Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 114
مشترکین
-124 ساعت
+37 روز
-3430 روز
آرشیو پست ها
4 114
CMO Maharashtra Tweets:
🔸Commencement of the 'Indian Jewellery Park Mumbai' project's work at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, Minister Ganesh Naik, MLA Manda Mhatre, Chairman of India Jewellery Park Mumbai, Kirit Bhansali and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' परियोजना के कार्य का शुभारंभ।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, विधायक मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई के अध्यक्ष किरीट भंसाली एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑1.55pm | 25-10-2026📍Navi Mumbai | दु. १.५५ वा. | २५-१०-२०२६📍नवी मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaJewelleryPark
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Such a proud and interesting thing !
https://x.com/Dev_Fadnavis/status/2114307710313533606?s=20
4 114
Full_Speech_India_Jewellery_Park_Mumbai_Project_Commencement_Ceremony.mp478.43 MB
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) प्रकल्पाच्या माध्यमातून 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार.
नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) परियोजना के माध्यम से रोजगार के 15 लाख अवसर सृजित होंगे।
(विविध विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण | रायगड | 25-10-2026)
#Maharashtra #Raigad #NAINAProject #Development
4 114
पुलावर दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिकांचा मुख्य रस्ता आणि प्रत्येकी दोन मार्गिकांचे सेवा रस्ते उपलब्ध आहेत. तसेच, 100 मीटर व्यासाचे मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेट उभारण्यात आले आहे. विमानतळाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस उभारण्यात आलेल्या क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक प्रवाहाला चालना मिळणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #NAINAProject #Development
4 114
CMO Maharashtra Tweets:
नैना प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला नवे 'ग्रोथ इंजिन' मिळणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पनवेल, रायगड येथे नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण केले. यात नैना टीपीएसमधील विविध पायाभूत प्रकल्प कामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुलभ कनेक्टिव्हिटीसाठी SBR 9 (Stilt Bridge), BR 4 व BR 5 पुलांचे लोकार्पण, उरण बाह्य वळण पुलाचे (Uran Bypass) लोकार्पण यांचा समावेश आहे.
नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे 15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी 5 लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनविण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नियोजनबद्ध विकासातून रोजगारनिर्मितीला चालना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नसून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. विमानतळाच्या प्रभाव क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करून नगररचना योजनांच्या माध्यमातून या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. या नियोजनबद्ध विकासातून रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
भूधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी शासन कटिबद्ध
भूधारकांच्या हातात जमिनीशी संबंधित कागदपत्रे दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विविध संकल्पनांतून नैना क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा
विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि नागरी वसाहती उभारणे नव्हे, नैना परिसरात रोजगार, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांमधून या क्षेत्रात विविध प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक संधी निर्माण होतील. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या परिसरातील विकासाला नैना क्षेत्रामुळे नवी दिशा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर राज्याच्या आर्थिक विकासाची प्रमुख केंद्रे ठरणार
महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी विविध विकासकेंद्रे विकसित होत आहेत. याच धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा परिसर आगामी काळात राज्याच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे इंजिन ठरेल. हा विकास भूमिपुत्रांना सोबत घेऊन आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करूनच केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पांविषयी माहिती
उरण बायपास ब्रिज
उरण शहरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सिडकोच्या वतीने नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरात हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान ₹50.26 कोटी खर्चून 11 मीटर रुंदीच्या बायपास पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 941 मीटर असून, त्यामध्ये 640 मीटर लांबीचा पूल, 153 मीटर लांबीचा पोहोच रस्ता आणि 148 मीटर लांबीचा जोडरस्ता समाविष्ट आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 1.75 मीटर रुंदीचे पदपथ असून, वाहनांसाठी 7.5 मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.
एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 प्रकल्प
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी पूर्वेकडून जलद, सुलभ आणि अखंड वाहतूक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सिडकोच्या वतीने ₹953 कोटी खर्चाचा एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 या तीन महत्त्वपूर्ण पुलांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल खाडी ओलांडून उभारण्यात आलेल्या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण या भागांतून राष्ट्रीय महामार्ग 4बीमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्गाशी पूर्वेकडून थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. या पुलांची एकूण लांबी मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेटासह 2593 मीटर असून, पुलाची एकूण रुंदी 60 मीटर आहे.
4 114
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕞 3.32pm | 25-10-2026📍Navi Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #NaviMumbai
https://www.youtube.com/live/RioBPOyIFpU?si=geVVqc6Qns8BmdfG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1093951093618803/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2114296704564703560?s=20
4 114
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕞 3.16pm | 25-10-2026📍Navi Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #NaviMumbai
https://www.youtube.com/live/bIhDuhOwS_4?si=9Lw9owqnWKQBlzqR
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1412432931049959
https://x.com/Dev_Fadnavis/status/2114292769367978149?s=20
4 114
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | India Jewellery Park Mumbai - Project Commencement Ceremony
🕒 2.52pm | 25-10-2026📍Navi Mumbai.
#Maharashtra #NaviMumbai #IndiaJewelleryPark
https://www.youtube.com/live/EgkjjkXOFMw?si=LOXFcb-XtSXwYyO8
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1116410097776250
https://x.com/Dev_Fadnavis/status/2114286733185646657?s=20
4 114
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पनवेल, रायगड येथे पात्र जमीनधारकांना मालमत्ता पत्रक आणि अंतिम भूखंडांसंदर्भातील प्रमाणित कागदपत्रांचे वितरण केले.
पात्र जमीनधारक
🔸गाव : नांदगाव
✅ राजाराम पाटील
✅ रामचंद्र भोईर
✅ नामदेव भोईर
✅ देवेंद्र भगत
✅ धनाजी खुटले
🔸गाव : देवद
✅ जगदीश वाघमारे
✅ गणेश गायकर
✅ वामन वाघमारे
✅ निलेश वाघमारे
✅ विनोद वाघमारे
#Maharashtra #DevendraFadnavis #Raigad #Development
4 114
CMO Maharashtra Tweets:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील गावांचा 225.59 चौरस किलोमीटर क्षेत्रात नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधण्यासाठी नैना प्रकल्प राबविण्यात येत आहे. जमीनधारकांचा सहभाग, ग्रामस्थांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार आणि सक्षम पायाभूत सुविधांच्या उभारणीतून आधुनिक शहर साकारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #NAINAProject
