LetsUpp Marathi
رفتن به کانال در Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
نمایش بیشتر6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
6 624
शेतकऱ्याचा नादखुळा, एकाच झाडावर घेतलं देशी-विदेशी आंब्याचं उत्पादन
LetsUpp | Trending
▪️ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ येथील एका शेतकऱ्यानं एकाच आंब्याच्या झाडावर २२ प्रकारच्या जातीच्या आंब्यांचं उत्पादन घेतलं आहे.
▪️ काकासाहेब सावंत असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने एकाच आंब्याच्या झाडावर 22 प्रकारच्या जातीचे आंबे घेण्याची किमया साधलीय.
▪️ एकाच झाडाला सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली आहेत.
▪️ त्यापैकी 22 जातीचे कलम लागू झाले आणि यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला 22 प्रकारचे आंबे आले आहेत.
या जातीच्या आंब्यांचा समावेश :
▪️ केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी
▪️ यातील काही आंब्याचा तोडा झाला असून 22 जातीच्या मिळून जवळपास 700 आंबे लागले होते. काही जातीचे 4-4 डझन तर काही जातीचे 2-3 डझन आंबे लागले आहेत.
सावंत यांचा थोडक्यात प्रवास :
▪️ जत तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली.
▪️ या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीतही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली आहे.
▪️ दरम्यान, सावंत यांना नर्सरीच्या व्यवसायात वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
To know more click here
https://letsup.app.link/w7UrffUqYgb
6 624
लस घेतल्यानंतर हाताला चिकटल्या लोखंडी वस्तू : व्हायरल व्हिडिओने संभ्रम
LetsUpp | Trending
● कोरोनाच्या लसीबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम अवस्था आहे. नाशिकमधील सिडको येथील एका ज्येष्ठ नागरिकाने डाव्या दंडावर लस घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही हाताला स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
● जिल्हा प्रशासनाने हा संशोधनाचा विषय असल्याचं सांगितलं असलं तरी आता ग्रामीण भागात हा व्हिडीओ व्हायरल झाला तर आदिवासींमध्ये आणखी उदासीनता निर्माण होण्याची शक्यता आहे.
● सिडकोच्या शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहे. कोरोना लस घेतलेल्याच्या हाताला लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचं समजल्यावर त्याने वडिलांच्या हातावर हा प्रयोग करून बघितला आहे.
● वडिलांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू, कॉईन, चमचे चिटकत असल्याचे निदर्शनास आले. हाताला घाम आला असेल म्हणून त्यांनी हात धुतला, मात्र पुन्हा हाच प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही अशा वस्तू चिटकत असल्याचे समोर आले आहे.
● याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही हा संशोधनचा विषय असल्याचं सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर वस्तू चिकटत असल्याचा दावा डॉ. थोरात यांनी फेटाळून लावला आहे. सदर इसमाची तपासणी करत तज्ञ मंडळींकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/Oc8wgxLnYgb
6 624
भारताचे ऐतिहासिक पाऊल; कोरोना लसीच्या 'या' चाचण्या करणारा पहिला देश
LetsUpp l Positive News
● कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जाते. यासाठी २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी ट्रायल करण्यात आली आहे. जगात छोट्या वयातील मुलावर कोरोना चाचणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
● भारत बायोटेकची कोवॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे. लसीची चाचणी करण्यासाठी तीन गटात मुलांना विभागण्यात आलं आहे.
● पहिल्या गटात २-६ वयोगटातील मुले. दुसऱ्या गटात ६ ते १२ वयोगट तर तिसऱ्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे. याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत.
जगातील पहिलीच चाचणी
● लसीच्या चाचणीचे मुख्य संशोधक बालरोग तज्ज्ञ प्रोफेसर वीएन त्रिपाठी म्हणाले की, २ वर्षाच्या मुलांवर कोरोना चाचणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. इतक्या छोट्या वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी कुठेच झाली नाही. आता २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.
● रशियाची स्पुतनिक आणि झायडस कॅडिला लसीची चाचणीही झाली. लस उत्पादन करणाऱ्या अन्य कंपन्या कानपूरमध्ये चाचणी करण्यासाठी प्रयत्नात आहे. कोवॅक्सिनचं नेजल स्प्रे पुढील महिन्यात येणार आहे.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/oheeh7XiYgb
6 624
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी
LetsUpp | Trending
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द झाली मात्र निकाल कशापद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह
पालकांचे लक्ष लागून होते.
● या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील
कार्यपद्धती जाहीर केली.
असे होणार निकालाबाबतचे मूल्यमापन
● यामध्ये नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्याक्षिक/
अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे.
● त्यानुसार इयत्ता नववीतील 100 पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी 30 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
● निकाल कधी जाहीर होणार? : दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
To know more click here
https://letsup.app.link/OxjBy0lPXgb
6 624
*आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण; जाणून घ्या सर्व काही!*
LetsUpp | Trending
● आज गुरुवारी १० जून रोजी या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे.
● हे सूर्यग्रहण दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी लागेल आणि संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी संपणार आहे.
● अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.
● भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसेल. म्हणून सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळ मानला जाणार नाही.
● हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर कॅनडा आणि रशिया आणि आशियामध्ये अंशतः दिसेल.
● भारतात अरुणाचल प्रदेश आणि लडाखचा भाग वगळता, सूर्यग्रहण दिसणार नाही.
To know more click here
https://letsup.app.link/ICra0CCVXgb
6 624
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर
LetsUpp | Trending
● आज राज्यात १०,९८९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तसेच आज १६,३७९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले
राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरेहोण्याचे प्रमाण ९५.४५% झाले आहे
● आज राज्यात २६१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४% एवढा
झाला आहे.
● आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ५८,६३,८८० नमनुे पॉझिटिव्ह आलेआहेत.
● सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/U7h5zXhWWgb
6 624
एक नजर या घडीच्या महत्वाच्या बातम्यांवर...
(स्रोत : लेट्सअप न्यूज नेटवर्क)
-
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
(Link in the bio)
6 624
एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये विश्व विक्रमाची नोंद
LetsUpp | International
● एखाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्याला वेड्यात काढाल. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिला असून याची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. गोसियामी धमारा सिटहोल असं या माहिलेचे नाव आहे.
● ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. गरोदर असतानाच डॉक्टरांनी या महिलेला सहा बाळं होतील असा अंदाज व्यक्त केला होता.
● मात्र ७ जून रोजी या महिलेच्या पोटात फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत आहे.
देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/wheaTovMWgb
6 624
MHT CET साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
LetsUpp | Trending
● MHT CET २०२१ साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ८ जूनपासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ७ जूलैपर्यंत अर्ज करु शकतात.
● इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी, फार्माकोलॉजी किंवा अॅग्रीकल्चर एज्युकेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट mahacet.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता.
● महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एमएचटी सीईटी २०२१ च्या ऑनलाईन नोंदणी आणि अर्जाच्या शेवटच्या तारखेची घोषणा केली.
● इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजी, फार्मेसी, आणि फार्म डी डिग्री कोर्सेस पहिल्या वर्षामध्ये प्रवेश करण्यासाठी एमएचटी सीईटी अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डवर आधारित असेल.
To know more click here
https://letsup.app.link/bFGYkOpJWgb
6 624
पहा व्हिडिओ : https://www.instagram.com/p/CP5TzUfplwm/
letsupp.marathi
कोकण रेल्वेला भीषण आग!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप रेल्वे स्टेशन परिसरात कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती सामान ठेवण्याच्या कोचला लागली आग... आगीची भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
रिपोर्टर : विवेक ताम्हणकर
व्हिडिओ एडिटर : सुहास साबळे
-
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
6 624
कोरोना लसींच्या किंमती निश्चित; असे आहेत नवीन दर
LetsUpp | Covid Helpline
● देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसीचे डोस केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
● दरम्यान 25 टक्के लसी खासगी क्षेत्रात उलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
● आता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांमध्येदेखील कोरोना लसींच्या कमाल किंमती किती असतील, हे केंद्र सरकारने निश्चित करून दिले आहे.
खासगी रुग्णालयांत अशा असणार लसींच्या किंमती :
• कोविशिल्ड: 780 रुपये
• कोवॅक्सिन: 1410 रुपये
• स्पुतनिक व्ही: 1145 रुपये
● दरम्यान आता लसीकरणाच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना चाप बसणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर!
https://letsup.app.link/ojBXz5cjWgb
6 624
1 सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार?
LetsUpp | Trending
● बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा जुलैअखेर घेऊन, 15 ऑगस्टपर्यंत निकाल आणि 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
● तर बीए, बीकॉम, बीएससी अशा विनाव्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी आणि घेऊ नये, असे दोन प्रवाह आहेत.
● त्यामुळे प्रत्यक्षात बारावीचे निकाल हाती आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
● कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनता आपलीच आहे. त्यांना मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नातून कौशल्यपूर्ण पाच अभ्यासक्रम सुरू करीत आहोत.
● लवकरच स्वतःच्या जागेत हे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
To know more click here
https://letsup.app.link/GPN7eGHsWgb
6 624
एसव्हीएस कंपनीच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
LetsUp | Pune
● पुण्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे औद्याोगिक वसाहतीतील एसव्हीएस केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आग प्रकरणात पोलिसांनी कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
● याबाबतची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात 15 महिलांसह 3 पुरुषांचा समावेश आहे.
● ग्रामिण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या संपूर्ण घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पौड पोलीस ठाण्यात एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा (रा.सहकारनगर) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
● तर पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी : कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीएनए चाचणी तसेच रक्तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.
To know more click here
https://letsup.app.link/Y8Q2FeCfVgb
6 624
etsupp.marathi
जागतिक समुद्र दिनी समुद्र संरक्षणाची प्रतिज्ञा करूया!
.
जागतिक समुद्र दिनी जीवसृष्टीच्या संरक्षणाबद्दल जाणून घेऊ अन् समुद्र संरक्षणाची प्रतिज्ञा करूया!
रिपोर्टर: सोनाली सावंत
प्रोड्युसर: श्रुती मुंगीकर
व्हिडिओ एडिटर : रचना रोहेकर
-
फॉलो करा 👇🏻
@letsupp.marathi
@letsupp.marathi
@letsupp.marathi
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
6 624
https://www.instagram.com/p/CP3HCajJvj2/
letsupp.marathi
जागतिक समुद्र दिनी समुद्र संरक्षणाची प्रतिज्ञा करूया!
.
जागतिक समुद्र दिनी जीवसृष्टीच्या संरक्षणाबद्दल जाणून घेऊ अन् समुद्र संरक्षणाची प्रतिज्ञा करूया!
रिपोर्टर: सोनाली सावंत
प्रोड्युसर: श्रुती मुंगीकर
व्हिडिओ एडिटर : रचना रोहेकर
-
फॉलो करा 👇🏻
@letsupp.marathi
@letsupp.marathi
@letsupp.marathi
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
(Link in the bio)
6 624
आषाढी वारीसाठी वारकरी शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला
LetsUpp | Trending
● पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज माझी भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिले आहेत.
● कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन.
● विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
To know more click here
https://letsup.app.link/Cmb46Bn5Ugb
