ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 766 подписчиков, занимая 5 593 место в категории Образование и 11 939 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 766 подписчиков.

Согласно последним данным от 13 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -26, а за последние 24 часа — 19, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 12.63%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 8.01% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 4 266 просмотров. В течение первых суток публикация набирает 2 704 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 14 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 766
Подписчики
+1924 часа
+537 дней
-2630 день
Архив постов
02 APRIL 2021 Current Affairs .pdf

02 APRIL 2021 Current Affairs .pdf

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

#Memorable_Moment ▪️गुरूवर्यांचे नाव किती मोठे करायचे हे फक्त शिष्यांच्या हातात असते.
#Memorable_Moment ▪️गुरूवर्यांचे नाव किती मोठे करायचे हे फक्त शिष्यांच्या हातात असते.

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार 🔸मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. 🔸त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 🔸१५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. 🔸दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. 🔸 देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. 🔸 याआधी १९९३ मध्ये  विजय तेंडुलकर व  २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता. ⚡️१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 🔸शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.

🏆 पुरस्कार : दादासाहेब फाळके पुरस्कार ⏳ पुरस्काराची सुरुवात : १९६९ मध्ये 💰 पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये ✔️ कोणाद्वारे
🏆 पुरस्कार : दादासाहेब फाळके पुरस्कार ⏳ पुरस्काराची सुरुवात : १९६९ मध्ये 💰 पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये ✔️ कोणाद्वारे : भारत सरकारकडून 👩 पहिल्या विजेत्या : देविका रानी (१९६९) ✅ आतापर्यंत फक्त २ व्यक्तिंना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे 👤 पृथ्वीराज कपूर : १९७१ मध्ये 👤 विनोद खन्ना : २०१७ मध्ये 👤 ५०व्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे विजेते अमिताभ बच्चन हे ठरले होते 🏆 ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेता रजनीकांत यांना जाहीर झाला (२०१९ साठी)

🟧ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठा यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी जल जीवन अभियान बसविणार सेन्सर-आधारीत IoT उपकरणेखेडेगावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी डिजीटल मार्ग अवलंबत सेन्सर आधारीत इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणांचा उपयोग करण्याचे जलशक्ती मंत्रालयाने ठरवले आहे. त्यांच्या अंतर्गत सहा लाखांहून अधिक गावांमधे जल जीवन अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा कम्युमिनीटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट (TCIT) आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राष्ट्रीय जल जीवन अभियानाने पाच राज्यातल्या दुर्गम भागात नुकतेच पथदर्शी प्रकल्प पूर्ण केले. त्यात महाराष्ट्र, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, सिक्कीम, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांनी हे तंत्रज्ञान कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारीत हे सेन्सर, दुर्गम भागात टेहळणी करुन मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक माहिती पुरवते. ही यंत्रणा केवळ प्रभावी टेहळणी आणि प्रत्यक्ष व्यवस्थापन सुविधाच देत नाही तर राज्यातील पाणीपुरवठा अधिकारी आणि नागरीकांना प्रत्येक क्षणाची अचूक माहिती उपलब्ध करते. जल जीवन अभियानाविषयी देशातल्या ग्रामीण भागामध्ये सन 2024 पर्यंत प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजीवणीमध्ये येणाऱ्या विविध समस्या सोडवत असताना जलशक्ती मंत्रालय अभिनव तंत्रांची मदत घेत आहे. पाणी योजनेचे काम करताना त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जल स्त्रोतांची उपलब्धता आणि जलस्तर त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता, जलपूर्ती आणि स्वच्छता यांच्यामध्ये समन्वय साधणे, तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा रंग राखाडी असतो काही ठिकाणी पाण्यामध्ये गाळ साठलेला असतो, अशा विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना जलशक्ती मंत्रालयाकडून ऑनलाइन मदत देण्यात येत आहे.

🟧‘भारत बायोटेक’च्या लस आयातीस ब्राझीलकडून नकार. येथील ‘भारत बायोटेक’ कंपनीत तयार केल्या जात असलेल्या कोव्हॅक्सिन लशीला आयातीची परवानगी देण्यास ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने नकार दिला आहे. या कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना दिसत नाही, असा शेरा त्यांनी मारला आहे. आयात बंदीच्या निर्णयावर ‘भारत बायोटेक’ कंपनीने म्हटले आहे की, प्रकल्पातील काही घटकांच्या अटी पूर्ण केल्या जातील. ब्राझील सरकारने २ कोटी लस मात्रांची मागणी आयातीच्या माध्यमातून नोंदवली होती, तो प्रस्ताव अजून बाद झालेला नाही. अ जूनही ब्राझील ती लस आयात करेल फक्त त्यासाठी आम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. ब्रेसिसा मेडिकॅमेंटॉस या कंपनीशी हा करार झाला होता. उत्कृष्ट उत्पादन पद्धतींचे अनुपालन न केल्याने ब्राझीलने ही आयात थांबवली आहे, असे ‘अ‍ॅनव्हिसा’ने संकेतस्थळावर म्हटले आहे जर्मनीत ऑक्सफर्ड लशीच्या वापराला स्थगिती - रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या कारणास्तव काही वयोगटांसाठी जर्मनी व कॅनडा यांनी या लशीचा वापर थांबवला आहे. या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोव्हिशिल्ड’ नावाने केले आहे.

🟧केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी एनसीटीई पोर्टलच्या “मायएनईपी 2020” मंचाची सुरुवात केली. 1 एप्रिल ते 15 मे 2021 या कालावधीत हा मंच कार्यरत असेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज एनसीटीई वेब पोर्टलच्या “मायएनईपी 2020” मंचाची सुरुवात केली. या मंचावर शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके (एनपीएसटी) आणि नॅशनल मिशन फॉर मेन्टरिंग प्रोग्राम मेम्बरशिप  (एनएमएम) विकसित करण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी हितधारकांकडून सूचना / माहिती  / सदस्यत्व  आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. “MyNEP2020” मंच 1 एप्रिल 2021 ते 15 मे 2021 पर्यंत कार्यरत असेल. डिजिटल सल्लामसलतीच्या या अभ्यासामध्ये  शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रात शाश्वत आणि सकारात्मक बदलांसाठी शिक्षकांच्या धोरणावरील कागदपत्रे तयार करण्यात शिक्षक, शैक्षणिक व्यावसायिक, शिक्षणतज्ञ आणि इतर हितधारकांचा  सहभाग अपेक्षित आहे. एनईपी 2020 च्या वरील दोन प्रमुख शिफारसींबाबत  कागदपत्रे तयार करण्यासाठी, एनसीटीई  व्यक्ती / संघटनांबरोबर  सल्लामसलत  करेल. तज्ज्ञ समिती सल्लामसलत कालावधीत संकलित माहितीचा सविस्तर आढावा घेईल आणि त्यानंतर  जनतेसाठी अंतिम मसुदा  तयार करेल. त्यानंतर  अधिसूचनेसाठी अंतिम मसुदा तयार करण्यासाठी हितधारकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.  

🟧उडान योजनेच्या अंतर्गत 3 दिवसात 22 मार्गांचे उद्घाटन दुर्गम प्रदेशांना जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत 27 मार्च ते 30 मार्च 2021 या तीन दिवसात 22 नवीन मार्ग कार्यरत केले गेले आहेत. 🅾ठळक बाबी 22 पैकी 6 नवीन मार्ग ईशान्य भारतात कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात शिलॉंग (मेघालय) - सिलचर (आसाम), शिलॉंग (मेघालय) - अगरतला (त्रिपुरा) या मार्गांचा समावेश आहे. 28 मार्च 2021 रोजी उडान योजनेच्या अंतर्गत 18 नवीन मार्गाना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. राज्य समर्थित उडान मार्ग गोरखपूर (उत्तरप्रदेश) ते लखनऊ (उत्तरप्रदेश), कुर्नूल (आंध्रप्रदेश) ते बंगळुरू (कर्नाटक), विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) आणि चेन्नई (तामिळनाडू), आग्रा (उत्तरप्रदेश) ते बेंगलोर (कर्नाटक) आणि भोपाळ (मध्यप्रदेश), प्रयागराज (उत्तरप्रदेश) ते भुवनेश्वर (ओडिशा) आणि भोपाळ (मध्यप्रदेश) हे मार्ग कार्यरत झाले. या मार्गांच्या व्यतिरिक्त, दिब्रूगड (आसाम) ते दिमापूर (नागालँड) पर्यंत नवीन हवाई मार्ग तयार करण्यात आला. उडान अंतर्गत वर्तमानात 57 वापरात नसलेली आणि वापराधीन विमानतळे (5 हेलीपोर्ट आणि 2 वॉटर एरोड्रोम यांच्यासह) 347 मार्गांसह भारतभरात कार्यरत आहेत. 🅾उडान (उडे देश का आम नागरिक) योजना. भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.उडान योजनेच्या अंतर्गत 3 दिवसात 22 मार्गांचे उद्घाटन दुर्गम प्रदेशांना जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत 27 मार्च ते 30 मार्च 2021 या तीन दिवसात 22 नवीन मार्ग कार्यरत केले गेले आहेत.

🟧लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे. दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे. या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के आहे. राजकीय सक्षमीकरणात भारताला मोठा फटका बसला असून त्यात १३.५ टक्के नोंद आहे. २०१९ मध्ये भारताची टक्केवारी २३.१ होती ती २०२१ मध्ये ९.१ टक्के झाली आहे. कामगार- कर्मचारी यात महिलांचा घटता सहभाग हे याचे प्रमुख कारण ठरले असून हा सहभाग २४.८ टक्क््यांवरून २२.३ टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक व तंत्रज्ञानात्मक भूमिकात महिलांचा सहभाग कमी होऊन तो २९.२ टक्के राहिला आहे. वरिष्ठ व व्यवस्थापकीय पातळीवर महिलांचा सहभाग कमीच असून १४.६ टक्के वरिष्ठ पदांवर महिला आहेत. व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न भारतात एक पंचमांश आहे. त्यामुळे भारत खालच्या दहा देशात गेला आहे. महिलांविरोधातील भेदभाव जास्त असून आरोग्य व जीवन संघर्षात टिकून राहण्याच्या निर्देशांकात भारताने खराब कामगिरी केली आहे. भारत त्यामुळे यात घटक निर्देशांकात खालच्या पाच देशात आहे.

🟧आणखी ३ राफेल लढाऊ विमाने आज भारतात होणार दाखल. फ्रान्सच्या संरक्षण उत्पादक डॅसॉल्ट एव्हिएशन यांनी बनविलेले आणखी तीन राफेल लढाऊ विमानांची नवी तुकडी बुधवारी भारतात दाखल होणार आहे. येणारी तीन राफेल लढाऊ विमाने अंबाला येथील आयएएफच्या गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉनमध्ये सामील होतील त्यामुळे या स्क्वॉड्रॉनमधील विमानांची संख्या १४ होईल. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनाईन यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाच अतिरिक्त राफेल विमाने एप्रिल अखेरपर्यंत भारतात आणण्यात येणार आहेत. ही विमाने बुधवारी दाखल होणाऱ्या तीन राफेल व्यतिरिक्त असतील, असेही ते म्हणाले. या गोष्टीला “मोठ्या अभिमानाची बाब” म्हणत ते म्हणाले की, “कोविड -१९ महामारी असूनही आम्ही वेळेपेक्षा आधी आम्ही हे वितरित करू शकलो आहोत.” फ्रान्सचे राजदूत म्हणाले की, “आत्तापर्यंत २१ राफेल विमाने भारतात पोहचवली गेली आहेत, ११ आधीच भारतात आणले गेले आहेत, तीन विमाने सध्या येत आहेत आणि एप्रिलच्या अखेरीस अतिरिक्त ५ विमाने आणण्यात येतील,’ असे भारतातील फ्रान्सचे राजदूत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “२०२२ मध्ये एकूण ३६ विमाने करारानुसार देण्यात येतील.” गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्टच्या कालावधीत या विमानाने हवाई दलाच्या ताफ्यात सामील होण्यास सुरुवात केली होती आणि हवाई दलाने कमीतकमी वेळेत ते कार्यान्वित केले आहेत.

🟧आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे तसेच इतर कर माहिती देण्याविषयक कालमर्यादेला मुदतवाढ.   कोविड-19 महामारीच्या संसर्गामुळे येणाऱ्या अडचणी बघता, करविषयक तसेच बेनामी संपत्तीविषयक माहिती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली कालमर्यादा वाढवण्यात आली असून कररचना आणि इतर कायदे (शिथिलता आणि विशिष्ट तरतुदींमध्ये सुधारणा) कायद्याअंतर्गत, तशी अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत, आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडण्यासाठी आज म्हणजेच 31 मार्च 2021 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, कोविड महामारी संसर्गामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, आधार क्रमांक पॅन कार्ड संलग्न करण्यासाठीची मुदत वाढवावी अशा आशयाची विनंती करणारी अनेक पत्रे विभागाला मिळाली. त्यांची दाखल घेऊन, केंद्र सरकारने आज तशी अधिसूचना जारी करत, ही मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. तसेच, या अधिसूचनेनुसार, विवाद निवारण समिती (DRP) ने जारी केलेल्या निर्देशांनुसार, या कायद्याच्या कलम 148 अन्वये, नोटीस जारी करण्यासाठीच्या कालमर्यादेलाही मुदतवाढ देण्यात आली असून इक्विलायझेशन लेव्ही स्टेटमेंट च्या प्रकियेलाही 30 एप्रिल 2021 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

🟧 संयुक्त पूर्व परीक्षा हॉल तिकिट आले आहेत. 🟧Maharashtra Subordinate Services Non-gazetted, Group-B Combined Pre Examinatio
🟧 संयुक्त पूर्व परीक्षा हॉल तिकिट आले आहेत. 🟧Maharashtra Subordinate Services Non-gazetted, Group-B Combined Pre Examination 2020" प्रवेशप्रमाणपत्र जाहीर. 👇link https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

▪️सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती बाबत आयोगाची घोषणा.
▪️सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती बाबत आयोगाची घोषणा.

🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks
🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 🔶दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. 🔶प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, 'महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.' दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे १२ वे दाक्षिणात्य अभिनेते 🔶रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟧ओसीआय’ कार्डधारकांना भारतात जुन्या पारपत्राची गरज नाही भारतीय वंशाच्या व्यक्ती व भारतीय समुदायाच्या ज्या व्यक्तींकडे ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया म्हणजे ओसीआय कार्ड असेल त्यांना आता भारतात जुने पारपत्र (पासपोर्ट) दाखवावे लागणार नाही. त्यांना मुदत संपलेल्या जुन्या पासपोर्टची गरज राहणार नाही, असे सांगण्यात आले असून या अधिसूचनेचे परदेशस्थ भारतीयांनी स्वागत केले आहे. ओसीआय कार्ड हे जगातील भारतीय वंशाच्या अशा प्रतिनिधींना दिले जाते, की जे भारताचेही नागरिक आहेत. सध्या तरी या लोकांना मतदानाचा अधिकार नाही पण तो दिला जावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. २६ मार्चच्या अधिसूचनेनुसार अमेरिकेतील भारतीय दूतावासांनी म्हटले आहे, की ओसीआय कार्डधारकांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी ओसीआय कार्ड पुन्हा जारी करण्यासाठी कालमर्यादा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तोपर्यंत नवीन कार्ड जारी केले जाईल. ओसीआय कार्ड बरोबर जुना पासपोर्ट बाळगण्याची अट रद्द करण्यात आली आहे. नवा पासपोर्ट जवळ ठेवणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. न्यूयॉर्क येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेम भंडारी यांनी म्हटले आहे, की अनेक वर्षांपासून ओसीआय कार्डधारकांची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्याबाबत भारताच्या गृह कामकाज खात्याला धन्यवाद देतो. ओसीआय कार्ड नूतनीकरणासाठी मुदतवाढ व जुन्या पासपोर्टची सक्ती रद्द करणे या दोन्ही निर्णयांचे स्वागतच आहे.

🟧सुएझ’ जलमार्ग मोकळा करण्यास झाली ‘पौर्णिमेच्या चंद्राची मदत' सुएझ कालव्यात अडकून पडलेले ‘एव्हरग्रीन’ या तैवानी कंपनीचे ‘एव्हर गिव्हन’ हे जहाज सुमारे १८ हजार कंटेनर वाहून नेत होते. या अडकलेल्या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न आठवडाभर सुरू होते. अखेर या प्रयत्नांना सोमवारी यश आले. दोन लाख २० हजार टन वजनाचे हे जहाज आता ‘ग्रेट बिटर लेक’च्या दिशेने वळवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक पुन्हा सुरळीत होईल असा अंदाज आहे. हे जहाज बाहेर काढण्यासाठी मदत लागली ती लहान टग बोटींची आणि पौर्णिमेच्या चंद्राची. हो याचा अर्थ सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांनी एकत्रितपणे या मोहिमेत मदत केली आहे. बचाव कार्यसंघाने या आठवड्यात पौर्णिमेच्या दिवशी हे जहाज बाहेर निघेल अशी आशा व्यक्त केली होती, रविवारीपासून, कालव्यातील पाण्याची पातळी सामान्यत: असलेल्या पातळीपेक्ष एक ते दीड फुट वाढली होती. त्यामुळे कालव्याच्या एका बाजूने जहाजाला बाहेर खेचणे सोपे झाले होते कारण १३०० फूट लांब असलेल्या जहाजातून १८,००० कंटेनर उतरवणे फारच अवघड गेले असते.