fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 737 مشترک است و جایگاه 5 619 را در دسته آموزش و رتبه 12 029 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 737 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -8 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.91% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 369 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 282 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 737
مشترکین
-1324 ساعت
-127 روز
-830 روز
آرشیو پست ها
photo content
+6

photo content
+9

photo content
+9

Buy Online Simplified Piblication Book https://www.simplifiedcart.com

photo content

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० (GS-2) मध्ये चालू घडामोडीच्या अनुषंगाने आलेले प्रश्न...

🟪हॉर्नबिल फेस्टिव्हलचे आयोजन नागालैंड *नागालँड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त (1 डिसेंबर 1963) दरवर्षी हॉर्नबिल फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते*. यावर्षी 1 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान हॉर्नबिल फेस्टिव्हलची 22 वी आवृत्ती आयोजित केली जाईल. नागा हेरिटेज व्हिलेज येथे राज्याच्या पर्यटन आणि कला आणि संस्कृती विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सणाला हॉर्नबिल पक्ष्याचे नाव देण्यात आले असून हा *सण 2000 साली सुरू झाला*. हॉर्नबिल हा *अरुणाचल प्रदेश आणि केरळचा राज्य पक्षी आहे*. हे भारतीय खंड आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. हा सांस्कृतिक उत्सव नृत्य, संगीत आणि पारंपारिक खाद्यपदार्थांसह, नागा समाजातील विविधतेचे प्रतिबिंब असलेल्या नागा समुदायाच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे वर्षानुवर्षे स्वीकारलेले कलात्मक प्रदर्शन आहे. त्याला 'उत्सवांचा उत्सव' असेही म्हणतात. नागालँडच्या समृद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि जतन करणे तसेच तिची परंपरा प्रदर्शित करणे हा या उत्सवाचा उद्देश आहे. ▪️नागालँड स्थापना दिवस ५९ वा नागालँडचा स्थापना दिवस ०१ डिसेंबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला. ▪️*नागालँड 1 डिसेंबर 1963 रोजी भारतीय संघराज्याचे 16 वे राज्य म्हणून अस्तित्वात आले*. नागालँड पूर्वेला *म्यानमार*, उत्तरेला *अरुणाचल प्रदेश*, पश्चिमेला *आसाम* आणि दक्षिणेला *मणिपूरने* वेढलेले आहे. सरमती पर्वत रांग नागालँड आणि म्यानमार दरम्यान नैसर्गिक सीमा तयार करते, जी नागालँडची सर्वोच्च टेकडी देखील आहे*. राज्यातील सुमारे 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि येथील *मुख्य अन्न पीक हे भात* आहे, याशिवाय एकूण शेतीच्या 70% भागावर भाताची लागवड केली जाते. स्लॅश आणि बर्न पद्धतीची शेती येथे प्रचलित आहे ज्याला स्थानिक भाषेत *झुम शेती* म्हणतात. राज्यातील दिमापूर जिल्हा संपूर्ण देशाशी रेल्वे आणि हवाई वाहतुकीने जोडलेला आहे. ▪️हॉर्नबिल पक्षी. हॉर्नबिल हा उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय आफ्रिका, आशिया आणि मेलेनशियामध्ये आढळणारा पक्षी आहे. *भारतात धनेश म्हणूनही ओळखले* जाते. हॉर्नबिल्स लांब, वक्र आणि चमकदार असतात.

🟪अंजू यांना अ‍ॅथलेटिक्समधील सर्वोत्कृष्ट महिलेचा पुरस्कार भारताच्या माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून वर्षांतील सर्वोत्कृष्ट महिला या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरात युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतल्याने ४४ वर्षीय अंजू यांना २०२१ या वर्षांतील सर्वोत्तम महिलेचा बहुमान मिळाला आहे. अंजू यांनी २००३ मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली होती. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या अद्यापही भारताच्या एकमेव अ‍ॅथलेटिक्सपटू आहेत. बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात झालेल्या आभासी पुरस्कार वितरण सोहळय़ात अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अ‍ॅथलेटिक्ससाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. ‘‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने मला या पुरस्कारासाठी पात्र समजल्याने मी त्यांचे आभार मानते. ज्या क्षेत्राने आपली ओळख निर्माण केली. त्यासाठी योगदान देण्याचा आनंद निराळाच आहे.

🟪नाशिकमधे आजपासून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात 🔲 आज सकाळी टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयातून निघालेल्या ग्रंथ दिंडीनं संमलेनाला प्रारंभ झाला. 🔲 नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यावेळी उपस्थित होते. 🔲 या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यांसह, विविध ढोल - लेझीम आणि नृत्य पथकं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात या ग्रंथदिडीचा समारोप झाला.  🔲 या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं.  🔲 संमेलनामध्ये प्रथमच चित्र-शिल्प अशा प्रकारचे वेगळे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे  उद्घाटन चित्रकार विजयराज बोधनकर तसेच भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. 🔲 नाशिकच्या संमेलनाने हा अनोखा पायंडा पाडला असल्याचं बोधनकर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान या संमेलनासाठी सर्व प्रकारच्या नियमांची दक्षता घेण्यात येत आहे. 🔲 प्रवेशद्वारावर लसीकरण झालेल्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाचीही व्यवस्था संमेलनात करण्यात आली आहे. 🔲 सुमारे दीडशे ग्रँथ प्रदर्शनाचे स्टॉल्स याठिकाणी उपलब्ध आहेत. संमेलन स्थळी जाण्यासाठी नाशिक महापालिकेच्या 50 ग्रीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 🔲 ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडे चार वाजता संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. 🔲 संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. 🔲 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन माध्यमातून, तर गीतकार जावेद अख्तर हे सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित असणार आहेत. विविध युट्युब वाहिन्या आणि फेसबुक पेजवरूनही या सोहळ्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

🟪चक्रीवादळ जवाद भारतीय हवामान विभागाने देशभरात चक्रीवादळ जवाद संदर्भात अलर्ट जारी केला आहे. हे वादळ ४ डिसेंबरला *ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर* धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे चक्रीवादळ ३ डिसेंबर रोजी मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. ▪️जवाद म्हणजे काय...? जवाद *सौदी अरेबियाच्या सूचनेवरून* या वादळाला नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द आहे. *अरबी शब्दात त्याचा अर्थ 'परोपकारी किंवा दयाळू' असा आहे*. त्यामुळे हे वादळ फारसे धोकादायक ठरणार नाही. या चक्रीवादळाचा सामान्य जीवनावर इतर चक्री वादळांसारखा विनाशकारी परिणाम होणार नाही.

🟪प्रदूषण वाढल्याने दिल्लीतील शाळा पुन्हा बंद. वायुप्रदूषणाच्या वाढलेल्या स्तराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जातील, असे दिल्ली सरकारने गुरुवारी जाहीर केले. तथापि, बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सुरू राहतील आणि अध्ययन व अध्यापन ऑनलाइन केले जाईल, असेही स्पष्ट केले. शहरात वायुप्रदूषण वाढले असतानाही शाळांचे वर्ग पुन्हा सुरू केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली सरकारची कानउघाडणी केल्यानंतर राज्य सरकारे हा निर्णय घेतला. ‘हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल हा हवामानविषयक अंदाज विचारात घेऊन आम्ही शाळा पुन्हा सुरू केल्या होत्या. तथापि, वायुप्रदूषणाचा स्तर पुन्हा वाढला असल्याने, शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद करण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितले. तर, बोर्डाच्या सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. १३ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आलेले शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांतील प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून पुन्हा सुरू झाले होते. मेट्रो रेल्वे आणि बसगाडय़ा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी सध्याची परिस्थिती योग्य नाही, असे राय यांनी करोनाच्या नव्या उपप्रकारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा हवाला देऊन सांगितले.

🟪वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार ; राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स (अनुज्ञप्ती)नसताही वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ ला अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती. तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे.

🟪दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक ; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना. राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील सरळसेवेची पदे भरण्यासाठीची कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. ही पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगाला विहित कालावधीत मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दर वर्षी मागणीपत्रे पाठविली जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मागणीपत्रे पाठविली जात नसल्यामुळे पदे दीर्घकाळ रिक्त राहून, त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या पुढे सरळसेवेच्या रिक्त पदांच्या भरतीची मागणीपत्रे प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजे पदोन्नत्तीच्या निवडसूचीच्या वर्षांच्या सुरुवातीस एमपीएससीला सादर करावीत, अशा सूचना राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत. राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात लोकसेवा आयोगाला सादर करावयाच्या मागणीपत्रांबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट या कालावधीत रिक्त पदांची गणना करणे, तसेच सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदांची संख्या निश्चित करून, त्यानुसार एमपीएससीला मागणीपत्रे सादर करायची आहेत. सेवानिवृत्ती आणि पदोन्नत्तीमुळे रिक्त होणारी पदेही विचारात घेणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण निश्चित करुन पदभरतीची मागणी पत्रे सादर करावयाची आहेत.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० (GS-2) मध्ये चालू घडामोडीच्या अनुषंगाने आलेले प्रश्न...

CSAT SAMPAL COPY- 2021.pdf7.32 MB