ru
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● विदर्भ-मराठवाडा भागातील पुरात आत्तापर्यंत 436 जणांचा मृत्यू तर 136 जण जखमी; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती ● राज्यात पूरस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा देता आल्या नाहीत, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ● राज्य सरकारची टाटा, कायनेटिकसारख्या कंपन्यांसोबत चर्चा; राज्यात इलेक्ट्रीक व्हेईकल पॉलिसीअंतर्गत काही धोरणं निश्चितीसाठी पहाणी सुरु असल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती ● धीर सोडू नका”, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन; प्रशासनाला दिले तातडीचे निर्देश! ● इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पावसाची आवक झाल्याने धरणाचे 13 दरवाजे उघडली; पैनगंगेला महापूर येवून अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे ● आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ● सरकारी आणि निमसरकारी शाळांतील मुलांसाठी पोषण आहार योजना राबविण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ● भाजप नेत्या आणि गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले ● पंजाबमध्ये 53 लाख कुटुंबांचं वीजबिल माफ; मुख्यमंत्री मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची मोठी घोषणा ● पंतप्रधानांचा भारताच्या सार्वभौमत्वावर घाला; राहुल गांधी यांची टीका; भारत हा सर्वधर्मियांचा असून त्यांच्यात एकप्रकारचे नाते आहे अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/HL0qJcvGWjb

'गुलाब' चक्रीवादळाचा फटका; नांदेडमधील लाखो हेक्टर शेतीचं नुकसान LetsUpp | Nanded 🌧️ गुलाब चक्रीवादळाचा फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. मागील तीन दिवसांत पडलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्ह्यातील गडावरी नदीला पूर आला आहे. 🌧️ जिल्ह्यातील 65 मंडळात अतिवृष्टी झाली असून 35 मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 🌦️ तसेच लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून शहरानजीक वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. 🚣 ग्रामीण भागात जवळपास 22 गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे विष्णुपुरी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 📌 दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/Sk2yDNeDWjb

टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या *LetsUpp | Bulletin* ● मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता; अरबी समुद्रात नव्या चक्रीवादळ येण्याचा अंदाज ● मराठवाड्याला पुराचा तडाखा ! अनेक भागात अतिवृष्टी; इरलामध्ये 150 जण अडकले ● पाहिल्यांदाच भारतातील 'या' IT कंपनीत 4 दिवसांचा आठवडा; शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्टी ● केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे ● मुश्रीफांचा तिसरा घोटाळा 1500 कोटींचा; सोमय्यांचा कोल्हापूरात हल्लाबोल ● पंजाबच्या राजकारणात धमाका होणार? कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना, तर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या प्रमुख पदाचा राजीनामा. ● "अतिवृष्टीमुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान, केंद्राने ७ हजार कोटी मदत द्यावी"; वडेट्टीवारांची मागणी ● “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात घोटाळे करण्याची कला विकसित केली”; किरीट सोमय्यांची टीका ● कॉटनचे कपडे महागणार, कापसाचे दर पोहोचले 10 वर्षातील उच्चांकी पातळीवर ● बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे : शिवलीला अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/SfaXkef1Ujb

photo content

टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार; उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष ● केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोपवली उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठी जबाबदारी; 'जीएसटी प्रणालीबाबत केंद्र स्तरिय मंत्रिगट स्थापन; या मंत्रिगटाचे अध्यक्षपद अजित पवारांकडे ● गेल्या चार ते पाच दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 100 टक्के भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे ● दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला सामोरे; माझ्याकडून काहीच चूक झालेली नाही, त्यामुळे मी चौकशीला सामोरं जातोय अनिल परब यांची प्रतिक्रिया ● शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ची मोठी कारवाई; गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक ● महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभांसह तीन लोकसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 30 ऑक्टोबरला मतदान ● गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा ● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर; 121 किलोमीटरच्या 4 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करून, कामाला हिरवा झेंडा दाखवला ● मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असल्यामुळे मोठ्या प्रामाणात नुकसान; मंत्रिमंडळात सरसकट पंचनाम्यांची मागणी करणार - राजेश टोपे ● पंजाबच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं, कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना, आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/UGS1p4vMUjb