es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 206
Suscriptores
-124 horas
-167 días
-8930 días
Archivo de publicaciones
CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : क्रीडा विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Ushering in a new era of digital governance through 'Maha eHRMS' Delighted to launch the ‘Maha eHRMS’ Digital Human Resource Management System at Sahyadri Guest House in Mumbai today, along with its key services: the ‘Maha eHRMS’ Mobile App, ‘Maha-IAS’ Portal and ‘Mentor-Mentee’ Portal. Maharashtra has emerged as a national leader in transforming human resource management through a series of far-reaching reforms. The Maha eHRMS is a notable example of this transformation, bringing greater efficiency, transparency and dynamism to public administration. This system will become a defining face of dynamic and technology-driven governance, showcasing yet another success story of Maharashtra’s digital capabilities and setting a benchmark for the nation. Government officials and employees often find themselves bound by rules, government resolutions and conventional practices. The Government Process Re-engineering (GPR) initiative marks a key step towards modernising the century-old paper-based administrative system making governance simpler, faster and technology-driven. Motivation is vital in public service, with career progression and promotions playing an important role. The new system will streamline promotions and bring the entire employee lifecycle from appointment to retirement onto a single digital platform. The General Administration Department deserves appreciation for its significant contribution to developing this system and advancing Maharashtra towards more efficient, technology-driven governance. Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Sunetratai Pawar, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Jaykumar Rawal, senior officials and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai #DigitalGovernance https://x.com/Dev_Fadnavis/status/2091917053376766227?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील हप्ता वितरीत. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर शेतकरी कर्जमुक्ति योजना 2026' के तहत राज्य के पात्र किसानों को दूसरे चरण की किस्त वितरित। ( मुंबई | 24-8-2026) #Maharashtra #Mumbai

CMO Maharashtra Tweets: महा eHRMSचा शुभारंभ, शासकीय सेवाप्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर मेंटी पोर्टल’ या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘जिज्ञासा’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले. देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे. 'महा ई-एचआरएमएस' प्रणाली ही गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक उत्तम यशोगाथा देशासमोर उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय व्यवस्थेमध्ये सेवा देताना अधिकारी, कर्मचारी शासन निर्णय आणि नियमांच्या चौकटीत पारंपरिक पद्धतीने कामकाज करत असतात, त्यात बदल करण्याच्या अनुषंगाने, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना अर्थात जीपीआर अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या व्यापक प्रशासकीय सुधारणांचा हा पहिला टप्पा आहे. शतकाहून अधिक काळ प्रचलित असलेल्या कागदाधारित प्रशासकीय कार्यपद्धती आणि सेवापुस्तकाच्या देखभालीचे आधुनिकीकरण करून त्या अधिक सुलभ, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रमाचा आणि प्रस्तावित एकात्मिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा हा प्रमुख घटक आहे. शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना 'मोटिव्हेशन' मिळणे हे महत्त्वाचे असते. यामुळे कामातील उत्साह कायम राहतो. शासकीय सेवेमध्येही पदोन्नती हे 'मोटिवेशन' आहे. या प्रणालीमुळे पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान होऊन शासकीय सेवेमध्ये नियुक्ती आदेशापासून ते सेवा निवृत्तीच्या कागदपत्रांपर्यंत संपूर्ण व्यवस्था डिजिटल स्वरूपात आली आहे. यंत्रणेमधील प्रत्येक अधिकाऱ्याला 'ग्राउंड रियालिटी'वर काम केलेले असल्यामुळे राज्यापुढील आव्हाने, प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अनुभवांचा, ज्ञानाचा चांगला उपयोग होतो. सामान्य प्रशासन विभागाने या प्रणालीच्या विकासात मोलाची भूमिका बजाविल्याबद्दल विभागाचे अभिनंदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ‘महा ईएचआरएमएस’मुळे 1935 पासून प्रचलित असलेल्या भौतिक सेवापुस्तकाऐवजी संरचित डिजिटल ई सेवा पुस्तक उपलब्ध होणार आहे. ई ऑर्डर मॉड्यूलमधून निर्गमित होणाऱ्या प्रत्येक आदेशाच्या आधारे संबंधित सेवाविषयक नोंदी स्वयंचलितपणे अद्ययावत होतील. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना एसएमएस अथवा ई-मेलद्वारे सूचना मिळतील. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण सेवाकालातील आदेशांनुसार डिजिटल सेवापुस्तक सातत्याने अद्ययावत राहील. जिज्ञासा, ‘मेंटॉर मेंटी’ पोर्टल आणि मोबाईल ॲप ‘जिज्ञासा’ हा स्वदेशी आणि सार्वभौम स्वरूपाचा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सहाय्यक आहे. आयएएस तसेच एआयएस सेवांशी संबंधित नियमांच्या आधारे तो प्रशिक्षित करण्यात आला आहे. त्याद्वारे अधिकाऱ्यांना सेवाविषयक नोंदी, लागू सेवा नियम, अनुज्ञेय हक्क आणि अन्य सेवाविषयक बाबींची माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल. ‘मेंटॉर मेंटी’ पोर्टलच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा क्षेत्रीय कामकाजाचा अनुभव, प्रशासकीय कौशल्ये आणि संस्थात्मक ज्ञान कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ईएचआरएमएस मोबाईल ॲपद्वारे अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही ठिकाणाहून वेतन पावती पाहणे, उपस्थितीची नोंद तपासणे तसेच रजेचा अर्ज सादर करणे अशा सेवांचा लाभ घेऊ शकतील. सर्व सेवा डिजिटली एकत्रित राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या महाराष्ट्र राज्य घटकाने हा सुरक्षित, ओपन सोर्सवर आधारित, एकात्मिक आणि भविष्यवेधी डिजिटल मानव संसाधन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ‘परिचय’ आणि ‘ नॅपिक्स' तंत्रज्ञानाचा त्यात वापर करण्यात आला असून, ई-ऑफिस, आयगॉट कर्मयोगी, महापार, सेवार्थ, एनपीएस, डिजिलॉकर, भाषिणी, ई-कॅबिनेट तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अन्य प्लॅटफॉर्मशी त्याची जोडणी करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचाही या प्लॅटफॉर्ममध्ये समावेश आहे. ‘जिज्ञासा’, ‘महा-एआय’ आणि ‘अनुभव एआय’ यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामासाठी बुद्धिमान सहाय्य उपलब्ध होईल. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मुझे विश्वास है कि मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी महिलाओं को आरक्षण देकर रहेंगे। (मुंबई | 24 -8-2026) #Maharashtra #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: 🤝 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the signing and exchange of an MoU between Association of Industrial Development (AID) and National Academy of Defence Production (NADP), Nagpur. 🔸Purpose of the MoU : ✅Strengthen industry-academy linkages. ✅Enhance experiential learning and innovation. ✅Support MSME and vendor ecosystem development. ✅Provide national and international industry exposure to defence production companies. ✅Enable internships and incubator-based learning for PGDM(BM) students. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairman Shivani Dani-Wakhare and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. 🔸सामंजस्य करारांची उद्दिष्टे : ✅उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे. ✅अनुभवाधारित शिक्षण आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे. ✅ एमएसएमई (MSME) आणि विक्रेता परिसंस्थेच्या विकासाला चालना देणे. ✅ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्राचा अनुभव (Exposure) मिळवून देणे. ✅PGDM (बिझनेस मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि स्टार्टअप इनक्यूबेटर-आधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content