Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
♦️चौथा टप्पा 13 मे मतदान - महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात..
8 338
♦️पोलीस भरती 2024 मॅट मध्ये वय वाढ करण्यासाठी जी केस सुरू आहे त्याबाबत..
👉 कोर्टाने गृह विभागाला वय वाढ करून देण्यासाठी आणि त्यावर विचार करण्यासाठी 13 जून पर्यंत वेळ दिला आहे...
8 338
🔷 चालू घडामोडी :- 13 फेब्रुवारी 2024
◆ श्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन युथ गेम्स 2024 मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 चे उद्घाटन द्रोपद्री मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ आंतरराष्ट्रिय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा श्रीलंका देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे.
◆ अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा 10वा आंतरराष्ट्रिय खेळाडू ठरला आहे.
◆ महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ सुमित नागल या भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ देशातील पहिले ऑलिम्पिक भवन पुणे येथे साकारण्यात येणार आहे.
◆ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने चौथ्यांदा ICC Under 19 Men’s Cricket World Cup स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ ICC Under 19 Men’s Cricket World Cup 2024 चा उपविजेता भारत हा संघ ठरला आहे.
◆ ICC Under 19 Men’s Cricket World Cup दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतो. यंदाची स्पर्धा दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ आसाम राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे.
◆ भारताचा उंच उडी पटू तेजस्वीन शंकर ने बेल्जियम जागतिक Athletics इन डोअर स्पर्धेत 2.23 मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकवला आहे.
◆ स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी 200वी जयंती साजरी करण्यात येत आहे.
◆ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ने आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट मध्ये 5वे शतक झळकावले आहे.
◆ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ने आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट मध्ये रोहित शर्मा या खेळाडूच्या 5 शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
◆ नवी दिल्ली येथे आयोजित 51 व्या जागतिक पुस्तक मेळाचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ नवी दिल्ली येथे आयोजित 51 व्या जागतिक पुस्तक मेळाचा प्रमुख अतिथी सौदी अरेबिया हा देश आहे.
◆ World Goverment समिट 2014, 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दुबई येथे होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 338
सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी.
1] शक्ती पीठ महामार्ग लांबी:- 805 किलोमीटर
2] समृद्धी महामार्ग लांबी :- 701 किलोमीटर
शक्तीपीठ महामार्ग संबंधी :-
1] या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.
2] 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ येथील शक्तिपीठे, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर ही धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत.
3] महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग असा 12 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.
8 338
ऑस्ट्रेलिया मध्ये प्रथमच गीतेवर हात ठेवून शपथ
ऑस्ट्रेलियामध्ये सिनेटर म्हणून पदग्रहण करण्याच्या समारंभामध्ये घोष यांनी भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.
यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पंतप्रधानपदाची शपथ भगवत गीतेवर हात ठेवून घेतली होती. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ भगवत गीतेवर हात ठेवून घेणारे ते पहिले नेते ठरले होते.
8 338
डॉ. शोभणे यांना विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर🔥🔥
अमळनेर येथे झालेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांना सन 2023 या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर.
डॉ. परब यांना भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 तर डॉ. ठाले पाटील यांना भाषा संवर्धक पुरस्कार 2023
1] महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब (व्यक्ती) यांची तर वाद्मय चर्चा मंडळ, बेळगाव (संस्था) यांची निवड करण्यात आली आहे.
2] कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2023 साठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील (व्यक्ती) यांची तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक (संस्था) यांची निवड करण्यात आली असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
8 338
देशाला मोठ्या संकटातून बाहेर काढणाऱ्या रत्नांचा झाला सन्मान. [माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर]
1] माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव[राजकारणातील चाणक्य आणि आर्थिक उदारीकरणाचे जनक]
1971 ते 1973 या कालावधीमध्ये आंध प्रदेशचे मुख्यमंत्री होते. दक्षिण भारतातून पंतप्रधान झालेले पहिले व्यक्ती होते.
2] स्व. एम. एस. स्वामिनाथन['कृषिक्रांतीचे प्रणेते']
1967 :- पद्मश्री पुरस्कार
1971 :- मॅगसेसे पुरस्कार
1972 :- पद्मभूषण पुरस्कार
1987 :- जागतिक खाद्य पुरस्कार
1989 :- पदद्मविभूषण
3] माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह
चरणसिंह 1967 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला. त्याच्या मृत्यूच्या वेळी खात्यात केवळ 470 रुपये होते.
8 338
लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल.
👉 हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
