fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 737 مشترک است و جایگاه 5 619 را در دسته آموزش و رتبه 12 029 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 737 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -8 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.91% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 369 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 282 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 737
مشترکین
-1324 ساعت
-127 روز
-830 روز
آرشیو پست ها
महापरिनिर्वान दिनानिमीत्त ५०% सवलतीमध्ये उपलब्ध Simplified CSAT 6th Edition at Rs. 280﹢ shipping charge Buy directly from my
महापरिनिर्वान दिनानिमीत्त ५०% सवलतीमध्ये उपलब्ध Simplified CSAT 6th Edition at Rs. 280﹢ shipping charge Buy directly from my website - link 1 👇👇👇www.simplifiedpublication.com/SimplifiedBooks/simplified-csat-6th-edition-/5919567388?gsdbdo link 2 👇👇👇👇 https://jsdi.al/posYt contact at 9423333181 खाली दिलेली Sample Copy आवश्य पहा

Buy Online Simplified Piblication Book https://www.simplifiedcart.com

photo content

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

Buy Online Simplified Piblication Book https://www.simplifiedcart.com

🟪वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार ; राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स (अनुज्ञप्ती)नसताही वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ ला अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती. तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे.

🟪दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक ; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना. राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील सरळसेवेची पदे भरण्यासाठीची कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. ही पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगाला विहित कालावधीत मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दर वर्षी मागणीपत्रे पाठविली जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मागणीपत्रे पाठविली जात नसल्यामुळे पदे दीर्घकाळ रिक्त राहून, त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या पुढे सरळसेवेच्या रिक्त पदांच्या भरतीची मागणीपत्रे प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजे पदोन्नत्तीच्या निवडसूचीच्या वर्षांच्या सुरुवातीस एमपीएससीला सादर करावीत, अशा सूचना राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत. राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात लोकसेवा आयोगाला सादर करावयाच्या मागणीपत्रांबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट या कालावधीत रिक्त पदांची गणना करणे, तसेच सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदांची संख्या निश्चित करून, त्यानुसार एमपीएससीला मागणीपत्रे सादर करायची आहेत. सेवानिवृत्ती आणि पदोन्नत्तीमुळे रिक्त होणारी पदेही विचारात घेणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण निश्चित करुन पदभरतीची मागणी पत्रे सादर करावयाची आहेत.

🟪 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने नवीन COVID-19  प्रकार B.1.1.529  चे Omicron  म्हणून वर्गीकरण केले आहे. ▪️ओमिक्रॉन बद्दल: वर्गीकरण ओमिक्रॉनला जागतिक स्तरावर प्रबळ डेल्टा, तसेच अल्फा, बीटा आणि गामा या कमकुवत प्रतिस्पर्ध्यांसह, COVID-19 प्रकारांच्या सर्वात त्रासदायक श्रेणीमध्ये ठेवते. दक्षिण आफ्रिकेशिवाय मलावीहून आलेल्या व्यक्तीमध्ये इस्रायलमध्ये ओमिक्रॉन आढळून आले आहे.

🟪'बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन - भारताच्या अभियानाचे नेतृत्व सिंधूकडे. ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ होत असून, या स्पर्धेत भारताच्या अभियानाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे आहे. याशिवाय लक्ष्य सेन तसेच पुरुष दुहेरीतील आशास्थान सात्त्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक सात खेळाडू वर्षांअखेरच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. परंतु या स्पर्धेत २०१८मध्ये जेतेपद मिळवण्याची किमया साधणारी एकमेव भारतीय खेळाडू सिंधू उपांत्य फेरीचा अडथळा पार करून प्रतिष्ठेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अ-गटात समावेश असलेल्या सिंधूची पहिली लढत अग्रमानांकन लाभलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगशी होणार आहे. श्रीकांतने २०१४मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्याची सलामी मलेशियाच्या द्वितीय मानांकित ली झि जियाशी होणार आहे. पदार्पणवीर लक्ष्य आणि सात्त्विक-चिराग यांना खडतर गटाचे आव्हान आहे. अ-गटात लक्ष्यला ऑलिम्पिक विजेता व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन, दोन वेळा विश्वविजेता केंटो मोमोटा, रॅसमस गेमके यांना सामोरे जावे लागेल.

🟪आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय स्थगित. नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे यापूर्वी ठरल्यानुसार १५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय सरकारने बुधवारी घेतला. ही उड्डाणे सुरू करण्याचे यापूर्वी जाहीर केल्यानंतर, करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तित विषाणूबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय फिरवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची नवी तारीख यानंतर अधिसूचित केली जाईल, असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सांगितले. करोना महासाथीमुळे नियोजित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक २३ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली आहे.

🟪जगातील सर्वात महागडं शहर कोणतं? पॅरिस किंवा लंडन नाही, तर. आधुनिकता, श्रीमंती किंवा उच्च राहणीमान या सगळ्या गोष्टींवरून जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन वगैरे येऊ शकतं. पण आपल्या या सगळ्या अंदाजांना बाजूला सारत अनपेक्षितपणे एक वेगळंच शहर जगातलं सर्वात महाग शहर ठरलं आहे. वर्ल्डवाईड कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स हा अहवाल इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं तयार केला असून त्यामध्ये यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे सर्वात महाग ठरलेल्या शहरासमोर जगातील महासत्तांमधली शहरं देखील फिकी पडली आहेत! इस्त्रायलमधलं तेल अविव हे शहर जगातलं सर्वात महागडं शहर ठरलं आहे. या अहवालातील निष्कर्षांनुसार, तेल अविवपाठोपाठ पॅरिस आणि सिंगापूर ही दोन शहरं संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर त्यामागे तिसऱ्या स्थानी झुरिच आणि चौथ्या स्थानी हँगकाँग आहे. हमखास महागडं वाटणारं न्यूयॉर्क या यादीमध्ये सहाव्या स्थानी तर जिविव्हा सातव्या स्थानी आहे. जिनिव्हापाठोपाठ आठव्या स्थानी कोपनहेगन, नवव्या स्थानी लॉस एंजेलिस आणि दहाव्या स्थानी जपानमधील ओसाका हे शहर आहे.

🟪 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
+1
🟪 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

4_5862963347854459578.pdf

photo content
+3

photo content
+9

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळाव
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.