cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

HiSTORY by Hardikar

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 485
مشترکین
-124 ساعت
+47 روز
+1130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (जन्म: २७ जानेवारी १९०१) यांचा आज स्मृतिदिन (मृत्यू-२७ मे १९९४) . जोशी, लक्ष्मणशास्त्री : (२७ जानेवारी १९०१ – ). महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जन्म. वडिलांचे नाव बाळाजी आणि आईचे चंद्रभागा. त्यांचे वडील बंधू वेणीमाधवशास्त्री आयुर्वेदाचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे ⇨केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्‍लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांचा स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला. १९२७ मध्ये मुल्हेरच्या (नासिक जिल्हा) पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली असून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकर हे अमेरिकेत गणकयंत्रनिर्मिती करणाऱ्या ‘इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स’ ह्या उद्योगसंस्थेत संशोधन व्यवस्थापक ह्या पदावर आहेत. वाई येथेच राहून शास्त्रीजींनी प्राज्ञ पाठशाळेचे व मराठी विश्वकोशाचे कार्य आणि आपला व्यासंग अखंडपणे चालू ठेवला आहे. प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते. ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. परिणामतः राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा या वातावरणातून शास्त्रीजींना लाभली. म. गांधींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदुधर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले. १९३० व १९३२ साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्रत्येक वेळी ६-६ महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. १९३६ नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले. १९४८मध्ये हा पक्ष विसर्जित होईपर्यंत ते त्याचे सदस्य होते. १९४० पर्यंत व पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशी ते एक विचारवंत भाष्यकार म्हणून निगडित आहेत. तर्कतीर्थांच्या नेतृत्वाने प्राज्ञ पाठशाळेला एका व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्राचे स्वरूप लाभले. वाईमध्ये हरिजन विद्यार्थ्यांचे वसतिगृह, हातबनावटीचा कागद कारखाना, अद्ययावत मुद्रणालय इ. उपक्रम त्यांनी यशस्वीपणे अंमलात आणले. वाईच्या महाविद्यालयाचेही ते संस्थापक-सदस्य आहेत. प्राज्ञ पाठशाळेतर्फे धर्मकोशाच्या संपादनाचे मौलिक कार्य त्यांनी हाती घेतले. या कोशाचे ११ खंड प्रसिद्ध झाले असून त्यांत कुटुंबसंस्था, हिंदुसंस्कार, जाती, विवाह, मालमत्ता याचप्रमाणे हिंदुधर्मविधी, नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान इ. विषयांसंबंधी प्राचीन शास्त्रांतील ग्रांथिक माहिती व्यवस्थितपणे संकलित केलेली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे सुरुवातीपासून म्हणजे १९६० पासून शास्त्रीजी अध्यक्ष आहेत. मंडळातर्फे भाषा-साहित्यविषयक अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यांपैकी प्रमुख प्रकल्प वीस खंडीय मराठी विश्वकोशाचा आहे. प्राचीन-अर्वाचीन सर्व ज्ञानविज्ञाने मराठीतून विशद करण्याचे हे मौलिक कार्य शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. शास्त्रीजींनी व्याख्याने, परिषदा इ. निमित्ताने भारतभर प्रवास केला. अमेरिका, ब्रह्मदेश, रशिया तसेच यूरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यानी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून किंवा स्वतंत्रपणे निमंत्रित म्हणूनही भेटी दिल्या आहेत. सोरटी सोमनाथाच्या जीर्णोद्धाराचे मुख्य पौरोहित्य त्यांनीच केले (१९५१). कुकुरमुंडे येथील सनातन धर्मपरिषद (१९२५) व वाराणसीचे अखिल भारतीय संस्कृत पंडितांचे संमेलन (१९२९) यांत भाग घेऊन शास्त्रीजींनी धर्मसुधारणेचे सभाष्य समर्थन केले. भारतीय संविधान संहितेचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले. हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रचारकार्याशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९५४). याखेरीज अनेक विभागीय व प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविली. शास्त्रीजींची ग्रंथसंपदा मोजकी पण मौलिक आहे. शुध्दिसर्वस्वम् (१९३४), आनंदमीमांसा (१९३८), हिंदुधर्माची समीक्षा (नागपूर विद्यापीठात रा. ब. परांजपे व्याख्यानमालेत दिलेली तीन व्याख्याने, १९४१), जडवाद (१९४१),ज्योतिनिबंध (म. फुल्यांचे चरित्र आणि कार्य– १९४७), वैदिक संस्कृतीचा विकास (१९५१, द्वितीय आवृ. १९७४), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (१९७३) हे त्यांचे ग्रंथ मान्यता पावले आहेत. राजवाडे लेखसंग्रह (१९६४) आणि लो. टिळक लेखसंग्रह (१९६९) हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ. यांशिवाय अनेक लेख व प्रस्तावना त्यांनी लिहिलेल्या आहेत.
نمایش همه...
हिंदुधर्माची समीक्षा ऐतिहासिक व समाजशास्त्रीय पद्धतीने त्यांनी केली आहे. ‘धर्मसमीक्षा हीच सर्व प्रकारच्या समीक्षेची जननी आहे’ या कार्ल मार्क्सच्या तत्त्वाचा पुरस्कार त्यांनी या ग्रंथात केला आहे. आधुनिक काळात सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने पारंपरिक धर्ममूल्ये कितपत उपयुक्त आहेत, याची मूलगामी चिकित्सा या ग्रंथात केलेली आढळते. या प्रबंधाचे इंग्रजी भाषांतर गोवर्धन पारिख यांनी ए क्रिटिक ऑफ हिंदुइझम या नावाने प्रसिद्ध केले आहे (१९४८). वैदिक संस्कृतीचा विकास हा एक प्रचंड प्रबंध आहे. मुळात पुणे विद्यापीठात श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे, इचलकरंजी-व्याख्यानमालेत दिलेली ही सहा व्याख्याने होत (१९४९). त्यांत वेदकालीन संस्कृती, इतिहास, पुराणे व रामायणाची संस्कृती, बौद्ध आणि जैन धर्मांचे कार्य आणि आधुनिक भारतातील सांस्कृतिक आंदोलन या विषयांचा सखोल आणि ऐतिहासिक दृष्टीने घेतलेला परामर्श आहे. भारतातील वैदिक संस्कृती ही परिवर्तनक्षम आहे, आधुनिक विज्ञानदृष्टी व मानवतावाद यांच्या निकोप संवर्धनाचे तिच्यात आंतरिक सामर्थ्य आहे व म्हणून आधुनिक क्रांतियुग आणि वैदिक संस्कृतीतील मूलभूत अध्यात्मयोग यांची सांगड घातली पाहिजे, हा या ग्रंथाचा निष्कर्ष आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना साहित्य अकादेमी १९५५ पासून पुरस्कार देते. असा पुरस्कार लाभलेला हा पहिला मराठी ग्रंथ. इतिहासाचार्य राजवाडे आणि लो. टिळक यांचे नमुनेदार लेखसंग्रह संपादित करून शास्त्रीजींनी त्यांना अभ्यासपूर्ण व अत्यंत विचारप्रवर्तक प्रस्तावना लिहिल्या आहेत. आधुनिक मराठी साहित्य व त्याची समीक्षा, संस्कृतातील रससिद्धांत, मराठी संताचे कार्य यांसंबंधीही त्यांनी अनेक लेखांतून नवा दृष्टिकोण मांडलेला आहे. रा. ग. जाधव यांनी शास्त्रीजींच्या निवडक लेखांचा संग्रह विचारशिल्प या नावाने संपादित केला आहे. (१९७५). गांधीयुगातील एक नमुनेदार कर्मयोगी विचारवंत या नात्याने त्यांच्या विचारकार्याची मीमांसा संपादकाने या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेत केली आहे. महाराष्ट्रात बुद्धीवादी विचारवंतांची एक थोर परंपरा आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, लो. टिळक, वि. दा. सावरकर, महर्षी शिंदे इ. विचारवंतांच्या परंपरेतच शास्त्रीजींचे कार्य मोडते. प्राचीन आचार्यपरंपरेची निःस्वार्थ लोकशिक्षणाची निष्ठा, तर्कशुद्ध दृष्टिकोण, पूर्व-पश्चिमी ज्ञानविज्ञानांचा प्रचंड व्यासंग, स्पष्ट आणि निःस्पृह विचारप्रतिपादन व सामाजिक आणि राष्ट्रीय उद्धाराची कळकळ हे या परंपरेचे विशेष होत. छोट्या शाळा-मंडळांपासून राष्ट्रीय संस्था-संघटनांपर्यंत सर्व प्रकारच्या व्यासपीठांवर दिलेली विचारप्रवर्तक भाषणे हा शास्त्रीजींच्या सामाजिक सेवाव्रताचाच एक अविभाज्य भाग होय. अशी कितीतरी मौलिक विचारांची भाषणे अजून ग्रंथरूपात संगृहीत झालेली नाहीत. उदा., पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत १९५३ साली भारतीय राष्ट्रीयत्वावर दिलेले भाषण, किंवा पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत १९७३ साली वाचलेला ‘द कॉस्मिक स्टेट अँड कलेक्टिव्ह किंगशिप ऑफ वेदिक गॉड्‌स’ हा शोधनिबंध. शास्त्रीजींनी शेकडो व्याख्यानांच्या रूपाने व लेखनाद्वारे केलेले विचारकार्य हा महाराष्ट्राचा एक बहुमोल असा ठेवा मानला जाईल. १९७५ साली त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांचा अमृतमहोत्सव सर्व महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त स्थापन झालेल्या अमृतमहोत्सव समितीने त्यांच्या समग्र लेखनाचे खंड प्रसिद्ध करण्याची योजना आखली आहे. ह्याच वर्षी मुंबई विद्यापीठाने एल्‌एल्‌.डी. ही सन्माननीय पदवी देऊन त्यांच्या विद्वत्तेचा यथोचित गौरव केला. संस्कृत पंडित म्हणून १९७३ मध्ये व ‘पद्मभूषण’ म्हणून १९७६ मध्ये भारत सरकारने त्यांना गौरविले. लेखक-जाधव, रा. ग.
نمایش همه...
नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा आज जन्मदिन (जन्म: २६ मे १८८५) (मृत्यू २३ जानेवारी १९१९) . गडकरी, राम गणेश गडकरी, राम गणेश : (२६मे १८८५–२३ जानेवारी १९१९). एक श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी. कवितालेखन ‘गोविंदग्रज’ ह्या नावाने. विनोद लेखन ‘बाळकराम’ ह्या नावाने. जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे. शिक्षण दामनगर (सौराष्ट्र), कर्जत आणि पुणे येथे महाविद्यालयीन पहिल्या वर्षापर्यंत (१९१२). त्यापूर्वी काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांत कामे करणाऱ्या मुलांचे मास्तर म्हणून काम केले. तेथे काही मतभेद झाल्यानंतर विदर्भातील बाळापूर ह्या गावी ते काही दिवस शिक्षक होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची नोकरी केली (१९०९–१०). तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. १९१० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखानावरच आपला चरितार्थ चालविला. राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी वयाच्या सतराव्या वर्षी लिहिलेले मित्रप्रीती हे त्यांचे पहिले नाटक अनुपलब्ध आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यांवर संस्कारक्षम वयातच पडला. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते श्रीपाद कृष्णांना आपले गुरू मानीत असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उताऱ्यांचे आहे (१९०७). वेड्यांचा बाजार (लेखनकाळ १९०६–०७) हे त्यांचे अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकऱ्यांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर ह्यांनी पूर्ण केले व ते १९२३ मध्ये प्रकाशित झाले. काव्यलेखानाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही गडकऱ्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. ह्याच मासिकातून १९१३–१५ मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (१९२१) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमि ह्या मासिकात ‘सवाई नाटकी’ ह्या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखन गडकरी करीत असत. प्रेमसंन्यास (१९१३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतरची त्यांची नाटके अशी : पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) व राजसंन्यास (१९२२, अपूर्ण). वाग्वैजयंती (१९२१) ह्या नावाने त्यांच्या कविता संगृहीत केलेल्या आहेत. त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (१९२५) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्यांशिवाय गडकऱ्यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (१९६२) ह्या नावाने प्रल्हाद केशव अत्रे ह्यांनी संपादित केले आहे. गडकऱ्यांच्या लेखनसंकल्पांची त्यावरून कल्पना येते. मृत्युसमयी ते विदर्भातील सावनेर ह्या गावी होते. ते क्षयाने आजारी होते. भावबंधन ह्या नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. गडकऱ्यांचे साहित्य अल्प असले, तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व असून तो त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती ह्यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. त्यांच्या नाट्यकृतींतून नाट्यात्मतेबरोबर ठिकठिकाणी काव्यात्मतेचा साक्षात्कार होतो आणि त्यांचे विनोदी लेखन उपहासापेक्षा कोटित्वाचाच विशेषत्वाने आश्रय घेताना आढळते. असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्‌मयाचे विशेष आहेत. करूण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिति त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. त्यांची कल्पनाशक्ती उच्छृंखल आहे कलादृष्ट्या प्रस्तुताप्रस्तुताचा विवेक करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी तितकेसे नाही तिचा स्वाभाविक कल अतिशयोक्तीकडे आहे परंतु असे असूनही त्यांच्या सर्वच लेखनात वाचक-प्रेक्षकांच्या मनांची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य अवतरलेले आहे. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहजधर्म आहे. कल्पनेची झेप अशी, की तिच्या हाती अनेकदा लागतात ती मती गुंग करणारी विचारमौक्तिके. गडकऱ्यांचे यश ह्या असाधारण गुणविशेषांमध्ये आहे. एकच प्याल्यातील सिंधू, गीता, तळीराम भावबंधनातील धुंडिराज, घनःश्याम, कामण्णा प्रेमसंन्यासमधील गोकुळ पुण्यप्रभावातील कालिंदी आणि राजसंन्यासमधील तुळशी ह्या गडकऱ्यांच्या नाट्यकृतींतील काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा होत. संदर्भ : १. अत्रे, प्र. के. संपा. अप्रकाशित गडकरी, मुंबई, १९६२. २. कोल्हटकर, चिं. ग.राम गणेश गडकरी, मुंबई, १९५९. ३. खांडेकर, वि. स.गडकरी, व्यक्ति आणि वाङ्‌मय, पुणे,१९३२. ४. वाळिंबे, रा. शं.गडकऱ्यांचे अंतरंग, पुणे, १९५१. ५. सरदेशमुख, त्र्यं. वि.गडकऱ्यांची संसारनाटके, मुंबई, १९७०. कुळकर्णी, वा. ल. (संदर्भ , मराठी विश्वकोश)
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
राम गणेश गडकरी
نمایش همه...
"इन्कलाब झिंदाबाद" - ब्रिटीश साम्राज्याच्या हृदयाला फाडून टाकणारी घोषणा मौलानाने तयार केली होती ज्यांचे कृष्णावर प्रेम होते. कवितेने अमर झालेला हा स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांचा इतिहास विसरला आहे. 1 जानेवारी 1875 रोजी जन्मलेले सय्यद फझल-उल-हसन (ज्यांना हसरत मोहनी म्हणूनही ओळखले जाते) 
نمایش همه...
डॉ. नारायणराव (बाळ) दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिन (जन्म- २५ मे १८८८) ( मृत्यू १९ ऑक्टोबर, इ.स. १९४९), विनम्र अभिवादन. .. वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर डॉ. नारायणराव सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू ही झाली त्यांची एक ओळख. पण त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण केली ती वीराग्रणी डॉ. नारायण सावरकर म्हणून. २५ मे १८८८ हा त्यांचा जन्मदिवस. आपले दोन बंधू गणेश दामोदर (बाबा) आणि विनायक दामोदर (तात्या) अंदमानात काळ्या पाण्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगीत असताना इकडे नारायणराव स्वस्थ नव्हते. आपल्या बंधूंची केवळ भेट मिळावी यासाठीसुद्धा त्यांना टाचा झिजवाव्या लागल्या. त्या दोघांच्या सुटकेसाठी त्यांनी आंदोलनच उभारले. सुटकेसाठी अतोनात प्रयत्न केले. बॉम्बे नॅशनल युनियन या संस्थेचे कार्यकर्ते, पुण्यातले अनंत हरी गद्रे, सेनापती बापट यांच्या सहकार्याने त्यांनी चार महिन्यात ऐंशी हजार स्वाक्षऱ्या गोळा केल्या. त्या स्वाक्षऱ्यांसोबत एक निवेदन ब्रिटिश सरकारला पाठविले. पण सरकार बधले नाही तरी पदरमोड करून, कर्ज काढून नारायणराव प्रयत्न करीत राहिले. अखेर 1921 मध्ये दोन्ही बंधूंची सुटका झाली. अभिनव भारत या वीर सावरकरांनी सुरु केलेल्या क्रान्तिकारी संघटनेचे ते कृतिशील सदस्य होते. दोघे बंधू अंदमानात असताना त्यांनी क्रान्तिकार्यात खंड पडू दिला नाही. अभिनव भारतच्या शाखा विस्तारतच राहिल्या. कुठलीही हत्या, बॉम्ब फेकीनंतर नारायणरावांनी अटक, झडती, जप्ती ठरलेली असे. १३ नोव्हेंबर १९०९ ला कर्णावती (अहमदाबाद) येथे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकण्यात आला. संशयावरून नारायणरावांना अटक करण्यात आली. १८ डिसेंबर १९०९ ला त्यांची सुटका झाली. पण २१ डिसेंबर १९०९ ला अनंत कान्हेरे यांनी नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला आणि २३ डिसेंबरला नारायणरावांना पुन्हा अटक झाली. या कटातील मुख्य आरोपी होते विनायक दामोदर सावरकर. अडतीस आरोपींपैकी सर्वात लहान आरोपी होते नारायणराव. या अभियोगात वीर सावरकरांना झाली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा तर नारायणरावांना सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा. २२ जून १९११ ला शिक्षा भोगून परत आल्यावर त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. इतर कुठल्याच महाविद्यालयांनी प्रवेश दिला नाही पण कलकत्त्यातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि ते दंत विशारद झाले. अभ्यास सुरु असतानाही १९१२ मध्ये दिल्लीत, लॉर्ड हार्डिंग्जवरील बॉम्बफेक प्रकरणात नारायणरावांना पकडण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ झाला आणि नंतर पुराव्याअभावी त्यांची मुक्तताही झाली. दोन्ही बंधू अंदमानात असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी नारायणरावांवर होती. गरजेपुरता वैद्यकीय व्यवसाय करून त्यांनी आपले राजकीय, सामाजिक आणि क्रान्तिकार्य सुरूच ठेवले. सरकारी ससेमिरा होताच त्यात समाजही चार हात दूरच राहू पहात होता अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आल्या त्या मादाम भिकाजी रुस्तम कामा. १९१७ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्यावर ते लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील झाले. टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह चळवळीतही त्यांनी उडी घेतली. पण पुढे काँगेसच्या स्वराज्य धोरणाला वेगळेच वळण लागलेले पाहून आणि काँग्रेसमध्ये राहून सशस्त्र क्रांती घडवून आणणे कठीण आहे हे जाणवल्यावर ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि हिंदुमहासभेच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालाही हातभार लावला. संघाच्या बैठका डॉ. सावरकरांच्या औषधालयातच होत असत. गांधींनी अफगाणिस्थानच्या अमानुल्लाखानला हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी पाचारण केलेले पाहून सावरकर बंधू अवस्थ झाले होतेच. पण या कटाचे कारस्थान सर्वप्रथम उघड केले ते आर्य समाज नेते स्वामी श्रद्धानंद यांनी पण त्यांचा खून झाला. त्यांच्या या बलिदानाचे स्मारक म्हणून डॉ. सावरकरांनी इतर सामजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने श्री स्वामी श्रद्धानंद महिलाश्रमाची स्थापना केली. तसेच श्रद्धानंद वृत्तपत्र सुरू केले. साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत श्रद्धानंद मधून सावरकर बंधू परखड मतप्रदर्शन करीत राहिले. ते इतके गाजले की त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. त्यासाठी बाबाराव आणि नारायणरावांनी अथक परिश्रम घेतले. हे पत्र चालविण्यासाठी नारायणरावांना आपले घरही विकावे लागले. परंतु अखेरीस सरकारने त्यावर बंदी आणली. वृत्तपत्र इतिहासातील श्रद्धानंदचे योगदान अनन्यसाधारण आहे. पंजाब आणि बंगालमधील गुप्त संघटनांबरोबर त्यांचा नियमित संपर्क होता. त्यांचे औषधालय म्हणजे दुर्गाभाभी व्होरा, पृथ्वीसिंह आझाद आणि असंख्य क्रान्तिकारकांचे मुंबईतील आश्रयस्थानच होते.
نمایش همه...
ते उत्कृष्ट वक्तेही होते. त्यांनी बाबाराव सावरकर आणि येसुवहिनींची शेवटपर्यंत सेवा शुश्रूषा केली. त्यांच्या या सर्व कार्यात त्यांच्याबरोबर ठाम उभ्या राहिल्या त्या त्यांच्या पत्नी शांताबाई. अत्यंत प्रसन्नवदन, हसतमुख असल्यामुळे अच्युतराव कोल्हटकर नारायणरावांना 'हसरं कमळ' म्हणत असत. शीतल चांदण्यासारखा त्यांचा स्वभाव होता. लहान वयातच अंगावर आलेली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलताना, आपले हिंदुराष्ट्र पुन्हा एकदा बलशाली समर्थ राष्ट्र व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. पण त्यांचा अंत मात्र अत्यंत दुर्दैवी झाला. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीत त्यांच्या घरावर हल्ला झाला. मुलांना, घराला वाचविण्यासाठी, आजारी असूनही मागच्या दाराने ते घराबाहेर पडले. त्यांच्यावर दगडफेक झाली, मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालण्यात आला. अहिंसेच्या पुजाऱ्याच्या चेल्यांनीच हे कृत्य केलं. त्यातून डॉ काही सावरले नाहीत आणि १९ ऑक्टोबर १९४९ या थोर देशभक्ताचा अंत झाला. त्यांना विनम्र अभिवादन!! लेखिका-©मंजिरी मराठे (माहिती इंटरनेट वरून साभार) कॉपी पेस्ट
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
डॉ. नारायण सावरकर
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
क्रांतिकारक , हिंदू महासभेचे नेते , आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत महत्वपूर्ण कार्य केलेले श्री रासबिहारी बोस यांचा आज जन्मदिन (जन्म: २५ मे १८८६) (मृत्यू-२१ जानेवारी १९४५ ,टोकियो जपान)
نمایش همه...
अनेक लहान गावांत व शहरांत त्यांनी शाळा, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो केले. पु.ल.देशपांडे, राजा गोसावी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध होते. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये राधेश्याम महाराज साकारताना त्यामध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना रघुवीर यांच्याकडे जादूचे छोटे प्रयोग शिकायला पाठवले होते. त्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीने पण त्यांचा जादूचा वारसा जपला आणि जोपासला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजय आणि संजय यांनी जादूचे कार्यक्रम देशविदेशात चालू ठेवले. विजय यांचे चिरंजीव जादूगार जितेंद्र व त्याची पत्नी अश्विनी व त्यांचा मुलगा ईशान तसेच कन्या तेजा रघुवीर व तिची मुलगी इरा ही चौथी पिढीही या कला व्यवसायात आहेत. त्यांनी 'मी पाहिलेला रशिया', 'प्रवासी जादूगार' व 'जादूच्या गमती जमती' ही तीन पुस्तके लिहिली. 'प्रवासी जादूगार' या पुस्तकात आलेले अनुभव त्यांनी रोचकपणे मांडले आहेत.त्यांचे पुस्तक 'प्रवासी जादूगार’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. (संदर्भ-मराठी विकिपेडिया)
نمایش همه...