ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 707 подписчиков, занимая 5 597 место в категории Образование и 11 970 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 707 подписчиков.

Согласно последним данным от 06 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -81, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 9.92%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.17% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 344 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 068 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 07 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 707
Подписчики
-324 часа
-477 дней
-8130 день
Архив постов
Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय http://dhunt.in/jYqmi?s=a&uu=0x63031c35561013bd&ss=pd Source : "News 18 लोकमत" via Dailyhunt अॅप डाउनलोड करा http://dhunt.in/DWND

photo content

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

🟪जगातील सर्वात वेगवान महिला.. इलेन थॉंप्सन-हेरा 🇯🇲 - १०.६१ सेकंद 🥇 (नवीन ऑलिंपिक विक्रम) 🏆तिन्ही पदके जमैकालाच 🇯🇲🇯🇲�
🟪जगातील सर्वात वेगवान महिला.. इलेन थॉंप्सन-हेरा 🇯🇲 - १०.६१ सेकंद 🥇 (नवीन ऑलिंपिक विक्रम) 🏆तिन्ही पदके जमैकालाच 🇯🇲🇯🇲🇯🇲 ▪️शेली ऍ न प्राईस - १०.७४ 🥈 ▪️शेरीका जॅक्सन - १०.७६ 🥉 www.simplifiedcart.com

Congratulations 💐💐✌️✌️ पी. व्ही. सिंधूला टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळाले...! 2016 च्या रिओ ऑलम्पिक मध्ये मिळवले होत
Congratulations 💐💐✌️✌️ पी. व्ही. सिंधूला टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळाले...! 2016 च्या रिओ ऑलम्पिक मध्ये मिळवले होते रौप्य पदक. सलग दोन ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

🟪डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार. वर्धा येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. मुंबईच्या राजभवनात आयोजित एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. बोरले यांनी स्वीकारला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील निवडक डॉक्टरांचा या समारंभात गौरव झाला. डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया व क्लाउड फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिल्या जातात. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार वितरन सोहळा घेण्यात आला होता. आयोजक संस्थेचे डॉ. गिरिष कामत व डॉ. देवेंद्र हंबरडीकर यांनी प्रास्ताविकातून पुस्काराची भूमिका मांडली. तर राज्यपाल कोश्यारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्राने आदर्श प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. सोहळ्यात डॉ. बोरले यांना तसेच डॉ. डी.जे. आरवाडे, वैद्य गोपालकृष्ण अंधनकर व डॉ. राजाराम जगताप यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बोरले हे गत चाळीस वर्षापासून दंत चिकित्सा विषयात सेवा देत आहेत. सेवाग्रामच्या रूग्णालयात सेवेची सुरूवात झाल्यानंतर त्यांनी सावंगीच्या रूग्णालयात पदभार सांभाळला. दोन तपाहून अधिक काळ कार्य केल्यानंतर त्यांना व्यवस्थापनाने कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रावर विविध पुस्तके लिहली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रहीय वैद्यकीय मासिकात त्यांचे संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहे. विद्यापिठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी डॉ. बोरले यांचे अभिनंदन करतांना विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा हा यथोचित सन्मान असल्याचे नमूद केले.

🟪भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता. वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे. ▪️मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम) ▪️सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश) ▪️पेंच (महाराष्ट्र) ▪️वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार) ▪️दुधवा (उत्तरप्रदेश) ▪️सुंदरबन (पश्चिम बंगाल) ▪️पारंबीकुलम (केरळ) ▪️बंदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक) ▪️मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू) “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा ▪️(CA|TS)” विषयी. CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत. 2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते. ▪️पार्श्वभूमी दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

🟪उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता. ▪️भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत. ▪️ठळक बाबी. कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली. भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे. ▪️उडान (उडे देश का आम नागरिक) योजना. भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.

🟪हिंद महासागर क्षेत्रात 36 वा भारत-इंडोनेशिया CORPAT नौसरावयाचे आयोजन. 30 जुलै आणि 31 जुलै 2021 रोजी हिंद महासागर क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या नौदलांचा 36 वा समन्वयित गस्त (Coordinated Patrol -CORPAT) सराव पार पडला. या वार्षिक सागरी कार्यक्रमात भारताचे INS सुरयू आणि इंडोनेशियाचे KRI बुंग टोमो या जहाजांनी भाग घेतला. दोनही देश 236 नाविक मैल (nautical miles) पसरलेली त्यांच्यामधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर त्यांच्या-त्यांच्या बाजूने गस्त घालण्याचा सराव केला आणि त्यादरम्यान आपापसात समन्वय साधण्याचा देखील सराव केला. बेकायदेशीर मासेमारी, मादक पदार्थांची तसेच इतर साहित्यांची तस्करी, सशस्त्र दरोडा, सागरी दहशतवाद अश्या कृतींना आळा घालण्यासाठी दोनही बाजूंना सशक्त करण्यामध्ये असा कार्यक्रम मदत करतो. ▪️इंडोनेशिया देश. इंडोनेशिया हा आग्नेय आशियामधील अनेक बेटांनी बनलेला एक प्रजासत्ताक देश आहे. जावा बेटावरील जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे. देशाचे राष्ट्रीय चलन रुपिया हे आहे. इंडोनेशियाच्या उत्तरेस दक्षिण चिनी समुद्र व प्रशांत, पूर्वेस प्रशांत आणि दक्षिणेस व पश्चिमेस हिंदी महासागर आहे. मलाया द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे न्यू गिनी बेटांपर्यंत इंडोनेशियाचा प्रदेश पसरला असून त्यामध्ये जावा, सुमात्रा, मादुरा, नुसा तेंगारा (बाली ते तिमोरपर्यंतचा द्वीपसमूह), मोलूकू (मोल्यूकस), सूलावेसी (सेलेबीझ), कालीमांतान (बोर्निओचा भाग), पश्चिम ईरीआन (न्यू गिनीचा पश्चिम भाग), तिमोर बेटाचा काही भाग व सुमारे तीन हजार लहान बेटे यांचा समावेश होतो. आशिया व ऑस्ट्रेलिया ह्यांना सांधणारा पूल समजला जाणाऱ्या या देशात भौगोलिक, समाजिक व आर्थिक विविधता तसेच वैचित्र्य भरपूर आहे.

🟪मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाल्याची माहिती कु लगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. चितमपल्ली यांनी निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी केली आहे. यात सोलापूर ही जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊ न त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी चितमपल्ली ठरले आहेत. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (१ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता विद्यपीठाच्या मुख्य सभागृहात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यœमास भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. जी. तिरुवसगम यांची ऑनलाइन माध्यमातून प्रमुख उपस्थिती राहणार आहे.