Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 136
مشترکین
-324 ساعت
-127 روز
-4430 روز
آرشیو پست ها
4 135
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #BJYM | 'युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ | मुंबई
https://www.youtube.com/live/xj3Ft02hD2I?si=VH5-Hs_HQQoRRaAB
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
My pranam to the great spiritual leader and profound philosopher, Jagadguru Sri Adi Shankaracharya, on his JayantiDin!
अद्वैत तत्त्वज्ञानाचे संस्थापक जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#आद्य_शंकराचार्य #SriAdiShankaracharya #Maharashtra
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Warm wishes to all officers on Civil Services Day who serve the nation with integrity, dedication and a deep sense of duty.
प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण भावनेने देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणार्या सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#नागरी_सेवा_दिन #CivilServicesDay #CivilServices #Maharashtra
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Pranam to the great martyr and 9th Sikh Guru, Shri Guru Tegh Bahadur Ji, on the occasion of Prakash Parv! His unparalleled sacrifice in protecting human rights and religion will be remembered for generations.
धर्म की रक्षा और मानव कल्याण के लिए अपना सर्वस्व बलिदान करने वाले, त्याग एवं वीरता के प्रतीक, सिखों के नौवें धर्मगुरु गुरु तेगबहादुर जी को प्रकाशपर्व पर कोटी कोटी वंदन।
#गुरु_तेगबहादुर #GuruTegBahadur #Maharashtra
4 135
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 20 एप्रिल 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/198340/
'विकसित महाराष्ट्र’ साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/198310/
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज; उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/198243/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 135
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : रुग्ण, रुग्णालये व शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या कामकाजाचा आढावा व राज्यामध्ये कार्यरत आरोग्यविषयक योजनांचे एकत्रिकरण करण्याच्या अनुषंगाने वॉर रूम स्थापन करण्यासंदर्भात बैठक पार पडली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, या ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यात कार्यरत असलेल्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये व शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी इम्युनो थेरेपी अतिशय खर्चिक असते. या थेरेपीचे एक इंजेक्शन साधारणतः ₹2 लाखांच्या घरात असून, उपचाराचा एकूण खर्च जवळपास ₹8 लाख असतो. या उपचारपद्धतीचा लाभ राज्यातील गरजू रुग्णांना देण्यासाठी नियोजन करावे. या योजनांच्या दुहेरी लाभांचे प्रकार टाळल्यास त्याचा खऱ्या गरजूंना जास्त प्रमाणात लाभ देता येईल. या उपक्रमामुळे दुहेरी लाभांचे प्रकार टाळता येतील.
नवीन वेबसाईटची वैशिष्ट्ये
✅अर्ज स्थितीचे ट्रेकिंग : यापुढे रूग्णांना अर्जाची माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएस, लिंकद्वारे रिअल टाईम मिळणार.
✅टप्प्या-टप्प्याने निधी वितरण : अर्जाच्या मंजुरीनंतर 30 टक्के रक्कम तात्काळ, उर्वरित 70 टक्के रक्कम अंतिम मंजुरीनंतर वर्ग केली जाणार.
✅रिअल-टाइम वॉर रूम मॉनिटरिंग : मंत्रालय स्तरावर वॉर रूमद्वारे सतत देखरेख, निर्णय प्रक्रियेत गती.
✅तात्काळ मंजुरी (कार्यालयीन आठ तासांत मंजुरी) : उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ कार्यालयीन आठ तासांत दिली जाते.
✅पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया : कागदपत्रांची देवाणघेवाण किंवा कार्यालयीन धावपळीशिवाय डिजिटल पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण.
✅रुग्णालयामार्फत थेट ऑनलाईन अर्ज : रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नाही रुग्णालयातूनच अर्ज सादर.
✅कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी : आधार, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका इ. तात्काळ डिजिटल पडताळणी.
✅थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) : मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा, पारदर्शकता वाढणार.
✅3000 पेक्षा अधिक रुग्णालयांचे जाळे : राज्यातील सरकारी व खासगी मिळून 3000+ रुग्णालयांचा समावेश.
✅हेल्पलाईन व डिजिटल मार्गदर्शन : टोल-फ्री 1800 123 2211 व व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन.
✅मोबाईल ॲपद्वारे रुग्णालय शोधता येणार : योजनेमधील जवळील रुग्णालय, रक्तपेढी, रुग्णवाहिका सहज शोधण्याची सुविधा.
✅एनजीओ व सीएसआर भागीदारी मॉडेल स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट सीएसआर निधीद्वारे अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध.
✅त्रिपक्षीय करार प्रणाली : रुग्णालय + सीएसआर संस्था + सीएमआरएफ यांच्यात विशिष्ट आजारासाठी करार खर्चाचा संयुक्त भार.
✅बेड मॅनेजमेंट व संसाधन पारदर्शकता : धर्मादाय रुग्णालयांतील बेड उपलब्धता रिअल-टाइम पाहण्याची सुविधा.
लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून संस्था नोंदणी करून शासनासोबत भागीदारी करू शकतात. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) संस्था आणि रुग्णालय यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे महागड्या उपचारांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरत आहे.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Transforming Healthcare Access Through CMMAF Digital Integration
Chaired a review meeting regarding the functioning of CM’s Relief Fund Cell and establishing a war room for the integration of health sector schemes under implementation across the State.
The new digital platform developed for the Chief Minister's Medical Assistance Fund (CMMAF) was inaugurated today. This platform will integrate multiple health sector schemes across the state, with a dedicated war room established to support this effort. With this initiative, the fund will evolve beyond being just a source of financial aid, emerging as an effective platform that connects patients, hospitals, and the government.
Directed that structured planning be undertaken to make costly medical treatments accessible to economically weaker patients, while preventing multiple claims for the same benefit to ensure wider and equitable support.
#Maharashtra #CMReliefFund
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046295972272390609?s=20
4 135
Action Plan for Balanced and Inclusive Development Across Maharashtra
Chaired a review meeting regarding the 'Viksit Maharashtra 2047' Vision Management Regulatory Board.
Directed departments to finalise a concrete action plan within stipulated timelines, with a clear focus on reducing regional disparities and ensuring balanced development across all districts.
On the lines of the Centre’s Aspirational Districts Programme, 10 aspirational districts and 174 aspirational talukas have been identified in the state, with focused efforts underway to drive development at the micro level. This approach will strengthen development indicators at both state and taluka levels, ensuring balanced and inclusive growth.
Ordered department-wise action plans to enhance Maharashtra’s performance in the Sustainable Development Goals Index. Directed the Planning Department to immediately issue guidelines for the first phase, while the Finance Department completes the financial evaluation of projects by April 30.
Directed departments to leverage alternative funding sources through public-private partnerships and land value capture policies. Emphasised the timely submission of utilisation certificates to secure maximum funds from the Central Government and instructed that all pending certificates be submitted without delay. Further directed that strategic decisions be undertaken to boost private investment, exports and consumption, with a strong focus on improving the ease of doing business.
Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Atul Save ji, Minister Nitesh Rane, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present.
#Maharashtra #VisionMaharashtra
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046293131545780444?s=20
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या राहता, अहिल्यानगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विखे पाटील कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे !
#Maharashtra #Ahilyanagar
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांना रेकॉर्ड मतांनी निवडून द्या...
भाजपा उम्मीदवार अक्षय कर्डिले इनको रिकॉर्ड मतों से विजयी बनाएं…
(जाहीर प्रचार सभा | अहिल्यानगर | 20-4-2026)
#Maharashtra #RahuriByElection
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'ज्येष्ठ नेते स्व. शिवाजीराव कर्डिले' एक अतिशय उमदे व दिलखुलास असे व्यक्तिमत्त्व होते.
'वरिष्ठ नेता स्व. शिवाजीराव कर्डिले' एक उमदा और दिलखुलास व्यक्तित्व थे।
(जाहीर प्रचार सभा | अहिल्यानगर | 20-4-2026)
#Maharashtra #RahuriByElection
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जनतेचा विश्वास, विकासाचा संकल्प; राहुरीत भाजपाच्या विजयाचे बिगुल!
आज राहुरी, अहिल्यानगर येथे ‘223- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक’ भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी आयोजित जाहीर प्रचारसभेत उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. याप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना अभिवादन केले.
ज्येष्ठ नेते स्व. शिवाजीराव कर्डिले हे अतिशय उमदे आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. धोरणी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. वांबोरी चारी आणि नळवंडे धरणाच्या पाण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरवठा करून ही कामे पूर्ण करून घेतली. त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले जे स्वप्न घेऊन मैदानात उतरले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. आपल्याला अक्षय कर्डिले यांना तीन-चतुर्थांश अशा विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे. या निवडणुकीत दिलेले प्रत्येक मत हे स्व. शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या मागणीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या परिसरातील काही जागा नवीन एमआयडीसीसाठी देण्यात येणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंत्री पंकजाताई मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #RahuriByElection
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046290237450854498?s=20
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
