Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 154
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4530 روز
آرشیو پست ها
4 154
CMO Maharashtra Tweets:
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 9 मधील पुणे महानगरपालिका - आपुलकी हेल्थकेअरच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावरील कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण संपन्न झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खासगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल.
कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो, हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत असून या माध्यमातून राज्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, आमदार राहुल कुल, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CancerCare
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
