LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● देशातील वैद्यकीय शिक्षण हा आर्थिक व्यवसाय बनलाय; NEET-SS परीक्षेतील बदलावरुन सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
● वाशिम जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व, सर्व जागांचे निकाल हाती; अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता
● शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का; पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पुत्र रोहित गावित पराभूत
● धुळ्यात भाजप नेते अमरिशभाई पटेल यांचं निर्विवाद वर्चस्व; शिरपूर पंचायतीच्या सहा गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजयी
● भाजपला मोठा हादरा; नंदुरबार जिल्हा परिषदेवर मविआची सत्ता, भाजपच्या जागा घटल्या, सुप्रिया गावित यांची झेडपीत एन्ट्री
● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, नरखेड पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व;
● भाजप नेते किरीट सोमय्या यांचा बारामती दौरा, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप
● शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही; कोरोना नियमांचं पालन करुन दसरा मेळावा होणार – शिवसेना खासदार संजय राऊत
● कॅप्टन अमरिंदर सिंह पुन्हा दिल्लीवारी करणार, पंतप्रधान मोदींच्या भेटीची शक्यता; कृषी कायदे आणि पंजाबमधील सीमा परिस्थितीबाबत चर्चा करणार
● राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्यास परवानगी नाकारली, राहुल गांधी पंजाब आणि छत्तीसगड मुख्यमंत्र्यांसोबत लखीमपूरकडे रवाना
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/u5gRyDC37jb
6 624
शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली जाहीर
Letsupp | Trending
● घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळ खुली होणार असून साईबाबा संस्थानने साईभक्तांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
● साईबाबा मंदिरात दिवसाला 15 हजार पासेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये पाच हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने, पाच हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने देऊन दर्शन दिले जाणार आसल्याची माहिती श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
● साईबाबांच्या सर्व आरतीचे पास ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत व यात प्रत्येक आरतीला फक्त 10 ग्रामस्थांसाह 90 भाविकांना उपस्थित राहता येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांनी दिली.
शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली
● दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार
● पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पासद्वारे तर पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास
● दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन
● साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश
● प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश
● 65 वर्षावरील नागरिकांना आणी 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही
● साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार
● साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई
● साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार
● online.sai.org.in या वेब साईट वर दर्शन व आरती पास मिळतील
● शासनाच्या नियमावलीनुसार 65 वर्षापेक्षा जास्त तसेच 10 वर्षाखालील बालकांसोबतच गर्भवती महिलांना साई दर्शन घेता येणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.
● साई मंदीर व दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी सहा फुटावर मार्किंग करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था प्रवेशद्वारावर केली आहे.
● याशिवाय मंदिरात मूर्तीच्या गाभार्यात हात न लावता दर्शन दिले जाणार असून भाविकांसाठी चक्रीय पद्धतीने भक्तनिवास सुद्धा उपलब्ध करून देणार असल्यची माहिती भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/767RizGD6jb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● "शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला,त्यांना जशास तसे उत्तर द्या"; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
● दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजली! औक्षण आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत
● नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबरला मतदान होणार
● अग्रलेख लिहून जे नेते होतात त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय माहीत; संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
● शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील एका शाळेत भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला
● न्यायासाठीच्या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू; काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन
● उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता एसटीएफ करेल तपास
● अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 4 वर्षांपासून घेतोय ड्रग्स, एनसीबीच्या चौकशीत केला खुलासा
● गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करणार - विजय वडेट्टीवार
● प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉस मराठी 3 च्या घरातून शिवलीला पाटील हिने माघार घेतली
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/aoLL8IaH4jb
6 624
आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?
Letsupp | Trending
● गेल्या दोन वर्षणापासून कोरोना आजरावर अनेक उपाय आणि संशोधन करण्यात आले आहे. आता कोरोना वरील लास देखील आल्या आहेत. मात्र तरी देखील कोरोनाचे प्रमाण कमी झालेले नाही आता यासाठी एक प्रतिबंधक गोळी विकसित केली जात आहे.
● कोण तयार करतंय गोळी?
- फायझर ही अमेरिकी कंपनी कोरोनाप्रतिबंधक गोळी तयार करत आहे
- त्यासाठी कंपनीकडून चाचण्या सुरू आहेत
- गोळी आल्यास लसीला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकणार
● कसे काम करणार ही गोळी?
- ही गोळी घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यताही मावळते
- कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरी धोका नाही
- ही गोळी शरीरात गेल्यानंतर प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करते
- सर्व रक्तपेशींना उ्ददिपीत करून बाह्यसंकटापासून संरक्षण देते
● कशी आहे गोळी?
- ही अँटिकोरोना गोळी सामान्य गोळीप्रमाणेच असेल
- ही गोळी कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी असेल
- प्राथमिक लक्षणांवेळीच ही गोळी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल
- ही गोळी पूर्णत: कोरोनाकेंद्रितच आहे
● वैज्ञानिक चाचण्या कशा होणार?
- गोळीची चाचणी फायझर २६०० जणांवर केली जाणार
- काही जणांना प्रत्यक्ष गोळी दिली जाईल तर काहींना प्रतिकात्मक औषध
- पाच ते दहा दिवस ही गोळी दिली जाईल
- दिवसातून दोनदा असे प्रमाण असेल.
- १८ वर्षांवरील लोकांनाच चाचणीत सहभागी होता येणार
- पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील
- गोळीला मंजुरी देण्यासाठी अमेरिकी एफडीएकडे अर्ज करता येणार
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/FYbXOhOB4jb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● राज्यातील कॉलेज, महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
● नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार करोना रुग्णांना नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या नेजल स्प्रेची चाचणी
● अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार लवकरच दिलासा देणार - अजित पवार
● 'शेतकरी हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ?' सदाभाऊ खोत यांचा सवाल
● 'ड्रोन' च्या वापराने शेती क्षेत्राला मिळणार चालना, डिजीटल कृषी मिशनवर लक्ष केंद्रीत करा : कृषीमंत्री तोमर
● प्रभागरचनेवरुन सरकारमध्ये कोणताही मतभेद नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण
● बोगस लसीकरण टाळण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना रोज नवा पासवर्ड, औरंगाबादेत आतापर्यंत दोन वेळा कोविन अॅप हॅक
● मराठवाड्यातील पूरस्थितीला 'जलयुक्त शिवार' कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा
● केजरीवाल यांची पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा जनतेला मोफत उपचार, औषधं आणि चाचण्यांचं देण्यात आलं आश्वासन
● अमरिंदर सिंग यांच्याकडून काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब; तर भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मात्र फेटाळून लावल्या
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/QLzUmBtlYjb
6 624
अतिवृष्टीमुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तारीख जाहीर
LetsUpp | Trending
⚡ राज्यात काही जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी मिळणार आहे.
⛈️ या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याचे विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविले आहेत.
💁♂️ त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंगू, मलेरीया, टायफाईड इ. साथीचे आजार, ट्राफिक, रोड दुर्घटना आदीमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेचे पहिले सत्र ३० मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणे, परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पूर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.
🤔 याचा विचार करता व उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुपसाठी जवळपास २७ ते ३० हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन परीक्षा देवू शकले नाहीत, अशा उमेदवारांना परीक्षेसाठी अंतिम संधी दिली जाणार आहे.
🗣️ शिक्षणमंत्री सामंत म्हणाले, वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना दि. १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वरील कारणांना अनुसरुन पात्र उमेदवारांना ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
📍 या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन दि. ९ व १० ऑक्टोबर २०२१ रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/UlGqLVTFXjb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा ! आगामी २४ तासांत अरबी समुद्रात 'शाहिन' चक्रीवादळाची निर्मीती होणार
● विविध मागण्या पूर्ण न झाल्याने राज्य़भरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून दिला संपाचा इशारा!
● नुकसानग्रस्त जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
● पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आकडेवारी आल्यानंतर ताबडतोब धोरण ठरवण्यात येणार - कृषीमंत्री दादा भुसे
● मुंबईत 'एक दिवसाआड' शाळा भरणार, एका बेंचवर एक विद्यार्थी बसणार : किशोरी पेडणेकर
● अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका, तब्बल ४७६ कोटींचं नुकसान, २२ लोकांचा मृत्यू तर शेकडो जनावरं दगावली
● केंद्राने सर्व राज्यांच्या बाबत समान भूमिका घ्यावी, अजित पवारांची प्रतिक्रिया
● तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; जिल्ह्यातल्या चौदा धरणांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर
● आधी मदत जाहीर करा, त्यानंतर दौरा करा, मुख्यमत्र्यांनी मराठवाड्यात पर्यटनाला येऊ नये: राणा जगजितसिंह पाटील
● देशात काल दिवसभरात २३ हजार ५२९ कोरोनाबाधितांची नोंद, तर ३११ जणांचा मृत्यू
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/M4LAnHB8Xjb
