fa
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
letsupp.marathi आयबीपीएस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! (Source: IBPS) - बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर! https://letsupapp.page.link/apps (Link in the bio)

photo content

photo content

धक्कादायक! सावत्र आईने दिले मुलाच्या गुप्तांगाला असह्य चटके LetsUp | Nashik ● दिंडोरी तालुक्यात पाडे या गावात सावत्र आई आणि मावशीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ● सावत्र आईकडून मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ● सावत्र मुलाच्या गालावर, पोटावर, पायावर आणि गुप्तांगावर असह्य चटके दिल्याचा प्रकार घडला आहे. ● घरात लहान मुलांच्या होणाऱ्या भांडणाची कुरापत काढून 10 वर्षाच्या मुलाला सावत्र आईने आधी अमानुष पणे मुलाला मारहाण करत नंतर संपूर्ण शरीरावर चटके देत अमानुष अत्याचार केला आहे. ● सदर मुलगा मूकबधिर असून वडील घरी आल्यानंतर सांख्यिकी भाषेत त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितल्याने या घटनेला वाच्यता फुटली आहे. ● जखमी केलेल्या मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सावत्र आईला दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ● केलेल्या कृत्याप्रकरणी आईवर पोक्सो सारखी कारवाई करण्यात आली असल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं आहे. ● कौटुंबिक वादातून जन्मदाती आई सोडून गेल्यानंतर मुलाची मावशी असलेली सावत्र आई तरी या मूकबधिर मुलाचा सांभाळ करेल, अशी अपेक्षा होती, मात्र मातृत्वाच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. To know more click here https://letsup.app.link/ZLVxH1dVUgb

photo content

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेली नेजल व्हॅक्सिन, आहे तरी काय? LetsUpp l Covid Helpline ● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना नेजल व्हॅक्सिनचा उल्लेख केला. ● “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. या दिशेने देखील दोन लसींची ट्रायल वेगाने सुरू आहे. ● आता देशात एका नेजल व्हॅक्सिनवरदेखील संशोधन सुरू आहे. याला इंजेक्शन न देता नाकात स्प्रे केलं जाणार आहे. ● देशाला नजीकच्या काळात या लसीवर यश मिळाल्यास यामुळे भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येईल.” असं पंतप्रधान मोदींनी सांगितले. निर्मिती : -कोवॅक्सीन बनवणाऱ्या हैदराबादमधील भारत बायटेकची निर्मिती असणाऱ्या आणि नकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरु केली आहे. -बीबीव्ही 154 असे या नेजल व्हॅक्सिनची म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचे नाव आहे. ही लस प्रि क्लिनिकल टप्प्यामध्ये आहे. ही इंटरनेजल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. -फेब्रुवारी महिन्यामध्ये सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने भारत बायोटेकला या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती. -नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/mNdB1mwEUgb

VIDEO : पुणे दुर्घटना घटनास्थळाचे EXCLUSIVE फुटेज... LetsUpp | Pune पुण्यातील पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागल
VIDEO : पुणे दुर्घटना घटनास्थळाचे EXCLUSIVE फुटेज... LetsUpp | Pune पुण्यातील पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये महिला कामगारांचा अधिक समावेश होता. घटनास्थळावरील ग्राउंड रिपोर्ट : व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/9-XuJLPmTVg पहा पुणे दुर्घटनेवर राजकीय मंत्र्यांची प्रतिक्रिया व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/4i5SmYuU1T0 To know more click here https://letsup.app.link/y1YNRbrWUgb

photo content

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार; विविध मुद्द्यांवर होणार चर्चा LetsUpp l Trending ● राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेते आज (दि.8) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ● दरम्यान या भेटीमध्ये लसीकरण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. ● मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरील चर्चेसाठी पंतप्रधानांच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली आहे. ● मराठा आरक्षणाचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. ● दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा: -सकाळी 7 वाजता : विमानाने दिल्लीकडे प्रयाण. -सकाळी 9.45 वाजता महाराष्ट्र सदन येथे आगमन. -सकाळी 11 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बैठक स्थळ : प्रधानमंत्री निवास, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली. -बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण. To know more click here https://letsup.app.link/aBmDW58sUgb

...तर असा आहे 'आम्ही पोहेकर' या पोहे ब्रॅंडचा यशस्वी प्रवास! Letsupp | Special ● महाराष्ट्रातील नाश्त्याचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे पोहे. पोहे कुणाला आवडत नाहीत असे लोक अगदी तुरळक आढळून येतात. तर नाश्त्याचा हा तात्काळ बनणारा पदार्थ चहाच्या वेळी खायला विशेष पसंती दिली जाते. ● वेगवेगळ्या भागामध्ये हे पोहे तयार करण्याची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे या पोह्यांना सगळीकडूनच स्वीकृती मिळाली. आहे. दरम्यान सध्याच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना याचा पोह्यांनी काही तरुणांनी व्यवसाय सुरू केला आहे. ● पुण्यातील काही आयटी इंजिनिअर तरुणांनी 'आम्ही पोहेकर' हा पोह्यांचा पिझ्झा, बर्गर या प्रमाणे हॉटेलची रचना आणि इंटिरिअर करून पोह्याला देखील एक ब्रॅंड बनवलं आहे. ● संकेत, तुषार, सुरज, मेघराज, महेश, प्रितम हे सहा मित्र पुण्यात एकत्र राहायचे यावेळी ते दररोज पोह्यांचा नाश्ता करायचे त्यानंतर त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण पोहे विक्रीचा व्यवसाय का करू नये ? त्यानंतर सुरू झाला 'आम्ही पोहेकर' या पोहे ब्रॅंड चा यशस्वी प्रवास ● यामध्ये या मित्रांना दिल तुषार याच्या बहिणीची त्यांना विशेष मदत झाली तिने या अगोदर एक स्टार्टअप स्पर्धा जिंकली होती. मग या इनोव्हेटिव्ह पोहे ब्रॅंड ने भेळ, पोह्याचे बर्गर, पोह्याचा दहीतडका, पोह्याची मिसळ, पोहे चीझ बॉल असे विविध १५ प्रकार लॉन्च केले. ● व्यवसायासाठी भांडवल हवं होतं. कर्ज मिळालं पण जागा ठरत नव्हती मग सदाशिव पेठ, नारायण पेठ या स्पर्धा परीक्षांचे हब असलेल्या ठिकाणी नारायण पेठेत हे स्टार्टअप सुरू झालं ● तर आता हे तरुण पोह्यांची क्वालिटी सारखी रहावी यासाठी पोहे बनवण्याचे प्रमाण सारखे ठेवण्यासाठी त्यांच्याकडून आता मशीन देखील तयार करण्यात येत आहे. ● हळूहळू या पोह्यांची चव सर्वदूर पसरली आणि संध्याकाळच्या वेळी देखील पोहे खाण्यासाठी या हॉटेलमध्ये येऊ लागले. ● सध्या लॉकडाऊनमुळे यामध्ये विशेषता शाळा, कॉलेज बंद असल्याने तसेच बहुतेक नोकरदार वर्ग देखील बाहेर पडत नसल्याने या तरुणांच्या व्यवसायाला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पार्सल सुविधा सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/j5bnyzJwTgb

पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, 14 जणांचा मृत्यू LetsUpp | Pune ● पुण्यातल्या उरवडे जवळ एसव्हीएस कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर कंपनीत 15 ते 20 कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ● या ठिकाणी तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे त्या कंपनीच्या परिसरात पोचलेले आहेत. ● आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आतमध्ये अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ● मुळशी तालुक्यातील लावासा रोडवर उरवडे गावाच्या जवळ ही कंपनी असून या कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचं काम सुरु होतं. (टीप : बातमी अपडेट होत आहे.) To know more click here https://letsup.app.link/mLHZsfnBTgb

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज काय घोषणा केल्या? वाचा! LetsUpp | Trending पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. काय आहेत या घोषणा पाहुयात. काय आहेत घोषणा? ● 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार. ● सरकार लस उत्पादकांकडून लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन राज्य सरकारांना विनाशुल्क देणार. ● ज्यांना मोफत लस नको असेल, त्यांना खासगी रुग्णालयात 150 रुपये भरून लस घेता येणार. ● लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. राज्यसरकारला खर्च करण्याची गरज नाही. ● नोव्हेंबरपर्यंत 80 कोटींहून अधिक देशवासीयांना दरमहा निश्चित प्रमाणात मोफत धान्य दिले जाणार. To know more click here https://letsup.app.link/aLwM8TTzTgb

केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; अन्यथा होईल दंड! LetsUpp | National ● देशात कोट्यावधी हेल्मेट दुय्यम दर्जाची किंवा बनावट आहेत. या बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. ● हेल्मेट खरेदी करताना आयएसआय मानके पूर्ण करते का? तसे सर्टिफिकेट आहे का हे पाहणे गरजेचे आहे. 1 जूनपासून सर्व दुचाकीस्वारांना आयएसआय मार्क हेल्मेट असणे बंधनकारक झाले आहे. हे हेल्मेट BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) सर्टिफाइड असणे गरजेचे आहे. ● काय आहे नियम ● रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशांकानुसार दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट बीआयएस प्रमाणित असायला हवे, या हेल्मेटवर आयएसआयचे चिन्ह असायला हवे. ● हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि १ वर्षांचा कारावास देखील भोगावा लागणार आहे. जो कोणी आयएसआय सर्टिफाईड नसलेले हेल्मेटचे उत्पादन करेल, विक्री करेल त्याला एक वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/DIyMQtatTgb

पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर कॉल केल्यास कागदपत्रातील त्रुटी दूर करून मिळवा 8 वा हप्ता... (स्रोत - पीएम किसान ) - फॉलो कर
पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर कॉल केल्यास कागदपत्रातील त्रुटी दूर करून मिळवा 8 वा हप्ता... (स्रोत - पीएम किसान ) - फॉलो करा 👇🏻 @letsupp.marathi @letsupp.marathi @letsupp.marathi बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर! https://letsupapp.page.link/apps (Link in the bio)

19 सप्टेंबरपासून रंगणार आयपीएलचा थरार... Letsupp | Cricket ● बीसीसीआयकडून कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीत करण्यात आलेले आहे. ● माहितीनुसार, येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा हंगाम पुन्हा सुरू होणार असून १५ ऑक्टोबरला अंतिम सामना पार रंगणार आहे. ● यासंदर्भात बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. बीसीसीआयकडून दुबई आणि शारजा येथे आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ● त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी खेळाडूंची उपलब्धता या संदर्भात देखील यावेळी चर्चा झाली. त्यामध्ये जवळ-जवळ सर्व परदेशी खेळाडू उपलब्ध असतील असे दिसत आहे. ● त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना लवकरच उर्वरित आयपीएल सामने पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. T20 क्रिकेट स्पर्धेचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर https://letsup.app.link/Z6sbg8enTgb

मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा LetsUpp | Trending ● मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात दि.९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ● या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ● या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षित स्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ● अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले. ● हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. To know more click here https://letsup.app.link/8QGGw5GiTgb

केंद्राकडून कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी LetsUpp | Covid Helpline ● देशातील कोरोनाची दुसरी लाट कमी होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यापूर्वी कोरोना उपचारावर जे उपाय केले जात होते, ते सर्व औषधे हटविण्यात आले आहेत. जाणून घेऊया सविस्तर ... ● कोरोना रुग्णांना नव्या गाईडलाईननुसार खालील बाबी न करण्याचा सल्ला दिला आहे. - वाफ घ्यायची नाही. - कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाही. - कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाही. - आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाही. - Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करायचा नाही. - ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही. ● ही आहेत कोरोनाची लक्षणे.... ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/9N3oVsghTgb

दहावीचा निकाल कधी होणार जाहीर? जाणून घ्या LetsUpp | Trending ● कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत
दहावीचा निकाल कधी होणार जाहीर? जाणून घ्या LetsUpp | Trending ● कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. ● राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. ● दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. ● शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. ● दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी 15 जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. To know more click here https://letsup.app.link/kcC4MzYcTgb

मुख्यमंत्री थोड्याच वेळात संवाद साधणार LetsUpp | Trending ● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद
मुख्यमंत्री थोड्याच वेळात संवाद साधणार LetsUpp | Trending ● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. ● आज दुपारी 12:30 वाजता ते बोलणार असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ● दरम्यान राज्यात आजपासून अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. ● मुख्यमंत्री आज आशा सेविकांना मार्गदर्शन करणार आहे. ● तसेच राज्यातील आशा सेविकांशी बालरोग तज्ञ टास्क फोर्सचा संवाद देखील असणार आहे. ● यामध्ये डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई यांच्यासह डॉ आरती किणीकर हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. To know more click here https://letsup.app.link/MG2ENRE3Sgb

अयोध्येतील मशिदीला स्वातंत्र्य सैनिकाचे नाव LetsUpp | National ● अयोध्येत 5 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या अयोध्या मशिद-हॉस्पिटल प्रोजेक्टचे नाव स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतीकारी मौलवी अहमद शाह फैजाबादी यांच्या नावावरुन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौलवी अहमद शाह फैजाबादी आजच्याच दिवशी 164 वर्षांपूर्वी शहीद झाले होते. ● मशिद ट्रस्टने याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे मशिद, हॉस्पिटल, संग्रहालय, रिचर्स सेंटर आणि कम्युनिटी किचनला फैजाबादी यांचे नाव असेल. फैजाबादी यांचे 1857 च्या उठावात महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी दोन वर्ष अवध प्रांताला ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त ठेवलं होतं. ● सुन्नी वक्फ बोर्डाने नेमलेल्या ट्रस्टने नऊ महिन्यांपूर्वीच स्पष्ट केलं होतं की, मशिदीला मुघल सम्राट बाबरचे नाव देण्यात येणार नाही. टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना IICF सचिव अथर हुसैन म्हणाले की, फैजाबादी यांच्या शहीद दिनी, आम्ही संपूर्ण प्रोजेक्टला त्यांचे नाव देण्याचं ठरवलं आहे. फैजाबादी हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक आहेत. देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/isQKIXrKRgb