ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 707 подписчиков, занимая 5 597 место в категории Образование и 11 970 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 707 подписчиков.

Согласно последним данным от 06 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -81, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 9.92%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.17% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 344 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 068 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 07 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 707
Подписчики
-324 часа
-477 дней
-8130 день
Архив постов
🟪एच १ बी’ व्हिसासाठी दुसरी सोडत. अमेरिकेत वास्तव्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एच १ बी या व्हिसासाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. अशा प्रकारे दुसरी सोडत काढण्याची ही दुर्मीळ घटना आहे. एच १ बी व्हिसा हा माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यात लोकप्रिय आहे. सोडत पद्धतीने या व्हिसासाठी आलेले अर्ज मंजूर केले जात असतात. आता दुसरी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने ज्यांना पहिल्या सोडतीत संधी मिळाली नाही त्यांना दुसऱ्या सोडतीत संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने म्हटले आहे, की एच १ बी व्हिसासाठी संगणकाच्या मदतीने पहिली सोडत यादृच्छिक पद्धतीने काढण्यात आली होती, पण त्यात एच १ बी व्हिसा पुरेशा संख्येने दिले गेले नाहीत त्यामुळे एच १ बी व्हिसा आणखी काही प्रमाणात देण्यासाठी त्यातीलच उर्वरित अर्जातून दुसरी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्या भारत व इतर देशातील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकतात.

🟪भारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी भारत आणि चीन यांच्यात आज, शनिवारी लष्करी पातळीवरील चर्चेची बारावी फेरी होणार आहे. चर्चेला सकाळी साडेदहा वाजता चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्दो या ठिकाणी सुरुवात होईल. चर्चेत हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथे असलेल्या चिनी सैनिकांच्या छावण्या हा प्रमुख विषय असेल. तेथून चीनने माघार घेतलेली नाही. चीनने अलीकडेच पूर्व लडाखमध्ये काही ठिकाणी घुसखोरी केल्यामुळे या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमेवरील अनेक संघर्ष बिंदूवर चीनने अतिक्रमण करून तेथे कुमक वाढवली आहे.

🟪१०५ वर्षीय धावक मान कौर यांचे निधन ▪️वयाच्या ९३व्या वर्षी कारकिर्दीस सुरुवात ▪️त्यांनी २०१७ वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये १००
🟪१०५ वर्षीय धावक मान कौर यांचे निधन ▪️वयाच्या ९३व्या वर्षी कारकिर्दीस सुरुवात ▪️त्यांनी २०१७ वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये १०० मी. व २०० मी. प्रकारात सुवर्णपदक जिंकले ▪️त्यांना २०२० मध्ये नारी शक्ती पुरस्कार ▪️" मिरॅकल ऑफ चंदीगड " नावाने परिचित ▪️त्यांना " लॉरीयस बेस्ट स्पोर्टींग मोमेंट २०१७ " पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते ▪️त्या ऑकलंडच्या स्काय टॉवर येथे स्काय वॉक करणाऱ्या जगातील वयोवृद्ध व्यक्ती

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+9

photo content
+9

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना ई-मेल, सगळ्यांनीच वाचावा असा. करोनामुळे संपूर्ण जगाचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अनेक कंपन्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. करोनाचा उगम झाल्यापासून गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे. अशात गुगलने वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. “कार्यालयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक भागात सुरु झालेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. कर्मचारी एकत्र विचारमंथन करून काम करत आहेत. कँटिनमध्ये एकत्र जेवण आणि कॉफीचा आनंद घेताना बरं वाटलं”, असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. स्वत:ला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवण्याासाठी लस घेणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

🟪कोव्हॅक्सिन’ आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती. भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे. ब्राझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.

🟪स्वच्छ भारत अभियान; दुसरा टप्पा राज्यात राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ही योजना राबविण्यासाठी २०२५ पर्यंत एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात केंद्र सरकारचा ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. राज्याच्या वाटय़ाचा एक हजार ८४० कोटी ४० लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेची राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे. यासाठी राज्य स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान स्थापन करण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगानेही काम करण्यात येईल.

🟪राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा. राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले. कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

🟪अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ घेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला. गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर ‘थोपवण्यात’ आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

🟪मेडल जिंका आणि आयुष्यभर विनामूल्य तिकिटे मिळवा; ऑलिम्पिक खेळाडूंसाठी Inox ची घोषणा भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी, देशातील प्रत्येकजण खेळाडूंनी पदक जिंकावं म्हणून प्रार्थना करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत. अलीकडेच मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि त्यानंतर पिझ्झा कंपनी डोमिनोसने आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देण्याची घोषणा केली. आता याच भागात, देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयनॉक्सनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. मंगळवारी आयनॉक्सने घोषित केले की, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू आयुष्यभर फ्री चित्रपट पाहू शकतील. त्याचबरोबर, संघातील सर्व सदस्यांना १ वर्षासाठी चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाईल. म्हणजेच, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या कोणत्याही खेळाडूला आयुष्यासाठी आयनॉक्सकडून विनामूल्य चित्रपटाचे तिकीट मिळेल. याव्यतिरिक्त, टोक्योला गेलेल्या क्रीडापटूच्या संपूर्ण संघाला आयनॉक्सकडून एक वर्षासाठी विनामूल्य चित्रपटाची तिकिटे दिली जातील.

🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आ
🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 700+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश ▪️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

🟪जगातील 70% वाघ भारतात www.simplifiedcart.com
🟪जगातील 70% वाघ भारतात www.simplifiedcart.com