fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
428
مشترکین
-124 ساعت
+67 روز
+530 روز
آرشیو پست ها
photo content
+1

त्रिभाषा धोरण समितीस दुसऱ्यांदा मुदतवाढ पहिलीपासून त्रिभाषा सूत्र देशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोनच केंद्रशासित प्रदे
त्रिभाषा धोरण समितीस दुसऱ्यांदा मुदतवाढ पहिलीपासून त्रिभाषा सूत्र देशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोनच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे. राज्य शासनाने 30 जून 2025 रोजी त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी ही समिती गठित केली होती. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव आहेत.

AACA च्या मीडिया अवॉईस 2026 चे अहमदाबादमध्ये भव्य आयोजन अहमदाबादमध्ये फेस्टिव्हल ऑफ ॲडव्हर्टायझिंग 2026 अंतर्गत AACA मीडिया अ
AACA च्या मीडिया अवॉईस 2026 चे अहमदाबादमध्ये भव्य आयोजन अहमदाबादमध्ये फेस्टिव्हल ऑफ ॲडव्हर्टायझिंग 2026 अंतर्गत AACA मीडिया अवॉर्ड्स 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले. आयोजक : अहमदाबाद ॲडव्हर्टायझिंग सर्कल असोसिएशन (AACA). निमित्त : AACA च्या 35 व्या वर्धापनदिनाचा सोहळा

कर्तव्यपथा'वर दिसणार महाराष्ट्राचे शक्तिवैभव 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य संचलनात महाराष्ट्
कर्तव्यपथा'वर दिसणार महाराष्ट्राचे शक्तिवैभव 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य संचलनात महाराष्ट्राचा 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवरील चित्ररथ असणार आहे. यंदाच्या संचलनात सहभागी होणाऱ्या एकूण 30 चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवरील चित्ररथ विशेष लक्ष वेधून घेणार आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुजवलेली सामाजिक एकात्मतेची चळवळ आज आधुनिक भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चा कसा पाया ठरते, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथातून सादर केले जाणार आहे.

भाजपला मिळाले सर्वांत तरुण अध्यक्ष : नितीन नबीन [भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष] 45 वर्षीय नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय
भाजपला मिळाले सर्वांत तरुण अध्यक्ष : नितीन नबीन [भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष] 45 वर्षीय नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. [या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.]

एम. व्ही. पाठक यांची कमांडरपदी नियुक्ती एम. व्ही. पाठक यांनी मुंबईत भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी किनारा कमांडर पदाचे अ
एम. व्ही. पाठक यांची कमांडरपदी नियुक्ती एम. व्ही. पाठक यांनी मुंबईत भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी किनारा कमांडर पदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने स्पर्धात्
सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. सायना नेहवालला मिळालेले पुरस्कार : 1] अर्जुन पुरस्कार (2009), 2] राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, (2009-10) 3] पद्मश्री (2010), 4] पद्मभूषण (2016)

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर 11 व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर 11 व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर झाला आहे. [पुरस्काराचे स्वरूप : पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लाख रूपये]

चंद्राच्या मोहिमेसाठी नासा सज्ज ! अमेरिकन अंतराळ संस्था नासा 'आर्टमिस-2' मोहिमेद्वारे आपल्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटसह चंद्रा
चंद्राच्या मोहिमेसाठी नासा सज्ज ! अमेरिकन अंतराळ संस्था नासा 'आर्टमिस-2' मोहिमेद्वारे आपल्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटसह चंद्राभोवती मानवी प्रदक्षिणा घालण्यासाठी सज्ज झाली आहे. [50 वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच मानवाला चंद्राच्या कक्षेत पाठवले जात आहे.]

मारिया मचाडोंनी स्वतःचा नोबेल पुरस्कार ट्रम्पना दिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारि
मारिया मचाडोंनी स्वतःचा नोबेल पुरस्कार ट्रम्पना दिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपले नोबेल पदक भेट म्हणून दिले. व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीचा सन्मान म्हणून याच्या प्रणेत्या मचाडो यांना 2025 सालचा नोबेल शांतता पुरस्कार दिला होता.

भारत नवी दिल्ली येथे 28 व्या राष्ट्रकुल सभापती आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचे (CSPOC) आयोजन करत आहे. 42 राष्ट्रकुल देश
भारत नवी दिल्ली येथे 28 व्या राष्ट्रकुल सभापती आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचे (CSPOC) आयोजन करत आहे. 42 राष्ट्रकुल देशांतील 61 सभापती व पीठासीन अधिकारी या संमेलनात सहभागी झाले आहेत. भारताने चौथ्यांदा या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आहे.

महेंद्रसिंह धोनी पुणे ग्रँड टूरसाठी सदिच्छादूत. महेन्द्रसिंह धोनी यांची पुणे ग्रँड टूर 2026 या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय
महेंद्रसिंह धोनी पुणे ग्रँड टूरसाठी सदिच्छादूत. महेन्द्रसिंह धोनी यांची पुणे ग्रँड टूर 2026 या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मल्टी-स्टेज व्यावसायिक रोड सायकलिंग स्पर्धेसाठी सदिच्छादूत म्हणून निवड झाली आहे, जी 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान पुण्यात होणार आहे. पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धेत 35 देशांतील 29 संघांचे एकूण 171 सायकलपटू सहभागी होत आहेत.

देशात पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळल्याला 15 वर्षे पूर्ण जागतिक पोलिओ दिन दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 13 जानेवारी 201
देशात पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळल्याला 15 वर्षे पूर्ण जागतिक पोलिओ दिन दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 13 जानेवारी 2011 रोजी भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळला होता. [भारताने 13 जानेवारी 2026 रोजी पोलिओमुक्त प्रवासाची 15 वर्षे पूर्ण केली आहेत.]

Current Eco अटल पेन्शन योजनेला 2030/31 पर्यंत मुदत वाढ सुरुवात: 9 मे 2015 रोजी औपचारिकपणे सुरू झाली. अंमलबजावणी: 1 जून 2015 प
Current Eco अटल पेन्शन योजनेला 2030/31 पर्यंत मुदत वाढ सुरुवात: 9 मे 2015 रोजी औपचारिकपणे सुरू झाली. अंमलबजावणी: 1 जून 2015 पासून लागू झाली. उद्देश: असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत करणे. वयोगट: 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींसाठी. लाभ: 60 वर्षांनंतर ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत निश्चित पेन्शन मिळते, जी सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला मिळते.

Current Eco UPI द्वारे 5000 RS पर्यंत ॲप मधूनच कर्ज मिळणार. तसेच व्याज नसेल आणि संबंधित तारखेच्या पेमेंट केल्यास कोणतेही इतर
Current Eco UPI द्वारे 5000 RS पर्यंत ॲप मधूनच कर्ज मिळणार. तसेच व्याज नसेल आणि संबंधित तारखेच्या पेमेंट केल्यास कोणतेही इतर शुल्क लागणार नाही. UPI सुरुवात 2016 NPCI स्थापन 2008

current Eco RBI कडून अंतर्गत लोकपाल साठी नवे नियम लोकपालाची पात्रता: सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेला अधिकारी; जनरल मॅनेजर (GM)
current Eco RBI कडून अंतर्गत लोकपाल साठी नवे नियम लोकपालाची पात्रता: सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेला अधिकारी; जनरल मॅनेजर (GM) दर्जा समकक्ष असणे आवश्यक. अनुभव अट: बँकिंग/नियमन/ग्राहक संरक्षण क्षेत्रात किमान 7 वर्षांचा अनुभव अनिवार्य. बँकिंग लोकपाल योजना 1995 ल सुरू करण्यात आली आहे आणि ही योजना बँक बाबत जर ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर निवारण करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

सुनिता विल्यम्स यांची ‘नासा’तून निवृत्ती
सुनिता विल्यम्स यांची ‘नासा’तून निवृत्ती

भूगोल दिन : 14 जानेवारी भारतात 14 जानेवारीला 'भूगोल दिन' साजरा होतो, तर 27 जानेवारी 'National Geographic Day' म्हणून साजरा के
भूगोल दिन : 14 जानेवारी भारतात 14 जानेवारीला 'भूगोल दिन' साजरा होतो, तर 27 जानेवारी 'National Geographic Day' म्हणून साजरा केला जातो.  भूगोल विषयासाठी मोलाचे काम करणारे, महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक डॉ. सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिवस. 1990 मध्ये डॉ. सी.डी. देशपांडे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र भूगोल समिती आणि भूगोल अध्यापक मंडळाने "भूगोल दिन" साजरा करण्यास सुरुवात केली.

केरळचे नाव होणार केरळम् केरळ राज्याचे नाव 'केरळम' असे बदलण्याचा प्रस्ताव केरळ विधानसभेत एकमताने मंजूर झाला आहे आणि आता केंद्र
केरळचे नाव होणार केरळम् केरळ राज्याचे नाव 'केरळम' असे बदलण्याचा प्रस्ताव केरळ विधानसभेत एकमताने मंजूर झाला आहे आणि आता केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा प्रस्ताव मांडला असून, संविधानातील आठव्या अनुसूचीमधील सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव 'केरळम' असे व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे

ग्रीनलँड एवढे महत्त्वाचं का आहे...
ग्रीनलँड एवढे महत्त्वाचं का आहे...