mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
428
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+77 روز
+630 روز
آرشیو پست ها
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. [अशा प्रकारचे ‘टास्क फोर्स’ निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.]
◆ जागतिक कडधान्य दिन दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
◆ आसाममधील धाकुआखाना फुटबॉल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 79 व्या संतोष ट्रॉफी (2025-26) राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सर्विसेस (Services) संघाने चॅम्पियनशिप जिंकली
◆ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी बिलासपूर जिल्हा प्रशासनाच्या 'पढाई विथ AI' या अभिनव डिजिटल शिक्षण उपक्रमाचा बर्थिन येथे शुभारंभ केला.
◆ बांगलादेशला हरवून भारताने SAFF U19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे.
◆ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025 नुसार, चीनने संशोधन आणि विकासावर (R&D) सर्वाधिक खर्च करणारा देश बनला आहे.
◆ झारखंडच्या महिला संघाने पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावले.
◆ दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर अवैध शस्त्रांचे प्रदर्शन, त्याद्वारे दहशत पसरवणे आणि अपशब्दांचा वापर रोखण्यासाठी ‘Operation Shastra' नावाची व्यापक मोहीम सुरू केली आहे.
भारताचे तिसरे राष्ट्रपती थोर शिक्षणतज्ज्ञ
डॉ. झाकीर हुसेन (Dr. Zakir Hussain) यांची जयंती दरवर्षी ८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते .
८ फेब्रुवारी १८९७ रोजी हैदराबादमध्ये जन्मलेले डॉ. हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती (१९६७-१९६९) होते.
जामिया मिलिया इस्लामियाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले
डॉ. झाकिर हुसेन
बिहारचे राज्यपाल (१९५७), भारताचे उपराष्ट्रपती (१९६२) राष्ट्रपती (१९६७-१९६९)
१९६३ मध्ये 'भारतरत्न' सन्मान
३ मे १९६९ (राष्ट्रपती पदावर असतानाच निधन)
त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपले आयुष्य राष्ट्र आणि शिक्षणासाठी समर्पित केले
मनू भाकरने आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले.
आशियाई चॅम्पियनशिप : 25 मीटर पिस्तूल निकाल
1] एनगुयेन थुय ट्रेंग (व्हिएतनाम) : सुवर्ण
2] मनू भाकर (भारत) : रौप्य
3] ईशा सिंग (भारत) : कांस्य
रेल्वेची 'E-Pantry' सेवा सुरू
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-पॅन्ट्री (E-Pantry) सेवा सुरू केली असून, सुरुवातीला 25 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
याद्वारे प्रवाशांना त्यांच्या सीटवरच गरम आणि स्वच्छ जेवण, नाश्ता मिळवता येणार आहे
◆ भारतात पहिल्यांदाच 'ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026' चे आयोजन ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे करण्यात आले.
◆ हैदराबादमध्ये पार पडलेल्या 'Wings India 2026' पुरस्कार सोहळ्यात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL) द्वारे संचालित इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'वर्षातील सर्वोत्तम विमानतळ' हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
◆ हैदराबाद येथे पार पडलेल्या 72 व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप 2026 च्या अंतिम सामन्यात हरियाणाने गतविजेत्या इंडियन रेल्वेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
◆ 2026 हिवाळी ऑलिंपिकचे उद्घाटन इटली देशात झाले आहे. [भारताचा ध्वजवाहक म्हणून अल्पाइन स्कीअर आरिफ खान याने भारतीय पथकाचे नेतृत्व केले.]
◆ ग्लोबल फायरपॉवरच्या 2026 च्या अहवालानुसार, भारत जगातील चौथी सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती बनला आहे.
◆ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाल्पोई येथे '9 व्या गोवा पक्षी महोत्सवाचे' उद्घाटन केले.
◆ केरळनंतर व्यापक पक्षी अॅटलस प्रकाशित करणारे गोवा हे भारतातील दुसरे राज्य ठरले आहे.
◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे भारतातील पहिले सहकारी-आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म, भारत टॅक्सी अधिकृतपणे लॉन्च केले.
महाराष्ट्रात सायबर फसवणुकीची रक्कम रोखण्याचे प्रमाण अवघे 22 टक्के
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (DNH & DD) या केंद्रशासित प्रदेशाने सायबर गुन्हेगारी रोखण्यात आणि विशेषतः फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात देशात अव्वल स्थान पटकावले आहे
सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये नागरिकांचे पैसे वाचवण्यात उत्तर प्रदेश राज्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. [हरियाणा : दुसऱ्या क्रमांकावर]
◆ महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या आणि भविष्यात येणाऱ्या सर्व नवीन बसेसचे नामकरण राजमाता 'जिजाऊ' असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या 'AI इम्पॅक्ट समिट'साठी भारतात येणार आहेत.
◆ भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ डॉ. झाकीर हुसेन यांची जयंती दरवर्षी 8 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.
◆ डॉ. झाकीर हुसेन यांना शिक्षण आणि सार्वजनिक सेवेतील अतुलनीय कार्यासाठी भारत सरकारने 1963 मध्ये त्यांना 'भारत रत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
◆ पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
रूबल नागी यांना जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार
मुंबईतील शिक्षिका रूबल नागी या जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 च्या विजेत्या ठरल्या आहेत.
या अंतर्गत त्यांना 10 लाख अमेरिकन डॉलर्स देण्यात आले आहेत. [रुबल नागी यांची निवड ही 139 देशांतील 5000 शिक्षकांमधून करण्यात आली आहे.]
दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी GEMS एज्युकेशनचे संस्थापक सनी वर्गी यांनी हा पुरस्कार दिला.
ग्लोबल टीचर पुरस्काराची सुरुवात ही सर्वोत्कृष्ट शिक्षकास सन्मानित करण्यासाठी करण्यात आली. [वर्की फाउंडेशन आणि युनेस्को यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेला उपक्रम आहे.]
लाडक्या बहिणींसाठी "सक्षमा" उपक्रम
राज्य महिला आयोगाने राज्यभरातील महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी 'सक्षमा' या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे.
नागपूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'सक्षमा' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
'पल्स' वैद्यकीय परिषद मुंबईत
'पल्स' वैद्यकीय परिषदेचे मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे 27 व 28 मार्च रोजी आयोजन करण्यात येणार आहे.
'पल्स' वैद्यकीय परिषदेचे भव्यदिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेस' उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
◆ भारतीय शिक्षिका रूबल नागी यांनी दुबईतील जागतिक सरकार शिखर परिषदेत एक दशलक्ष डॉलर्सचे Global Teacher Prize 2026 जिंकले.
◆ "इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047" अंतर्गत 100% विमा कव्हरण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा अलवर (राजस्थान) आहे.
