शौर्य mpsc अकॅडमी
رفتن به کانال در Telegram
सर्व सपर्धा परीक्षा साठी गणित व बुद्धिमत्ता , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान , इंग्रजी म्हणजेच संपूर्ण विषयाची तयारी. ते पण नवीन पॅटर्न नुसार रोज अतीसंभव्य प्रश्न तसेच संभाव्य प्रश्नपत्रिका , जाहिरातीसाठी हे चॅनल उपयुक्त आहे.
نمایش بیشتر6 823
مشترکین
-124 ساعت
-37 روز
+2030 روز
آرشیو پست ها
6 823
📝 नववर्षात राज्यात 8100 पोलिसांची भरती.... शेवटी यामध्ये वाढ होणार
2027 जानेवारी पोलीस भरती मुहूर्त निघणार
लागा तयारीला
6 823
● दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
6 823
श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली..
6 823
आजच्या बैठकीमध्ये पोलीस भरती बाबत खालील महत्त्वाचे मुद्दे यावर सविस्तर चर्चा झाली :-
⭐️ दरवर्षी भरती जाहीर करणे
⭐️अगोदर लेखी परीक्षा घेऊन त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याच्या पर्यायाची चाचणी करणे.
⭐️ वयोमर्यादा वाढ करणे.
⭐️ होमगार्ड वयोवाढ तसेच अग्निवीर भरतीशी सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा.
6 823
पोलीस भरती २०२६-२७ वार्षिक वेळापत्रकाबाबत आयोजित बैठकीची सविस्तर माहिती.
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२६, दुपारी २:०० ते ३:००
स्थळ: मंत्रालय, मुंबई
अध्यक्ष: मा.ना. श्री. योगेश कदम साहेब, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
गृहराज्यमंत्री मा.ना. श्री. योगेश जी कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस भरती २०२६-२७ च्या वेळापत्रकाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीस उपस्थित मान्यवर: १. मा. आ. बच्चू कडू साहेब - विधानपरिषद आमदार (VC द्वारे उपस्थित) २. मा. श्री. कृष्णप्रकाश सर - अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), महाराष्ट्र ३. मा. श्री. रवींद्र पाटील सर - उपसचिव, गृहविभाग ४. कक्ष अधिकारी व संबंधित विभागाचे इतर अधिकारी
बैठकीतील चर्चेचा गोषवारा:
१. पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत: मा. आ. बच्चू कडू साहेब यांनी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पोलीस भरतीचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली. यावर प्रशासनाने गतवर्षीच्या प्रलंबित नियुक्त्या, प्रशिक्षणास होणारा विलंब व मधल्या काळात येणाऱ्या निवडणुका या अडचणी विशद केल्या.
सविस्तर चर्चा अंती मा. मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार ADGP मा. कृष्णप्रकाश सर यांनी दरवर्षी निश्चित रिक्त होणाऱ्या जागांच्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च या कालावधीत अंदाजित वार्षिक वेळापत्रक घेणे शक्य असल्याबत सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनाने लवकरच तसे परिपत्रक जारी करावे, अशी भूमिका घेण्यात आली. त्यावर मंत्रीमहोदय यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून लवकरच परिपत्रक जारी करण्याबाबतचे भाष्य केले.
२. रिक्त पदांचा आढावा: सध्या दिनांक ३०/०६/२०२६ पर्यंत सुमारे ८,९७० रिक्त पदे उपलब्ध असून यामध्ये वाढ होणार आहे. या जागांच्या अनुषंगाने वार्षिक वेळापत्रकाचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी दिले.शिवाय, ह्या विषयावर मुख्यमंत्री महोदय यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे नमूद केले.
३. होमगार्ड यांना वयोमर्यादेत सवलत: पोलीस भरतीत होमगार्ड जवानांना ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत (३३+५) देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावर ADGP सरांनी सकारात्मकता दर्शवली.
४. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भरती: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती लवकर घेण्याची आवश्यकता प्रशासनाने नमूद केली व त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची (Infrastructure) गरजही विषद केली.
५. पोलीस उपनिरीक्षक (DPSI / PSI) बाबत महत्त्वाचे निर्णय: अ) खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या दक्षता प्रमाणपत्रातील किरकोळ शिक्षा वगळण्याबाबत गृहविभागाचे उपसचिव मा. रवींद्र पाटील सर यांना निर्देश देण्यात आले. किरकोळ शिक्षेमुळे उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार हिरावला जातो, असे मा. मंत्री महोदयांनी नमूद केले. ब) DPSI परीक्षा मागील ३ वर्षांपासून बंद असल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष संधी (One Time Age Relaxation) देण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदय देखील सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. क) DPSI २०२६ च्या ९२ जागांच्या मागणीपत्रात जागावाढ करण्याबाबत तसेच दरवर्षी Direct PSI च्या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी स्वतंत्र धोरण आखण्याबाबत चर्चा झाली.
*एकंदरीतच गृहराज्यमंत्री महोदय, प्रशासन व मा. आ. बच्चू कडू साहेब यांच्यात अत्यंत सकारात्मक व फलदायी चर्चा झाली. त्यामुळे पोलीस भरती व DPSI च्या उमेदवारांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळेल,अशी अपेक्षा आहे.
6 823
कोतवाल भरती 2026
● एकूण जागा - 2912
● फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026
● परीक्षा दिनांक - 11/11/2026
● नियुक्तीपत्र - 28/11/2026
6 823
सन 2026- 2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक
दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
6 823
🛑 बोगस खेळाडू प्रमाणपत्र यावरती शासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात भविष्यात मोठ्या प्रमाणावर बोगस खेळाडू प्रमाणपत्राची उलगडा होऊन प्रत्येक बोगस खेळाडूवर आजीवन कठोर कायदेशीर कारवाई होणार🛑
सचिन भीमराव काळभोर या मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यावर कारवाई...
👇👇👇
https://www.instagram.com/p/DcyNDYuD06D/?igsi=MXIyanRyMDhvdWc1bQ==
6 823
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.
- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)
लावा ताकत 🚔🚔💪
