fa
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

رفتن به کانال در Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

نمایش بیشتر
5 654
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
+730 روز
آرشیو پست ها
✅ केंद्रीय मंत्रीमंडळ ✅ भारताच्या घटनेमध्ये ब्रिटनच्या धरतीवर संसदीय शासन पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे. ✅ घटनात्मक तरतुदी:
केंद्रीय मंत्रीमंडळ ✅ भारताच्या घटनेमध्ये ब्रिटनच्या धरतीवर संसदीय शासन पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे. ✅ घटनात्मक तरतुदी: 🔹 अनुच्छेद.७४ राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ. ✅ १) अनुच्छेद.७४(१)राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागतील. (४२ वा घटना दुरुस्ती कायदा १९७६ ने ही तरतूद करण्यात आली) ✅ २)अनुच्छेद.७४ (२)मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. 🔹 अनुच्छेद. ७५ :-मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी ✅ १) अनुच्छेद ७५.(१):पंतप्रधान राष्ट्रपती कडून नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री राष्ट्रपती कडून पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातील. ✅ २) अनुच्छेद.७५ (१A): मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही (ही तरतूद घटनेच्या ९१ वा घटनादुरुस्ती कायदा,२००३ अन्वये समाविष्ट करण्यात आली. ✅ * अनुच्छेद. ७५(१B)संसदेच्या दोन्ही सभागृहातील कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य जर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आला असेल तर तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असेल. ✅ * अनुच्छेद.७५(२) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपली पदे धारण करतील. ✅ * अनुच्छेद.७५ (३) मंत्रिमंडळ लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार असेल. ✅ * अनुच्छेद ७५(४) मंत्र्यांनी आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यास पद व गोपनीयतेच्या शपथा तिसऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार देतील. ✅ * अनुच्छेद.७५(५) जो मंत्री कोणत्याही सलग सहा महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद असा कालावधी संपताच संपुष्टात येईल. ✅ * अनुच्छेद.७५(६) मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेने कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे असतील. ✅ * भारतातील संसदीय शासन व्यवस्थेच्या तत्त्वांचे वर्णन मात्र घटनेत करण्यात आलेले नाही. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+4
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ “People’s G20” ईबुक 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ✅ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी, नवी दिल्ली येथे भ
“People’s G20” ईबुक 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ✅ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी, नवी दिल्ली येथे भारताच्या G20 अध्यक्षपदावर प्रकाश टाकणारे “People’s G20” ईबुकचे अनावरण केले. ✅ ईबुक भारताच्या G20 प्रेसिडेन्सीचे सर्वसमावेशक विहंगावलोकन प्रदान करते, ज्यामध्ये तीन मुख्य भाग आहेत: पहिला भाग: ✅ पहिल्या भागात सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेचा समावेश आहे, ज्यामध्ये G20 ची रचना आणि भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उपक्रमांचे स्पष्टीकरण दिले आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती यात दिली आहे. दुसरा भाग: ✅ दुसरा भाग शेर्पा आणि फायनान्स ट्रॅक अंतर्गत विविध कार्यगटांनी आयोजित केलेल्या बैठकांचा , तसेच भारताच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षभरात संपूर्ण भारतभर आयोजित केलेल्या प्रतिबद्धता गट बैठकांचा सारांश देतो. तिसरा भाग: ✅ ईबुकच्या अंतिम विभागात भारताच्या G20 अध्यक्षपदाचे लोक-चालित चळवळीत रूपांतर करणाऱ्या जन-भागीदारी (सार्वजनिक सहभाग) कार्यक्रमांचे फोटो निबंध समाविष्ट आहेत. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ पायल छाबरा पॅरा कमांडो बनणारी पहिली महिला आर्मी सर्जन बनली आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पायल छाबरा पॅरा कमांडो बनणारी पहिली महिला आर्मी सर्जन बनली आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ✅ हरियाणातील कैथल जिल्ह्यातील कलायत नगर येथील पायल छाबरा हिने सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये डॉक्टर असताना प्रशिक्षित पॅरा परीक्षा उत्तीर्ण करून कमांडो बनण्याचा मान मिळवला आहे. ✅ यापूर्वी कोणत्याही महिला शल्यचिकित्सकाला ही कामगिरी करता आली नसल्याची माहिती आहे. ✅ सध्या मेजर पायल छाबरा या देशाच्या दुर्गम भागातील केंद्रशासित प्रदेश लेह लडाखच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ सर्जन म्हणून सेवा देत आहेत. ✅ हे लक्षात घेण्यासारखे आहे की पॅरा कमांडोना खूप कठीण आणि जटिल प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीची पातळी चांगली असणे महत्त्वाचे आहे. ✅ पॅरा कमांडोना आग्राच्या एअर फोर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण दिले जाते. ✅ मेजर पायल यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खारदुंगला मोटर बायपासवर असलेल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणूनही काम केले आहे. ✅ त्यांना 13 जानेवारी 2021 रोजी अंबाला कॅंट येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये कॅप्टन म्हणून पहिली नियुक्ती मिळाली. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

Syllabus of Assistant Professor.pdf

✅ पृथ्वीच्या अंतरंगाची रचना:- 🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎 शिलावरण/कवच (lithosphere /crust) ✅ पृथ्वीच्या सर्वात वरच्य
पृथ्वीच्या अंतरंगाची रचना:- 🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎 शिलावरण/कवच (lithosphere /crust) ✅ पृथ्वीच्या सर्वात वरच्या बाह्य घनरूपास शिलावरण असे म्हणतात. ✅ शिलावरणाचा २९ टक्के भाग भूमीने व ७१ टक्के भाग जलाने व्यापलेला आहे. ✅ शिलावरणाची जाडी १६ ते ४० कि.मी.पर्यंत आहे. ✅ सरासरी जाडी ३३ कि.मी.मानली गेली आहे ही जाडी सर्वत्र सारखी नाही हिमालय, रॉकी सारख्या पर्वतश्रेण्याखाली ही जाडी ४० कि.मी.पेक्षा जास्त आढळते,तर महासागराखाली ती १० कि.मी.पेक्षा कमी जाड आहे. ✅ शिलावरणाचे ' सियाल ' व ' सीमा ' असे दोन थर आहेत. १)सीयाल (sial):- भूपटलाच्या सर्वात वरच्या घन थरास ' सियाल ' असे म्हणतात. ✅ भूखंडे प्रामुख्याने सियालची बनलेली आहेत. ✅ Si म्हणजे सिलिका व Al म्हणजे ॲल्युमिनियम या प्रमुख रासायनिक मूलद्रव्यांनी सियाल हा थर बनलेला आहे. ✅ भूखंडाखाली सियाल थराची जाडी २९ कि.मी. आहे. ✅ सियालची घनता २.६५ ते २.७७ एवढी आहे. ✅ भूकंप लहरींचा वेग: प्राथमिक लहरी या थरातून सेकंदाला ५.६ कि. मी.वेगाने तर दुय्यम लहरी दर सेकंदाला ३.२ की. मी. वेगाने सियाल थरातून प्रवास करतात. २) सीमा(sima):- ✅ सियाल थराच्या खालील थरास सीमा असे म्हणतात. ✅ सामान्यतः महासागर तळ सीमा (sima ) चे बनलेले आहे. ✅ si म्हणजे सिलिका व ma म्हणजे मॅग्नेशियम या दोन मूलद्रव्यांनी सीमा थर बनलेला आहे. ✅ सीमा थरात बेसाल्ट खडक आढळतात. ✅ सीमा थराची जाडी महासागराखाली ३ ते ५ कि.मी.तर भूखंडाखाली १३ कि.मी.आहे. ✅ भूकंप लहरींचा वेग सीमा थरात प्राथमिक लहरी दर सेकंदाला ६ ते ७.२ कि.मी.वेगाने तर दुय्यम लहरी दर सेकंदाला ३ ते ४ कि.मी.वेगाने प्रवास करतात. ✅ कॉनरॅड विलगता : "सियाल व सीमा यांची ज्या भागात घनता बदलते त्यास कॉनरॉड विलगता असे म्हणतात". Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+5
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ UNESCO : होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕 ✅ युनेस्कोने कर्नाटकातल्या ह
UNESCO : होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕 ✅ युनेस्कोने कर्नाटकातल्या होयसळ मंदिरसमूहाला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली. ✅ एप्रिल 2014 मध्ये आपल्या तात्पुरत्या यादीत या प्राचीन मंदिराला स्थान दिले होते. होयसळ मंदिराला 'होयसळ पवित्र संकुल' म्हणूनही ओळखले जाते. ✅ हे मंदिर 12व्या ते 13व्या शतकात बांधले गेले. होयसळ काळातील कलाकार आणि वास्तुविशारदांच्या सर्जनशीलतेचे आणि कौशल्याचे प्रतीक म्हणून ते आजही उभे आहेत. ✅10व्या ते 14व्या शतकादरम्यान होयसळ साम्राज्याने आधुनिक कर्नाटक राज्याच्या मोठ्या भागावर राज्य केले. साम्राज्याची राजधानी सुरुवातीला बेलूर येथे होती. नंतर ती हळेबिडू येथे हलविण्यात आली. ✅ होयसळ मंदिरांमध्ये मूलभूत पारंपारिक द्रविडीयन आकृतिविज्ञान आहे, परंतु मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या भूमिजा पद्धती, उत्तर आणि पश्चिम भारतातील नागरा परंपरा आणि कल्याणी चालुक्यांनी पसंती दिलेली कर्नाटक द्रविडीयन पद्धती यांचा मजबूत प्रभाव दिसतो. वास्तुविशारदांनी विविध प्रकारच्या मंदिर वास्तुकलेपासून प्रेरणा घेतली. परिणामी एक पूर्णपणे नवीन 'होयसळ मंदिर' फॉर्म जन्माला आला. ✅ युनेस्कोच्या अधिकृत संकेतस्थळावर असे सांगण्यात आले की या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अति-वास्तववादी शिल्पे आणि दगडी कोरीव काम. संपूर्ण वास्तुशिल्पीय पृष्ठभाग, एक परिक्रमा मंच, मोठ्या आकाराची शिल्पकला गॅलरी आणि सालाची शिल्पे आहेत. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ अमृता शेरगिल यांच्या कलाकृतीला विक्रमी मूल्य 🖼🖼🖼🖌🎨🎨🎨🖼🖼🖼🖌🎨🎨🎨🖼🖼🖼🖌🎨🎨 ✅ सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल या
अमृता शेरगिल यांच्या कलाकृतीला विक्रमी मूल्य 🖼🖼🖼🖌🎨🎨🎨🖼🖼🖼🖌🎨🎨🎨🖼🖼🖼🖌🎨🎨 ✅ सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला ‘सॅफ्रॉनआर्ट’च्या लिलावामध्ये ६१.८ कोटी रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. ✅ शेरगिल यांनी १९३७ साली रेखाटलेल्या या चित्राला मिळालेली ही किंमत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कलाकृतीला जगभरात मिळालेली सर्वोच्च किंमत आहे. ✅ यापूर्वी सय्यद हैदर रझा यांच्या १९८९च्या ‘गेस्टेशन’ या चित्राला गेल्याच महिन्यात पुंडोलेंच्या लिलावात ५१.७५ कोटी रुपये किंमत मिळाली होती. ✅ अमृता शेरगिल यांचे ‘द स्टोरी टेलर’ हे चित्र एक मैलाचा दगड आहे. त्यातून त्यांचे कौशल्य आणि अमर वारशाची साक्ष मिळते अशी प्रतिक्रिया ‘सॅफ्रॉनआर्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वझिरानी यांनी व्यक्त केली. ✅ अमृता शेरगिल यांची आवडती कलाकृती खुद्द अमृता शेरगिल यांनी ‘द स्टोरी टेलर’ ही आपल्या सर्वोत्तम १२ कलाकृतींपैकी असल्याचे सांगितले होते. हे चित्र त्यांच्या सर्वात प्रामाणिक आणि अभिव्यक्तीपूर्ण रचनांपैकी एक मानले जाते. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे 🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝 ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे
ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे 🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝🚝 ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०२३ मध्ये ईशान्य भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. ✅ ती आसामच्या गुवाहाटी ते पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी असा प्रवास करेल. ✅ ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NRF)झोनद्वारे चालविली जाणारी ही पहिली निळ्या आणि पांढऱ्या रंगाची ट्रेन आहे. ✅ वंदे भारत एक्सप्रेस:- ✅ ही स्वदेशी बनावटीची आणि निर्मित अर्ध हाई स्पीड स्वयं- चाललीत ट्रेन आहे. ✅ सुरुवातीच्या टप्प्यात' ट्रेन १८' असे संबोधले जायचे. ✅ पहिली वंदे भारत एक्सप्रेस ' दिल्ली ते वाराणसी '(१५ फेब्रुवारी २०१९) रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. ✅ पहिल्या वंदे भारत रेल्वेची निर्मिती ' इंटिग्रल कोच फॅक्टरी ' चेन्नईने ' मेक इन इंडिया ' कार्यक्रमाचा भाग म्हणून सुमारे १००कोटी रुपयांना केली. ✅ ही ट्रेन कमाल १०० किलोमीटर प्रतितास वेग गाठू शकते. ✅ या ट्रेन्स ने ' शताब्दी एक्सप्रेसची ' जागा घेतली. ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरून ' आजादी का अमृत महोत्सवा ' निमित्त अधिक ७५ वंदे भारत ट्रेन ७५ आठवड्यात देशाच्या विविध भागांना जोडणार असल्याची घोषणा केली होती. ✅ २०२२-२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पुढील तीन वर्षात ४०० वंदे भारत गाड्यांचा विकास आणि निर्मिती प्रस्तावित केली. ✅ महाराष्ट्रातील पहिली ( देशात ९ वी )वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (मुंबई )ते सोलापूर. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+8
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📣 Attention 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 Special Offline Batch @ Nashik Location ————————— ✅ ZP | MIDC | WCD | WRD | BMC Exams ची तयार
📣 Attention 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 Special Offline Batch @ Nashik Location ————————— ✅ ZP | MIDC | WCD | WRD | BMC Exams ची तयारी करा महाराष्ट्रातील सर्वोत्तम Team सोबत 👑 Admission Open  The Infinity Academy  📣 Special Batch for: 🔔 Enquire Now - https://forms.gle/dFdpWp1NrJSfFz739 ✔️ ADMISSION LINK :  https://csjzx.on-app.in/app/oc/399577/csjzx ✔️ 📹 Subscribe YouTube - https://bit.ly/3OxXvmW —————— 📌 Venue : The Infinity Academy, 1st Floor Upadhey Classes Building Ashok sthambh Nashik —————— 📞 Call : 8686349494

photo content

Congratulations 🎉👏💐💐 Sonali Pagare Selected & Finalized AE & JE Mahagenco 👍✨✨✨💐💐💐

✅ शांतिनिकेतन आता जागतिक वारसा, युनेस्कोची घोषणा 🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐 ✅ जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर य
शांतिनिकेतन आता जागतिक वारसा, युनेस्कोची घोषणा 🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐 ✅ जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांनी शतकापूर्वी जेथे विश्व भारतीची स्थापना केली, त्या शांतिनिकेतन स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ✅ पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील आहे. ✅ शांतिनिकेतन हे विद्यापीठाचे शहर कोलकात्यापासून १६० किलोमीटरवर आहे. ✅रवींद्रनाथ टागोर यांचे पिता देबेंद्रनाथ यांनी तेथे सर्वप्रथम एका आश्रमाची स्थापना केली होती. त्या ठिकाणी ध्यानधारणेसाठी प्रवेश देताना कोणत्याही प्रकारचा जातीपंथ भेदभाव केला जात नसे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ भारताचे पंतप्रधान ✅ भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या संसदीय शासनव्यवस्थेत राष्ट्रपती हे ' नामधारी कार्यकारी अधिकारी '(राष्
भारताचे पंतप्रधान ✅ भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या संसदीय शासनव्यवस्थेत राष्ट्रपती हे ' नामधारी कार्यकारी अधिकारी '(राष्ट्रप्रमुख) आहेत आणि पंतप्रधान 'वास्तव कार्यकारी अधिकारी '(शासन प्रमुख)आहेत. ✅ घटनेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. ✅ अनुच्छेद. 75 मध्ये केवळ एवढेच सांगण्यात आले आहे की,राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील. ✅ 'संसदीय शासन पद्धती 'मध्ये प्रस्थापित झालेल्या संकेतानुसार राष्ट्रपतींना लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच ' पंतप्रधान ' म्हणून नियुक्त करावे लागते. ✅ पुढील दोन परिस्थितीमध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांच्या निवड व नियुक्ती बाबत आपला वैयक्तिक स्वेच्छाधिकार वापरू शकतात. १)जेव्हा लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसते तेव्हा अशा परिस्थितीत राष्ट्रपती सहसा लोकसभेतील सर्वात ' मोठ्या पक्षाच्या किंवा ' युतीच्या नेत्याला ' पंतप्रधान म्हणून शपथ देतात. अशा स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर राष्ट्रपतींनी पहिल्यांदा १९७९ मध्ये वापरला. ✅ मोरारजी देसाई सरकार पडल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ' नीलम संजीव रेड्डी ' यांनी 'चरण सिंग ' यांना पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. २) जेव्हा पंतप्रधानांचा पदावर असताना अचानक मृत्यू होतो व कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो तेव्हा. ✅ जवाहरलाल नेहरू व लालबहादूर शास्त्री यांचा पदावर असताना मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रपतींनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून दोन्ही वेळी 'गुलजारी लाल नंदा 'यांची नियुक्ती केली. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राष्ट्रपती झेलसिंग यांनी 'राजीव गांधी ' यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. ✅ पंतप्रधानांचा कालावधी घटनेने निश्चित केलेला नाही ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतात. त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ दिली जाते या शपथेचा नमुना तिसऱ्या अनुसूची मध्ये देण्यात आला आहे. ✅ पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील संपर्काचे प्रमुख माध्यम आहेत. पंतप्रधान केंद्र शासनाचे ' प्रमुख प्रवक्ता ' तसेच ' राजकीय प्रमुख ' म्हणून कार्य करतात.पंतप्रधान सर्व मंत्र्यांच्या कृतिकार्याचे मार्गदर्शन, दिशादर्शन ,नियंत्रण व समन्वय करतात. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+8
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📹 🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

photo content