ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 765 подписчиков, занимая 5 593 место в категории Образование и 11 939 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 765 подписчиков.

Согласно последним данным от 13 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -26, а за последние 24 часа — 19, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 12.63%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 8.01% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 4 266 просмотров. В течение первых суток публикация набирает 2 704 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 14 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 765
Подписчики
+1924 часа
+537 дней
-2630 день
Архив постов
03 APRIL 2021 Current Affairs .pdf

03 APRIL 2021 Current Affairs - Page 1.pdf

🟧 21 मार्च 2021 रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षेत" आपल्या सिम्प्लिफाईड COMBINE सरावप्रश्नसंच या पुस्तकातून 20+ प्रश्नांचा समावेश आहे. ▪️आगामी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपली प्रत राखून ठेवा. ▪️कमी कालावधीत जास्त सराव आणि Revision साठी महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ▪️महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🏆 पुरस्कार : बुकर पुरस्कार ⏳ सुरुवात : १९६९ पासून 👤 पहिले विजेते : पी.एच. न्यूबाय 📒 कशासाठी : समथिंग टू आन्सर फॉर 👩 २०१८
🏆 पुरस्कार : बुकर पुरस्कार ⏳ सुरुवात : १९६९ पासून 👤 पहिले विजेते : पी.एच. न्यूबाय 📒 कशासाठी : समथिंग टू आन्सर फॉर 👩 २०१८ : अॅना बर्न्स (आयर्लंड) 📒 कशासाठी : मिल्कमॅन 👩 २०१९ : मार्गारेट अटवुड (कॅनडा) 📒 कशासाठी : द टेस्टामेंट्स 👩 २०१९ : बर्नार्डिन इव्हारिस्टो (ब्रिटन) 📒 कशासाठी : गर्ल , वूमन , आॅदर 👤 २०२० : डग्लस स्टुअर्ट 📒 कशासाठी : शुगी बेन .

photo content

🟧सुरत आणि दीव दरम्यानच्या क्रूझ सेवेला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दाखवला हिरवा झेंडा. जल वाहतूक हे वाहतुकीसाठीचे नवे भविष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे- मांडवीय केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज सुरतमधले हाझीरा बंदर ते दीव दरम्यानच्या क्रूझ सेवेला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्रूझ पर्यटन विकासावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे  मनसुख मांडवीय यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. 2014 पासुन क्रूझ द्वारे पर्यटन करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत असून 2014 पूर्वी ही संख्या एक लाख होती तर 2019-20 मध्ये ही प्रवासी संख्या 4.5 लाख झाल्याचे ते म्हणाले.

🟧जागतिक ऑटिझम जागृती दिवस: 2 एप्रिल दरवर्षी 2 एप्रिल या दिवशी ऑटिझम आजाराबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘जागतिक ऑटिझम (​स्वमग्नता) जागृती दिवस’ साजरा केला जातो. जागरुकता वाढविणे आणि लोकांना ऑटिझमग्रस्त असलेल्यांना समजण्यास आणि स्वीकारण्यात मदत करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ▪️ऑटिझम आजाराविषयी ऑटिझम (स्वमग्नता) ही एक न्यूरोलॉजिकल अवस्था आहे, जी आयुष्यभर राहते आणि ही सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. आजाराचे पूर्ण नाव 'सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर' असे आहे. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. ते कदाचित आपल्यापेक्षा थोड्या वेगळ्या असू शकतात, परंतु ते ‘सामान्य’ लोकही असतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. हा आजार सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या इतरांशी संवाद साधण्याची आणि संवाद साधण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. ऑटिझमची लक्षणे - डोळयात डोळा घालून न बघणे, लक्ष न देणे, परत परत त्याच हालचाली करतात. अधिक हालचाल करतात, गरगर फिरणे, त्याकडे बघणे, कधीकधी हिंसक 'शिस्त' नसणे, 'भाषा' न येणे / उशिरा येणे, भान नसणे (बधिरता), सामाजिक जाणीव कमी/नसते

🟧गुगल नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करुन पथदिवे उभारल्याने सीमेचा वाद मिटलेला नसताना गुगल नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात दाखविल्याने नवा वाद उद्भवला आले. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गुगल नकाशावार वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वेवजी मधील इंडीया कॉलनी, दुकाने तसेच एमबीबीआय शाळा गुजरात राज्यात दिसत असल्याने सीमा भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं २०४ चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर. १७३ हे दोन भुखंडावर दोन राज्यांची सिमा आहे. गुजरात आणि महाराष्टर्् राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चिात नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत.महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चिात करण्याची मागणी होऊ लागली आहे.

🟧ऑनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचे ‘ई-दिशा’ अ‍ॅप. करोनाच्या प्रादुर्भावामुळे बिकट स्थिती निर्माण झाल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहे. प्रत्येक मुलाने शिकावे यासाठी ऑनलाइन शिक्षण उपक्रम सुरू आहेत. पालघर जिल्हा परिषदेनेही ई- दिशा अ‍ॅपची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. या नवोपक्रमशील, उपक्रमशील शिक्षक सन्मानामुळे इतरांना प्रेरणा मिळेल व पालघर जिल्ह्यचे नाव आणखी उंचावेल. ‘ई-दिशा’ जिल्ह्यसाठी मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक सन्मान कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या संकुल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यतील डोंगरी, दुर्गम, शहरी भागातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी व शिक्षण विभागातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती केली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होत असून सर्व शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करून गुणवत्तावाढीसाठी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी केले.

🟧पश्चिम बंगालमध्ये ८०%, तर आसाममध्ये ७५ टक्के मतदान पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल कॉंगे्रसने निवडणूक आयोगाकडे केल्या.

🟧मूलभूत साक्षरतेला बळकटी देण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करा- उपराष्ट्रपती. सरला दास यांच्या 600व्या जयंतीदिनी त्यांचा आदी कवी, आदी ऐतिहासिका आणि आदी भूगोलविद म्हणून वेंकैया नायडू यांच्याकडून गौरव.   बालकांची मूलभूत साक्षरता बळकट करण्यासाठी लहान वयातच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी केले आहे. बालकांना वाचनाची आवड लागावी यासाठी शिक्षणतज्ञ, विचारवंत,पालक आणि शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बालकांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मनोरंजक उपकरणांच्या अतिवापरापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी वाचनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शाळेत वर्गांमध्ये पुस्तकांचे आकर्षक विश्व निर्माण करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आणि बालकांसाठी जास्तीत जास्त लिखाण करण्याचे लेखकांना आवाहन केले. बालकांना असलेल्या आवडीनिवडी आणि त्यांच्या क्षमता यांना लक्षात घेऊन या पुस्तकांचे लिखाण आणि प्रदर्शन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आदिकवी सरला दास यांच्या 600 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते. सरला दास यांनी केलेल्या महाभारताच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील लिखाणामुळे आणि विवेचनामुळे शेकडो वर्षानंतरही ओदिया जनतेमध्ये या ग्रंथाचे महत्त्व कमी झालेले नाही, असे ते म्हणाले. यामुळे लिहिण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी अतिशय साध्यासोप्या आणि सर्वसामान्य लोकांना आकलन होणाऱ्या भाषेचे महत्त्व लक्षात येते असे त्यांनी सांगितले. सरला दास केवळ आदी कवी नव्हते तर ते आदी ऐतिहासिका आणि आदी भूगोलविद होते अशा शब्दात नायडू यांनी त्यांचा गौरव केला. 15 व्या शतकासारख्या प्राचीन काळातही त्यांनी सामान्यांना समजेल अशा बोलीभाषेचा वापर केल्यामुळे लोकाभिमुख साहित्यनिर्मितीचे ते प्रणेते होते असे त्यांनी सांगितले. कबीर आणि योगी वेमना यांच्याशी सरला दास यांची तुलना करत वेंकैया नायडू म्हणाले की अतिशय गुंतागुंतीच्या भावना आणि कल्पनांना साध्यासोप्या भाषेत लोकांसमोर मांडण्याचे असामान्य कसब महान कवींच्या अंगी असते आणि त्यामुळे असंख्य वाचकांमध्ये ते आपला ठसा कायम राखतात. महाभारतातील नायक आणि नायिका यांच्या पात्रांची मांडणी सरला दास यांनी ज्या प्रकारे केली त्यातून त्यांच्या नंतरच्या काळातील लेखकांना देखील एक किंवा दोन पात्रांना विचारात घेऊन त्यांच्या भोवताली एका संपूर्ण कादंबरीचे लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली, असे नायडू यांनी सांगितले. त्यांनी उभी केलेली महिलांची पात्रे अतिशय कणखर आणि बुद्धिमान आणि कनवाळू होती आणि धैर्य आणि आत्मविश्वासाने कृती करणारी होती, असे ते म्हणाले. सरला दास असामान्य प्रतिभावान साहित्यिक होते आणि ओदिया भाषेचे पितामह अशी उपाधी त्यांना प्राप्त झाली होती, अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला. त्यांनी ओदिया भाषा आणि संस्कृती समृद्ध केली असे ते म्हणाले. त्यामुळेच भारत सरकारने ओदिया भाषेचा भारताची सांस्कृतिक भाषा म्हणून सन्मान केला असून सरला दास हे या भाषेचे दीपस्तंभ आहेत, असे त्यांनी सांगितले.

🟧जागतिक आर्थिक मंचचा ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेने त्याचा वार्षिक ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ हा अहवाल प्रकाशित केला आहे. ▪️अहवालातील ठळक बाबी जगातील सर्वाधिक स्त्री-पुरुष समानता ठेवणारा देश - आइसलँड स्त्री-पुरुष समानता ठेवण्याच्या बाबतीत आइसलँड खालोखाल फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, रवांडा, स्वीडन, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रमांक लागतो आहे. स्त्री-पुरुष समानता ठेवणाऱ्या 156 देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक 140 वा लागतो. यंदाच्या क्रमवारीत 28 स्थानांची घसरण झाली आहे. भारत स्त्री-पुरुष समानता ठेवण्याच्या बाबतीत दक्षिण आशियातील तिसरा सर्वात वाईट कामगिरी करणारा देश ठरला आहे. भारताचे शेजारी, बांगलादेश 65 वा, नेपाळ 106 वा, श्रीलंका 116 वा, अफगाणिस्तान 156 वा, भूटान 130 वा आणि पाकिस्तान 153 व्या क्रमांकावर आहे.

🟧सुटीच्या दिवशीही मिळणार लस!; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय. करोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवनवीन कृती कार्यक्रम हाती घेतला जात असून, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसुत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे. देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय केंद्राने घेतला आहे. देशात पुन्हा एकदा करोना बळावू लागला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात संक्रमणाचा वेग वाढल्यानं केंद्राने काही निर्णयही घेतले असून, त्यात लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथे दोन आठवड्यात लसीकरण करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आलेल्या आहेत. निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार देशभरात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी आजपासून लसीकरण सुरू झालं आहे. आतापर्यंत करोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती तसेच ६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होतं. आता मध्यमवयीन व्यक्ती करोना बाधित होण्याचं प्रमाण प्रचंड असल्यानं लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.

🟧महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या नियामक मंडळावर चेतन दुनाखे यांची नियुक्ती. महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या नियामक मंडळावर (Governing Council) मधुचंदा ट्रॅव्हल्सचे संचालक चेतन दुनाखे यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे. वन क्षेत्रावर आधारित निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची डिसेंबर २०१५ मध्ये स्थापना करण्यात आली. हे मंडळ राज्यातील ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने आणि चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशा ५८ वन्यजीव संरिक्षत क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचे काम करते. राज्यातील प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्रात दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक भेट देत असून या क्षेत्रात भविष्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. पर्यटन क्षेत्रातील कार्यामुळे दुनाखे यांची महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाली होती. आता दुनाखे असोसिएशनच्या गोल्डन जुबिली वर्षात सरचिटणीसपदी कार्यरत आहेत. चेतन दुनाखे यांना यापूर्वी ‘यंग आंत्रप्रिनरअवॉर्ड फॉर टुरिझम 2016’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांची महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या नियामक मंडळावर (Governing council ) निवड झाली आहे.

🟧एक लाख रुपये किलो… ही आहे ‘जगातील सर्वात महागडी भाजी’; औरंगाबादमधील शेतकरी घेतोय उत्पादन. जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रति किलो आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भाजीची प्रायोगिक तत्वावरील लागवड बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केलीय. या भाजीचं नाव आहे हॉप शूट्स. खरं तर या भाजीचं उत्पादन ११ व्या शतकामध्ये करण्यात आलं आहे. ही वनस्पती त्यावेळी बियरमध्ये फ्लेवर आणण्यासाठी वापरली जायची. नंतर या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून आणि आता थेट भाजी म्हणून करण्यात येऊ लागलाय. शूट्सला एवढी किंमत असण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड मिळतात. या अ‍ॅसिडची नावं आहे ह्यूमोलोन्स आणि ल्यूपोलोन्स. या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो असं मानलं जातं. कॅन्सरसारख्या आजारावर मात मिळवण्यासाठी या वनस्पतीमधील अ‍ॅसिड उपयोगी असल्यानेच तिला एवढा भाव मिळतो. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावातील ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले भारतीय शेतकरी ठरलेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये एका किलो हॉप शूट्स एक हजार पौंडांना विकले होते. भारतीय चलनानुसार ही किंमत किलोमागे एक लाख रुपये इतकी होते. अर्थात ही भाजी इतकी महाग असल्याने ती भारतात खूपच कमी मिळते. खरं तर विशेष मागणी केल्यानंतर ती उपलब्ध करुन दिली जाते.

🟧ज्येष्ठ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांना 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी जाहीर केले.  2019 साठीचा पुरस्कार दिग्गज अभिनेते  रजनीकांत यांना प्रदान करण्यात येणार आहे. 3 मे रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबरोबर हा पुरस्कार प्रदान केला जाईल. नवी दिल्ली येथे या पुरस्काराची घोषणा करताना जावडेकर म्हणाले की ज्यूरी सदस्यांनी ही निवड एकमताने केली होती, जी सरकारने मान्य केली. ज्युरींमध्ये खालील  पाच सदस्यांचा समावेश होता. 🪞आशा भोसले 🪞मोहनलाल 🪞विश्वजित चॅटर्जी 🪞शंकर महादेवन 🪞सुभाष घई रजनीकांत यांच्या कर्तृत्वाविषयी  बोलताना जावडेकर म्हणाले की, ते पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे प्रमुख अभिनेते आहेत. फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी या महान अभिनेत्याचे अभिनंदन केले.

photo content
+1

photo content
+9