cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

HiSTORY by Hardikar

Больше
Рекламные посты
1 493
Подписчики
Нет данных24 часа
+47 дней
+1630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

01:47
Видео недоступноПоказать в Telegram
167369403_1444320599622891_5443994123108263997_n.mp418.22 MB
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी  (जन्म १८ मार्च १८८१) यांचा आज  स्मृतीदिन (मृत्यू: ०३ जून १९५६). . जोशी, वीर वामनराव : (१८ मार्च१८८१–३ जून १९५६). मराठी पत्रकारआणि नाटककार. पूर्ण नाव वामन गोपाळ जोशी. त्यांचा जन्म अमरावतीचा. १८९९ मध्ये मॅट्रिक झाले. काही काळ नोकरी केली परंतु देशभक्तीची प्रेरणा निर्णायक ठरून धडाडीने राजकारणात पडले. राष्ट्रमत  ह्या दैनिकात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून त्यांनी काम केले. लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा ते पुरस्कार करू लागले. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. १९२० नंतर महात्मा गांधींच्या राजकारणात ते सहभागी झाले. असहकारितेच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल आणि सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना अनुक्रमे दीड व दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या (१९२३ १९३०). लोकजागृतीसाठी त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थान  हे साप्ताहिक चालविले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. ‘वीर वामनराव जोशी’ ह्या नावानेच त्यांना जनता ओळखत असे. त्यांनी काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांपैकी खुबसुरत बला  ह्या उर्दू नाटकावर आधारित राक्षसी महत्त्वाकांक्षा ( १९१४) व रणदुंदुभि (१९२७) ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांतील काही पदे–उदा., ‘मी नवबाला’ (राक्षसी महत्त्वाकांक्षा ) आणि ‘परवशतापाश दैवे’ रणदुंदुभि )- अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांची ही नाटके थोडीफार भडक असली, तरी जनतेच्या मनावर राष्ट्रभक्तीचा संदेश जोरकसपणे ठसविणारी असल्यामुळे विशेष गाजली. अमरावती येथे ते निधन पावले.                                                   लेखक-मालशे, स. गं. (संदर्भ-मराठी विश्वकोश)
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
वीर वामनराव जोशी
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
राज्यसेवा साठी उपयुक्त
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख
Показать все...
'केसरी' मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - 'बॉम्ब-गोळ्याचे रहस्य'. . 02-June-1908 (मंगळवार) - आजच्या दिवशी, लोकमान्य टिळकांचा 'केसरी' मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - 'बॉम्ब-गोळ्याचे रहस्य'. . या लेखात लोकमान्य टिळक म्हणतात -'पाश्चात्य विज्ञानाने बॉम्बगोळे तयार केले....सरकारचे सैनिकी सामर्थ्य बॉम्बद्वारे उद्धवस्थ होते....परंतु बॉम्बमुळे सरकारचे लक्ष अव्यवस्थेवर खिळून राहते आणि सैनिकी सामर्थ्याच्या अभिमानामुळे ती टिकून राहते'.बॉम्बचं प्रतीकात्मक महत्व लोकमान्य टिळकांनी पुढील शब्दांतून उलगडून दाखवलं -'अधिकारी वर्ग लोकांवर विनाकारण दरारा गाजवू लागतो आणि लोकांना अनावश्यकपणे घाबरून त्यांच्यात निराशा उत्पन्न करण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा दडपशाहीच्या अशा अनुदार धोरणांचा विनातक्रार मान राखण्याची दुर्बल अवस्था ओलांडून लोक पुढच्या टप्य्यात गेले आहेत, ही सत्य परिस्थिती अधिकाऱ्यांच्या कानांवर घालण्यासाठी बॉम्बगोळ्याचा आवाज उत्स्फुर्तपणे केला जातो'. . या आणि इतर संबंधित लेखात लोकमान्य टिळकांनी हिंसाचाराचा धिक्कार केला; पण लोकांच्या नैसर्गिक इच्छांचं दमन करणारं धोरण सरकारने राबवलं, त्यामुळे हिंसाचार अपरिहार्य झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. टिळकांनी त्यांच्या नेहेमीच्या रोखठोक शैलीत मतं मांडली.या संदर्भात, त्यांच्या लेखांची तुलना 'काळ' वृत्तपत्राचे संपादक प्रा. शिवराम महादेव परांजपे याच्या लेखांशी करणं रोचक ठरेल. टिळकांची आणि परांजप्यांची स्वभाववृत्ती भिन्न असली, तरी टिळकांनी परांजप्यांबद्दल अत्यंत आत्मीयता वाटत असे आणि त्यांचे अनेक विचार पटत नसतानाही महाराष्ट्रातील राजकीय चळवळींमध्ये परांजप्यांचं योगदान लक्षणीय असल्याचं टिळकांच्या निश्चितपणे लक्षात आलं होत. परांजप्यांच्या तुलनेत टिळकांच्या लेखांमधील शब्दप्रयोग कमीकठोर असले तरी परांजप्यांच्या लेखनापेक्षा टिळकांच्या लेखांचा लोकमतावरील प्रभाव खूप जास्त होता. . वृत्तपत्रचं कार्य पवित्र विश्वास जपणारं असतं, असं टिळक मानीत होते. प्रत्येक महत्वाच्या प्रशांवर लोकमत जागृत करण्याचं कर्तव्य बजावण्यात आणि प्रत्येक महत्वाच्या घटनेवेळी लोकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोचवण्यात त्यांनी कधीही कसूर केली नाही. त्यामुळे, बॉम्बस्फोटाच्या घटनेवर त्यांनी 'केसरी' मध्ये पाच अग्रलेख लिहिले. दरम्यान 'हिंदस्वराज्य', 'विहारी' व 'अरुणोदय' या वृत्तपत्रांच्या संपादकांविरुद्ध राजद्रोहाचा खटले चालवण्यात आले. परंतु, अशा कारवायांनी 'केसरी'ने नमते घेतले नाही. लोकशिक्षणाचं व लोकभावना व्यक्त करण्याचं कर्तव्य लोकमान्य टिळक बजावतात राहिले. . धंदा म्हणून चालणारी वृत्तपत्रे त्या वेळीहि काही कमी नव्हती. १८२२ साली महाराष्ट्रात छापखाना निघाला. मुंबई इलाख्यात तेव्हा देशी भाषेतील ७१ वृत्तपत्रे होती, त्यापैकी मराठी ३४ होती. त्यातील ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, ज्ञानोदय, दीनबंधु ही पत्रे विशेष प्रसिद्ध होती. 'ज्ञानप्रकाश' च्या लेखकवर्गात कृष्णशास्त्री चिपळूणकर, न्या. रानडे इत्यादि प्रतिष्ठित मंडळी असत. त्याचा जन्म १८४९ साली झाला. त्यावेळी जशा अँग्लो- व्हर्नाक्युलर शाळा असत तशीच ज्ञानप्रकाश, इंदु- प्रकाश, वगैरे दहा अँग्लो-मराठी वृत्तपत्रे निघत. पण राष्ट्रीय स्वातंत्र्य हे 'साध्य' व लोकजागृति हे 'साधन' असा निश्चय करून १८८१ मध्ये निघालेले 'केसरी' हे पहिलेच पत्र होय. . 🇮🇳🙏🇮🇳
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
आज अमेरिकेच्या ‘ट्वि डिस्क’ या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिकने टॉर्क इन्व्हर्टर्स, मरीन गिअर बॉक्स आणि रेल ट्रॅक्शन ट्रान्समिशन्स यांचेदेखील उत्पादन सुरू केले आहे. आता मात्र किर्लोस्कर उद्योगाच्या एवढ्या प्रचंड ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा उपयोग भारतातील उदयोन्मुख उद्योजकांना होणे गरजेचे होते. यातूनच १९६३ साली ‘किर्लोस्कर कन्सल्टंट्स लिमिटेड’ ही कंपनी उदयाला आली. गेल्या २५ वर्षांत किर्लोस्कर समूहाने संरक्षण, पर्यावरण, रस्ते आणि शेती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. १९६४ साली किर्लोस्कर समूहाने सेवा उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. ‘पुणे इंडस्ट्रियल हॉटेल लिमिटेड’ कंपनीतर्फे पुण्यात ‘हॉटेल ब्लू डायमंड’ आणि कोल्हापुरात ‘हॉटेल पर्ल’ सेवाक्षेत्रात रुजू झाले. यातूनच पुढे ‘बेकर्स बास्केट कन्फेक्शनरी चेन’ आणि ‘हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या सेवा संस्था अस्तित्वात आल्या. आज शेती, पाणीपुरवठा, ऊर्जा आणि शेतकीकरण या क्षेत्रांत किर्लोस्कर समूहाने कमावलेल्या नावाचे श्रेय शंतनुराव किर्लोस्कर यांनाच जाते. किर्लोस्कर उद्योग समूहाचा व्याप त्यांनी देशी-परदेशी वाढवल्याने ते केवळ किर्लोस्कर समूहाचे नेते नव्हते, तर पुण्यात ज्यांना उद्योग करायचा, त्या सर्वांना ते सल्ला देत. त्यासाठी त्यांनी वेगळे खातेच सुरू केले होते. ते वेगवेगळ्या वीस कंपन्यांच्या संचालक मंडळांवर होते. १९६५-१९६६ साली भारतीय उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. ‘बोर्ड ऑफ ट्रेड’वर ते सल्लागार होते. ‘इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षणसंस्थेचे ते १५ वर्षे अध्यक्ष होते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. लेखक - डॉ. रंजन गर्गे
Показать все...
उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा आज जन्मदिन (जन्म: २८ मे १९०३) (मृत्यू २४ एप्रिल १९९४) . किर्लोस्कर, शंतनू लक्ष्मण उद्योजक जन्मदिनांक : २८ मे १९०३ मृत्युदिनांक : २४ एप्रिल १९९४ कार्यक्षेत्र : विज्ञान-तंत्रज्ञान जन्मस्थळ : सोलापुर शंतनु लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूरला झाला. शालेय शिक्षण औंध येथे झाले आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ साली प्राप्त केली. पारतंत्र्याच्या काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्रनिर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योगसमूह म्हणूनच ‘किर्लोस्कर उद्योग समूहा’ची ओळख करून द्यायला हवी. ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ ही भारतातील पहिली कंपनी, की ज्यांनी स्वत:चेच गुणवत्ता मापदंड निश्चित करून ‘चारा कापण्याचे यंत्र’ आणि ‘लोखंडी नांगर’ अशी दोन अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे, त्या काळी अशाच प्रकारच्या ब्रिटिश अवजारांशी स्पर्धा करून ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे नाव सातासमुद्रापलीकडे प्रसिद्धी पावले. भारतात जणू स्वदेशी यंत्रयुगाला सुरुवात झाली. शेंगदाण्याची टरफले काढणारे यंत्र, उसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचा पंप, अशा हातयंत्रांची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय उद्योगजगतात किर्लोस्कर कंपनीने क्रांतीच घडवून आणली. आता गरज होती ती या यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची. हेही आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योगजगतात स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली. डीझेल इंजीन, कोलगॅस जनरेटर्स, विद्युत मोटर अशा स्वदेशी यंत्रांच्या साहाय्याने भारतीय उद्योगात चैतन्याचे वारे वाहू लागले, त्याला एक वेगळीच गती प्राप्त झाली. पंप आणि झडपा (व्हाल्व्ह्स) तयार करणारा सर्वांत मोठा भारतीय उद्योगसमूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स उदयाला आला. जागतिक युद्धकालीन परिस्थितीत भारतीय उद्योगांची अवस्था खूपच बिकट झाली होती. आमच्याकडे स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव आणि ब्रिटिश सरकारने ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारतात पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेत किर्लोस्करचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतीने ‘मशीन टूल्स’ तयार करण्याचा धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित केले. शेतीची अवजारे बनवणारे किर्लोस्कर, मशीन टूल्सकडे वळले हे भारतीय उद्योगजगतातील क्रांतिकारक वळणच म्हणायला हवे. यासाठी त्यांनी ‘हरिहर’ येथे ‘मैसूर किर्लोस्कर लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली. या कामी मैसूरचे महाराजा त्यांना हितचिंतक म्हणून लाभले. त्या वेळी तयार केलेली सातही ‘लेथ मशीन्स’ हातोहात विकली गेली. भारताची वाटचाल वसाहतवादाकडून स्वातंत्र्याकडे सुरू झाली. १९४० साली भारताचे राजकीय वातावरण बदलले. महाराजांच्या आशीर्वादाची आता गरज उरली नाही. भारताचे औद्योगिक धोरण बदलले आणि त्याचा किर्लोस्कर ग्रूपला खूपच मोठा फायदा झाला. शंतनुराव किर्लोस्कर यांनी अखेर पुणे गाठले आणि डीझेल इंजीन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. उद्योग उभारण्यासाठी पुणे येथे जमीन मिळविण्यासाठी त्यांना जनतेच्या विरोधाला आणि नोकरशाहीवृत्तीला तोंड द्यावे लागले. माणसापेक्षा उद्योगधंद्यांचे आयुष्य दीर्घकालीन असते असे लोकांना पटवून शंतनुरावांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड’साठी जागा मिळवली. यासाठी त्यांना ‘असोसिएटेड ब्रिटिश ऑइल इंजीन एक्स्पोर्ट लिमिटेड’ या इंग्लंडच्या कंपनीशी करार करावा लागला. या करारानंतर तब्बल एका वर्षाने किर्लोस्करांना जागा ताब्यात मिळाली. परदेशी कंपनीशी करार करून तंत्रज्ञानाची दरी ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर’द्वारा भरून काढण्याचा प्रयत्न करणारा पहिला भारतीय उद्योगपती म्हणून शंतनुरावांचे नाव घ्यायला हवे. १९४६ साली किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड कंपनी अस्तित्वात आली आणि या कंपनीने भारताला पहिले स्वदेशी असे ‘व्हर्टिकल हाय स्पीड इंजीन’ प्रदान केले. हे पहिले इंजीन खरेदी करणारे ब्रिजलाल सारडा यांनी ४० वर्षे हे इंजीन उत्तम चालल्याची पावतीसुद्धा दिली आहे. विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते, ते १९४६ साली पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने १० हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड उद्योग सुरू केला. पुढे १९५८ साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनुरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळला. इंग्लंडच्या ब्रूम अ‍ॅण्ड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने एअर कॉम्प्रेसर्स आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू केले.
Показать все...