ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 156
Подписчики
+124 часа
-147 дней
-5330 день
Архив постов
photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: डोंबिवली, ठाणे येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे भगवान शंकराचे दर्शन घेत अभिषेक केला व आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. #Maharashtra #Mumbai #PimpleshwarShivMandir

CMO Maharashtra Tweets: मूल्याधारित शिक्षणाचा विस्तार; राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम 2.0 ची व्यापक अंमलबजावणी होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मूल्यवर्धन कार्यक्रम परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनासंदर्भात बैठक पार पडली. शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (2.0) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात केवळ अभ्यासक्रम महत्त्वाचा नसून शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत करत असून ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे, हे लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी. शिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था आणि भागीदार संघटनांनी समन्वयाने काम करून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्यार्थ्यांना केवळ गुणवंतच नव्हे तर सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी मूल्य शिक्षणाची चळवळ येत्या काळात व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #ValueAdditionProgramme

Full_Speech_कृतज्ञता_सोहळा_व_सत्कार_समारंभ,_ठाणे_08_06_2026.mp425.79 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभ 🕤 रा. ९.३३ वा. | ८-६-२०२६📍डोंबिवली, ठाणे. #Maharashtra #Thane #PimpaleshwarMahadev https://www.youtube.com/live/KA1Q2gI9cgg?si=-mDGm5VioNNJvJtB https://www.facebook.com/100044197187974/videos/3489256111240741 https://x.com/Dev_Fadnavis/status/2064015648699875431?s=20

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी चव्हाण कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या प्रसंगी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा ही संघटनेची खरी ताकद असल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. #Maharashtra #Thane

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | Felicitation | कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभ | ठाणे https://www.youtube.com/live/KA1Q2gI9cgg?si=6GIYnbZ-paM2SWZz

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Dharavi Reimagined with prioritising citizens, livelihoods and environmental sustainability Chaired a review meeting on the Dharavi Redevelopment Project at Sahyadri Guest House, in Mumbai, today. Emphasised that the residents of Dharavi must remain at the centre of the redevelopment project. Directed timely completion of the project and reiterated that the redevelopment should be carried out on the lines of world-class housing projects in Singapore and Hong Kong. The Dharavi Redevelopment Project is not just about constructing buildings, but an initiative aimed at the holistic development of Dharavi residents. Also directed to preserve the area’s industrial and social ecosystem. Reiterated that while commercial development is part of the project, public welfare and the interests of citizens must remain the highest priority. Noted that Dharavi’s 'Kumbharwada' is an important cultural and tourism asset. Directed that suitable solutions be taken through consultations with respective people to preserve its unique identity. Also instructed for the implementation of the 'Nature Park' under the Dharavi Redevelopment Project. Directed that a special cell be established to ensure the speedy issuance of all necessary permits for this project under a single roof. Expressed confidence that coordinated efforts across departments would ensure timely completion of the project, transforming Dharavi and strengthening Mumbai’s stature as a world-class city. MoS Dr. Pankaj Bhoyar, Mumbai Mayor Ritutai Tawde and senior officials were present. #Maharashtra #Mumbai #DharaviRedevelopment https://x.com/Dev_Fadnavis/status/2063991384202506601?s=20

याशिवाय विमानतळापर्यंत जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी उभारण्यात येणार असून भविष्यातील हवाई टॅक्सी सेवांचा विचार करून व्हर्टीपोर्टही विकसित केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग आणि हवाई वाहतूक अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. बीकेसी-धारावी परिसराचे होणार सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत बीकेसी ते धारावी मार्गावरील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मध्यभागी हरित पट्टा, पदपथ आणि आधुनिक वास्तुरचना विकसित केली जाणार आहे. तसेच बस डेपोच्या जागेवर आधुनिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे धारावी आणि बीकेसी परिसराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. 10 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य धारावीतील पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी 39 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करून हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबईच्या महापौर रितू तावडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment

CMO Maharashtra Tweets: सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक पार पडली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारण्याचा कार्यक्रम नसून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम आहे. त्यामुळे धारावी येथे राहणारे नागरिकच या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. धारावीतील संपूर्ण औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था (इकोसिस्टम) कायम ठेवण्यात यावी. व्यावसायिक विकास हा या प्रकल्पाचा एक भाग असला तरी लोकहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. हा प्रकल्प नागरिकांच्या हितासाठी राबविला जात असल्याने त्यांच्या रोजगार व उपजीविकेचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. धारावीतील कुंभारवाडा हा केवळ मातीच्या भांड्यांचा व्यवसाय करणारा भाग नसून धारावीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा महत्त्वाचा घटक आहे. धारावीला भेट देणारे अनेक पर्यटक कुंभारवाड्यालाही आवर्जून भेट देतात. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये नेचर पार्कची संकल्पना मांडण्यात आली असून ती प्रत्यक्षात उतरवण्यात यावी. तसेच या प्रकल्पात पर्यावरणाचे संतुलन राखताना झाडांचे पुनर्रोपण व नवीन झाडे लावण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात सन 2028 पर्यंत किमान 10,000 घरे नागरिकांना देण्याचे नियोजन करावे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने एकाच ठिकाणी व जलदगतीने मिळावेत, यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात यावा. यासाठीची प्रक्रिया रिइंजिनीअरिंग करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावीत, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन मुंबईला जागतिक दर्जाची नवी ओळख मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ बांधकामाचा किंवा व्यावसायिक विकासाचा प्रकल्प नसून धारावीतील रहिवासी, कामगार आणि उद्योगांना केंद्रस्थानी ठेवून राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रकल्पांतर्गत रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांचे संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात आहे. खाद्यपदार्थ उद्योगांसाठी आधुनिक 'क्लाऊड किचन' संकल्पना विकसित करण्याची योजना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पात्र रहिवाशांना नव्या घरांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर, शयनकक्ष, स्वच्छतागृहे, नैसर्गिक प्रकाश व्यवस्था असेल. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. रेल्वे विभागाच्या जमिनीचा विकास, पुनर्वसन इमारतींचे काम आणि इतर पायाभूत सुविधांची कामे टप्प्याटप्प्यांत सुरू असून काही ठिकाणी झोपड्यांचे स्थलांतर, रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन आणि पर्यावरणीय परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक निधी उपलब्ध असून प्रकल्प नियोजनानुसार पुढे जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या केंद्रात विमान प्रवाशांसाठी 'सिटी चेक-इन' सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवासी धारावीतच सामानाची नोंदणी करून नंतर एअरपोर्ट एक्सप्रेसच्या माध्यमातून विमानतळावर पोहोचू शकतील. सिंगापूर आणि हाँगकाँगप्रमाणे जागतिक दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Fast-Tracking Rail Infrastructure: Towards a Level-Crossing-Free Maharashtra Chaired a review meeting regarding the construction of Road Over Bridges (ROBs) and Underpasses at railway level crossings today. Approved the first phase of 65 projects out of the total 131 being undertaken by the Maharashtra Rail Infrastructure Development Corporation (Maharail). Directed officials to build infrastructure to make Maharashtra free of railway level crossings. Instructed infrastructure upgrades near urban railway lines to ensure smooth commuting for growing populations. Directed that, among the 65 approved projects, priority be given to completing infrastructure works on roads with a TVU (Train Vehicle Unit) ranging from 25,000 to 1,00,000 and requiring minimal land acquisition. Considering the rapid urbanisation, 80 rail infrastructure projects have been planned in cities across Maharashtra. Instructed securing lower-interest loans from HUDCO through a specialised mechanism, while expediting Maharail's transition under the Public Works Department. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, MoS Indranil Naik, MLC Prasad Lad and senior officials were present. #Maharashtra #InfrastructureDevelopment https://x.com/Dev_Fadnavis/status/2063969793863278713?s=20

CMO Maharashtra Tweets: रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांना वेग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. ‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’मार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यात 65 कामांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मंजुरी दिली. तसेच महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील (अंडर पास) रस्त्यांची कामे 'महारेल'मार्फत करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात एकाही रेल्वे मार्गावर फाटक राहता कामा नये. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी रेल्वेकडून पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात. तसेच महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणाकरिता पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात यावीत. मान्यता देण्यात आलेल्या 65 कामांमधील संबंधित रस्त्यांवरील 25,000 ते 1,00,000 'टीव्हीयू' (ट्रेन व्हेईकल युनिट) असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. वाढते शहरीकरण लक्षात घेता शहरांमधील 80 रेल्वे पायाभूत सुविधांची कामे नियोजित करण्यात आली आहेत. या कामांसाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात यावी. समितीने नियोजित कामांविषयी पडताळणी करावी. त्यानंतर ते काम महारेल हाती घेईल. ही कामे पूर्ण झाल्यास या भागातील नागरिकांना त्यांच्या मागणीपूर्वीच पायाभूत सुविधा मिळतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नागपूर शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर चौकाच्या ठिकाणी भविष्यात वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे, अशा ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कार्यवाही करावी. अमरावती-बडनेरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पूल जुना असून याठिकाणी नवा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 'महारेल'ने कामांच्या प्राधान्यक्रमानुसार टप्पे पाडावेत. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हुडकोकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे. हुडकोने बँकांकडून कर्ज न घेता वेगळी व्यवस्था उभारून बाजारातील स्पर्धेचा अंदाज घेत शासनाला दिलेल्या कर्जावर कमी व्याज आकारावे. त्याचबरोबर 'महारेल' हे महामंडळ 'सार्वजनिक बांधकाम विभागा'च्या अखत्यारीत आणण्यासाठी कार्यवाही गतीने पूर्ण करावी. 'महारेल'मार्फत पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे देयक राज्य शासनाकडून तातडीने अदा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 🚆 प्रस्तावित रेल्वे पायाभूत सुविधांची कामे : मुंबई महानगर क्षेत्र - 17, पुणे शहर - 15, नागपूर - 13, नाशिक - 5, अमरावती - 5, सांगली - 4, छत्रपती संभाजीनगर - 3, कोल्हापूर - 3, धुळे- 3, लातूर - 3, परभणी - 3, सोलापूर - 2, जळगाव - 2, अहिल्यानगर - 1 आणि नांदेड शहर - 1, एकूण - 80. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रसाद लाड व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A 12-year journey across 15 pillars of Vikas, driven by one revolutionary vision. Witness the story of a changing nation. The Vikas Yatra documents India's major developmental leaps under Hon PM Narendra Modi Ji, highlighting progress across Garib Kalyan, Nari Shakti, Farmer Welfare, Infrastructure, Technology, National Security, Business, Culture and much more through informative sectoral booklets, impactful graphics, real stories and deep-dive articles. Click here to explore how New India is growing and transforming: https://www.narendramodi.in/vikasyatra2026 #India #VikasYatra

CM Shri Devendra Fadnavis Tweets: The Garib Kalyan Revolution: Empowering and Uplifting 25 Crore+ People Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the past 12 years have witnessed transformative efforts towards Garib Kalyan across sectors such as healthcare, housing, financial inclusion, sanitation, clean drinking water, and food security. From Jan Dhan accounts and Direct Benefit Transfer to Swachh Bharat, PM Awas Yojana, Jal Jeevan Mission, Ayushman Bharat and more, 25 crore+ people have been lifted out of poverty. This is the true spirit of 'Sabka Sath, Sabka Vikas'! #12YearsOfGaribKalyan

photo content