऊन दुध भात साक्षी ठेवून सर्वांनी शपथ घेतली देवाला कौल लावण्यात आला. आरल्याच्या नागाइने अनुकूल तर खरसुंडीच्या देवीने प्रतिकूल कौल दिला. तात्कालीन धेय्य असे होते. सातारा, यवतेश्वर व महाबळेश्वरचे इंग्रजी सैन्य कापून काढणे, तुरुंग फोडून ३०० कैदी मुक्त करणे. इंग्रजांच खजिना लुटणे, सातारच्या गाडीवर प्रताप सिंहाचा दत्तक मुलगा शाहू याला बसवून छत्रपतींची राजवट सुरु करणे. पण दैव अनुकूल नव्हते. १८३१ मध्ये उमाजी नाईक यांच्याशी ज्याने १० हजारासाठी फितुरी केली त्यानेच हि बातमीही भोरच्या राजाने नोकरीवरून कमी केलेल्या एकाकडून इंग्रजांकडे पाठवली फितुराचे नाव नाना चव्हाण असे होते.
2150Loading...
09
Media files
2420Loading...
10
Media files
2581Loading...
11
https://www.instagram.com/reel/C7-uU_no-0K/?igsh=MTVlZXA1eXlrcHNkMw==
2730Loading...
12
https://www.youtube.com/live/QZrgBWLNR9Q?si=m0__vz7ATPgdGn98
2871Loading...
13
Media files
2620Loading...
14
Media files
2270Loading...
15
Media files
2101Loading...
16
धन्यवाद : लोकसत्ता
2120Loading...
17
Media files
2250Loading...
18
Media files
2380Loading...
19
Media files
1850Loading...
20
त्यापलीकडच्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यामुळे शेवटी जे फळ मिळणार ते पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही. पण त्याची खात्री नाही त्यामुळे कर्मच करू नये असे नाही. कधी फळ मिळेल कधी मिळणार नाही. त्याविषयी फार आनंद किंवा फार दुःख करत बसण्यापेक्षा पुढच्या कार्याकडे वळावे. टिळकांना ह्या प्रकारचा संदेश देऊन लोकांना कार्यास प्रवृत्त करायचे होते, त्यांच्यातली उदासीनता, निरुत्साह घालवुन त्यांच्यात स्वाभिमान आणि उत्साह जागवायचा होता. त्यांच्या काळात एक तर विरक्तीच्या विचाराने कुठल्याही गोष्टीत रस न घेणारे लोक किंवा ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारतीय इतिहास, तत्वज्ञान, अध्यात्म सगळेच टाकाऊ वाटणाऱ्या लोकांची संख्या बरीच होती. ब्रिटिशांनी तयार केलेल्या शिक्षण पद्धतीत भारतीय लोकांमध्ये एक न्यूनगंड हमखास तयार होत होता. तो दूर करणे गरजेचे होते. ह्या विषयावर टिळकांनी तुरुंगात जाण्याच्या काही वर्षे आधीपासुन तयारी सुरु केली होती. काही भाषणांमध्ये आपल्या मनात असे घोळत आहे हे बोलुन दाखवले होते. त्याचा आराखडा त्यांनी श्रीपतीबुवा भिंगारकर यांच्याशी चर्चा करून तयार करून ठेवला होता. ब्रिटिश सरकार भारतीय नेत्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना मुद्दाम फार दूरच्या तुरुंगात नेऊन टाकत असे. त्यांचा इतरांशी संपर्क होऊ नये. ते एकटे पडावेत. त्यांना कोणाचाही आधार मिळु नये. आणि त्यांच्या अनुयायांना सुद्धा कसले मार्गदर्शन मिळु नये, त्यांना दिशाहीन वाटावे म्हणुन ते असे सगळ्यांचेच मनोधैर्य खचावे यासाठी असले प्रकार करत. टिळकांना मंडालेला पाठवण्याचा हाच उद्देश होता. पण खचतात ते टिळक कसले. तिथल्या तुरुंगात त्यांनी आपला अभ्यास चालु ठेवुन गीतारहस्याचे काम पूर्ण केले. ज्या स्थितप्रज्ञतेची, मनोधैर्याची शिकवण गीता देते त्यावर ग्रंथ लिहिणाऱ्या टिळकांनी स्वतः हे जगुन दाखवले. ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्या बायकोची तब्येत म्हणावी तशी ठीक नव्हती. मुलांची शिक्षणे चालु होती. तुरुंगातुन ते जी पत्रे लिहीत असत त्यात त्यांच्या प्रकृतीची, मुलांच्या शिक्षणाची त्यांच्या प्रगतीची चौकशी असे. आणि दर वेळी नव्या पुस्तकांची यादी असे. ते आपली पुस्तके कोणालाही देऊ नका असे बजावत असत. टिळक एरवी दुसऱ्यांसाठी जीव देतील पण आपली पुस्तके कोणाला देणार नाहीत, उलट त्यासाठी जीव घेतील असे लोक गमतीने म्हणायचे. गीतेमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, पाश्चात्य तत्वज्ञान आणि तिकडच्या तत्वज्ञांचे विचार या सर्वांचा संदर्भ घेतलेला आहे. वयाच्या पन्नाशी नंतर त्यांनी केवळ पुस्तके वाचुन फ्रेंच आणि जर्मन भाषा पुस्तके समजतील इतपर शिकली. मग हळू हळू या परदेशी भाषांमधल्या ग्रंथांचेही वाचन केले. ते तुरुंगात असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना हि बातमी कळली तेव्हा तेही हादरून गेले. पण तरीही त्यांनी स्वतःला सावरलं आणि मुलांना दुःखात फार वेळ न घालवता त्यातून बाहेर या आणि स्वावलंबी व्हा असा संदेश पाठवला. हे गीतेच्या शिकवणीनुसारच होते. या व्यतिरिक्त त्यांना गणित, अर्थशास्त्र आणि धर्माचा इतिहास यावरही ग्रंथ लिहायचे होते. राजकारणात आणि भारतभर प्रवासात व्यस्त असल्यामुळे हे शक्य झाले नाही. गीतारहस्य तुरुंगात लिहुन पूर्ण झाले असले तरी त्याचे प्रकाशन व्हायला त्यांना शिक्षा पुर्ण होईपर्यंत थांबावे लागले. तुरुंगातून निघताना त्यांना हस्तलिखित आधी सरकारी अधिकाऱ्यांकडे सोपवावे लागले. त्यांच्यावर चिथावणीखोर लेखनाचाच मुख्य आरोप असल्यामुळे अधिकाऱ्यांनी गीतारहस्याचा बारकाईने अभ्यास केला. शेवटी तो एक धार्मिक विषयावरचा ग्रंथ असल्यामुळे त्यातही प्रबोधनाची शक्यता असुनही त्यांना तो अडवता आला नाही. टिळक पुण्यात पोहोचल्यावर तो प्रकाशित झाला. टिळकांनी पहिल्या काही प्रति पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, पंढरपूरचा पांडुरंग आणि त्यांना गुरुस्थानी असलेल्या अण्णासाहेब पटवर्धन यांना अर्पण केल्या. पहिली आवृत्ती लगेच संपली. काही जणांनी तो ग्रंथ देव्हाऱ्यात ठेवला. . लेखक: आकाश खोत
2240Loading...
21
०८ जून १९१५ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले. . टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलं हि गोष्ट सर्वांनाच माहित आहे. आज जाणुन घेऊ हे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं. टिळकांचे वडील विद्वान पंडित होते. स्वतः टिळकांचा संस्कृत आणि धर्मग्रंथाचा फार गाढा अभ्यास होता. त्यांच्यावर महाभारत आणि भगवदगीता यांचा फार प्रभाव होता. ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर विचार करून तर्क मांडणं याची त्यांना आवड होती. टिळकांच्या वेळेस जर इंग्रजांचं राज्य नसतं आणि जर स्वराज्यासाठी लढण्याची एवढी निकड नसती तर कदाचित ते एक शिक्षण, अभ्यास, लेखन यात रमलेले चिंतक झाले असते. गणितातही त्यांना फार प्रगती करणे शक्य होते. आयुष्यभर राजकारण करूनही त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता. धर्मग्रंथ, गणित, ज्योतिषशास्त्र, अर्थशास्त्र, कायदेशास्त्र हे सगळे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांनी लावलेल्या अर्थाच्या आधारे त्यांनी वेदिक संस्कृती आणि आर्य लोक हे मुळचे उत्तर ध्रुवावरच्या प्रदेशातुन इतरत्र पसरले असावेत असा सिद्धांत मांडणारा “दि आर्क्टिक होम इन दि वेदाज” असा ग्रंथ लिहिला. वेदांमधल्या श्लोकातले वर्णन, ज्योतिषशात्राच्या आधारे नक्षत्रांचे गणित मांडून वेदांच्या निर्मितीच्या कालखंडाबाबाबत विवेचन करणारा “ओरायन” हा ग्रंथ लिहिला. गणितात त्यांनी पदवी घेतली होती, आणि ते त्यांनी स्थापन केलेल्या शाळा कॉलेजांमध्ये गणित शिकवतही होते. सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यावर त्यांनी चरितार्थ चालवण्यासाठी लॉ क्लासेस सुरु केले होते. अनेक भावी वकील त्यांच्याकडे शिकले. गीतेवरचा ग्रंथ त्यांनी अचानक तुरुंगात फावल्या वेळात करायचा उद्योग म्हणुन लिहिला नव्हता. असा ग्रंथ लिहिण्याचं त्यांच्या अनेक वर्षांपासुन मनात होतं. राजकारणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. तो सलग वेळ त्यांना तुरुंगात मिळाला आणि त्यांनी तो सत्कारणी लावला. महाभारत आणि गीता यांचा टिळकांवर फार प्रभाव होता. आपल्या भाषण आणि लेखांमध्ये ते अनेकदा यातली वचने वापरत असत. गीतेचा जो अर्थ त्यांनी लावला तेच त्यांचं तत्वज्ञान होतं आणि आयुष्यभर ते ह्याच तत्वानुसार जगले. त्यांना तेच कागदावर मांडायचं होतं. गीतेमधल्या सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक असलेला म्हणजे “कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन”. फळ काय मिळेल याची चिंता न करता कर्म करीत रहा असा याचा रूढ अर्थ आहे. गीतेवर अनेकांनी आपलं भाष्य केलं आहे, त्या आधारे तत्वज्ञान मांडलं आहे. कालांतराने या श्लोकाचा आणि एकंदर गीतेचा एक निष्क्रिय आणि काहीसा नकारात्मक सुर असलेला अर्थ प्रचलित झाला होता. फळाची अपेक्षाच करू नये, फक्त देवाला शरण जावे, भक्ती सोडुन काहीच करू नये, निरपेक्ष काम करत रहावे असा थोडा विरक्ती असलेला अर्थ लोकांमध्ये पसरला होता. उलट गीता हि कर्मप्रधान आहे. कृष्णाने अर्जुनाला युद्ध सोडुन माझी भक्ती कर असे सांगण्यासाठी गीता सांगितली नव्हती. त्याने अर्जुनाला युद्धाला म्हणजे त्याचं कर्तव्य असलेलं कर्म करण्यासाठी प्रवृत्त करायला लिहिली होती आणि कृष्णाची सर्व वचने हि त्याच दिशेने होती याचा विसर पडला होता. कृष्णाने ईश्वरप्राप्तीचे भक्ती आणि कर्म हे दोन्ही मार्ग सांगितले. ईश्वराचे स्मरण ठेवुन, त्याच्याप्रती आदरभाव ठेवुन, आजुबाजुला जे काही ते त्यानेच निर्माण केलं आहे, जे काही चाललंय ते त्याच्या मर्जीने चाललं आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे आणि मला फक्त माझं कर्तव्य करायचं आहे ह्या भावनेने कर्म करत राहिलं तरीही ईश्वरप्राप्ती होईल. कर्माचं जे काही फळ, गुण, दोष असतील ते त्याला अर्पण करून मोकळं व्हायचं आणि पुढच्या कर्माला लागायचं. अर्जुनाला आपल्या स्वकीयांची युद्ध कशाला करायचं, काय मिळणार आहे, स्वकीयांना मारून मिळालेलं राज्य काय करायचं असे प्रश्न पडले होते आणि तो शस्त्रे टाकुन बसला होता. कृष्णाने त्याला आता या क्षणी युद्ध करणं हेच तुझं कर्तव्य आहे, ते सोडणं हेच अयोग्य आहे असं समजावलं होतं. कृष्णाचा अर्थ असा नव्हता कि फळाची अपेक्षाच करू नये. कुठलंही कार्य आपण सुरु करतो तेव्हा त्या कार्याचा काही तरी उद्देश, लक्ष्य असतंच. त्या उद्देशानेच कार्याची सुरूवात होत असते. कोणी एखादं दुकान उघडलं तर वस्तु विकुन पैसे कमावणे हा उद्देश असतो. त्या दृष्टीने विचार आणि तयारी न करता दुकान कोणीही टाकत नसतं. कृष्णाचा अर्थ असा होता कि माणसाच्या हातात कर्म करणं आहे, त्याचं फळ त्याच्या हातात नाही एवढंच. दुकान टाकुन ते चालेलच असं नाही, त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे दुकान चांगलं चालेल किंवा चालणार नाही. त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही. आपलं काम हे आहे कि जे आपल्या हातात आहे त्या सर्वांची काळजी घेणं, त्यासाठी मेहनत करणं.
1990Loading...
22
Media files
1700Loading...
23
आधुनिक इतिहास प्र. एप्रिल 1947 मध्ये भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून पेथिक लॉरेन्स यांची जागा कोणी घेतली? एप्रिल 1947 मध्ये पॅट्रिक लॉरेन्स यांच्यानंतर भारताचे राज्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? (1) सर सिरिल रॅडक्लिफ (2) लॉर्ड लिस्टोवेल (3) लॉर्ड एचिनलेक (4) लॉर्ड इस्मय
2030Loading...
24
प्र. विजयनगर साम्राज्यात अंदाजे 90,000 माणसे शस्त्र बाळगण्यास योग्य होती असे खालील परदेशी प्रवाशांपैकी कोणी लिहिले? राज्यसेवा पूर्व साठी उपयुक्त प्रश्न : खालीलपैकी कोणत्या परदेशी प्रवाशाने लिहिले आहे की विजयनगर साम्राज्यातील सुमारे 90000 लोक शस्त्रे उचलण्यास सक्षम होते? (1) न्युनिझ (2) स्टेफानो (3) निकिटि (4) निकोलो कॉन्टी
1990Loading...
25
भाऊ दाजी लाड 150पुण्यतिथी
2140Loading...
26
Media files
1900Loading...
27
350वर्ष शिवराज्याभिषेक
1930Loading...
28
०६ जून १९६९: वि. स. पागे समितीच्या शिफारशी नुसार, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली. . काँग्रेस नेते श्री वि.स.पागे , अत्यंत संयमी, शांत असे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व होते. “रोजगार हमी योजने’च्या कल्पनेबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. महाराष्ट्रात साधारण १९७१ ते १९७४ या कालावधीमध्ये दुष्काळ पडला होता. यावेळी शेतकरी व कामकरी यांची परिस्थिती गंभीर झाली होती. दुष्काळाच्या या परिस्थितीचा विचार करीत ते एकदा आपल्या घरी झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले, “प्रभा, घरात पैसे किती आहेत?’ प्रभाताईंनी सांगितले की, “सातशे रुपये आहेत.’ “त्यावर त्यांनी विचारणा केली, “सातशे रुपयांत शेतावर किती गडी राबू शकतील?’ घरातून सांगण्यात आले की, “वीस दिवस चौदा-पंधरा गडी सहज लावता येतील.’ मग काय त्यांनी थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाच पत्र लिहायला घेतलं. त्यातील मजकूर असा होता. “माननीय मुख्यमंत्री साहेब, माझ्या शेतावर सातशे रुपयांत चौदा-पंधरा दिवस वीस गडी मजुरीला लावता आले. शंभर कोटी रुपये बाजूला काढलेत, तर किती मजुरांना काम देता येईल?’ रोजगार हमी योजनेचा जन्म या चार ओळींमध्ये झाला. वसंतराव नाईक यांनी लगेचच पागे यांना बोलावून घेतले. नेमकं काय करायला हवं ते सगळं विचारून घेतलं. योजना फारच छान होती. पण शंभर कोटी रुपये कुठून आणायचे? या प्रश्‍नाने मुख्यमंत्री चिंतेत पडले. त्यावेळी शंभर कोटी रुपये खूप मोठी रक्‍कम होती. त्यांनी या विषयावर विरोधी पक्षनेत्यांसह खास बैठक बोलावली. या बैठकीत त्यावेळचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप उपस्थित होते. ते म्हणाले, “नाईकसाहेब, गरिबांना काम देत असाल तर या योजनेसाठी शंभर कोटी रुपये उभे करण्यासाठी विधानसभेत आम्ही कर प्रस्ताव घेऊन येतो.’ जगाच्या संसदीय लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाला संपूर्णपणे मदत करण्यासाठी “कर प्रस्ताव’ आणण्याची भूमिका सर्वप्रथम महाराष्ट्रातच घेतली गेली. पागे व नाईक दोघेही ग्रामीण भागातील असल्याने त्यांना शेतकरी व कामकरी यांच्या प्रश्‍नांची चांगली जाण असल्यामुळे रोजगारनिर्मिती व त्यातून विकास साधण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली. रस्ते, पाझर तलाव, नाला बंडिंग, विहिरी अशा प्रकारची कामे सुरू झाली. . (संदर्भ-श्री माधव विद्वांस यांच्या कै. श्री वि.स.पागे यांच्या वरील लेखातून साभार)
2431Loading...
29
Media files
2330Loading...
30
Media files
3161Loading...
31
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी  (जन्म १८ मार्च १८८१) यांचा आज  स्मृतीदिन (मृत्यू: ०३ जून १९५६). . जोशी, वीर वामनराव : (१८ मार्च१८८१–३ जून १९५६). मराठी पत्रकारआणि नाटककार. पूर्ण नाव वामन गोपाळ जोशी. त्यांचा जन्म अमरावतीचा. १८९९ मध्ये मॅट्रिक झाले. काही काळ नोकरी केली परंतु देशभक्तीची प्रेरणा निर्णायक ठरून धडाडीने राजकारणात पडले. राष्ट्रमत  ह्या दैनिकात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून त्यांनी काम केले. लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा ते पुरस्कार करू लागले. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. १९२० नंतर महात्मा गांधींच्या राजकारणात ते सहभागी झाले. असहकारितेच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल आणि सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना अनुक्रमे दीड व दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या (१९२३ १९३०). लोकजागृतीसाठी त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थान  हे साप्ताहिक चालविले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. ‘वीर वामनराव जोशी’ ह्या नावानेच त्यांना जनता ओळखत असे. त्यांनी काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांपैकी खुबसुरत बला  ह्या उर्दू नाटकावर आधारित राक्षसी महत्त्वाकांक्षा ( १९१४) व रणदुंदुभि (१९२७) ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांतील काही पदे–उदा., ‘मी नवबाला’ (राक्षसी महत्त्वाकांक्षा ) आणि ‘परवशतापाश दैवे’ रणदुंदुभि )- अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांची ही नाटके थोडीफार भडक असली, तरी जनतेच्या मनावर राष्ट्रभक्तीचा संदेश जोरकसपणे ठसविणारी असल्यामुळे विशेष गाजली. अमरावती येथे ते निधन पावले.                                                   लेखक-मालशे, स. गं. (संदर्भ-मराठी विश्वकोश)
3930Loading...
32
वीर वामनराव जोशी
2950Loading...
33
Media files
2960Loading...
34
राज्यसेवा साठी उपयुक्त
2680Loading...
35
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख
2612Loading...
36
'केसरी' मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - 'बॉम्ब-गोळ्याचे रहस्य'. . 02-June-1908 (मंगळवार) - आजच्या दिवशी, लोकमान्य टिळकांचा 'केसरी' मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - 'बॉम्ब-गोळ्याचे रहस्य'. . या लेखात लोकमान्य टिळक म्हणतात -'पाश्चात्य विज्ञानाने बॉम्बगोळे तयार केले....सरकारचे सैनिकी सामर्थ्य बॉम्बद्वारे उद्धवस्थ होते....परंतु बॉम्बमुळे सरकारचे लक्ष अव्यवस्थेवर खिळून राहते आणि सैनिकी सामर्थ्याच्या अभिमानामुळे ती टिकून राहते'.बॉम्बचं प्रतीकात्मक महत्व लोकमान्य टिळकांनी पुढील शब्दांतून उलगडून दाखवलं -'अधिकारी वर्ग लोकांवर विनाकारण दरारा गाजवू लागतो आणि लोकांना अनावश्यकपणे घाबरून त्यांच्यात निराशा उत्पन्न करण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा दडपशाहीच्या अशा अनुदार धोरणांचा विनातक्रार मान राखण्याची दुर्बल अवस्था ओलांडून लोक पुढच्या टप्य्यात गेले आहेत, ही सत्य परिस्थिती अधिकाऱ्यांच्या कानांवर घालण्यासाठी बॉम्बगोळ्याचा आवाज उत्स्फुर्तपणे केला जातो'. . या आणि इतर संबंधित लेखात लोकमान्य टिळकांनी हिंसाचाराचा धिक्कार केला; पण लोकांच्या नैसर्गिक इच्छांचं दमन करणारं धोरण सरकारने राबवलं, त्यामुळे हिंसाचार अपरिहार्य झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. टिळकांनी त्यांच्या नेहेमीच्या रोखठोक शैलीत मतं मांडली.या संदर्भात, त्यांच्या लेखांची तुलना 'काळ' वृत्तपत्राचे संपादक प्रा. शिवराम महादेव परांजपे याच्या लेखांशी करणं रोचक ठरेल. टिळकांची आणि परांजप्यांची स्वभाववृत्ती भिन्न असली, तरी टिळकांनी परांजप्यांबद्दल अत्यंत आत्मीयता वाटत असे आणि त्यांचे अनेक विचार पटत नसतानाही महाराष्ट्रातील राजकीय चळवळींमध्ये परांजप्यांचं योगदान लक्षणीय असल्याचं टिळकांच्या निश्चितपणे लक्षात आलं होत. परांजप्यांच्या तुलनेत टिळकांच्या लेखांमधील शब्दप्रयोग कमीकठोर असले तरी परांजप्यांच्या लेखनापेक्षा टिळकांच्या लेखांचा लोकमतावरील प्रभाव खूप जास्त होता. . वृत्तपत्रचं कार्य पवित्र विश्वास जपणारं असतं, असं टिळक मानीत होते. प्रत्येक महत्वाच्या प्रशांवर लोकमत जागृत करण्याचं कर्तव्य बजावण्यात आणि प्रत्येक महत्वाच्या घटनेवेळी लोकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोचवण्यात त्यांनी कधीही कसूर केली नाही. त्यामुळे, बॉम्बस्फोटाच्या घटनेवर त्यांनी 'केसरी' मध्ये पाच अग्रलेख लिहिले. दरम्यान 'हिंदस्वराज्य', 'विहारी' व 'अरुणोदय' या वृत्तपत्रांच्या संपादकांविरुद्ध राजद्रोहाचा खटले चालवण्यात आले. परंतु, अशा कारवायांनी 'केसरी'ने नमते घेतले नाही. लोकशिक्षणाचं व लोकभावना व्यक्त करण्याचं कर्तव्य लोकमान्य टिळक बजावतात राहिले. . धंदा म्हणून चालणारी वृत्तपत्रे त्या वेळीहि काही कमी नव्हती. १८२२ साली महाराष्ट्रात छापखाना निघाला. मुंबई इलाख्यात तेव्हा देशी भाषेतील ७१ वृत्तपत्रे होती, त्यापैकी मराठी ३४ होती. त्यातील ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, ज्ञानोदय, दीनबंधु ही पत्रे विशेष प्रसिद्ध होती. 'ज्ञानप्रकाश' च्या लेखकवर्गात कृष्णशास्त्री चिपळूणकर, न्या. रानडे इत्यादि प्रतिष्ठित मंडळी असत. त्याचा जन्म १८४९ साली झाला. त्यावेळी जशा अँग्लो- व्हर्नाक्युलर शाळा असत तशीच ज्ञानप्रकाश, इंदु- प्रकाश, वगैरे दहा अँग्लो-मराठी वृत्तपत्रे निघत. पण राष्ट्रीय स्वातंत्र्य हे 'साध्य' व लोकजागृति हे 'साधन' असा निश्चय करून १८८१ मध्ये निघालेले 'केसरी' हे पहिलेच पत्र होय. . 🇮🇳🙏🇮🇳
3520Loading...
37
Media files
4102Loading...
38
उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा आज जन्मदिन (जन्म: २८ मे १९०३) (मृत्यू २४ एप्रिल १९९४) . किर्लोस्कर, शंतनू लक्ष्मण उद्योजक जन्मदिनांक : २८ मे १९०३ मृत्युदिनांक : २४ एप्रिल १९९४ कार्यक्षेत्र : विज्ञान-तंत्रज्ञान जन्मस्थळ : सोलापुर शंतनु लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूरला झाला. शालेय शिक्षण औंध येथे झाले आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ साली प्राप्त केली. पारतंत्र्याच्या काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्रनिर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योगसमूह म्हणूनच ‘किर्लोस्कर उद्योग समूहा’ची ओळख करून द्यायला हवी. ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ ही भारतातील पहिली कंपनी, की ज्यांनी स्वत:चेच गुणवत्ता मापदंड निश्चित करून ‘चारा कापण्याचे यंत्र’ आणि ‘लोखंडी नांगर’ अशी दोन अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे, त्या काळी अशाच प्रकारच्या ब्रिटिश अवजारांशी स्पर्धा करून ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे नाव सातासमुद्रापलीकडे प्रसिद्धी पावले. भारतात जणू स्वदेशी यंत्रयुगाला सुरुवात झाली. शेंगदाण्याची टरफले काढणारे यंत्र, उसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचा पंप, अशा हातयंत्रांची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय उद्योगजगतात किर्लोस्कर कंपनीने क्रांतीच घडवून आणली. आता गरज होती ती या यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची. हेही आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योगजगतात स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली. डीझेल इंजीन, कोलगॅस जनरेटर्स, विद्युत मोटर अशा स्वदेशी यंत्रांच्या साहाय्याने भारतीय उद्योगात चैतन्याचे वारे वाहू लागले, त्याला एक वेगळीच गती प्राप्त झाली. पंप आणि झडपा (व्हाल्व्ह्स) तयार करणारा सर्वांत मोठा भारतीय उद्योगसमूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स उदयाला आला. जागतिक युद्धकालीन परिस्थितीत भारतीय उद्योगांची अवस्था खूपच बिकट झाली होती. आमच्याकडे स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव आणि ब्रिटिश सरकारने ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारतात पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेत किर्लोस्करचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतीने ‘मशीन टूल्स’ तयार करण्याचा धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित केले. शेतीची अवजारे बनवणारे किर्लोस्कर, मशीन टूल्सकडे वळले हे भारतीय उद्योगजगतातील क्रांतिकारक वळणच म्हणायला हवे. यासाठी त्यांनी ‘हरिहर’ येथे ‘मैसूर किर्लोस्कर लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली. या कामी मैसूरचे महाराजा त्यांना हितचिंतक म्हणून लाभले. त्या वेळी तयार केलेली सातही ‘लेथ मशीन्स’ हातोहात विकली गेली. भारताची वाटचाल वसाहतवादाकडून स्वातंत्र्याकडे सुरू झाली. १९४० साली भारताचे राजकीय वातावरण बदलले. महाराजांच्या आशीर्वादाची आता गरज उरली नाही. भारताचे औद्योगिक धोरण बदलले आणि त्याचा किर्लोस्कर ग्रूपला खूपच मोठा फायदा झाला. शंतनुराव किर्लोस्कर यांनी अखेर पुणे गाठले आणि डीझेल इंजीन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. उद्योग उभारण्यासाठी पुणे येथे जमीन मिळविण्यासाठी त्यांना जनतेच्या विरोधाला आणि नोकरशाहीवृत्तीला तोंड द्यावे लागले. माणसापेक्षा उद्योगधंद्यांचे आयुष्य दीर्घकालीन असते असे लोकांना पटवून शंतनुरावांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड’साठी जागा मिळवली. यासाठी त्यांना ‘असोसिएटेड ब्रिटिश ऑइल इंजीन एक्स्पोर्ट लिमिटेड’ या इंग्लंडच्या कंपनीशी करार करावा लागला. या करारानंतर तब्बल एका वर्षाने किर्लोस्करांना जागा ताब्यात मिळाली. परदेशी कंपनीशी करार करून तंत्रज्ञानाची दरी ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर’द्वारा भरून काढण्याचा प्रयत्न करणारा पहिला भारतीय उद्योगपती म्हणून शंतनुरावांचे नाव घ्यायला हवे. १९४६ साली किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड कंपनी अस्तित्वात आली आणि या कंपनीने भारताला पहिले स्वदेशी असे ‘व्हर्टिकल हाय स्पीड इंजीन’ प्रदान केले. हे पहिले इंजीन खरेदी करणारे ब्रिजलाल सारडा यांनी ४० वर्षे हे इंजीन उत्तम चालल्याची पावतीसुद्धा दिली आहे. विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते, ते १९४६ साली पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने १० हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड उद्योग सुरू केला. पुढे १९५८ साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनुरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळला. इंग्लंडच्या ब्रूम अ‍ॅण्ड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने एअर कॉम्प्रेसर्स आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू केले.
3950Loading...
39
आज अमेरिकेच्या ‘ट्वि डिस्क’ या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिकने टॉर्क इन्व्हर्टर्स, मरीन गिअर बॉक्स आणि रेल ट्रॅक्शन ट्रान्समिशन्स यांचेदेखील उत्पादन सुरू केले आहे. आता मात्र किर्लोस्कर उद्योगाच्या एवढ्या प्रचंड ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा उपयोग भारतातील उदयोन्मुख उद्योजकांना होणे गरजेचे होते. यातूनच १९६३ साली ‘किर्लोस्कर कन्सल्टंट्स लिमिटेड’ ही कंपनी उदयाला आली. गेल्या २५ वर्षांत किर्लोस्कर समूहाने संरक्षण, पर्यावरण, रस्ते आणि शेती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. १९६४ साली किर्लोस्कर समूहाने सेवा उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. ‘पुणे इंडस्ट्रियल हॉटेल लिमिटेड’ कंपनीतर्फे पुण्यात ‘हॉटेल ब्लू डायमंड’ आणि कोल्हापुरात ‘हॉटेल पर्ल’ सेवाक्षेत्रात रुजू झाले. यातूनच पुढे ‘बेकर्स बास्केट कन्फेक्शनरी चेन’ आणि ‘हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या सेवा संस्था अस्तित्वात आल्या. आज शेती, पाणीपुरवठा, ऊर्जा आणि शेतकीकरण या क्षेत्रांत किर्लोस्कर समूहाने कमावलेल्या नावाचे श्रेय शंतनुराव किर्लोस्कर यांनाच जाते. किर्लोस्कर उद्योग समूहाचा व्याप त्यांनी देशी-परदेशी वाढवल्याने ते केवळ किर्लोस्कर समूहाचे नेते नव्हते, तर पुण्यात ज्यांना उद्योग करायचा, त्या सर्वांना ते सल्ला देत. त्यासाठी त्यांनी वेगळे खातेच सुरू केले होते. ते वेगवेगळ्या वीस कंपन्यांच्या संचालक मंडळांवर होते. १९६५-१९६६ साली भारतीय उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. ‘बोर्ड ऑफ ट्रेड’वर ते सल्लागार होते. ‘इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षणसंस्थेचे ते १५ वर्षे अध्यक्ष होते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. लेखक - डॉ. रंजन गर्गे
5120Loading...
40
शांतनुराव किर्लोस्कर
2320Loading...
राज्यसेवा मुख्य साठी उपयुक्त☝️
Показать все...
मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५) यांचा आज स्मृतिदिन. (१४ जून १९१६:) निर्दोष कलाकृती नसली, तरी अस्सल वातावरण, जिवंत स्वभावचित्रण, सुटसुटीत व मार्मिक संवाद, प्रासादिक पद्यरचना आणि सहजसुंदर विनोद या बाबतींत ती बिनतोड ठरावी. संशयकल्लोळ या हटकून रंगणाऱ्या सुखात्मिकेवरुन देवलांच्या असाधारण रूपांतरकौशल्याची साक्ष पटते. देवलांनी रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ द कोर्ट ऑफ लंडन ह्या कादंबरीवरून लंदनरहस्य, पूर्वार्ध भा. १ (१८९४) ही कादंबरी व पुणे वैभव पत्रात प्रचलित विषयावर स्फुटलेखन केले होते. अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचे लेखन आणि स्वाभाविक अभिनयशिक्षण या द्विविध प्रकारे रंगभूमीशी तादात्म्य पावून देवलांनी जी रंगभूमीची सेवा केली, ती चिरंतन स्वरूपाची आहे. शेवटी काही वर्षे देवल रंगभूमीवरून निवृत्त झाले होते. मधुमेहाच्या विकाराने त्यांचे मिरज येथे देहावसान झाले. संदर्भ : बनहट्टी, श्री. ना. नाट्याचार्य देवल, पुणे, १९६७. लेखक-मालशे, स. गं.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram