फार्मसी विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन
प्रति,
मा. अध्यक्ष / सदस्य,
व्ही. राधा उच्चस्तरीय समिती
(शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य.
विषय : महाराष्ट्रातील फार्मसी पदवीधारक व फार्मासिस्ट यांच्यासाठी शासकीय भरती परीक्षा, शैक्षणिक पात्रता व सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत.
महोदय / महोदया,
महाराष्ट्र राज्यात मोठ्या संख्येने फार्मसी विद्यार्थी, पदवीधारक व नोंदणीकृत फार्मासिस्ट आहेत. फार्मसी हा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असूनही विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता व सेवा प्रवेश नियमांमध्ये असलेल्या विसंगतीमुळे फार्मसी उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय भरती परीक्षा सुधारणा संदर्भात आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. औषध निरीक्षक (Drug Inspector) पदासाठी सरळसेवा व विषयाधारित परीक्षा
औषध निरीक्षक हे तांत्रिक पद असल्याने Prelims–Mains अशा बहुपदरी परीक्षेऐवजी एकच विषयाधारित लेखी परीक्षा व आवश्यकतेनुसार मुलाखत घेऊन भरती करण्यात यावी.
परीक्षेमध्ये Pharmaceutics, Pharmacology, Pharmacognosy, Pharmaceutical Chemistry, Pharmaceutical Analysis व Pharmacy Jurisprudence या फार्मसी विषयांना योग्य महत्त्व देण्यात यावे.
२. गट-ब फार्मसी पदांसाठी एक परीक्षा + मुलाखत
गट-ब मधील फार्मसी/तांत्रिक पदांसाठी एकच लेखी परीक्षा व त्यानंतर मुलाखत अशी पारदर्शक व गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया असावी.
अनावश्यक Prelims–Mains पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक व मानसिक भार टाकू नये.
३. गट-क औषध निर्माता/फार्मासिस्ट पदांसाठी D.Pharm व B.Pharm पात्रता
महानगरपालिका, DMER, कारागृह, ESIS, आरोग्य विभाग, AYUSH तसेच इतर संबंधित शासकीय आस्थापनांमधील गट-क औषध निर्माता/फार्मासिस्ट पदांसाठी D.Pharm आणि B.Pharm या दोन्ही शैक्षणिक अर्हता स्पष्टपणे पात्र करण्यात याव्यात.
विशेषतः राज्यस्तरीय एकत्रित भरती परीक्षेसाठी D.Pharm उमेदवारांना पात्र ठरविण्यात यावे.
विभागनिहाय वेगवेगळे पात्रता निकष ठेवून D.Pharm उमेदवारांना काही ठिकाणी अपात्र ठरविण्याची विसंगती दूर करण्यात यावी.
महानगरपालिका, DMER, कारागृह, ESIS, आरोग्य विभाग व इतर संबंधित विभागांमधील रिक्त पदे एकत्रित करून एकसमान सेवा प्रवेश नियम (Service Entry Rules) लागू करण्यात यावेत.
शक्य असल्यास:
“D.Pharm + B.Pharm पात्रता → एकच सेवा प्रवेश नियम → एकच राज्यस्तरीय परीक्षा → एकच गुणवत्ता यादी → विभागनिहाय पदवाटप”
अशी पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.
४. AYUSH Pharmacist पदासाठी D.Pharm व B.Pharm पात्रता
AYUSH विभागातील Pharmacist पदासाठी D.Pharm सोबत B.Pharm पदवीधारकांनाही स्पष्टपणे पात्र ठरविण्यात यावे.
AYUSH Pharmacist पदांसाठीही स्पष्ट व एकसमान सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात यावेत.
५. फार्मसी प्राध्यापक भरतीमध्ये PCI मार्गदर्शक तत्त्वांचे पालन
फार्मसी प्राध्यापक भरतीमध्ये वारंवार न्यायालयीन वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे Pharmacy Council of India (PCI) च्या लागू मार्गदर्शक सूचना व पात्रता निकषांनुसारच भरती प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट धोरण शासनाने निश्चित करावे.
६. राज्यसेवा परीक्षेत फार्मसी विषयाचा समावेश
B.Pharm पदवीधारकांना राज्यसेवा परीक्षेसाठी पात्रता असताना Descriptive/Main परीक्षेमध्ये फार्मसी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक विषयाचे ज्ञान सिद्ध करण्याची संधी मिळावी.
त्यासाठी Pharmaceutics, Pharmacology, Pharmacognosy, Pharmaceutical Chemistry, Pharmaceutical Analysis व Pharmacy Jurisprudence या विषयांचा योग्य पद्धतीने समावेश करण्यात यावा.
७. Chemistry / Science आधारित पदांवर B.Pharm पात्र ठरवावे
ज्या-ज्या शासकीय पदांसाठी Chemistry किंवा Science विषयाची पदवी पात्रता म्हणून स्वीकारली जाते, त्या पदांसाठी B.Pharm पदवीधारकांना त्यांच्या संबंधित विषयज्ञानाचा विचार करून पात्र ठरविण्यात यावे.
यासाठी सर्व विभागांना लागू होईल असे स्पष्ट शासन धोरण तयार करावे.
८. उद्योग निरीक्षक पदासाठी B.Pharm पात्रता
उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये B.Pharm पदवीचा स्पष्टपणे समावेश करण्यात यावा.
B.Pharm अभ्यासक्रमातील Pharmaceutical Chemistry, Pharmaceutics, Pharmaceutical Analysis, Quality Control व औद्योगिक औषधनिर्मितीशी संबंधित विषयांचा विचार करून फार्मसी पदवीधारकांना समान संधी देण्यात यावी.
९. Pharm.D पदवीधारकांना B.Pharm प्रमाणे पात्रता
ज्या-ज्या संबंधित शासकीय पदांसाठी B.Pharm पात्र आहे, त्या पदांसाठी Pharm.D पदवीधारकांनाही पात्र ठरविण्यात यावे.