4 209
订阅者
-424 小时
-117 天
-9230 天
帖子存档
4 209
CMO Maharashtra Tweets:
तीर्थक्षेत्रांचा विकासाद्वारे महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि इतिहासाचे जतन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली, कल्याणेश्वर मंदिर, नागपूर आणि शिवसृष्टी थीम पार्क, आंबेगाव, पुणे या 3 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करून त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ₹50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली मंदिराच्या ₹1,93,55,20,474 च्या तर, कल्याणेश्वर मंदिर, नागपूरच्या ₹72.49 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. 'शिवसृष्टी थीम पार्क, आंबेगाव, पुणे' येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यातील कामांसाठी ₹50 कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली.
'श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली' मंदिर परिसराचा विकास आराखडा
औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराची कामे पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरिहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून 2500 भाविक बसू शकतील अशा क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, या दृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्ती भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार आहे.
'कल्याणेश्वर मंदिर' विकास आराखडा
नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्या ठिकाणी 2 तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ₹72.49 कोटी इतक्या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र साकारणार
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाची विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
4 209
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार प्रवीण दटके, आमदार विजय शिवतारे, आमदार संतोष बांगर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaCulture
4 209
CMO Maharashtra Tweets:
तीर्थक्षेत्रांचा विकासाद्वारे महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि इतिहासाचे जतन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली, कल्याणेश्वर मंदिर, नागपूर आणि शिवसृष्टी थीम पार्क, आंबेगाव, पुणे या 3 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करून त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ₹50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली मंदिराच्या ₹1,93,55,20,474 च्या तर, कल्याणेश्वर मंदिर, नागपूरच्या ₹72.49 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. 'शिवसृष्टी थीम पार्क, आंबेगाव, पुणे' येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यातील कामांसाठी ₹50 कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली.
'श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली' मंदिर परिसराचा विकास आराखडा
औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराची कामे पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरिहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून 2500 भाविक बसू शकतील अशा क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, या दृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्ती भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार आहे.
'कल्याणेश्वर मंदिर' विकास आराखडा
नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्या ठिकाणी 2 तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ₹72.49 कोटी इतक्या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र साकारणार
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाची विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
4 209
CMO Maharashtra Tweets:
व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी ऑटो-टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऑटो-टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात व्यावहारिक मराठी आलीच पाहिजे, याला पूर्ण समर्थन असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी नमूद केले. तसेच व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देत, या कालावधीत यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले.
#Maharashtra #DevendraFadnavis #AutoTaxiDrivers
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
ऑटो-रिक्शा एवं टैक्सी चालकों को मराठी सीखने के लिए 1 वर्ष की समयसीमा दी गई है, इस अवधि के दौरान उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की जाएगी।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महायुती सरकारने मराठा समाजाच्या हिताचे जेवढे निर्णय घेतले आहेत, तेवढे निर्णय यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतले नाहीत.
महायुति सरकार ने मराठा समाज के हित में जितने निर्णय लिए हैं, उतने निर्णय इससे पहले किसी भी सरकार ने नहीं लिए हैं।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
CMO Maharashtra Tweets:
NepalFloodsAlerts
CM Devendra Fadnavis’ prompt intervention!
Journey resumes for 106 Nagpur passengers stranded in Nepal
All 106 passengers from Nagpur have safely departed from Kathmandu for Danapur, Bihar.
Following a phone call from CM Devendra Fadnavis, Nepal MP Sandeep Rana arranged four local mini-buses to facilitate their journey from Kathmandu to Janakpur.
The passengers are expected to reach the Janakpur–Bihar border tomorrow morning. Buses have been arranged for their journey to Danapur, Bihar, from where their return journey by train has also been arranged.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 209
CMO Maharashtra Tweets:
CM Devendra Fadnavis assures support to Maharashtra's citizens stranded in Nepal
CM Devendra Fadnavis interacted with tourists from Maharashtra stranded due to the flood situation in Nepal through a video call. After inquiring about their well-being, he reassured them, saying, "Do not worry, the Government stands with you."
He directed the administration to take all necessary steps to ensure their safe return to Maharashtra and also took up the matter with the Ministry of External Affairs, urging that their safe evacuation and return be given priority.
The Chief Minister also spoke with Nepal MP Sandeep Rana. Reiterating that the safety of Maharashtra's citizens is the Government's highest priority, he assured the stranded tourists that every possible effort is being made to bring them home safely.
#Maharashtra #Mumbai #NepalFloods
4 209
CMO Maharashtra Tweets:
NepalFloodsAlerts
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू
नागपूरचे सर्व 106 प्रवासी काठमांडूवरून दानापूर (बिहार) करिता सुखरुप निघाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर काठमांडूवरून जनकपूरपर्यंत नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना स्थानिक 4 मिनी बस करून दिल्या.
हे सर्व लोक जनकपूर (बिहार) बॉर्डरला उद्या सकाळी पोहोचतील.
दानापूरपर्यंत (बिहार) त्यांच्यासाठी बसेस केल्या आहेत. तेथून रेल्वेने त्यांची परतण्याची व्यवस्था झालेली आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
एमपीएससीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
एमपीएससी की परीक्षा में होने वाली अनियमितताओं को रोकने के लिए समिति गठित की गई है।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भोर तालुक्यातील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन संदर्भात योग्य मार्ग काढला जाईल.
भोर तालुका के प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन के संदर्भ में उचित मार्ग निकाला जाएगा।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नेपाळ दुर्घटनेबाबत केंद्र सरकारशी बोलणे झाले असून, सरकार अलर्ट मोडवर आहे.
नेपाल दुर्घटना के संदर्भ में केंद्र सरकार से बातचीत हुई है, एवं सरकार अलर्ट मोड पर है।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai