Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 111
مشترکین
+3324 ساعت
+117 روز
-230 روز
آرشیو پست ها
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
बोगस मतदानाला आळा घालणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाच्या मताचा सन्मान राखणे, हीच SIR प्रक्रियेची खरी ताकद आहे. SIR मुळे निवडणूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन लोकशाहीचा पाया अधिक मजबूत होईल.
#Maharashtra #SIR #ElectionCommission
03 اکتبر, 11:29
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
समाजाचे भविष्य घडवण्यासाठी मातृभाषेचा आग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे.
(अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026चे उदघाटन | मुंबई | 3-10-2026)
#Maharashtra #अभिजातमराठी #ClassicalLanguage
03 اکتبر, 11:07
4 112
कलावंतांनी आपल्या अभिनयातून, लेखनातून आणि प्रयोगशीलतेतून मराठी रंगभूमीला वेगळी ओळख मिळवून दिली. ही नाट्यपरंपरा मराठीच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे वैशिष्ट्य आहे.
रोजच्या व्यवहारातून मराठीचे संवर्धन
मराठीचे जतन आणि संवर्धन केवळ शासकीय उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या दैनंदिन व्यवहारातून त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. घर, शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे अशा सर्व क्षेत्रांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर वाढला पाहिजे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मराठीला भविष्यातील सक्षम ज्ञानभाषा बनविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्यासह अन्य मान्यवर, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ClassicalLanguage #अभिजातमराठी
03 اکتبر, 10:37
4 112
CMO Maharashtra Tweets:
माय मराठीचा समृद्ध वारसा जपत, डिजिटल युगात तिचा विस्तार करूया!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’चे उदघाटन केले.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला 21व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा अभिमानाचा क्षण
मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी करून दिली.
मराठी शब्दसंपदा वाढविण्याची गरज
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा 13वा क्रमांक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. 20 व्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये 11 ते 13 लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे 6 लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण 3 ते 3.5 लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे 3 लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. विविध कोशांमध्ये लाखो मराठी शब्द नोंदविले गेले असून, ही शब्दसंपदा मराठीच्या समृद्ध भाषिक परंपरेचे दर्शन घडवते. मराठीचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्येही त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘मराठी AI’च्या माध्यमातून नव्या युगाशी नाते
डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत मराठीला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मराठीतील ज्ञानसामग्री उपलब्ध झाल्यास नव्या पिढीला मातृभाषेतून आधुनिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
बोलीभाषांचा गोडवाही जपला पाहिजे
प्रमाण मराठीसोबतच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा हा मराठीचा अमूल्य ठेवा आहे. कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी-अहिराणी, मालवणी, डांगी, झाडीबोली यांसारख्या बोलीभाषांमध्ये स्थानिक संस्कृती, लोकपरंपरा आणि जीवनानुभव सामावलेले आहेत. त्यामुळे या बोलींचे साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्ये जतन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मराठी नाट्यसंस्कृतीचाही विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असतानाही अनेक पिढ्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवली.
03 اکتبر, 10:37
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
आपणा सर्वांना 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या' मनःपूर्वक शुभेच्छा!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2024मध्ये मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा गौरव वाढविला. हा सन्मान प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या औचित्याने ‘मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त ‘मराठी भाषा सप्ताह 2026’चे उदघाटन केले.
मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, संस्कृती, इतिहास आणि विचारविश्वाची ओळख आहे. संत, साहित्यिक, कवी, शाहीर आणि लोककलावंतांच्या योगदानातून मराठीचे हे वैभव समृद्ध होत गेले. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनप्रवासावरील लीळाचरित्रापासून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीपर्यंत आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांपासून शाहिरी परंपरेपर्यंत मराठीने ज्ञान, अध्यात्म, समाजजागृती आणि लोकभावनांना समृद्ध अभिव्यक्ती दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासोबतच स्वभाषेचा अभिमान जपण्याची शिकवण दिली. त्यांच्या विचारांतून मराठीला स्वाभिमान, संस्कृती आणि अस्मितेचे बळ मिळाले. हीच समृद्ध परंपरा पुढे संत, समाजसुधारक, साहित्यिक आणि कलावंतांनी आपल्या कार्यातून अधिक व्यापक केली. त्यामुळे मराठी भाषा ही आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
मराठीचा अभिजात दर्जा हा आपल्या वैभवशाली भाषिक वारशाला मिळालेला सन्मान आहे. हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवताना मराठीचा सातत्याने वापर, तिचे संशोधन आणि तिच्या साहित्याचे जतन महत्त्वाचे आहे. कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी, आगरी, धनगरी, झाडीबोली अशा विविध बोलीभाषांनी मराठीचे सांस्कृतिक विश्व अधिक समृद्ध केले आहे. या विविधतेतूनच मराठीचे सौंदर्य आणि व्यापकता अधिक खुलून दिसते.
आज अभिजात मराठी भाषा सन्मानाच्या निमित्ताने माझ्या मनात एकच भावना आहे, आपल्या संस्कृतीसोबतच एक नवी डिजिटल संस्कृतीही आकार घेत आहे. या नव्या विश्वातही मराठीचा ठसा उमटला पाहिजे. ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा अधिकाधिक प्रसार करून मराठीचा डंका जगभरात वाजवूया.
#Maharashtra #ClassicalLanguage #अभिजातमराठी
https://x.com/Dev_Fadnavis/status/2106391010607816853?s=20
03 اکتبر, 10:30
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
देशात सर्वाधिक साहित्य संमेलने मराठी भाषेत होतात, याचा अभिमान आहे.
(अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026चे उदघाटन | मुंबई | 3-10-2026)
#Maharashtra #अभिजातमराठी #ClassicalLanguage
03 اکتبر, 10:06
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी तिचा वापर, वावर आणि संशोधन महत्त्वाचे आहे.
(अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026चे उदघाटन | मुंबई | 3-10-2026)
#Maharashtra #अभिजातमराठी #ClassicalLanguage
03 اکتبر, 10:05
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासोबतच स्वभाषेचा अभिमान बाळगण्याची शिकवण दिली.
(अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026चे उदघाटन | मुंबई | 3-10-2026)
#Maharashtra #अभिजातमराठी #ClassicalLanguage
03 اکتبر, 10:04
4 112
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’चे उदघाटन करून व्हिजिटर नोटमध्ये आपला अभिप्राय नोंदवला.
#Maharashtra #DevendraFadnavis #ClassicalLanguage #अभिजातमराठी
03 اکتبر, 09:51
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
India’s Hockey Glory Continues! 🇮🇳🥇🏑
Heartiest congratulations to the Indian Men’s Hockey Team on defending their crown and creating history by winning the Gold at the Asian Games 2026 with a commanding 5-1 victory over Malaysia in the final! A historic 5th Asian Games Men's Hockey gold and direct qualification for the LA 2028 Olympics make this victory even more special! Best wishes to the Indian team for the road ahead.
#AsianGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
03 اکتبر, 08:55
4 112
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त 'मराठीचिये कौतुके भाग - 2' या पुस्तकाचे प्रकाशन केले. देश-विदेशात मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या आकाशवाणी वरील मुलाखतींचा या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे.
यावेळी मंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. हेमलता बागला व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ClassicalLanguage #अभिजातमराठी
03 اکتبر, 08:24
