mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
428
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+77 روز
+630 روز
آرشیو پست ها
जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे व्हेनेझुएला (सुमारे 303 अब्ज बॅरल) कडे आहेत. त्याखालोखाल सौदी अरेबिया (267 अब्ज बॅरल) आणि इराण (209 अब्ज बॅरल) यांचा क्रमांक लागतो.
Current Eco
पंतप्रधान कार्यालयाचे नवीन संकुल सेवातीर्थ चे उद्घाटन करताना खालील चार योजनांना गती देण्यात आली.
👉पंतप्रधान दिलासा योजना
👉कृषी पायाभूत सुविधा निधी यामध्ये दोन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली
👉लखपती दीदी योजना 2029 पर्यंत सहा कोटी
पर्यंत वाढविण्याचे लक्ष.
👉स्टार्ट अप इंडिया 2.0 यामध्ये फंड ऑफ फंड्स निधी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आला.
◆ सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) चे आधार वर्ष 2012 वरून 2024 केले आहे.
◆ तमिळनाडूतील व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण (VOC Port) शाश्वत, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम इमारतींसाठी प्रतिष्ठित IGBC प्लॅटिनम रेटिंग मिळवणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर बनले आहे.
◆ भारत सरकारने 1 जानेवारी 2026 पासून किम्बर्ली प्रोसेस (KP) चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
◆ भारतीय वायुसेना 27 फेब्रुवारी 2026 रोजी जैसलमेरच्या पोखरण रेंजमध्ये 'वायुशक्ती-26' हा मोठा हवाई सराव आयोजित करेल.
◆ भारतात राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
◆ युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या 145 वर्षे जुन्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (DHR) च्या इतिहासात 5 फेब्रुवारी 2026 रोजी सरिता योल्मो (दार्जिलिंग) या पहिल्या महिला TTE बनल्या आहेत.
◆ Four Stars of Destiny: An Autobiography हे पुस्तक भारताचे 28 वे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे आत्मचरित्र आहे.
◆ भारतीय हवाई दलाने (IAF) रॉयल थाई हवाई दलासोबत (RTAF) फेब्रुवारी 2026 मध्ये "इन-सिटू" (In-Situ) संयुक्त हवाई सराव आयोजित केला.
◆ सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी 'पायलट जिल्हा' म्हणून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
◆ गोवा राज्य सरकारने राज्याचा पहिला 'जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा' लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. हरिप्रिया अरविंद आणि डॉ. आर. वेंकटेश यांची 2026 च्या प्रतिष्ठित चांग-क्रँडल मानवतावादी पुरस्कार 2026 साठी संयुक्तपणे निवड
'जातमुक्त गाव' : सौंदाळा, अहिल्यानगर
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने स्वतःला 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित केले आहे.
सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025
Transparency International या संस्थेने 'भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025' जाहीर केला आहे.
भारताचा क्रमांक : 100 पैकी 39 गुणांसोबत भारत 182 देशांच्या यादीत 91 व्या क्रमांकावर आहे. [2024 मध्ये भारत 96 व्या क्रमांकावर होता.]
जागतिक क्रमवारी :
1] डेन्मार्क : 89 गुण (सर्वात कमी भ्रष्टाचार)
2] फिनलंड : 88 गुण
3] सिंगापूर : 84 गुण
सर्वात खराब कामगिरी करणारे देश :
180] वेनेझुएला : 10 गुण
181] सोमालिया & दक्षिण सुदान : 9 गुण (सर्वात जास्त भ्रष्टाचार)
जागतिक रेडिओ दिन : 13 फेब्रुवारी
जागतिक रेडिओ दिन दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
2026 ची थीम : "रेडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स: आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक उपकरण आहे, आवाज नाही"
2025 ची थीम : "रेडिओ आणि हवामान बदल"
रेडिओचा शोध प्रामुख्याने गुग्लिएल्मो मार्कोनी (Guglielmo Marconi) या इटालियन शास्त्रज्ञाने लावला.
भारतात सुरुवात : 1923 मध्ये मुंबईच्या रेडिओ क्लबने पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केला.
#Updated Eco Current
राज्यनिहाय Start अप संख्या सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आहे व दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे....
👆👆
◆ दिल्ली हे 'भारत टॅक्सी' या सहकारी-आधारित राईड-हेलिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करणारे भारतातील पहिले केंद्रशासित प्रदेश/राज्य बनले आहे.
◆ आंतरराष्ट्रीय डार्विन दिन दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. [हा दिवस उत्क्रांती सिद्धांताचे जनक चार्ल्स डार्विन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.]
◆ दिल्ली सरकारने आपल्या पहिल्या 'दिल्ली खेल महाकुंभ' या भव्य क्रीडा महोत्सवासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ 11 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण देशात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. [या दिवसाला 'समर्पण दिवस' म्हणून ओळखले जाते.]
◆ भारतातील पहिला 'Musical Road मुंबई शहरात तयार करण्यात आला आहे.
◆ SCALP (स्टॉर्म शॅडो) हे क्षेपणास्त्र फ्रान्स आणि युनायटेड किंगडम (इंग्लंड) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. [क्रूझ क्षेपणास्त्र]
◆ बायोफाच (BIOFACH) 2026 या सेंद्रिय उत्पादनांच्या जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शनात भारताला 'कंट्री ऑफ द ईयर' (Country of the Year) म्हणून बहुमान मिळाला आहे. [ठिकाण : न्युरेमबर्ग, जर्मनी]
◆ गुजरातचा आदित्या पंड्या 'सर्वात तरुण भारतीय ॲनालॉग अंतराळवीर' बनला आहे.
◆ भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 91 व्या क्रमांकावर आहे.
◆ दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी 'लखपती बिटिया योजना' सुरू करण्याची घोषणा केली आहे.
◆ नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 (NRI 2025) अहवालानुसार भारत 45 व्या क्रमांकावर आहे.
◆ नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 अहवाल वॉशिंग्टन DC येथील "Portulans Institute" या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो.
सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक
केंद्र सरकारने आता प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् च्या संपूर्ण सहा कडव्यांचे गायन किंवा वादन अनिवार्य केले आहे. [जन गण मन या 52 सेकंदांच्या राष्ट्रगीतासह आता 3 मिनिटं 10 सेकंदांचं वंदे मातरम् सादर करणंही अनिवार्य आहे.]
'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल.
वंदे मातारम् 1875 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर रोजी या गीताची रचना केली. [7 नोव्हेंबर 2025 मध्ये या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले.]
आसाममध्ये भारतातील सर्वांत लांब भूकंपरोधक पूल तयार
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला सहा-पदरी भूकंपरोधक पूल अर्थात महासेतू तयार झाला आहे. [हा भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल असेल.]
केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार - थान्या नाथन
◾️व्यक्तीचे नाव --> थान्या नाथन
◾️राज्य --> केरळ 🇮🇳
◾️ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झाल्या
◾️कामगिरी --> अपंगत्व गुणवत्ता यादीत Rank 1 मिळवला 🥇
◾️अपंगत्व प्रकार --> पूर्णपणे दृष्टिहीन
◾️केरळ उच्च न्यायालय मध्ये
◾️महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय --> सर्वोच्च न्यायालयाचा 2025 चा निर्णय – अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही ⚖️
◾️त्यांचे वय --> 24 Years
◾️शिक्षण --> कन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये Rank 1 🎓
◾️कारकीर्द सुरुवात --> कनिष्ठ वकील म्हणून तालीपरंबा येथे प्रॅक्टिस
◾️त्यांनी ब्रेल लिपी + स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर ने अभ्यास केला
◆ भूतानच्या राणी माता ग्याल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक यांना 22 वा उपेंद्र नाथ ब्रह्मा 'सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी' (मानवतेचा सैनिक) पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
◆ अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाई दलांनी दक्षिण कोरियातील प्योंगटेक येथील ओसान हवाई तळावर 'बडी स्क्वॉड्रन' हा संयुक्त हवाई सराव सुरू केला आहे.
◆ ओडिशाचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते विश्वभूषण हरिचंदन यांनी लिहिलेल्या 'E Mati Katha Kahe' आणि 'Buxi Jagabandhu: The Great Commander' या दोन पुस्तकांचे नुकतेच भुवनेश्वर येथे प्रकाशन करण्यात आले आहे.
◆ चीनच्या तियानजिनमध्ये 12 व्या आशियायी इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
◆ भारताच्या तेजस्विन शंकरने चीनच्या आशियायी इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ गुजरातने दुर्गम आणि आदिवासी भागात उपग्रह-आधारित इंटरनेट प्रदान करण्यासाठी SpaceX उपकंपनी Starlink सोबत करार केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. [अशा प्रकारचे ‘टास्क फोर्स’ निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.]
