ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 114
Подписчики
-124 часа
+37 дней
-3430 дней
Архив постов
CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे चेतन ताम्हणकर आणि पल्लवी ताम्हणकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे हितेंद्रसिंह यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

CMO Maharashtra Tweets: महाराष्ट्राला जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला. मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास, सरकार आणि उद्योग यांच्या सहकार्यातून साकारला जाणारा ‘इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याला जागतिक संधींची जोड मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिकतेची जागतिक स्तरावर ओळख आहे. रत्न व आभूषण उद्योगासाठी आवश्यक असलेले कुशल कारागीर, उद्योजकता, व्यापाराचे अनुभवसंपन्न जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. बदलत्या जागतिक व्यापाराशी जुळवून घेण्याचे आवाहन जागतिक स्तरावरील बदलती परिस्थिती आणि अमेरिका व चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांनी बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ या बदलांना सामोरे जाण्यासाठी दागिने उद्योगाला आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. इंडिया ज्वेलरी पार्क उद्योगाच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा महापे येथील 22 एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजपासून 30 ते 40 वर्षांनंतर मागे वळून पाहताना ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे निश्चितपणे स्मरण केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उद्योगांना आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उद्योग उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या कामात कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल. तसेच उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सरकार आणि उद्योग यांच्यातील समन्वय व भागीदारी महत्त्वाची असून, उद्योगांच्या गरजा समजून घेऊन आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत महाराष्ट्राचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्रही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’सारखे प्रकल्प या आर्थिक वाटचालीला बळ देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #IndiaJewelleryPark

photo content

photo content
+1

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra’s Next Growth Story Begins with NAINA Glad to commence development works in the NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) Region, distribute property cards to landholders and inaugurate key connectivity projects in Navi Mumbai today. The inauguration of basic infrastructure projects under CIDCO’s NAINA marks another significant step towards Maharashtra’s development. The Navi Mumbai International Airport will act as a major economic catalyst, boost the region’s GDP and accelerate integrated development around the airport. NAINA, the 3rd Mumbai, is set to emerge as a major growth engine for Maharashtra, creating substantial employment opportunities. The planned development of the NAINA region aims to generate approximately 15 lakh employment opportunities, including 5 lakh high-paying jobs, creating significant opportunities for Maharashtra’s workforce. The inauguration of three major bridges, SBR-9, BR-4 and BR-5, built by CIDCO at a cost of ₹953 crore marks a significant step towards faster, smoother and seamless connectivity to the Navi Mumbai International Airport from the eastern side. Built across Panvel Creek, these bridges will provide direct eastern connectivity from Pune, Panvel, Thane and Kalyan via National Highway 4B to the Navi Mumbai International Airport, Ulwe Coastal Road, Mumbai Trans Harbour Link (MTHL) and Amra Marg. To address the concerns of farmers and landholders, granted CIDCO special powers to rectify overlapping plots, incorrect plot numbers and errors in ownership records, despite the general limitations on revising a final development plan. This step ensures that genuine discrepancies are addressed and the concerns of project-affected people are resolved. With the proposed EduCity, MediCity, Sports City, AeroCity and Knowledge City concepts, NAINA is poised to create new economic and social opportunities, while Thane, Navi Mumbai, Raigad and Palghar emerge as key centres driving Maharashtra’s economic growth. DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare ji, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature and other dignitaries were present. #Maharashtra #NAINAProject #Development https://x.com/Dev_Fadnavis/status/2114319172867948592?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: वेगवान कनेक्टिव्हिटी, पिण्याचे मुबलक पाणी आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) हे भविष्यातील उत्तम शहर म्हणून विकसित करणार! तेज कनेक्टिविटी, पर्याप्त पेयजल और नियोजित विकास के माध्यम से नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) को भविष्य के एक उत्कृष्ट शहर के रूप में विकसित करेंगे! (विविध विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण | रायगड | 25-10-2026) #Maharashtra #Raigad #NAINAProject #Development

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनाही भारतात यायचे आहे! पाक व्याप्त कश्मीर के लोग भी भारत में आना चाहते हैं! ( नवी मुंबई | 25-10-2026) #Maharashtra #NaviMumbai

Full_Media Interaction_Navi Mumbai_25-10-2026.mp443.36 MB

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content