fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 708 مشترک است و جایگاه 5 597 را در دسته آموزش و رتبه 11 970 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 708 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 06 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -81 و در ۲۴ ساعت گذشته برابر -3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.92% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 344 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 068 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 07 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 708
مشترکین
-324 ساعت
-477 روز
-8130 روز
آرشیو پست ها
photo content

photo content
+3

photo content
+9

photo content

Congratulations 💐💐✌️✌️ ऑलिम्पिक मध्ये पुरूष हॉकी संघाने 🏑🏑41 वर्षानंतर कांस्य पदक जिंकले🇮🇳🇮🇳
Congratulations 💐💐✌️✌️ ऑलिम्पिक मध्ये पुरूष हॉकी संघाने 🏑🏑41 वर्षानंतर कांस्य पदक जिंकले🇮🇳🇮🇳

Congratulations 💐💐✌️✌️ ऑलिम्पिक मध्ये पुरूष हॉकी संघाने 🏑🏑कांस्य पदक जिंकले🇮🇳🇮🇳

🟪जैवतंत्रज्ञान विभागाची "बायोटेक-प्राइड“ मार्गदर्शक तत्त्वे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने "बायोटेक-प्राइड (माहिती विनिमयाद्वारे संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन / Promotion of Research and Innovation through Data Exchange) मार्गदर्शक तत्त्वे" विकसित केली आहेत. देशभरातील संशोधक आणि संशोधन संस्थांदरम्यान माहितीची देवाणघेवाण करणे तसेच प्रगत संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देणे, असे उद्दिष्ट ठेवून ही मार्गदर्शके ठरविण्यात आली आहेत. जैविक माहितीसंग्रह तयार करण्याच्या बाबतीत सर्वोत्तम 20 राष्ट्रांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सुरुवातीला, ही मार्गदर्शक तत्त्वे रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी येथे इंडियन बायोलॉजीकल डेटा सेंटर (IBDC) मार्फत अंमलात आणली जातील. इतर विद्यमान माहिती केंद्रे IBDC याला जोडली जातील, ज्याला “बायो-ग्रीड” या नावाने संबोधले जाईल. बायो-ग्रीड हे जैविक घटकांचे ज्ञान, माहितीसाठी एक राष्ट्रीय भांडार असेल.

🟪पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रुपी’चा शुभारंभ; सेवेबद्दल जाणून घ्या. ‘ई रुपी’ सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. ‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते. भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.

🟪पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू. पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. राज्य सरकारने शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते. करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार असून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्व प्राथमिक शाळा व पहिली दुसरीचे वर्ग मार्च २०२० नंतर १० महिन्यांनी सुरू झाले आहेत. सर्व शाळा दोन ऑगस्टपासून सुरू करण्याच्या आदेशापूर्वी २६ जुलैला दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जी मुले शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध असणार आहेत. डॉक्टर्स व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कोणत्या अहवालानुसार सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते व आप नेते हरपाल सिंह चिमा यांनी केला आहे. राज्यात ६०.५ लाख विद्यार्थी असून एकूण २० टक्के लोकसंख्येचा जीव धोक्यात टाकला जात आहे असे त्यांनी सांगितले.

🟪आसाम-मिझोरम सीमा संघर्ष. 26 जुलै 2021 रोजी आसाममधील कछर जिल्ह्याला लागून असलेल्या मिझोरमच्या सीमेवर संघर्ष झाला आणि हा संघर्ष गोळीबारापर्यंत पोहचला. त्यात सहा पोलीस आणि नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जन जखमी झाले. ▪️संघर्षाचे मूळ. आसामचा सीमावाद मिझोरमसोबतच त्याला लागून असलेल्या सहा राज्यांसोबत सुरू आहे. आता झालेल्या संघर्षांमागे अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप दोनही राज्यांनी केला आहे. ब्रिटिशांच्या काळात आसाम-मिझोरम सीमासंघर्ष सुरू झाला. 1830 सालापर्यंत कछर (आताचा आसाममधील जिल्हा) हे स्वतंत्र राज्य होते. 1832 साली तेथील राजाचा मृत्यू झाला. राजाचा कुणीही उत्तराधिकारी नसल्याने ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’ (भारतातील संस्थाने ताब्यात घेण्यासंदर्भात ब्रिटिशांनी बनवलेले धोरण) धोरणानुसार ते राज्य ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतले आणि कछर राज्य ब्रिटिश वसाहतीचाच भाग बनले. त्यावेळी मिझो हिल्स येथील स्थानिक आदिवासी म्हणजेच मिझो समुदायाकडून त्या भागामध्ये होणाऱ्या लुटालूटीच्या घटना वाढल्यामुळे ब्रिटिशांनी आसाममधील डोंगराळ व आदिवासी प्रदेशांना वेगळे करण्यासाठी 1875 साली इनर लाईन रेग्युलेशन (ILR) कायदा लागू केला आणि मिझो आदिवासीना त्यांच्या भूखंडचा मालकी हक्क दिला. पुढे 1933 साली ब्रिटिशांनी कछर राज्य आणि मिझो हिल्स यांच्यामध्ये औपचारिकता म्हणून सीमारेषा ठरवली. या निर्णयाला मिझो आदिवासी समुदायाने विरोध दर्शवला. ▪️वर्तमान वादाचा मुद्दा. मिझोरममधील तीन जिल्हे आयजोल, कोलासिब आणि ममित हे आसाममधील कछर, करीमगंज आणि हैलाकांडी या जिल्ह्यांना लागून आहेत. तिनही जिल्ह्यांमधून आसाम-मिझोरमची 164.6 कि.मी.ची लांब सीमा आहे. 1950 साली आसाम भारतातील एक राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यावेळी आसाममध्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोरम या प्रदेशांचाही समावेश होता. पुढे कालांतराने नवीन राज्ये अस्तित्वात आली आणि पूर्वीच्या सीमावादाला तोंड फुटले. ‘पूर्वोत्तर क्षेत्र कायदा-1971’ अन्वये आसामाची विभागणी करून मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही राज्ये तयार करण्यात आली. त्यानंतर 1987 साली मिझो शांती करारानुसार मिझोरम वेगळे राज्य तयार करण्यात आले. असे असले तरी 1875 सालाच्या इनर लाईन रेग्युलेशन (ILR) याचा स्वीकार केलेला असल्याची भूमिका मिझो आदिवासी समुदायाकडून घेतली जाते. त्यामुळे हा वाद अजूनही सुटलेला नाही.

🟪नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार - केंद्र सरकार. भारत सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीचा उद्घाटन समारंभ २३ जानेवारी २०२१ रोजी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. दरम्यान, केंद्र सरकारने २३ जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली १२५ जयंतीनिमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस स्मारक नाणे, आणि टपाल तिकीटाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. २३ जानेवारी २०२१ रोजी कोलकाता आणि ५ मार्च २०२१ रोजी जबलपूर येथे आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन देखील करण्यात आले होते.

'पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्स महानियंत्रक कार्यालय’ (CGPDT) येथे आढावा बैठक संपन्न 31 जुलै 2021 रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत ‘पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्स महानियंत्रक कार्यालय’ (CGPDT) येथे एक आढावा बैठक घेतली. कार्यालयाने चालविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, बौद्धिक संपदा अधिकारविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याविषयी चर्चा केली. पेटंट, डिझाईन्स स्वामीत्व हक्क आणि ट्रेडमार्क्सची तपासणी आणि मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सुधारणांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ▪️ठळक बाबी... भारतात पेटंट, संरचना, ट्रेडमार्क्स, GI सिस्टिम यांची व्यवस्था अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी केंद्रीय सरकार कटिबद्ध आहे. देशात नवोन्मेष आणि संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच, भारताच्या पारंपरिक व्यवस्थेतून नवनवी संशोधने जागतिक व्यासपीठावर आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. संपूर्ण देशात महिला उद्योजक, स्टार्टअप तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भराव्या लागणाऱ्या शुल्कात जवळपास 80 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लघुउद्योजक, महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यालयात कोणतेही अर्ज अथवा समस्यांचा निपटारा करण्यासाठी नवी कालमर्यादा आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर केला जात आहे. उदाहरणार्थ, ट्रेडमार्क नियम 74 याच्या अर्जाच्या जागी आता आठ एकत्रित अर्ज असतात. गेल्या पाच सहा वर्षात भारतात पेटंट, स्वामीत्व हक्क यांना मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत जलद गतीने वाढ झाली आहे. 2015-16 या वर्षामध्ये 6,326 पेटंटना मंजूरी देण्यात आली होती, जी संख्या तुलनेत 2020-21 या वर्षामध्ये 28,391 पर्यंत पोहचली आहे. तसेच, ट्रेडमार्क नोंदणीत वाढ झाली असून 2020-21 या वर्षामध्ये 2,55,993 मंजुऱ्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, कॉपीराइट म्हणजेच स्वामीत्व हक्क देण्यात त्यांची संख्या गेल्या आर्थिक वर्षात 16,402 पर्यंत पोहोचली. ▪️पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालय... पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालय (CGPDTM) मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत हे कार्यालय कार्यरत आहे. ‘पेटंट कायदा 1970’, ‘डिझाईन कायदा 2000’ आणि ‘ट्रेडमार्क्स कायदा 1999’ या सर्व कायद्यांच्या अंमलबजावणीवर हे कार्यालय देखरेख ठेवते. तसेच, या सर्व विषयांवरील प्रकरणांवर सरकारला आवश्यक तो सल्ला देण्याचेही काम हे कार्यालय करते. पेटंट कार्यालयाचे मुख्यालय कोलकाता इथे आहे, ट्रेड मार्क नोंदणी मुंबईत आहे, तर GI नोंदणी चेन्नईत केली जाते. पेटंट माहिती व्यवस्था आणि राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था नागपूर इथे आहे.

📚MPSC डायरी📚 स्टेटबोर्ड,NCERT,YCMOU,IGNOU,CBSE,GOV'T WEBSITES,Etc.वर आधारित समकेंद्री पद्धतीने मांडणी केलेले महाराष्ट्रात प
📚MPSC डायरी📚 स्टेटबोर्ड,NCERT,YCMOU,IGNOU,CBSE,GOV'T WEBSITES,Etc.वर आधारित समकेंद्री पद्धतीने मांडणी केलेले महाराष्ट्रात पहिले आणि एकमेव पुस्तक 📚पुस्तकात समाविष्ट विषय 🟢 भूगोल {प्राकृतिक/भारत/महाराष्ट्} 🔵 पर्यावरण 🟣 सा.विज्ञान{जीवशास्त्र/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र} 🔴 इतिहास {प्राचीन भारत/ मध्ययुगीन भारत/ आधुनिक भारत/ महाराष्ट्र/समाजसुधारक} 🟠 राज्यशास्त्र / पंचायतराज 🟡 अर्थशास्त्र 📚पुस्तकाची वैशिष्ट्ये:- ✔️ सर्व विषयांच्या अफलातून Tricks चा समावेश असणारे पुस्तक ✔️ Maps, Mind map, Flowcharts, Tables असणारी उत्कृष्ट मांडणी ✔️ राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये तब्बल 49 प्रश्नांची उत्तरे आढळणारे एकमेव पुस्तक. ________________________ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. ________________________ ▪️Online booking Available http://www.simplifiedcart.com/mpsc-diary-by-nace-academy/pid-437405704

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪Combine पूर्व 2020 4 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. www.simplifiedcart.com
🟪Combine पूर्व 2020 4 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. www.simplifiedcart.com

🟪पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रुपी’चा शुभारंभ 🔸‘ई रुपी’ सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. 🔸ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. 🔸 ‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. 🔸नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. 🔸 ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते. 🔸भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. 🔸कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. 🔸 जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. 🔸३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. 🔸भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. 🔸नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे. www.simplifiedcart.com

🟪ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक भारतासाठी स्टार अँथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्
🟪ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक भारतासाठी स्टार अँथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे. क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे.

📚MPSC डायरी📚 स्टेटबोर्ड,NCERT,YCMOU,IGNOU,CBSE,GOV'T WEBSITES,Etc.वर आधारित समकेंद्री पद्धतीने मांडणी केलेले महाराष्ट्रात प
📚MPSC डायरी📚 स्टेटबोर्ड,NCERT,YCMOU,IGNOU,CBSE,GOV'T WEBSITES,Etc.वर आधारित समकेंद्री पद्धतीने मांडणी केलेले महाराष्ट्रात पहिले आणि एकमेव पुस्तक 📚पुस्तकात समाविष्ट विषय 🟢 भूगोल {प्राकृतिक/भारत/महाराष्ट्} 🔵 पर्यावरण 🟣 सा.विज्ञान{जीवशास्त्र/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र} 🔴 इतिहास {प्राचीन भारत/ मध्ययुगीन भारत/ आधुनिक भारत/ महाराष्ट्र/समाजसुधारक} 🟠 राज्यशास्त्र / पंचायतराज 🟡 अर्थशास्त्र 📚पुस्तकाची वैशिष्ट्ये:- ✔️ सर्व विषयांच्या अफलातून Tricks चा समावेश असणारे पुस्तक ✔️ Maps, Mind map, Flowcharts, Tables असणारी उत्कृष्ट मांडणी ✔️ राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये तब्बल 49 प्रश्नांची उत्तरे आढळणारे एकमेव पुस्तक. ________________________ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. ________________________ ▪️Online booking Available http://www.simplifiedcart.com/mpsc-diary-by-nace-academy/pid-437405704

photo content
+4