mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
428
مشترکین
-124 ساعت
+67 روز
+530 روز
آرشیو پست ها
#Updated Current Eco
56 वी परिषद (Annual Meeting 2026) (world Economic Forum)
स्थापना: 1971 मध्ये 'युरोपियन मॅनेजमेंट फोरम म्हणून नंतर WEF बनले.
सध्या 56 वी परिषद (Annual Meeting 2026) स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १९-२३ जानेवारी २०२६ दरम्यान सुरू आहे.👆👆
मोकाट जनावरे पाळा, दरमहा 12 हजार मिळवा, उत्तराखंड सरकारची नवी योजना
मोकाट 5 जनावरांना आसरा देणाऱ्या व्यक्तीला दरमहा 12,000 रुपयांपर्यंत उत्पन्न देण्याची घोषणा उत्तराखंड राज्य सरकारने केली आहे.
रस्ते आणि शेतात घुसखोरी करणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तराखंड सरकारने "ग्राम गौर सेवक योजना" आणि "गोशाळा योजना" या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत.
1] ग्राम गौर सेवक योजना : या योजनेंतर्गत, जी व्यक्ती जास्तीत जास्त पाच नर मोकाट जनावरांना (वळू/बैल) सांभाळेल त्यांना प्रतिजनावर दररोज 80 रुपये दिले जातील. [जनावरांना मोफत आरोग्य सेवाही पुरवली जाईल.]
2] गोशाळा योजना : या योजनेत कोणतीही व्यक्ती आपल्या गोठ्यात वा गोशाळेत कितीही संख्येने मोकाट जनावरांना आसरा देऊ शकते. त्यासाठीही प्रतिजनावर दिवसाला 80 रुपये या दराने मानधन दिले जाईल.
विजय हजारे करंडक : सौराष्ट्रला नमवून विदर्भ ठरले 'चॅम्पियन'
विदर्भ संघाने 2025-26 च्या विजय हजारे करंडकाचे विजेतेपद पहिल्यांदाच पटकावले आहे. [अंतिम सामन्यात त्यांनी सौराष्ट्रचा 38 धावांनी पराभव केला.]
ठिकाण : बेंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड.
सामनावीर : अथर्व तायडे (विदर्भ : 128 धावा).
Current Eco
पायाभूत सुविधा घटक मुख्य
((शक्तीपीठ महामार्ग))
👉 लांबी एकूण 802 किमी आहे परंतु यामध्ये वाढ होऊन 840 किमी एवढी लांबी होण्याची शक्यता आहे.
👉महामार्गाला 18 धार्मिक स्थळे जोडली जाणार असून ((तीन शक्तीपीठे 👉माहूर, तुळजापूर, कोल्हापूर)) या मार्गावर येतात.
👉 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे.
Eco Current
👉पायाभूत सुविधा घटक (मुख्य)
👉देशातील पहिली वंदे भारत (स्लीपर )एक्सप्रेस सुरू करण्यात आली.
👉 ही ट्रेन हावडा – गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान धावणार आहे.
((वंदे भारत बाबत इतर माहिती))
👉 पहिली वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली((सिटींग)).
👉पहिली वंदे भारत नवी दिल्ली – वाराणसी या स्टेशनदरम्यान धावली.
👉दिल्ली–वाराणसी अंतर सुमारे 787 किमी आहे.
👉वंदे भारतचे दुसरे नाव सुरुवातीला Train-18 होते.
मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ‘ग्रोक’ या AI आधारित चॅट बॉटवर बंदी
मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी "ग्रोक" या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅट बॉट वर बंदी घातली आहे. [अशी कारवाई करणारे हे जगातील पहिलेच देश आहेत.]
एलोन मस्क यांच्या "X" AI कंपनीने तयार केलेल्या या चॅट बॉट चा वापर अश्लील छायाचित्र, चित्रफिती आणि इतर अश्लील आशयनिर्मितीसाठी होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
#Updated Current
राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन...
नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा सहभाग....
भारताने चौथ्यांदा यजमानपद भूषविले आहे.
PSLV (पीएसएलव्ही) उड्डाण अयशस्वी
👉 PSLV-C57 / EOS-09 हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले; प्रारंभी उड्डाण सुरळीत झाले.
👉तिसऱ्या टप्प्यात (Third Stage) रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला.
👉रॉकेटचा मार्ग (Trajectory) बिघडला, त्यामुळे उपग्रह अपेक्षित कक्षेत पोहोचू शकला नाही.
👉परिणामी EOS-09 उपग्रहाचे नियोजित कक्षेत स्थिरीकरण अपयशी ठरले.
👉ISRO कडून कारणांचा सखोल तपास सुरू असून, भविष्यातील मोहिमांसाठी सुधारणा केल्या जाणार आहेत..👆👆
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले.
- पद्मश्री पुरस्कार (1981)
- पद्मभूषण पुरस्कार (2006)
- शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1986)
- टाइलर पुरस्कार (2015)
- संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार (2024) 💐💐
वर्दीतल्या माणसाच्या नोंदी
लेखक - महासंचालक सदानंद दाते
हे एक प्रकारचे आत्मकथन असून, ते खाकी वर्दीपलीकडचा माणूस आणि त्याचे अनुभव वाचकांसमोर आणते.
प्रकाशक - समकालीन प्रकाशन
शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश चव्हाण
9 व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
अमेरिका येथील जगप्रसिद्ध 'लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'मध्ये डॉ. गणेश चव्हाण यांच्या "भरकाडी" या ग्रंथांचा समावेश झाला आहे.
डॉ. गणेश चव्हाण यांचा "भरकाडी" हा कथासंग्रह भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित आहे. [गोरबोली भाषेतील कथांचा समावेश.]
Eco Current
स्रोत: IMF
GDP वृद्धीदर % नुसार विचार केल्यास भारत जगात प्रथम स्थानी 6.20% असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
GDP आकारमानानुसार विचार केल्यास भारत जगात चौथ्या स्थानी आहे.
1) अमेरिका
२) चीन
३) जर्मनी
४) भारत
वरील प्रमाणे क्रम आहे तसेच भारतात GSDP चा विचार केल्यास सर्वाधिक महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे.
Current Eco
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केंद्र सरकारची अधिकृत घोषणा....
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था
अमेरिका,चीन ,जर्मनी,भारत आणि जपान.
पुढील परिस्थितीवर भारत जर्मनीलाही मागे टाकेल असा विश्वास केंद्र सरकार दर्शविला आहे.
